* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789386454997
  • Edition : 6
  • Publishing Year : JANUARY 1994
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 176
  • Language : MARATHI
  • Category : HUMOUR
  • Available in Combos :SHYAM BHURKE COMBO SET - 12 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
PUNE, A CITY OF CULTURE, EDUCATION AND HISTORY; A PLACE OF HAPPENINGS; A PLACE WITH HISTORICAL MONUMENTS, MEMORIES OF MANY FAMOUS PERSONALITIES FROM VARIOUS AREAS OF LIFE-INDEPENDENCE TO POLITICS. GREAT LEADERS LIKE TILAK, AGARKAR AND GOKHALE WERE BORN AND BROUGHT UP IN PUNE. THEY MADE THIS CITY THEIR WORKPLACE AND DEVELOPED AN EVER-LASTING IMPRESSION ON GENERATIONS TO COME. THEY PUBLISHED NEWSPAPERS, THEY TAUGHT THE PEOPLE ABOUT PATRIOTISM AND DEDICATION, THEY STRUGGLED FOR THE BETTERMENT OF SOCIETY. PUNE, A PLACE WHERE WOMEN STROVE HARD TO EDUCATE THEMSELVES AND STAND FIRMLY ON THEIR OWN TWO FEET WHEN ALL OVER INDIA THE PICTURE WAS NOT VERY IMPRESSIVE OR HOPEFUL. PUNE, A PLACE SHOW-CASING THE HIGH INTELLIGENCE IN MANY FORMS; A PLACE FAMOUS FOR THE TYPICAL CHARACTERISTICS OF BEING A PUNEITE, A PLACE WHERE DRAMA, THEATRE, MOVIES, MUSIC SHOWS, STREET FOOD… ALL HAVE SPECIAL IMPORTANCE. PUNE, FAMOUS AS THE EDUCATION HUB. TODAY, PUNE IS ALSO ACQUIRING NAME AND FAME IN THE INDUSTRY AREA, INFORMATION TECHNOLOGY AND MANY MORE. GLOBALISATION HAS OPENED NEW VISTAS FOR PEOPLE IN PUNE AND ENTREPRENEUR FROM ALL OVER THE WORLD. PUNE IS ACCEPTING EVERYONE’S PRESENCE IN ITS VAST ENVIRONMENT AND HELPING ALL TO LEARN MORE ABOUT ANYTHING AND EVERYTHING. RESEARCH, ARTS AND STUDIES ARE A FEW OF THE AREAS ATTRACTING MANY TO PUNE. THE WRITER OF THIS BOOK, MR. SHYAM BHURKE IS IMPRESSED BY THE CAPACITIES AND SHADES OF PUNE WITH ITS MANY EDUCATIONAL INSTITUTIONS, MANY COMPANIES-A FEW TO NAME ARE THE PRABHAT COMPANY, BALGANDHARV NATYA MANDIR, PUNE UNIVERSITY, ETC. APPA BALWANT CHOWK, THE NAGNATH PAAR, THE LAKADI POOL ARE A FEW OF THE NAMES ABOUT WHICH THE AUTHOR EXPRESSES HIS AMUSEMENT AND TRIES TO FIND OUT THE HISTORY BEHIND THESE NAMES. HE ALSO TRIES TO FIND THE ROOTS OF VARIOUS CULTURAL PROGRAMS LIKE SAWAI GANDHARV MAHOTSAV, VASANT VYAKHYANMALA, TILAK SMARAK MANDIR, BHARAT NATY MANDIR, BALGANDHARV MANDIR, ETC. HE EXPLORES THE CITY AND HELPS US TO KNOW MORE ABOUT THE EMINENT PERSONALITIES IN THE WORLD OF LITERATURE. THIS INCLUDES PULA, GADIMA (MADGULKAR), ACHARYA ATRE, ETC. A BOOK WHICH WOULD HELP US TO KNOW PUNE IN DETAIL. IRRESISTIBLE PUNE; HOW CAN I NOT LOVE YOU?
