* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: RANGRESHA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662528
  • Edition : 4
  • Publishing Year : FEBRUARY 1999
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 128
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :SHANTA SHELKE COMBO SET - 21 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
I HAVE ALWAYS LOVED WRITING FROM NEWSPAPERS. MANY SMALL EVENTS IN DAILY LIFE, MEETINGS AND INTERACTIONS WITH PEOPLE OF DIFFERENT ATTITUDES, MANY EMOTIONS OF NATURE, VARIOUS RITUALS THAT ARE INSTILLED IN THE MIND THROUGH DAILY READING - FROM THESE SOURCES, I SUGGEST TOPICS FOR WRITING. IT IS MY EXPERIENCE THAT THERE IS NO OTHER MEDIUM LIKE WRITING TO EXPRESS MUCH THAT CANNOT BE EXPRESSED IN ANY OTHER FORM OF LITERATURE.
वृत्तपत्रांतून सदरलेखन करणे मला नेहमीच आवडत आले आहे. दैनंदिन जीवनातील अनेक लहानमोठ्या घटना, वेगवेगळ्या वृत्तिप्रवृत्तींच्या माणसांशी या ना त्या कारणाने होणाया भेटी आणि संवाद, निसर्गाच्या अनेक भाववृत्ती, नित्याच्या वाचनातून मनावर होणारे विविध संस्कार – या सायांमधून मला सदरलेखनासाठी विषय सुचतात. बरेचसे काही, जे इतर कोणत्याच साहित्यरूपाने प्रकट होऊ शकत नाही, ते व्यक्त करण्यासाठी सदरलेखनासारखे अन्य माध्यम नाही, असा माझा अनुभव आहे....
एफ.आय.पी पुरस्कार २०००
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#आंधळी#कॅथरिन ओवेन्स पिअर#कादंबरी# शान्ता ज.शेळके#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#THE HELENKELLERSTORY #CATHERINEOWENSPEARE #SHANTAJ.SHELKE #ANDHALI #ANDHALYACHE DOL #ANOLAKH #ANUBANDH #CHAUGHIJANI #GAVATI SAMUDRA #GONDAN #KAVITA SMARANATALYA #KINARE MANACHE #LEKHAK ANI LEKHANE #MEGHDUT #NIMITTA NIMITTANE #PAVSAAADHICHAPAUS #PURVASANDHYA #RANGRESHA #RESHIMREGHA #SANGAVESEVATALEMHANUN #SANSMARNE #SUVARNAMUDRA #VARSHA
Customer Reviews
  • Rating Starसौ अपर्णा अनंत मिसे, ठाणे पश्चिम

    नमस्कार मंडळी, केसरी ह्या वृत्तपत्रात श्रीमती शांताबाई शेळके "*रंगरेषा*" हे सदर लिहीत असत. वृत्तपत्रातील असे सदर वाचकांना दैनंदिन जीवनातील लहान मोठ्या घटना,वेगवेगळ्या वृतीप्रवृत्तीच्या माणसांशी या ना त्या कारणाने होणाऱ्या भेटी आणि संवाद,निसर्गाच्या अेक भाववृत्ती, नित्याच्या वाचनातून मनावर होणारे संस्कार, याबद्दल लेखिकेला आलेल्या अनुभवांचे साहित्य रूपाने प्रकटीकरण आहे.