* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PREMACHA RENU
  • Availability : Available
  • ISBN : 9788177668902
  • Edition : 2
  • Publishing Year : OCTOBER 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 232
  • Language : MARATHI
  • Category : SCIENCE FICTION
  • Available in Combos :DR.SANJAY DHOLE COMBO SET - 8 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DR. SANJAY DHOLE IS A FIRM BELIEVER THAT SCIENCE-BASED STORIES SHOULD BE ENTERTAINING AS WELL AS INFORMATIVE, AT THE SAME TIME, THEY SHOULD HAVE THE CALIBER TO AWAKE THE SOCIAL MIND, HE PROVES TRUE TO HIS BELIEFS. HE HAS VERY WELL SUCCEEDED IN MAKING THE COMPLEX TRUTHS OF THE SCIENCE VERY SIMPLE FOR THE READERS. THESE STORIES ARE NOT ONLY OF THE PRESENT BUT THEY PERFECTLY PICTURE THE TOMORROW AND BEYOND THAT. THEY REVEAL BOTH THE POSITIVE AND THE NEGATIVE SIDES OF SCIENCE MAKING US REALIZE THE SYMPTOMS. VARIOUS ASPECTS OF SCIENCE SUCH AS MICROBIOLOGY, SPACE, ATOM, RAYS, BIOTECHNOLOGY, CHEMISTRY, PHYSICS, ETC. ARE PRESENTED VERY INTERESTINGLY INCREASING THE INTERESTS OF THE COMMON MAN. THEY ARE NOT JUST SCIENCE FICTIONS BUT THEY ENLIGHTEN THE PATH TO FUTURE.
विज्ञानकथा या मनोरंजनासोबतच सामाजिक प्रबोधनासाठीही लिहिल्या गेल्या पाहिजेत, असे मानणा-या डॉ. संजय ढोले यांचा हा कथासंग्रह निश्चितच वाचकांची बौद्धिक पूर्तता करेल. कथेच्या माध्यमाद्वारे विज्ञानातील गुंतागुंतीच्या संकल्पना सामान्य वाचकांपर्यंत नेण्यात ते यशस्वी ठरले आहेत. या कथा आजच्या तर आहेतच; त्या उद्याच्या व परवाच्याही आहेत. विज्ञानाच्या चांगल्या व वाईट दोन्ही बाजू समर्थपणे या कथेत मांडलेल्या दिसतील. या विज्ञानकथांमध्ये सूक्ष्मतंत्रज्ञान, अवकाश, अणू, किरण, जैव, रसायन, भौतिकी इत्यादी विषयांतील संकल्पनांना आणि त्यांच्या ब-या-वाईट पैलूंना सहजपणे स्पर्श झालेला आढळेल. म्हणूनच या कथा नुसत्याच विज्ञानकथा राहत नाहीत, तर त्या भविष्याच्या उदरात काय काय दडलेले आहे याची व्यामिश्र चुणूक दाखवणा-या प्रकाशवाटा ठरतात.
* राज्य शासनाचा `र.धो. कर्वे पुरस्कार` २००७-०८. *मुलुंडच्या साहित्य सम्राट न.चि. केळकर ग्रंथालयचा `साहित्य साधना पुरस्कार` २००९. *डॉ. संजय ढोले यांना म.सा.प.- प्रा. गो.रा. परांजपे पुरस्कार` २०१५ .