स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच पुणे या शहराभोवती, तेथील ऐतिहासिक महत्त्वपूर्ण घटना, तेथील ऐतिहासिक वास्तूंची वैशिष्ट्यं, स्वातंत्र्यचळवळीतील नेत्यांचा- टिळक, आगरकर, गोखले वगैरे बिनीच्या नेत्यांचा वावर, त्या काळात त्यांची ओळख बनलेली वर्तमानपत्रे, त्यांचे वाडे, पुराण काळापासूनच प्रबळ आत्मविश्वास घेऊन वावरणारा सुधारक-शिक्षित स्त्री वर्ग, खास ओळख असणारा बुद्धिजीवी माणूस, त्याच्या वागणुकीच्या तऱ्हा या गोष्टींचं लखलखीत वलय या शहराला लाभलं आहे. नाटक-सिनेमा, गाणं, खाद्यजीवन, या प्रत्येक क्षेत्रातील त्या शहराचं खास व्यत्तिमत्त्व लक्षात घ्यावं लागतंच. विद्येचं माहेरघर म्हणवणारं हे शहर आजही शिक्षण क्षेत्राबरोबरच, उद्योग-तंत्रज्ञान क्षेत्रातही विविधांगांनी झपाट्यानं रूप पालटत आहे. ग्लोबलायझेशनच्या या युगात भारतातूनच नव्हे, तर जगातील सर्व भागांतून पुण्याकडे शिक्षणासाठी, कलासाधनेसाठी, संशोधनासाठी माणसांचा ओघ वाढला आहे. त्या त्या कारणानुसार निर्माण झालेल्या संस्था-विद्यापीठे, जसे प्रभात कंपनी, बालगंधर्व रंगमंदिर याविषयी सर्वांनाच लेखक श्याम भुर्के यांच्याप्रमाणेच कुतूहल वाटतं. ‘पुस्तकंÂ मिळणाऱ्या चौकास अप्पा बळवंतांचं नाव का?`, ‘नागनाथ पारातला हा नागनाथ कोण?’ लकडी पुलावरून जाताना ‘या सिमेंटच्या पुलाला लकडी पूल का म्हणतात?` मॅजेस्टिक गप्पा, वसंत व्याख्यानमाला, सवाई गंधर्व महोत्सव, कसे सुरू झाले, टिळक स्मारक मंदिर, भरत नाट्य मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर हे कुणाच्या पुढाकारानं उभे राहिले; तर इथं साहित्यविश्व बहरलं असेल, इथं पु.ल. राहतात, इथं ग.दि.मां.नी गीतरामायण लिहिलंय, तर कुठं अत्र्यांचं भाषण गाजलं असेल, अशा जागा अगदी गवयाच्या सुराप्रमाणे आळवत त्यांच्या मनात रुंजी घालत येतात. याविषयी जाणून घेताना गप्पांच्या ओघात अन् पुस्तकांच्या पानांत त्यांची उत्तरंही लेखकास सापडली. अशा आठवणींचं हे शब्दांकन!
पुणे मराठी ग्रंथालयातर्फे कै. ना.ह. आपटे स्मृती साहित्य पुरस्कार २००८

No Records Found
No Records Found
Keywords
PUNE EK SATHVAN# SHYAM BHURKE# SARSWATI NADI# GUPT# SILENT# BAKARWADI# AMBA BARFI# CHITALE# HEMAMALINI# VADE# NATAKALA JA# SAMBHAJI PARK# TUPACHI INITIAL# LEKHANI# VASTARYACHI DHAR# KALIDAS# SARWJANIK KAKA# NARO APPAJI# TULSHIBAG# NAGNATH PAR# RAJA KELKAR VASTUSANGRAHALAY# S.P.ATRE
Customer Reviews
  • Rating StarSneha Lolayekar

    नक्की वाचा छान मन प्रसन्न करणारे पुस्तक

  • Rating StarPravin Shirsundar

    पुणेकर आहात व त्यातुन पुण्यात राहूनच पन्नाशीला आलात? किंवा कामानिमित्त खुप पुर्वी पुणे सोडलेय मग हे वाचाच, आठवणींना उजाळा... पुणेकर नसल्यास जरूर वाचा,

  • Rating StarDAINIK SAMANA 08-01-2018