हे सगळे ललित लेख शांताबाई सारख्या भाषेवर प्रभुत्व असलेल्या लेखिकेने लिहिले आहेत. त्यामुळे सगळ्या लेखांना शांताबाई या नावाचा परीसस्पर्श झाला आहे.सगळेच लेख अत्यंत वाचनीय आहेत. या सदरात *29* ललित लेख आहेत. संग्रहातील काही लेखांचा संक्षिप्त परिचय करून देत आहे. परिचय मी त्यांच्याच शब्दांमध्ये करून देत आहे. लेखातील अनेक वाक्ये उद्धृत करण्यामागे उद्देश्य हा की, लेखातील गोडवा अन् शब्द सौंदर्य कायम राहावे असा आहे. *घटातील पोकळी* नववर्षाच्या शुभेच्छा निमित्त एक ग्रीटिंग कार्ड आले.त्यावरील चित्राने मन वेधून घेतले. ओल्या मातीचा गोळा चाकावर घालून कुंभार त्याला मडक्याचा आकार देत आहे. असं ते चित्र होतं. त्याहीपेक्षा कार्डाच्या आतल्या बाजूला असलेला मजकूर अर्थपूर्ण वाटला.त्याचा आशय असा होता, मातीच्या गोळ्यापासून मडके तयार होते.पण मडक्याचा खरा अर्थ म्हणजे आतील पोकळी. मडक्याचा देह हा खापराचा असतो.ही त्याची व्यावहारिक उपयुक्ततता पण मडक्याच्या आतील पोकळी हा त्याचा आत्मा आहे. तो त्याचा जीवनाशय आहे. पोकळी म्हणजे शून्य.शून्य या शब्दाला आपल्या अध्यात्मात विशिष्ट महत्त्व आहे. शून्य आणि पूर्ण दोघांचा अर्थ एकच मानला जातो.पूर्णातून पूर्ण वजा केले तरी पूर्णच राहते. अशा अर्थाचा एक श्लोक आहे *`पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते`* शून्यातून शून्य वजा केले तरी शून्यच येते. या शून्याची एक गंमतच आहे. म्हटले तर ते अगदी लहान असते. आणि म्हटले तर ते साऱ्या विश्वाला गवसणी घालण्याइतके विराटही होते. प्रारंभी एकाच व्यक्तीच्या ठायी केंद्रित असणारे प्रेम साऱ्या विश्वापर्यंत पसरत जाणे. याचेच नाव अध्यात्म. शांताबाईंनी जिगर मुरादाबादी यांचा एक शेर येथे दिला आहे. *इस लफ्जे मुहब्बतका* *इतनाहि फसाना हैं* *सिमटे तो दिले -आशिक* *फैले तो जमाना हैं !* शेराचा अर्थ - प्रेमाच्या एका शब्दाची इतकीच कहाणी असते.ते संकुचित झाले तर प्रिय व्यक्तीच्या हृदयात सामावून राहते. आणि त्याचा विस्तार झाला तर ते साऱ्या विश्वाला व्यापून टाकते. ते प्रेम म्हणजेही आपल्या अध्यात्माने सुचवलेले घटातील पोकळी आणि बाहेरचे अंतराळ यांचे अभिन्नत्वच! सर्वसामान्य माणसाजवळ प्रेम करण्याची ताकद असते. एकमेकांच्या गरजा जाणून घेतो. एकमेकांच्या साहाय्याला धावून जातो. ज्याची जितकी कुवत असेल तितका तो स्वतःची प्रगती करून घेतो.