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #PREMACHARENU #PREMACHARENU #प्रेमाचारेणू #SCIENCEFICTION #MARATHI #DR.SANJAYDHOLE #डॉ.संजयढोले "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA

    सृजनशील वैज्ञानिक शिक्षणाचा रेणू... आवडलेली सुंदर मुलगी प्रेम अव्हेरते, जिवापाड प्रेम करूनही तिला आपलं आकर्षण वाटत नाही म्हणून दुखावलेला प्रियकर व्यसनाधीन होतो. स्वत:च्या विनाशाची तयारी करतो. त्याच वेळी त्याचा जवळचा मित्र जो जैवतंत्रज्ञ आहे, अभ्यासांती त्या जैवतंत्रज्ञ आहे, तो येतो. मित्राला त्यांची प्रेयसी वश व्हावी यासाठी विज्ञानाचा वापर करतो. अभ्यासाअंती त्या जैवतंत्रज्ञाच्या लक्षात येतं की, स्त्री-पुरुषांमध्ये आकर्षण निर्माण होण्याला त्यांच्या लाळेतील विशिष्ट रसायन कारणीभूत असते. तो प्रयोग करतो. मित्राच्या लाळेतील त्या रसायनाचा रेणू वेगळा करून शीतपेयातून तो त्या मुलीला पाजतो. थोड्याच दिवसांत ती मुलगी मित्राला वश होते. दोघे आनंदानं लग्न करतात. अशी हळवी वैज्ञानिक कथा लिहिलीय ती पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील ज्येष्ठ संशोधक प्रा. डॉ. संजय ढोले यांनी. याच कथेचं नाव त्यांनी आपल्या वैज्ञानिक कथासंग्रहाला दिलं आहे प्रेमाचा रेणू. असा रेणू जर खरंच सापडला तर सगळीच माणसं परस्परांवर प्रेम करू लागतील. जातीधर्माच्या आणि देशा-देशांमधील लढाया कधीच संपलेल्या असतील. आपल्या काळी असा प्रेमाचा रेणू असता तर...? या कल्पनेमुळे अनेक माजी प्रियकरांना हळहळ वाटावी इतकी ही कथाच नव्हे तर कथासंग्रहातील बहुसंख्य कथा वाचकाला गुंतवून ठेवतात. आदिम काळापासून माणसं अन्नासोबत फक्त प्रेमाच्या शोधासाठी इतस्तत:भटकत आली आहेत. कुणी प्रियकर प्रेयसीच्या तर कुणी अज्ञात भूमीच्या प्रेमासाठी भटकत राहिला. काहीजणांनी निसर्गातील आप, तेज, वायूसारख्या पंचमहाभूतांच्या वशीकरणासाठी आयुष्य कारणी लावलं. हे अफाट आणि म्हणूनच अनाकलनीय विश्व काम तरी कसं करतं, याच्या विचारात पिढ्यांमागे पिढ्या सरल्या. विश्वाला समजून घेण्याच्या प्रयत्नात त्यांना देवाची कल्पना सुचली. धर्म अस्तित्वात आले. धर्मसत्तेने विज्ञानाला वेठीस धरण्याचा प्रयत्नसुद्धा केला. पण विज्ञानाच्या प्रेमिकांनी प्राण त्यागले, पण विज्ञानाची कास सोडली नाही. आजचा आधुनिक मानवी समाज विज्ञानामुळेच अस्तित्वाला आला. दुर्दैवाने आपल्यासारख्याच देशात लोक विज्ञानाचा वापर करायला शिकले, पण त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला नाही. वैज्ञानिक शिक्षणाला पावणेदोनशे वर्षे होत आली तरी वैज्ञानिक संशोधनाच्या क्षेत्रात आपण मागासलेलेच घरात पंख्याखाली बसून आपण गार हवेचा आनंद घेऊ पण पंखा नेमका कसा काम करतो याचा विचारच करणार नाही. असा आंधळा विज्ञानवादी समाज असेल त्याचा विकास कसा होईल? त्याला वैज्ञानिक शोधात अग्रेसर असणाऱ्या देंशांची गुलामी करावीच लागेल. गुलामी टाळायची असेल, स्वराष्ट्राच्या अस्मिता जागृत ठेवण्याची इच्छा असेल तर विज्ञानाचा इतिहास शिकण्या-शिकविण्यापेक्षा मुलांना वैज्ञानिक स्वप्ने पाहायला शिकवावं लागेल. नेमकं हेच काम डॉ. ढोलेसरांचा कथासंग्रह करतोय. उदाहरणादाखल सांगायचं तर भौतिकशास्त्रात संशोधन करणारे एक प्राध्यापक आपल्या गावी येतात वीज भारनियमनाला कंटाळून शेजारच्या