- Vaibhav Salunke
दैनिक दिव्य मराठी, नाशिकचे डेप्युटी एडिटर श्री. अभिजित कुलकर्णी यांच्या लेखणीतून उतरलेली ‘रेड टेप’ ही कादंबरी, २६४ पृष्ठांची ही कांदबरी मेहता पब्लिशिंग हाऊस, (पुणे) यांनी प्रकाशित केली आहे. काल्पनिक कथानकावर बेतलेली ही कादंबरी वाचकांच्या पातळीवर कालपनिक राहत नसून आजूबाजूला घडणारी घटनाचं बनून जाते. क्षणाक्षणाला कथानकातील उत्कंठा वाढवत जाते.
बांद्रयाचे कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व धडाडीचे जिल्हाधिकारी महेश राऊत हे या कादंबरीचे नायक आहेत. तर ‘प्रखर’ या दैनिकाचा झुंझार, निर्भीड मुख्य बातमीदार जया देशमुख हे सहनायक आहेत. आजूबाजूचे पात्र आपसूकच मग ओघाने येतात. गोरगरीब रूग्णांवर सवलतीच्या दरात उपचार व्हावेत म्हणून सरकातर्फे बांद्रयाला मध्यवस्तीत उभारायच्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी राखीव असलेला कोट्यावधी रूपयांचा भूखंड गिळून टाकण्याचा घाट घातला जातो. यात राजकारणी, मंत्री, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, बिल्डर, ठेकेदार व दलाल या सर्वांच्या ‘अभद्र युती ’चा समावेश असतो. या अभद्र युतीचा लोकहित विरोधी असलेला डाव उधळून लावण्याचा चंग जिल्हाधिकारी महेश राऊत करतात. त्यांना जया देशमुख या निर्भीड पत्रकाराची साथ-संगत लाभते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री, बांधकांममंत्री, आरोग्यमंत्री आणि मंत्री मंडळातील अजून एक-दोन मंत्री, मुख्यसचिव, महसूल सचिव, सचिव दर्जाचे अजून एक-दोन अधिकारी, बिल्डर, ठेकेदार आणि कार्यालयातील काही घरभेदी अधिकारी/कर्मचारी अशी सर्व फौज एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जिल्हाधिकारी महेश राऊत व त्यांना आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून मदत करणारा पत्रकार जया देशमुख यांचा जबरदस्त असा दुहेरी संघर्ष या कादंबरीत पत्रकार, संपादक अभिजित कुलकर्णी यांनी उभा केला आहे.
या कथानकावर निश्चित एखादा चित्रपट होऊ शकतो. सामान्य माणासाला कायमच मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांचा रूबाब-आब व व्यक्तीमत्त्वाचे आकर्षण राहिले आहे. या आकर्षणाबरोबरच त्यांच्या वर्तुळात घडणाऱ्या आतील घडामोडी, लफडी याविषयी ‘चवितचर्ण’ करण्यात एका विशिष्ट गटाला रस असतो. ही सर्वसामान्य वाचकांची नस नेमकी हेरत कुलकर्णी यांनी संपूर्ण कादंबरीत मंत्रीमंडळातील मंत्री, प्रशासनातील अधिकारी यांच्याशी संबंधित खुसखुसीत चर्चा कादंबरीत ठिकठिकाणी पात्रांच्या तोंडून उदधृत केल्या आहेत. मुख्यमंत्री, मंत्री, सचिव, जिल्हाधिकारी, पत्रकार यांचा एकमेकांशी प्रत्यक्ष व दूरध्वनीच्या माध्यमातून होणार संवाद अभिजित कुलकर्णी यांनी आपल्या ओघवत्या शैलीत कादंबरीत शब्दब्ध केला आहे. यामुळे वाचक म्हणून आपण या संवाद शैलीच्या प्रेमात अधिक पडत जातो. जिल्हाधिकारी महेश राऊत यांना अडकविण्यासाठी विदेश दौऱ्यांत त्यांच्यावर लावण्यात आलेला ‘हॅनी ट्रॅप’ बाबत आपली उत्कंठा वाढत जाते. जिल्हाधिकारी या ‘हॅनी ट्रॅप’ मध्ये फसतील का ? याची क्षणा-क्षणाला उत्कंठा वाढत जाते. व काळजी पण वाटत जाते. मंत्रालयात महेश राऊत यांची बदली झाल्यानंतर राऊत हताश, निराश होतात. प्रसंगी नोकरी सोडण्याचा निर्धार करतात. मात्र त्यांचा पत्रकार मित्र त्यांची समजूत घालतो. आणि त्यांना मंत्रालयात रूजू होण्याचा सल्ला देतात. महेश राऊत मंत्रालयात रूजू झाल्यानंतर आपणास वाटते. हा संघर्ष आता संपला ; पण मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून राऊत ‘बांद्रा’ तील भूखंड हळपण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव उघळून लावतात की ते त्यात अपयशी ठरतात ? हा संघर्ष कादंबरीत वाचण्यासारखा आहे.