आणि मला वाटते हेच आपल्यासारख्यांना उमगणारे अध्यात्म. याहून वेगळे अध्यात्म आपल्याला कधी भेटणार नाही आणि आपल्याला त्याची आवश्यकताही नाही. *जीवनाविषयी थोडेसे* ज्याने *जीवन* हा प्रतिशब्द आयुष्यासाठी प्रथम वापरला तो माणूस मोठा रसिक व कल्पक असला पाहिजे. पाण्यालाही संस्कृतमध्ये जीवन म्हणतात. आणि मानवी जीवन पाण्यासारखेच असते. एकदा बादशहाने बिरबलाला विचारले, क्षणभरही न थांबता रात्रंदिवस अखंड चालू राहणारी गोष्ट कोणती? बिरबलाने उत्तर दिले ,अशी गोष्ट म्हणजे, सावकाराचे व्याज. मला वाटते बादशहाच्या प्रश्नाला बिरबलाने मानवी जीवन असे उत्तर दिले असते, तरी ते तितकेच समर्पक ठरले असते. काळ कोणासाठी थांबत नाही तो सुखाचा असो या दुःखाचा. सुख भोगतांना माणूस म्हणतो `हे सुखाचे दिवस हा हा म्हणता संपणार आहेत बरे!` आणि दुःखातही तो स्वतःला दिलासा देतो,`हे ही दिवस आज ना उद्या निघून जातील ते कायमचे राहणार आहेत थोडेच?` म्हणजे काय तर जीवनाची अखंडितता आणि त्याची गतिमानता या दोन्ही गोष्टी ध्यानात घेऊनच माणसाने जगायला शिकले पाहिजे. *जीवित म्हणजे असंख्य क्षणांचा गुंफलेला एक सुंदर हार आहे.* प्रत्येक क्षण मागच्या क्षणाला जबाबदार असतो. लोकमान्य टिळकांची एक कथा बहिणाबाईंनी दिली आहे. ती अशी की प्लेगच्या साथीत लोकमान्यांच्या मुलाचे निधन झाले.त्यावेळी मुलाला ते स्मशानात पोचवून आल्यावर लगेचच केसरीचा अग्रलेख लिहायला बसले. पुत्रशोकाच्या अथांग सागराचे एका घोटात आचमन घेऊन त्यांनी जीवनातील नित्याची कर्तव्ये करावयास प्रारंभ केला. स्थितप्रज्ञ वृत्तीचे मर्म कसे आत्मसात केले होते हेच ही कथा आपल्याला सांगत नाही काय?शेवटी काय खेळ चालू राहिला पाहिजे.मग तो रंगमंचावरचा असो, की जीवनाच्या मंचावरचा असो! *खुंट्या ईगो टांगण्यासाठी*. एका वाड्यात एक बाई राहत असे. ती मरतांना तिने तिच्या मुलीला हेमगर्भाची मात्रा दिलेली असते. ही मात्रा माणूस अगदी आसन्नमरण झाला म्हणजे त्याला उगाळून चाटवितात .की त्याचं मरण काही चार, दोन मिनिटे लांबवता येते. एवढाच या मात्रेचा उपयोग. पण ज्या बाईजवळ ही मात्रा असते तिला त्याचा भयंकर अभिमान. बिऱ्हाडात कुणी आजारी पडले, अत्यवस्थ झाले की ही मागला पुढला विचार न करता खुशाल सांगते, काही काळजी करू नका बरं का! तशीच जर वेळ आली ना तर माझ्याजवळ हेमगर्भाची मात्रा आहे. अगदी संकोच न करता मागा. हिला कुणाच्या आजाराचा ओझरता सुगावा लागला तरी त्या घराभोवती घारीसारख्या घिरट्या घालत राहते. काय म्हणावं या बाईला ?कसला तो अहंकार! माणसांच्या अहंकाराचे इतके गमतीदार प्रकार बघायला मिळतात . एक बाई तर आपली निवड एकदमच भारी हे सांगण्यासाठी मला बाई,माझ्या नवऱ्याने काहीही आणलेले मला आवडत नाही. एक मनुष्य त्याला वाटते, आपण खूपच मार्मिक व विनोदी बोलतो. खूप श्रवणीय बोलतो.