गावात वीज जास्त काळ राहते असा गैरसमज झाल्यानं त्या गावातील लोकांची डोकी फोडतात. प्राध्यापक महाशय या प्रकाराने अस्वस्थ होतात. आकाशात मान्सून महिन्याच्या काळात कडाडणाऱ्या विजेची ऊर्जा साठवून गावाला कायमस्वरूपी वीज मिळवून देण्याचा स्वदेशी ग्रामस्वराज्याच्या पुरस्कार करतात. आज हे शक्य नाही हे सांगायला कुण्या ज्योतिष्याची गरज नाही, पण असाही विचार करता येऊ शकतो, हे तर कुणीतरी आपल्या मुलांना सांगायला पाहिजे. त्याशिवाय ते नवी मांडणी करू तरी कशी शकतील? पिटर ड्रकर नावाच्या व्यवस्थापन शास्त्रज्ञानं लिहून ठेवलंय की, जगात कोणताही माणूस, समाज आणि देश मागासलेला नाही. जर कुणी असा मागासलेला माणूस असेल तर त्याला त्याच्या क्षमतांची माहिती नाही. आपल्या आजूबाजूला काय साधनसामग्रही आहे हे त्याला कळत नाही. मग त्या साधनसंपत्तीचा वापर न करता तो विकसित कसा होईल? त्याला काय कुणी विकसित होऊ नकोस म्हणून बांधून ठेवलंय? देशातील मुलं जेव्हा नैसर्गिक संपत्तीचा पर्यायी आणि पर्याप्त वापर करायला शिकतील तेव्हाच आणि फक्त तेव्हाच आपला देश महासत्ता होऊ शकेल. त्यासाठी विज्ञानातील शक्यतांची सृजनशील मांडणी करणे त्यांना शिकवावे लागेल. यासाठीचा मार्ग ढोलेसरांचा कथासंग्रह निश्चितच दाखवतो. कोळ्याच्या धाग्यापासून विमानासाठी पॅराश्यूट अशा नवनवीन कल्पनांचा विचार आपल्या मुलांनी केला पाहिजे. याचा आरंभ या कथासंग्रहापासून करायला हरकत नाही. गणित आणि विज्ञान हे तसे आपल्या बहुसंख्य मुलांचे नावडते विषय. आता मुलांना गणितात आणि विज्ञानात रसच नसेल तर वैज्ञानिक शोध लागणार तरी कसे? ढोलेसरांनी मूळ वैज्ञानिक सिद्धांतांना धक्का न लावता विज्ञानाचे मूलभूत नियम कथेच्या माध्यमातून सोपे करून सांगितले आहेत. मुलं कथा वाचता वाचता त्यात गुंतून तर जातातच, पण त्यासोबत विज्ञानाचे सिद्धांतही त्यांना सहज समजू लागतात. विज्ञानाच्या एका शोधाने कोट्यवधी माणसांना रोजगार मिळू शकतो, ही बाब आता आपल्या परिचयाची झाली आहे. सॅटेलाइटच्या माध्यमातून संवाद साधण्याच्या एका शोधाने दूरसंदेश क्षेत्रात (एस,टी,डी,, पी,सी,ओ. आणि मोबाईलने) किती लोकांना रोजगार दिला असेल याची कल्पना करता येईल. म्हणूनच दुसऱ्या देशांनी केलेल्या संशोधनावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वदेशी विज्ञान आणि तंत्रज्ञान विकसित करणं आवश्यक आहे. त्याचा आरंभ वैज्ञानिक स्वप्न पाहिल्याशिवाय कसा होणार? अशी स्वप्ने पाहायला आपल्याला प्रेमाचा रेणू मदत करेल. विज्ञान हा आता आधुनिक मानवी जीवनातील परवलीचा शब्द झाला असला तरी हे दुधारी अस्त्र शाप म्हणूनही अनेकदा सिद्ध झाले आहे. दहशतवादी, मानवतेविरुद्ध काम करणारे स्वार्थी लोक तसेच आपल्याच माणसांच्या द्वेषाने पछाडलेले मनोरुग्ण बऱ्याचदा विज्ञानाचा वापर विनाशासाठी करतात. या संबंधातील अनेक पोलिसी शोधांच्या अंगावर रोमांच उभ्या करणाऱ्या कथा या संग्रहात आहेत. त्याचा तपशील इथे दिला तर वाचनाची गंमत हरवून जाईल. म्हणून तो अधिक्षेप इथे करीत नाही. पृथ्वीने दिलेली वैविध्यपूर्ण नैसर्गिक संपदा उधळी लागल्याप्रमाणे संपवणाऱ्या माणसाला आता राहण्यायोग्य दुसऱ्या ग्रहाचा शोध घ्यायचाय. तो घेताना त्याला परग्रहावरील जीवसृष्टीची सुद्धा भीती वाटतेय. ही भीती ‘परजीवी’ या कथेत मांडून देशांप्रमाणे परग्रहाशी