THESE STORIES IN SIMPLE LANGUAGE ARE ALSO EXPRESSING FEELINGS WITH THE INCIDENTS.
THE GENERAL SOCIAL LIFE OF ORISSA, THE RURAL LIFE, THE POLITICS OF POLITICS - ESPECIALLY THE CONSEQUENCES OF THE JUNIOR CLASS, THE PHILOSOPHY OF MIDDLE CLASS SOCIETY, AS WELL AS THE CASTEISM, THE RIOTS THAT ARISE, AND THE TRUE FORMULAS OF THESE ARE ALL ANALYZED IN DIFFERENT PERSPECTIVES. THERE IS A TREMENDOUS RESPECT FOR THE PEOPLE OF SHRI JAGANNATH.
ओरिसातील सर्वसाधारण समाजजीवन, ग्रामीण जीवन, राजकारणाचा समाजावर- विशेषतः कनिष्ठ वर्गावर होणारा परिणाम, मध्यमवर्गीय समाजाचे दर्शन, त्याचबरोबर जातिभेद, धर्मभेदांमुळे उसळणाऱ्या दंगली, त्याचे खरे सूत्रधार या सर्वांचे वेगळ्या दृष्टिकोनांतून विश्लेषण केलेले आढळते. श्री जगन्नाथाबद्दलची लोकांची असीम भक्ती, श्रद्धाही त्यांच्या कथांमध्ये आवर्जून पाहावयास मिळते.
माणसांमध्ये दरी निर्माण करणाऱ्या भेदांचे मानवी दृष्टिकोनातून विश्लेषण करू पाहणाऱ्या या साहित्याचा अंश या कथांच्या अनुवादातून मराठी साहित्यात आला आहे. साध्या भाषेतल्या या कथा घटनांबरोबर भावनाही व्यक्त करणाऱ्या आहेत.