ते गृहस्थ प्रत्येक शब्दावर कोट्या करतात. कोणी हसो ना हसो स्वतःच मोठ मोठ्याने असतात. खरंच माणसं स्वतःची अशी प्रतिमा का तयार करतात? वास्तविक आपण कोण? आपली कुवत किती आहे.हे ज्याचे त्याला पक्के ठाऊक असते. मानसशास्त्राचा असा एक सिद्धांत आहे की, अहंकार हे न्यूनगंडाचेच एक वेगळे रूप असते. या कॉम्प्लेक्सने पछाडलेली माणसे मग आपला अहंकार जोपासण्यासाठी खरे, खोटे आधार निर्माण करतात.आपला ईगो टांगून ठेवण्यासाठी कसल्या ना कसल्या खुंट्या बनवतात. त्या खुंट्या जन्मभर जपत राहतात. *दळण सरलं सरलं म्हणू कशी?* जपानमध्ये जेव्हा एखादे घर बांधतात तेव्हा त्या घरामध्ये एक, दोन विटांची जागा रिकामी ठेवतात. हे असे करण्याचे कारण काय?तर घर अपुरे राहावे. त्याची बांधणी पूर्ण करू नये. कोणतीही गोष्ट पूर्णत्वाला नेणे म्हणजे ती संपवणे. काही संपवणे, कशाचा शेवट करणे म्हणजे जीवनाचाच अंत करणे अशी काहीशी त्यांची यामागची कारणपरंपरा आहे. जीवनाचे सातत्य कायम राहिले पाहिजे, त्याचा प्रवाह कुठेही खंडित होता कामा नये.तसे करणे म्हणजे निसर्गाच्या विरुद्ध जाणे आहे. अशी जपानी माणसाच्या मनाची धारणा आहे. जीवन भंगुर आहे.जे जे उत्पन्न झाले ते शेवटी लयाला जाणार आहे.हे सत्य, जे मला कळते, तुम्हाला कळते, ते न कळण्या इतका जपानी माणूस वेडा आहे का? शांताबाई म्हणतात माझ्या लहानपणी घरात जाते होते.आजी, मामी त्या जात्यावर रोज दळण दळत.मुठभर धान्य आवर्जून मागे ठेवीत. मी विचारलं तर म्हणे,दळण संपवायचं नसतं. संपलं असं म्हणायचंही नसतं व लगेच ओवी पण ऐकवी , *दळण सरलं सरलं म्हणू कशी?* *सासर -माहेर भरल्या दोन्ही राशी!* *दळण सरलं सरलं म्हणू नाही* *पाहुण्या-रावळ्यांची वर्दळ सदा राही* थोडक्यात काय तर घर नेहमी भरलेलं असावं . रात्रीचे जेवण आटोपले की निदान कोरभर भाकर आई, आजी शिंकेवरच्या टोपलीत राखून ठेवत. टोपली कधी रिकामी राहू देत नसत. घरातलं जेवण संपता कामा नये ही भावना. कोणाच्या घरी गेलो तर तिथून निघतांना `जातो` म्हणत नाही `येतो`असे म्हणतो .घरातल्या माणसांनी `परत या हं!`असे म्हणूनच त्याला निरोप द्यायचा. म्हणजे येण्या जाण्याची प्रथा चालू राहावी त्यात खंड पडू नये ही त्यामागची भावना असते. घरी देव बसवल्यानंतर जेव्हा आपण विसर्जन करतो तेव्हा त्यांनी देखील आपण `पुनरागमनाय च` या शब्दात निरोप देऊन स्नेहबंधनाचा धागा अतूट राखतो. `पुन्हा यायचे बरे का!` अशी प्रेमळ सूचना देवांना देतो. काहीही संपू नये, कशाचाही शेवट होऊ नये ही जी भावना आपल्या मनात खोलवर रुजलेली आहे तिचा परिणाम आपल्या दैनंदिन भाषेवरही कसा झाला आहे ते बघण्याजोगे आहे.