होऊ शकणाऱ्या युद्धांची कल्पना आपल्याला करता येते. वैज्ञानिक प्रयत्नातून माणूस कदाचित असा नवा ग्रह शोधून काढेलही किंवा कृत्रिमरित्या ग्रहाची निर्मिती करून प्रतिसृष्टी निर्माण करण्याचाही तो प्रयत्न करेल. त्याचा हा प्रवास केवळ मानवी कल्याणासाठीच नव्हे तर समस्त सजीव आणि निर्जीव सृष्टीच्या लाभाचा विचार करून केलेला असला पाहिजे. तरच हे विश्व जननक्षम राहील. नाही तर समुद्रकाठची माती गोळा करून दिवसभर राब-राब राबून आपल्याच हातांनी बांधलेल्या किल्ला जाताना पायांनी तुडवून मोडून टाकण्यासारखं होईल आणि तेही स्वातंत्र्य या उदार निसर्गानं माणसाला दिलं आहे. याचा अनुभव ढोलेसरांच्या कथांमधून आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. विश्वाची रचना समजून घेण्याचा प्रयत्न माणूस प्राचीन काळापासून करतोय. त्या खगोलशास्त्रीय अभ्यासातूनच त्याला त्या अदृश्य शक्तीविषयी जाण आली असेल. आपल्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या त्या अदृश्य शक्तीसमोर तो आगतिक झाला असेल, नम्र झाला असेल. निसर्गातील त्या वैविध्यपूर्ण शक्तीचं तो पूजन करू लागला असेल. या पूजा पद्धतीतूनच मग धर्म ही कल्पना पुढे आली असावी. शहाणी माणसं अशी म्हणायची की, विज्ञानाचा प्रसार आणि प्रचार सर्वदूर झाला तर धर्माचा आणि देवाचा पगडा कमी कमी होत जाईल. खऱ्या देवाचे दर्शन त्यांना होईल. प्रत्यक्षात आपला प्रवास मात्र उलट्या दिशेने होताना दिसतोय. या विश्वाला नियंत्रित करणारी एकच शक्ती आहे आणि ती म्हणजे विज्ञान. याचा साक्षात्कार, ‘प्रेमाचा रेणू’ या वैज्ञानिक कथासंग्रहातून प्रत्येकाला झाल्याशिवाय राहणार नाही. -प्रा. डॉ. महेश जोशी ...Read more

  • Rating Starभावना खिस्ती-नाटेकर, पुणे

    माझा आपल्याशी प्रत्यक्ष परिचय नाही, परंतु आपले `प्रेमाचा रेणू` हे विज्ञानकथांचे पुस्तक वाचून तुमची आदरणीय प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली. आतापर्यंत दिवाळी अंकातून रहस्यकथा वाचनात आल्या होत्या. परंतु विज्ञान कथा वाचण्याचा योग आला नव्हता. `प्रेाचा रेणू` हे पुस्तक प्रा. विजय जाधव यांनी भेट म्हणून दिले. पुस्तकाच्या नावावरून ह्या पुस्तकात प्रेमकथा असाव्यात असा माझा समज झाला. परंतु विजयने ह्या विज्ञानकथा आहेत असे सांगितले आणि आग्रहपूर्वक वाचायला सुचवले तेव्हा सुद्धा काहीतरी क्लिष्ट प्रकार वाचावा लागणार या कल्पनेने माझ्या कपाळावरच्या आठ्या नकळत चढल्या. प्रत्यक्षात पुस्तक वाचायला सुरवात केल्यानंतर प्रत्येक कथा संपेपर्यंत पुस्तक खाली ठेवूच नये असे वाटले. उत्सुकता शिगेला पोहोचवत सहज आणि सुलभ भाषेत त्या कथेचे रहस्य वैज्ञानिक दृष्टिकोनातून उलगडले आहे. माझ्यासारख्या सामान्य वकीलाला विज्ञानाबद्दल ओढ निर्माण करणारा हा कथासंग्रह आहे. कुठल्याही कथेतील रहस्य अर्धवट सोडलेले नाही. ते अतिशय कौशल्याने बुद्धीपर्यंत पोहोचवले आहे. विज्ञानकथांमुळे विज्ञानाबद्दल ज्या नकारार्थी भावना माझ्या मनात घर करून बसल्या होत्या त्या कायमच्या संपल्या. शेवटी मला एकच सुचवायचे होते की अशा प्रकारचा कथासंग्रह शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला गेला तर मुलांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढेल आणि ती चौकस व हुषार होतील. आपले विज्ञानकथा संग्रह त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवतील अशी मला खात्री आहे. