"1. GADKARI: VYAKTI ANI VANGMAY:
THE LATE RAM GANESH GADKARI A PROMINENT WRITER OF MARATHI LITERATURE, A POET, PLAYWRIGHT AND A HUMORIST WAS FONDLY KNOWN AS GOVINDAGRAJ OR BALAKRAM. IT WAS LATE V. S. KHANDEKAR WHO PENNED DOWN HIS MEMOIR EFFECTIVELY TO REVEAL THE VIVID PERSONALITY.
THE FIRST VERSION OF THIS BOOK WAS PUBLISHED IN THE YEAR 1932, 12 YEARS AFTER HIS DEATH. THE REVISED VERSION WAS PUBLISHED LATER IN 1947. THE THIRD VERSION WAS PUBLISHED IN 1997. THE REPRINT OF THIS BOOK IS EVER SINCE IN DEMAND BY ARDENT READERS AND SCHOLARS.
THE BOOK THROWS LIGHT ON ALL KIND OF LITERATURE BY GADKARI GIVING IMPORTANCE TO HIS DRAMAS.
GADKARI’S DRAMAS HAVE COVERED THE PERIOD OF 50 YEARS SINCE THE BEGINNING OF MARATHI DRAMA CULTURE. HENCE, IT WAS ESSENTIAL TO STUDY HIS WRITINGS IN DETAIL FROM VARIOUS ASPECTS. SHRI. KHANDEKAR HAS DONE A GREAT JOB WITH IT.
EVEN AFTER ALMOST A CENTURY, GADKARI’S DRAMAS ARE EQUALLY POPULAR AMONGST THE MARATHI CONNOISSEUR.
TODAY, WHEN MANY ARE TRYING TO REJUVENATE MARATHI DRAMA CULTURE, GADKARI’S WRITING WILL WORK AS A LIGHTHOUSE FOR SURE. THIS BOOK WILL SURELY PROVE TO BE THE MOST BENEFICIAL; BEING ONE OF ITS OWN TYPES.
"
"मराठी साहित्यातील अलौकिक प्रतिभेचे कवी, नाटककार आणि विनोदकार वैÂ. राम गणेश गडकरी यांच्या जीवनपटाच्या पाश्र्वभूमीवर श्री. वि. स. खांडेकरांनी चितारलेले हे वाङ्मयात्मक, परंतु यथार्थ व्याQक्तचित्र आहे.
हा मूळ ग्रंथ वैÂ. गडकNयांच्या मृत्यूनंतर सुमारे बारा वर्षांनी १९३२ मध्ये प्रथम प्रसिद्ध झाला. त्याची सुधारित आवृत्ती १९४७ मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर पन्नास वर्षांनी, १९९७ मध्ये तिसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली आणि आता या पुस्तकाचे पुनर्मुद्रण होत आहे, ते वाचकांच्या आणि अभ्यासकांच्या सततच्या मागणीमुळेच.
या ग्रंथात श्री. गडकNयांच्या सर्व प्रकारच्या साहित्याचे विस्तृत समालोचन असले, तरी प्राधान्याने त्यांच्या नाटकांवरच अधिक भर देण्यात आला आहे.
मराठी नाट्यसृष्टीच्या जन्मकाळापासूनच्या पुढील पन्नास वर्षांतील सर्व प्रमुख नाट्यप्रवाहांचा संगम वैÂ. गडकNयांच्या नाटकांत झालेला होता; त्यामुळे त्यांच्या नाटकांचा मार्मिक व चिकित्सक दृष्टीने अभ्यास होणे आवश्यक होते. या अभ्यासाचे फलस्वरूप `गडकरी : व्यक्ती आणि वाङ्मय` या पुस्तकाच्या रूपाने श्री. खांडेकरांनी चोखंदळ वाचकांपुढे ठेवले आहे.
वैÂ. गडकNयांच्या मृत्यूला आता जवळजवळ शंभर वर्षे पूर्ण होत आली असली, तरी त्यांच्या नाटकांची लोकप्रियता अबाधित आहे. मराठी नाट्यकलेच्या पुनरुज्जीवनाच्या दृष्टीने विविध प्रयोग आज सुरू आहेत. वैÂ. गडकNयांसारख्या प्रभावशील नाटककाराचा हा चिकित्सक अभ्यास या कामासाठी फार महत्त्वाचे साधन ठरणार आहे.
"