`दिवा मालवा` असे कधी म्हणत नाही. `दिव्याला निरोप द्या` असे म्हणतो. निरोपामागे तो उद्या पुन्हा घरात तेवणारच आहे हा दृढ विश्वास. बांगड्या फुटल्या, कुंकू पुसले असे अभद्र शब्द न काढता बांगड्या वाढवल्या, कुंकू वाढवले असे म्हणायचे. अन्त नाकारण्याची आणि जीवनाचे सातत्य मानण्याची ही कल्पना आपल्याला इतकी का बरे महत्त्वाची वाटावी? पौर्वात्य मन हे खरोखरीच जीवनाच्या सातत्याबद्दल निःशंक असेल का? ते काही असो संकेत मात्र फार सुंदर मनाला धीर व दिलासा देणारा आहे .त्यामुळे आजीच्या ओवीतही अंधश्रद्धा नसून जीवनाविषयीचे खोल शहाणपण आणि स्वीकारशीलता त्यात सामावलेली आहे असे वाटते. *`दळण सरलं सरलं म्हणून कशी`!* जीवनाचे हे जाते असेच अविरत फिरत राहणार आहे. तर असे एकापेक्षा एक सरस लेख.खूप सुंदर. धन्यवाद! ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    ‘तिळा उघड’चा मंत्र देऊन बहुमोल अनुभवांची गुहा खुले करणारे ललित लेख… विख्यात गीतकार आणि ललित लेखिका शांता शेळके यांना स्तंभलेखनाची आवड आहे आणि त्यांच्या स्तंभलेखनाची आजवर अनेक पुस्तके निघाली आहेत. ‘रंगरेषा’ हे नवे पुस्तक म्हणजे केसरीच्या रविवारी पुरणीत त्यांनी त्याच नावाने जे सदर चालवले होते, त्यात आलेल्या २९ लेखांचे संकलन आहे. प्रास्ताविकात त्यांनी म्हटले आहे, ‘‘ दैनंदिन जीवनातील अनेक लहानमोठ्या घटना, वेगवेगळ्या वृत्तिप्रवृत्तींच्या माणसांशी या ना त्या कारणाने होणाऱ्या भेटी आणि संवाद, निसर्गाच्या अनेक भाववृत्ती, नित्याच्या वाचनातून मनावर होणारे संस्कार, या साऱ्यांमधून मला सदर लेखनासाठी विषय सुचतात. जे इतर कोणत्याच साहित्यरूपाने प्रकट होऊ शकत नाही, असे बरेचसे काही व्यक्त करण्यासाठी सदर लेखनासारखे अन्य माध्यम नाही असा माझा अनुभव आहे. शांताबार्इंचे वाचन संस्कृत, प्राकृत, इंग्रजी, उर्दू, मराठी असे सार्वदेशीय आहे; त्यांचे लोकसाहित्यातील अवगाहन अफाट आहे, पाठांतरही विस्मयकारक आहे. पत्रकारिता-लेखन-प्रकाशन-कार्यक्रम या निमित्ताने अमाप मित्रपरिवार आणि चाहत्यांचा वर्ग त्यांना लाभला आहे. नवीन प्रवाहांशी कौतुकाने त्या सलगी करतात परंतु आपल्या मूळ स्मरणरंजनाशी त्यांच्या निष्ठा अविचल आहेत. एकूण भूमिका आस्वादकाची असल्याने आपल्या प्रौढत्वीही त्यांनी आपले शैशव मनोभावे जपले आहे. शांताबाई गोष्टीवेल्हाळ आहेत; गप्पांचा त्यांना कंटाळा कधी येत नाही. त्यामुळे त्यांच्या ललित लेखांमधून त्या आपल्याशी मोकळ्या मनाने गप्पा मारत आहेत असेच जाणवत राहते; आणि त्यांच्या विविध विषयांवरील आत्मीयतेच्या टीकाटिपणीने आपल्या