* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: I AM ANOTHER YOU:A JOURNEY TO POWERFUL BREAKTHROUGHS
  • Availability : Available
  • Translators : SWATI KALE
  • ISBN : 9789353171452
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 160
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : NON-FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
I AM ANOTHER YOU IS A STORY OF BREAKTHROUGHS. POWERFUL, LIFE CHANGING BREAKTHROUGHS. YOU START THIS JOURNEY WITH THE AUTHOR, YEARS AGO TRYING TO ESCAPE FROM A WORLD THAT DID NOT FEEL RIGHT. YOU TRAVEL WITH HER IN THIS MAGICAL JOURNEY TO THE NETHERLANDS, WHERE SHE LEARNS THE GREATEST LESSONS OF HER LIFE BY TAKING PART IN SOME AMAZING PROCESSES IN THE TRADITION OF THE ANCIENT SPIRITUAL MASTERS AND HEALDERS WHO HELP HER REALIZE THAT THE ONLY PLACE WHERE WRONG IS `RIGHTENED` IS WITHIN. THERE IS NOTHING WRONG WITH THE WORLD OUTSIDE IF WE SORT OUT THE WORLD INSIDE. THERE ARE SOME STORIES THAT EVERYONE RELATES TO, BECAUSE THEY INVOLVE YOU THROUGH THOUGHTS AND FEELINGS THAT ARE UNIVERSAL, THIS IS SUCH A STORY. A LIFE PURPOSE FOR EXAMPLE IS SOMETHING EACH OF US IS LOOKING FOR. A DESIRE TO ACHIEVE MORE FROM LIFE AND LIVE AT A HIGHER SELF, IS SOMETHING EVERYONE WANTS. A SPIRITUAL INCLINATION TO SEEK DEEPER, BEYOND MATERIAL FULFILLMENT EACH OF US PURSUES SOONER OR LATER. THERE ARE NUMEROUS PLACES IN THE BOOK WHERE YOU FIND YOURSELF STOPPING, DRAWING PARALLES TO YOUR OWN LIFE AND FINDING ANSWERS. IN AN HONEST NARRATIVE EXTRACTED FROM REAL LIFE EXPERIENCE, THE BOOK TAKES YOU THROUGH STRUGGLE, OVERCOMING AND VICTORY OVER SELF. THE BOOK DEALS WITH BREAKTHROUGHS THAT CAN BE USED BY ANYONE TO ACHIEVE PERSONAL SUCCESS IN THE TRUE SENSE OF THE WORD. PRIYA, WHO IS A CORPORATE TRAINER BY PROFESSION, WEAVES LEARNINGS INTO EACH CHAPTER, SUBTLY, OBSERVING THE MEANING BEHIND EVERY EXPERIENCE, POINTING IT OUT TO THE READER WITHOUT BEING OBVIOUS AND LEADING YOU TO THINK AND FIND MEANING AND PURPOSE IN YOUR OWN LIFE SITUATION AS IT IS NOW AND WHERE YOU DESIRE TO TAKE IT FROM HERE. A BOOK OF MANY LESSONS, MANY INSIGHTS AND MANY TRUTHS, IT HAS THE POWER TO AWAKEN YOU TO YOUR BEST SELF. THIS BOOK WILL URGE YOU TO TAKE THAT PATH YOU ALWAYS KNEW WAS RIGHT BUT NEVER HAD THE COURAGE TO FOLLOW. IT WILL GUIDE YOU, HUMOUR YOU, INSPIRE YOU, TOUCH YOU AND ABOVE ALL LEAD YOU TO YOUR LIFE`S CALLING.