    सुरस पुणेरी बाणा... पुणे आणि पुणेकर हा विषय (पुण्यातल्या) लेखकांचा आवडता विषय आहे. त्यांचा पुणेरी बाणा हा ऐतिहासिक असून दानशूरता हा आध्यात्मिक स्वभाव आहे. बसवाले आणि रिक्षावाले (हमालसुद्धा) यांच्याशी पैशांबाबत तात्त्विक घासाघीस करणे आणि पगडीपासून दगी बंगल्यापर्यंत (स्वत:च्या) जाहीर कौतुक करणे ही स्वभावनिष्ठ सवय आहे. वस्तुनिष्ठ समस्या शब्दनिष्ठ पद्धतीने कशा सोडवाव्यात याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे पुणे आणि पुणेकर. प्रा. श्याम भुर्के (अर्थात पुणेकर) यांनी प्रस्तुत पुस्तकात हेच दिलखुलास (नवल आहे ना?) सांगितले आहे. पहाटे पुण्यातील बागांमधून रामदेवबाबांचे अनुयायी ‘प्राणायाम’ करताना दिसतात. यावर एक विनोद प्रसिद्ध आहे. एकाने मित्राला प्रश्न केला, ‘तू व्यायाम काय करतोस?’ ‘पहाटे फिरायला जातो शुद्ध हवेत.’ ‘त्याचा काही उपयोग नाही.’ ‘का?’ ‘त्यावेळी बाबांचे अनुयायी हवेतला सगळा प्राणवायू खेचून घेतात. मग तुला कुठून मिळणार? असे अनेक किस्से मोठे मजेदार आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळ अन् स्वातंत्र्योत्तर काळातील गमतीदार आठवणी आहेतच. आधुनिक काळातील ‘चितळ्यांच्या दुकानाच्या वेळा’ हा चर्चेचा विषयही इतर विषयांप्रमाणेच (पुणेकरांच्या फक्त) जिव्हाळ्याचा आहे. हा दुर्मिळ माहितीचा खजिना न-पुणेकरांनाही आवडेल असा सुरस अन् (चमत्कारिक) अद्भुत आहे. –अरुण मालेगांवकर ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 03-09-2017

    मम सुखाची ठेव... ‘पेन्शन घ्यावं अन् पुण्यात रहावं.’ अशा सुख कल्पनेतलं हे गाव. इंग्रजीमध्ये म्हण आहे, ‘वेल बिगन इज हाफ डन.’ तसं पुण्यात राहायला मिळालं म्हणजे सुखाचा अर्धा टप्पा गाठल्यासारखंच आहे. शिवरायांनी सोन्याच्या नांगरानं भूमिपूजन केलेली ही पुनवी! निसर्गानं मुळा-मुठे सारख्या नद्या बहाल करून पुण्याला देखणं केलं तर पर्वती, हनुमान टेकडी, वेताळ टेकडी अशा मध्यमवर्गीय टेकड्यांनी या गुलजार पुण्यात सकाळ-संध्याकाळ स्वच्छ हवेचा आस्वाद त्या एकदम महाकाय पर्वतासारख्या नाहीत की ‘आम्ही मधूनमधूनच परत आलो’ असं खचून जाणारं कोणी बोलेल. त्या इतक्याही लिंबू टिंबू नाही की थोडीसुद्धा धाप लागत नाही. पुणेकरांच्या तब्येती चांगल्या राहाव्यात यासाठी किती उंचीवर चढून आलं म्हणजे माफक व्यायाम होईल याचा हिशोब करूनही अगदी ‘मेड टू ऑर्डर’ अशा या टेकड्या निसर्गानं बनविल्या. ‘अ‍ॅटॅच्ड गार्डन’ असं फ्लॅटवाले जसं कौतुकानं सांगतात तसं पुणेकर अगदी ‘घराजवळ पर्वती’ असं भरल्या मनानं सांगतात. पंधरा वर्षांपूर्वी रुपया फुटानं जागा घेतली. आता विकायला काढली तर दहा लाख रुपये सहज येतील, हे सुखही बऱ्याच पुणेकरांच्या वाट्याला आलं हे त्यांनी होऊन दिलेल्या माहितीमुळं कळतं. विद्येच्या या माहेरघरात एक नव्हे तर दोन विद्यापीठे आहेत. शिवाय एक एक शिक्षणसंस्था म्हणजे एका एका विद्यापीठासारखंच. शाळेत जर्मन विषय घेतात हे मी इथंच पाहिलं. आमच्या लहानपणी अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यांना जर्मनची भांडी म्हणायचे. तेवढाच या शब्दाशी आलेला माझा संबंध. मी मुलीला म्हटलं, ‘तू जर्मन घेतलंस ना? जसं काय ती आता जर्मनीला जाणार अशा कौतुकानं भारावलेलं ते वाक्य. त्यावर ती म्हणाली, ‘जमन’ म्हणायचं. आपल्याकडे जशी सरस्वती नदी गुप्त आहे तसा हा ‘र’ म्हणजे सायलेंट असतो. आता मी मनातच म्हटलं, ‘अरेरे!’ हे मी मनातच म्हटल्यामुळं त्यातले बहुसंख्येने असलेले ‘र’ हे शांतच बसले असणार. पुण्यात जेवढे म्हणून अभ्यासक्रम शिकवले जातात त्या सर्वांची एकत्र माहिती घेण्याचा एखादा अभ्यासक्रम आहे का याची तेवढी चौकशी करायची बाकी आहे. पुणं म्हणजे सुखाची गुरुकिल्ली म्हणायचं कारण म्हणजे इथं कोणाला कशामुळं आनंद होईल सांगता येत नाही. पण आनंदच होतो. रडगाणी कमी. जीवनगाणी, आनंदगाणी जास्त. कुणाला टेल्को, बजाज, कमिन्ससारखी आधुनिक तीर्थक्षेत्रं आहेत म्हणून आवडेल. ऐतिहासिक, सांस्कृतिक स्थळांशिवाय लग्नासाठी भरपूर स्थळं मिळणारं गाव म्हणजे पुणं. आमच्या सातारच्या बहुतेक मुली पुण्यात लग्नानंतर लहान मुलांना घेऊन फिरताना दिसायच्या. एखादी पुढ्यातच भेटली तर त्या मुलाला ‘हा तुझा मामा बघ’ अशी ओळख करून देणार आणि आपला भर रस्त्यात मामा करणार. ओळखीची माणसं दिसणारं गाव म्हणूनही कुणाला पुणं आपलंसं वाटत असणार. दूरदर्शनवर मराठी बातम्यांत ‘जिल्हा वार्तापत्र’ असा दूरदर्शनच्या प्रतिभेला साजेलसा कंटाळवाणा भाग असतो. त्यामध्ये पाणीटंचाई, लोकन्यायालये, रोजगार योजना, विंझणविहीरी असल्या उजाड बातम्या असतात. पण पुणे जिल्ह्याच्या वार्तापत्रात मात्र साहित्यिक गप्पा, व्याख्यानमाला असा आनंददायी भागही आढळतो. पुणेकर म्हणजे आनंदयात्री. मुंबईत दंगलीनं संचारबंदी होते तर त्याच वेळी पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सवासाठी पंधरा हजार लोक एकत्र गाण्याच्या मौफिलीत रंगलेले असतात. गणेशोत्सव पाहावा तर पुण्याचाच. व्याख्यानं, चर्चामंडळं, गप्पांचे कार्यक्रम, हास्य कविसंमेलन, रोषणाई, श्रीमंत दगडूशेठ गणपतीजवळ नारळाचे डोंगर. सारा गावच या उत्सवात सामावलेला. पुण्याची लांबी, रुंदी जशी वाढलीय तशी उंचीही, इमातींनाही अरोरा टॉवर्स,पर्वती टॉवर्स, इंदिरा हाइट्स अशी नांव आलीत. तरीही जरा आतल्या बाजूला नजर वळली की ‘श्रमसाफल्य’,‘लताविश्व’ अशी बिनगर्दीच्या भागात निंवातपणा अनुभवणारी निवासस्थानं आहेतच. मुख्य रस्त्यावर आलं की सिटी दिसणारं हे शहर, कॉलनीत गेलं की निसर्गरम्य. चार चौघांची विचारपूस करणारं पुणं वाटतं. जगाच्या गतीत आपणही मागं नाही हे दाखवून देणारं हे पुणं वेगवान झालंय. पूर्वी घरोघरी सायकली होत्या. आता मोपेड्स व स्कूटर्सची गर्दी झालीय. रस्ता क्रॉस करायलाही रिक्षा करायला हवी असं मजेनं म्हणायची वेळ आलीय. पूर्वी दुकानदार समोरच्या हॉटेलातून बोटांच्या इशाऱ्यावर चहा मागवायचे. आता इशारे ऐकू जात नाहीत अन् दिसूही शकत नाहीत. रस्ता क्रॉस करून सांगायला जायची कसरत केली तरी चहावाला मुलगा इकडे येईपर्यंत चहा थंडगार व्हायचा. यावर उपाय म्हणून आपल्या दुकानाच्या बाजूचाच चहावाला शोधायचा. अशा कितीही अडचणींचे डोंगर असले तरी ‘पुण्यावाचून जमेना, पुण्यावाचून करमेना’ अशीच स्थिती होते. ‘कोल्ह्याला द्राक्षे आंबट’ या न्यायाने पुण्याबाहेरचे लोक पुणेकरांची अगदी चवीनं थट्टा करीत असतात. ‘पुण्याचे लोक इतके चेंगट की, ‘या हं एकदा चहाला!’ असं आमंत्रण करत पण नक्की केव्हा यायचं हे सांगत नाहीत. यावर दुसरा म्हणाला, ‘अहो, पुण्यात नेने आणि लेले नावाचे दोन गृहस्थ आपण कसे काटकसरीने राहातो ते सांगत होते. नेने म्हणाले, ‘मी सुपारी बरेच दिवस वापरता यावी म्हणून ती न कापता दोरीने टांगून ठेवली आहे. सुपारी खावी वाटली, तर मी फक्त चाटतो.’ यावर लेले म्हणाले, ‘मी माझ्या नावाचा शिक्का बनविताना फक्त ‘ले’ या एकाच अक्षराचा बनविला व तोच दोनदा वापरतो. तिसऱ्याने लगेच सरसावून एक किस्सा सांगितला. ‘एका गृहस्थाकडे एक पुणेकर गप्पा मारत असताना बाहेर जोराचा पाऊस पडायला लागला. पाऊस थांबायची काही चिन्हे दिसेना. अंधार पडायला लागलेला. तेव्हा मित्र म्हणाला, आता जेऊनच जा. नंतर त्यानं आत जाऊन बायकोला जरा दचकतच सांगितलं, ‘अगं मी त्याला जेवायला थांबवून घेतलंय. बाहेर जोराचा पाऊस पडतोय, तेव्हा तयारी कर हं!’ बायकोच्या पूर्व संमतीशिवाय मित्राला जेवायला थांबविल्यामुळे बायकोची आत समजूत काढून तो बाहेरच्या खोलीत आला. तर या पुणेकर मित्राचा पत्ताच नाही! हा गेला कुठं? अशा विचारात असतानाच हा पुठ्ठया धापा टाकत पूर्ण भिजलेला असा आला. कुठे गेला होता विचारताच, ‘घरी जेवायला येणार नाही हे सांगून आलो! असा खुलासा त्यांनी केला. अशी पुणेकरांची थट्टा करण्याची हॅटट्रिक पूर्ण झाली असतानाही एकानं आणखी एक चौकार ठोकला, एकदा नागपूरच्या गृहस्थांना आपल्या मुलानं उधळेपणा कमी करावा, काटकसरीनं राहावं असं वाटल्यानं त्यांनी मुलाला काही दिवस पुण्याला काकांकडे जाऊन राहायला सांगितलं. मुलगा पुण्याला आला. काकांच्या घराशी आल्यावर दारावर बेल दिसली नाही. कडी वाजवावी तर लक्षात आलं की, दार काही लावलेलं नाही. नुसतंच लोटलेलं आहे. त्यानं दार ढकललं. आत काका बसलेलेच होते. ते म्हणाले, ‘ये बाळ, मी कडी का लावली नाही माहीत आहे? ती झिजेल, म्हणून कमीत कमी वेळा लावतो! थोड्या वेळात वीज गेल्यामुळे त्यांनी मेणबत्ती लावून त्या प्रकाशात दोघांनी भोजन घेतलं. भोजनानंतर आता तर नुसतेच ऐकण्याचे काम आहे म्हणून त्यांनी मेणबत्ती विझवली. पुतण्या त्यांना म्हणाला, ‘आता अंधार असल्यामुळे मी पंचाही काढून ठेवला आहे, तोही झिजयला नको!’ अशी पुण्याला नावं ठेवणारी माणसं जेव्हा पुण्यात येऊन काही दिवस राहतात. तेव्हा मात्र त्यांना पुण्यातच स्थानिक व्हावं असं वाटतं. पुण्यात राहायला जागा मिळणं व मुलांना शाळेत प्रवेश मिळणं हे महाकठीण काम. पण एकदा का ते जमलं की मग अगदी ‘पुणं तिथं काय उणं’ अशीच प्रतिक्रिया यायला लागते. पुण्याचा इतिहास प्रेरणादायी आहे. इथं साहित्यिकांची मांदियाळी आहे. यशस्वी उद्योजकांचं कर्तृत्वपूर्ण वास्तव्य आहे. एकाहून एक सरस नाट्यगृहं आहेत. क्रीडा संकुलं आहेत. अशा पुण्याचा फेरफटका मारायचा आहे आपल्याला. सुरुवात करू या लकडी पुलावरून! ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more