रसिकतेच्या कक्षा अलगदपणे विस्तारत जातात. मग एखादा हायकूही त्यांच्या स्पर्शाने आपल्या लेखी परीसाचे काम करून आपल्या भावजीवनाला सुवर्णाची झळाळी आणतो. शांताबार्इंच्या लेखनाचे जे चहाते आहेत, ते त्यांच्या शब्दांच्या परीसस्पर्शासाठी असे आतुर असतात, ते उगाच नव्हे. नेहमीच्या चिरपरिचित गोष्टींनाही शांताबाई आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या वलयाने अलीबाबाच्या गुहेतील अमाप खजिन्याची श्रीमंती बहाल करतात. ‘रंगरेषा’मधील लेख वाचतानाही या त्यांच्या किमयेची प्रचीती येते. लेखांचे विषय तसे नेहमीचेच आहेत, पण त्याकडे पाहण्याची शांताबार्इंची जी दृष्टी ती वेगळी आहे; त्यामुळे खरी मजा येते. वाङ्मयीन संदर्भांनी त्यांचे सारे लेखन दुथडी भरून वाहन असते. आत्मचरित्रात्मक व व्यक्तिपरिचयात्मक उल्लेखही सतत येतात. सहजपणे येतात. विषय नेहमीचे म्हणजे काय? तर या संग्रहातल्या काही लेखांची शीर्षकेच त्याबद्दल सांगतील. पेशवेकालीन पुणे, मैत्रीचे निकष आणि मर्यादा, शब्दांची गंमत-गमतीचे शब्द. नातेसंबंध-जुने आणि नवे, रिमझिम पाऊस पडतो बाई, जुनी फाईल, बातमीचा बळी (डायनाचा मृत्यू), इ. आणि आपल्याच जीवनातील काही आठवणींना उजाळा देणारे प्रसंग व व्यक्तिविशेष टिपणारे लेख उदा. सेन्सॉर बोर्डाचे दिवस, बिऱ्हाडकरू, आजीची ताटली लोटी, लेखक असल्यामुळे, प्रतिबिंब (फोटो काढण्याचे अनुभव), जीवनाविषयी थोडेसे, इ. लेखनाने पैसा फारसा मिळत नाही. लेखनाने आपल्याला फारसे द्रव्य दिलेले नाही, फारसे निर्मितीचे समाधानही अजून लाभलेले नाही; आपल्या लेखनातील उणिवा व कलात्मक मर्यादा यांची आपल्याला जाण आहे, असे शांताबाई म्हणतात. ‘‘मी सर्वसामान्य माणूस आहे आणि कधी कधी थोडीशी लेखक आहे, हीच माझी माझ्यापुरती स्वत:शी असलेली ओळख (आयडेंटिटी) आहे.’’ असेही त्या सांगतात. व्यवसाय म्हणून लेखनाचा मार्ग स्वीकारल्यामुळे आपण ‘केवळ कलानिर्मितीसाठी एकाग्र, व्रतस्थ आणि उग्र साधना करणाऱ्या ‘‘थोर लेखकांपैकी नाही हेही त्या कबूल करतात. परंतु लेखन ही माझ्या जीवनातली आनंदाची गोष्ट आहे आणि लिहिताना मला जे समाधान लाभते तीच माझ्या लेखनाची फलश्रुती आहे... पानेच्या पाने लिहिणे, डोळे-हात-मान दुखेपर्यंत लिहिणे ही माझी गरजच आहे, केवळ मानसिक नव्हे तर शारीरिकसुद्धा.’’ अशी त्यांची श्रद्धा आहे. आपल्या लेखनाला दाद देणारे वाचक त्यांना भेटतात; त्याबद्दल त्यांना मोठा आनंद वाटतो. कुणाशी तरी आपला सूर जुळतो याचे समाधान मिळते. वाचक-लेखक जवळीक हा प्रकार उभयपक्षी आनंददायक असतो. कधी कधी त्यामुळे अनेक जण आपल्या आयुष्यातले पेचप्रसंग सांगायलाही त्यांच्याकडे येतात. ‘‘तुम्ही माझ्या जीवनावर एक कादंबरी लिहा. नाहीतर झकास नाटकच लिहून टाका. बेफाम होईल बघा...’’ असाही कोणी पाठपुरावा करतात. पेशवेकालीन पुण्याचे वर्णन प्रा. चिं. ग. भानू यांच्या शृंगेरीची लक्ष्मी या कादंबरीच्या आधारे त्या करतात, आणि सवाई माधवरावाच्या काळातील पुण्यातील रंगढंग आणि श्रीमंती याकडे लक्ष वेधतात. त्यावेळी सराफ कट्ट्याजवळच्या शाक्ताश्रमात नेमनिष्ठ ब्राह्मण ताडी प्यायला जात असाही प्रसंग त्या कादंबरीत आहेत; आणि लक्ष्मी ही नायिका गाण्याद्वारे अर्थार्जन करीत असली तरी शृंगेरी धर्मपीठाला ती बहुतांश कमाई देते असे दाखवले आहे. य. गो. जोशी यांच्या ‘हेमगर्भाची मात्रा’ या कथेची नायिका आसन्नमरण व्यक्तीला हेमगर्भाची मात्रा देऊन बरे करते. ती तशा मृत्युशय्येवर असणाऱ्या व्यक्तींच्या शोधातच राहते. हे शांताबार्इंना चमत्कारिक वाटते. तिच्याजवळ अभिमान वाटावा अशी हेमगर्भाची मात्रा हीच एक वस्तू आहे; आणि आपला अहंकार वा प्रतिमा हेमगर्भाच्या मात्रेची मालकीण म्हणूनच तिला मिरवणे शक्य होते. त्यावरून आपल्या इगोसाठी लोक काय काय करतात याबद्दलचे विवेचन शांताबाई करतात. काहीशा खोडकर-खट्याळपणे त्या म्हणतात, ‘‘आपला इगो टांगून ठेवण्यासाठी लोक कसल्या ना कसल्या खुंट्या बनवतात. जन्मभर जपत राहतात.’’ तर काही माणसे अहंकार दुखावला गेल्यामुळे जन्मभर कडवटपणे प्रत्येक गोष्टीवर टीकेचा भडिमार करीत राहतात. इतरांची टवाळी करीत राहतात; कुत्सित बोलत राहतात. आपले जिवलग मित्रही काही वेळा मानसिक आधार देण्याऐवजी मत्सराच्या पोटी भांडणे, चिडचिडेपणा, आक्रस्ताळेपणा यांच्या आहारी जातात. शांताबाई त्यावर भाष्य करतात, ‘‘जगामध्ये सारेच काही सुंदर, विलोभनीय नसते. इथे हेवेदावे आहेत, असूया आहे. मत्सर आहे. कुजकेपणा आहे. जे दुसऱ्याला मिळाले ते मला मिळाले नाही, कदाचित माझी लायकी त्याच्यापेक्षा जास्त असूनही मिळाले नाही या जाणिवेमुळे मनातून उमटणारे असंतोषाचे फणकारे आहेत. सारे काही आहे आणि मुख्य म्हणजे आपणांपैकी कुणीही साऱ्या मनोविकारांवर प्रभुत्व मिळवून स्थितप्रज्ञतेच्या पदवीला पोचलेला नाही. पण म्हणून तर मैत्रीचे महत्त्व, प्रेमाचे महत्व. त्याचा बळी देऊन मिळवावे इतके मोलाचे आणि आनंददायक असे दुसरे काही नाही. अगदी आपले आत्मप्रेमसुद्धा.’’ –असा आपुलकीचा सल्लाही या लेखांमध्ये सहजपणे मिळत राहतो. म्हणून हा लेखसंग्रह सतत जवळ ठेवायला हवा. शांताबार्इंचे मित्रपण त्यांच्या प्रत्येक लेखांतून आपल्याला साद घालत राहते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ.प्रतिमा देसाई, नवी मुंबई.