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    वैज्ञानिक संकल्पनांचा प्रत्यय देणाऱ्या विज्ञानकथा… विज्ञानकथालेखक आपल्या कल्पनाशक्तीनं एखादी अचाट गोष्ट सहज घडवून आणू शकतो, म्हणजे उदाहरणार्थ परग्रहावरच्या सृष्टीचा वेध घेऊ शकतो. उडत्या तबकड्या पृथ्वीवर उतरवू शकतो, परग्रहावरच्या सजीवांशी संवाद साधू कतो. दुसऱ्या सूर्यमालिकेतल्या ग्रहांवर यानं पाठवू शकतो, माणसं पाठवू शकतो, परग्रहावरच्या ग्रहांवर यानं पाठवू शकतो. माणसं पाठवू शकतो, एखादं टाइममशिन शोधून काढून भूतकाळात किंवा भविष्यकाळात सहज जाऊ शकतो, अशा अनेक गंमतीशीर गोष्टी ज्या सध्या घडत नाहीत, पण घडण्याची शक्यता आहे, ज्यांना विज्ञानाच्या सिद्धान्तांचा आधार मिळू शकतो. अशा अनेक गोष्टी विज्ञानकथालेखक आपल्या कथांतून वाचकांपर्यत पोहोचतो आणि त्यांच्याही कल्पनाशक्तीला चालना देतो. डॉ. संजय ढोले हे आजच्या मराठी विज्ञानकथा लेखकांपैकी एक नावाजलेले लेखक आहेत. गेल्या पंधरा वर्र्षांत त्यांनी साठहून अधिक विज्ञानकथा लिहिल्या आहेत. ‘प्रतिशोध’ हा त्यांचा पहिला विज्ञानकथासंग्रह. ‘प्रेमाचा रेणू’ हा त्यांचा विज्ञानकथांचा प्रसिद्ध झालेला दुसरा संग्रह आहे. यातल्या सर्व कथा यापूर्वी दिवाळी अंकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यापैकी पहिलीच कथा ‘अनामिक प्रयोग’ विषयाच्या वेगळेपणामुळे लक्षात राहते. ‘अ फेल्युअर एक्सपेरिमेंट’, ‘चिरूट’, ‘स्फोट’ या कथाही त्याच धर्तीवरच्या आहेत. ‘आश्रय’ ही कथा विज्ञानकथेइतकीच रहस्यकथाही वाटते. ‘जिद्द’, ‘परजीवी’, ‘अनाहूत’ या मात्र विषय आणि मांडणी यामुळे खऱ्याखुऱ्या विज्ञानकथा वाटतात. ‘काळकोठडी’ आणि ‘योगसिद्धी’ या कथा चांगल्या जमल्या आहेत. ‘पे्रमाचा रेणू’ ही कथा विज्ञानाबरोबरच मानवी स्वभाविषयी, तो आयुष्यात ज्या मुल्यांना, संस्कारांना महत्त्व देतो त्या विषयीही भाष्य करते. ती कथा मस्त जमली आहे. ‘विज्ञानकथालेखक हा स्वत: शास्त्रज्ञ असलाच पाहिजे असं नाही. मात्र विज्ञानकथा लिहिण्यापूर्वी ज्या विज्ञानाचा आपल्या कथेत अंतर्भाव करायचा ते आधी नीट समजावून घेऊन अचूकपणानं कथेत दिलं पाहिजे. विज्ञानकथेत कल्पनेची भरारी मारण्याच्या नादात प्रस्थापित विज्ञान चुकीचं लिहू नये, असं डॉ. ढोले यांचं मत आहे. विज्ञानकथा वाचून संपल्यानंतर वाचकांनी त्या कथेचाच नव्हे, तर विज्ञानाचाही विचार करावा. अशी त्यांची अपेक्षा आहे. ते स्वत: अध्यापन-संशोधन करतात. त्यांच्या विज्ञानकथेत ते हे सर्व नियम शंभर टक्के पाळतात. शिवाय त्यांच्या विज्ञानकथा रंजकही आहेत. विज्ञानकथा या मनोरंजनासोबतच सामाजिक प्रबोधनाकरताही लिहिल्या गेल्या पाहिजेत, असं मानणाऱ्या डॉ. संजय ढोले यांचा हा संग्रह निश्चितच वाचकांच्या बौद्धिक अपेक्षांची पूर्तता करेल. या कथांच्या माध्यमातून विज्ञानतल्या गुंतागंतीच्या संकल्पना सामान्य वाचकांपर्यंत नेण्यात ते यशस्वी ठरलेले आहेत. यात विज्ञानाच्या भल्याबुऱ्या बाजू तितक्याच ताकदीनं मांडलेल्या आहेत. म्हणून ‘प्रेमाचा रेणू’ मधल्या विज्ञानकथा त्यांच्या चाहत्यांनाच आवडतील असं नाही, तर या पुस्तकानं त्यांना नवे चाहते मिळतील यात शंकाच नाही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more