‘प्रतिरूप’ हे पुस्तक म्हणजे पारंपरिक पद्धतीचे "SELF HELP" पुस्तक नाही. हे पुस्तक म्हणजे असंख्य मानसिक, आध्यात्मिक अडथळ्यांवर मात करीत मिळवलेल्या विजयाची गोष्ट आहे. नेदरलँडला लेखिका स्वशोधाकरिता एकटी जाते. तेथे शमन्स जमातीच्या विधींमध्ये सहभागी होते आणि तेथून तिचा अंतर्मनातील प्रवास सुरू होतो. तिच्या प्रवासात आपण प्रवासी म्हणून कधी सामील होतो, हे कळतच नाही. या पुस्तकात प्रत्येक विधीचे एक प्रकरण आहे. सर्वच विधी अंतर्मुख करायला लावतात. प्रत्येक विधीतून ईश्वरीय सत्य उलगडत जाते. जीवन अनेक शक्यतांचे बनले आहे. सर्वच शक्यतांचा प्रवास आपण करू शकत नाही; पण या पुस्तकाद्वारे सर्व शक्यतांचे ज्ञान मात्र होऊ शकते. जर आपले अंतर्मन योग्य दिशेने नेले, तर बाह्य जगात कोणतीच गोष्ट चुकीची नाही. लेखिका महिनाभर नेदरलँडच्या रहिवाशांबरोबर तसेच चौथ्या पिढीतील शमन्सबरोबर होती. शमन्स ही प्राचीन जमात आहे, जी आध्यात्मिक उत्क्रांती आणि मुक्तीसाठी काही आध्यात्मिक क्रिया करते. भौतिक आणि आध्यात्मिक जगातील दुवा म्हणून शमन्सकडे पाहिले जाते. ‘शमनीझम’ हा आध्यात्मिक ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव आहे. असे म्हणतात की, शमन्स आत्म्यावर उपचार करतात. उपचार करून तुमच्यातून नष्ट झालेली ऊर्जा ते परत मिळवून देतात. लेखिकेच्या वैयक्तिक पातळीवरील प्रवासात आपण पुस्तकरूपाने सहभागी होतो; पण आपल्या लगेच लक्षात येते की, हा फक्त लेखिकेचा वैयक्तिक प्रवास नाही; लेखिकेच्या प्रवासात आपण सर्वच सहभागी आहोत. ‘मी म्हणजे दुसरे तुम्हीच!’ हे पुस्तकाचे नाव या दृष्टीने सार्थ ठरते. या पुस्तकातून अनेक सनातन मूल्यांचा शोध लागतो. आपल्या नियतीला आपणच आकार देऊ शकतो. गुरू आपल्यातच असतो. निराश होणे अथवा आनंदी राहणे हे पर्याय आहेत. कोणता पर्याय निवडायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. याचक आणि गुरू यामध्ये फरक नसतो. फरक दृष्टिकोन आणि प्रवृत्तीचा असतो. आपणच गुरू असतो आणि शिष्यही! आयुष्य आपणास दोन्ही बाजूंनी शिकवते. अशी अनेक सनातन मूल्ये आपणास जागोजागी भेटतात. अनेक लहानसहान रोचक प्रसंग लेखिकेने शब्दरूपाने फुलवले आहेत. प्रत्येक प्रकरण वाचकाला नवीन अनुभव देऊन जाते. प्रत्येक वेळी नवीनच सत्य समोर येते. मानवधर्म हा वैश्विक आहे. प्रत्येक मनुष्य सारखाच आहे आणि वैयक्तिक पातळीवर त्याचा झगडाही सारखाच आहे. या सर्व झगड्यांतून जात असताना हाती येणारे वैश्विक सत्य चिरंतन असते आणि हाच धागा पकडून लेखिकेने आपल्या समर्थ शैलीने फार नाजूकपणे विणला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#SWATI KALE#PRIYA KUMAR#I AM ANOTHER YOU#PRATIROOP# #स्वाती काळे# प्रिया कुमार#आय अ‍ॅम अनदर यू# प्रतिरूप#
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 13-01-2019

    आयुष्यावर मिळवलेल्या विजयाची कथा... ‘आय अ‍ॅम अनदर यू’ हे इंग्रजीतील बऱ्यापैकी चर्चा झालेलं पुस्तक. प्रिया कुमार यांच्या स्वत:च्याच अनुभवावर आधारित या पुस्तकाला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचाच स्वाती काळे यांनी केलेला मराठी अनुवाद म्हणजे – परतिरूप. प्रिया कुमार आयुष्यातील एक टप्प्यावर काही कारणाने नेदरलॅण्डला गेल्या. त्यांचा तो परदेशप्रवास म्हणजे एकप्रकारे पळवाट होती. प्राप्त परिस्थितीपासून दूर जाण्याची. मात्र ही पळवाट प्रत्यक्षात त्यांच्या आयुष्याचा मार्ग उजळवणारी प्रकाशवाट ठरली. ती कशी, ते कळण्यासाठी प्रतिरूप वाचलं पाहिजे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 09-12-2018

    प्रियाकुमार या लेखिकेनं असंख्य अडचणींवर मात करत मिळवलेल्या विजयाची ही कहाणी. एके काळी तिला या जगापासून दूर जायचं होतं. तिथल्या एका जमातीनं केलेल्या काही विधींमुळं ‘चुकीची जागा सुयोग्य होऊ शकते ती फक्त स्वत:च्या अंतर्मनातच. आपलं अंतर्मन योग्य दिशेनं नलं, तर बाह्य जगात कोणतीच गोष्ट चुकीची नाही,’ असं तिला समजतं. त्यातून तिनं केलेला प्रामाणिक झगडा आणि त्यावर तिनं मिळवलेल्या विजयाचं वर्णन तिनं या पुस्तकात केलं आहे. ‘आय एम अनादर यू’ या मूळ इंग्लिश पुस्तकाचा अनुवाद स्वाती काळे यांनी केला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more