सर्वप्रथम पुस्तकाचं मुखपृष्ठ नजरेतून उतरून विचारात जातं. डबा ऐसपैस मधे न दिसताच जाणवणारं मित्रांचं टोळकं, बिनधास्त वृत्ती आणि खोडकर प्रवृत्ती दर्शवणारं भिरभिरतं फुलपाखरू, दप्तरातून डोकावणारी वह्या पुस्तके म्हणजे नकळत पुढील आयुष्याच्या जबाबदारीच्या जाीवा आणि __एकदम भिंगाचा चष्मा जणू तटस्थ पणे ते सगळं जगणं पहातोय. काही गोष्टी आपण म्हणतो "compliment for each other"तसं हे मुखपृष्ठ. छोट्या छोट्या गोष्टी पण काही ना काही शिकवत माणसाला कसं संस्कारीत करतात याचं उदाहरण म्हणजे " छाटितो गप्पा" . अर्थात काय शिकवणं घ्यायची ते घेणाऱ्या वर असतं. अडगळीत गेलेल्या `थर्मास` वरचा "जोकर" मनात शल्य ठेवून जातो. `गव्हातले खडे ` केवळ मनाला बोचत नाहीत तर त्यातला त्या काळातील सोशिक भाव सांगून जातो. `आनंदाची खुण` ही गोष्ट म्हणजे त्यातल्या बहिणीच्या मायेची जणू ऊबदार शाल . `हॅट्ट्रिक ` ह्या कथेतून नकळत्या वयातच आपल्या संविधानाच्या चौकटीत राहून कायद्याचा धडा गिरवला गेला त्यामुळे `टॅक्स डिपार्टमेंट` मधे असूनही हात बरबटले नाही. `मामूची उधारी ` जन्मभराचं हे ओझं नकळत सजग करून गेलं. पुरणामागची वेदना मधलं मनाला भिडलेलं चिरकालाचं दु:ख , सल डोळ्यात पाणी आणते. सगळ्याच कथा सुरवातीला हलक्याफुलक्या वाटल्या तरी त्यातील वेदना , हुरहूर, खेद अश्या अनेक भावनांचा संगम आहे. सगळ्या बद्दल थोडं थोडं लिहिलं तरी नको ईतकं लांब लचक होईल.तरी एक शेवटचं जे सगळ्यात जास्त भावलं. सुपरहिरो! वा. यातल्या एका वाक्यानी आनंदाश्रु व खंत यांची जाणीव करून दिली. ९५ वर्षाच्या व्याधींनी जर्जर झालेल्या आईचा पलंग दिवाणखान्यात ठेवून वर "दिवाणखान्याची खरी शोभा तीच तर आहे बाकी सगळं शोभेच" हे ठामपणे सांगणाऱ्या लक्ष्मण भाऊंना मनापासून दंडवत. न पाहिलेल्या या व्यक्तीला अनुभवलं ही तुझ्या लेखनाची कमाल. थोडक्यात "छाटितो गप्पा "हा ऐवज आहे अनुभवाचा . यातून पुढल्या पिढीला खुप घेण्यासारखे आहे. अनेक भावनांची गुंफण घालत, तरल अनुभव सांगताना त्यातल्या वेदना,सल,दु:ख, आनंद हळुवार उलगडत केलेलं हे लिखाण जास्त मनाला जागवतं. मनापासून आवडलं पुस्तक. प्रत्येक कथेवर भाष्य करण्याचा मोह आवरावा लागला. लेखकाचं हार्दिक अभिनंदन. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अनिरुद्ध गुप्ते, नागपूर.

स्वतः लेखक समोर बसून गप्पा मारत आहेत असा भास होतो. सर्वच कथा सुंदर आहेत. पुस्तक पुर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेववत नाही, ह्यातच लेखकाचे यश आहे. *"मोबाईल माॅकरी"* कथेत पात्रांविषयी उत्सुकता निर्माण होते. *अगा, जे घडलेचि नाही* कथेतील इलेक्शन ड्यूीचा अनुभव मस्त कथन केला आहे. *थर्मास* सर्वोत्तम असे माझे मत आहे. लेखकाचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा !! ...Read more