कादंबरी एकूणच उत्कंठावर्धक, वाचकांची अभिरूचीची भूक सांभाळणारी, खुसखुसीत, खुमासदार झालेली आहे. ‘रेडटेप !’.
...Read more
- Shrikant Adhav
दैनिक दिव्य मराठी, नाशिकचे डेप्युटी एडिटर श्री. अभिजित कुलकर्णी यांच्या लेखणीतून उतरलेली ‘रेड टेप’ ही कादंबरी, २६४ पृष्ठांची ही कांदबरी मेहता पब्लिशिंग हाऊस, (पुणे) यांनी प्रकाशित केली आहे. काल्पनिक कथानकावर बेतलेली ही कादंबरी वाचकांच्या पातळीवर काल्निक राहत नसून आजूबाजूला घडणारी घटनाचं बनून जाते. क्षणाक्षणाला कथानकातील उत्कंठा वाढवत जाते.
बांद्रयाचे कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व धडाडीचे जिल्हाधिकारी महेश राऊत हे या कादंबरीचे नायक आहेत. तर ‘प्रखर’ या दैनिकाचा झुंझार, निर्भीड मुख्य बातमीदार जया देशमुख हे सहनायक आहेत. आजूबाजूचे पात्र आपसूकच मग ओघाने येतात. गोरगरीब रूग्णांवर सवलतीच्या दरात उपचार व्हावेत म्हणून सरकातर्फे बांद्रयाला मध्यवस्तीत उभारायच्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी राखीव असलेला कोट्यावधी रूपयांचा भूखंड गिळून टाकण्याचा घाट घातला जातो. यात राजकारणी, मंत्री, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, बिल्डर, ठेकेदार व दलाल या सर्वांच्या ‘अभद्र युती ’चा समावेश असतो. या अभद्र युतीचा लोकहित विरोधी असलेला डाव उधळून लावण्याचा चंग जिल्हाधिकारी महेश राऊत करतात. त्यांना जया देशमुख या निर्भीड पत्रकाराची साथ-संगत लाभते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री, बांधकांममंत्री, आरोग्यमंत्री आणि मंत्री मंडळातील अजून एक-दोन मंत्री, मुख्यसचिव, महसूल सचिव, सचिव दर्जाचे अजून एक-दोन अधिकारी, बिल्डर, ठेकेदार आणि कार्यालयातील काही घरभेदी अधिकारी/कर्मचारी अशी सर्व फौज एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जिल्हाधिकारी महेश राऊत व त्यांना आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून मदत करणारा पत्रकार जया देशमुख यांचा जबरदस्त असा दुहेरी संघर्ष या कादंबरीत पत्रकार, संपादक अभिजित कुलकर्णी यांनी उभा केला आहे.
या कथानकावर निश्चित एखादा चित्रपट होऊ शकतो. सामान्य माणासाला कायमच मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांचा रूबाब-आब व व्यक्तीमत्त्वाचे आकर्षण राहिले आहे. या आकर्षणाबरोबरच त्यांच्या वर्तुळात घडणाऱ्या आतील घडामोडी, लफडी याविषयी ‘चवितचर्ण’ करण्यात एका विशिष्ट गटाला रस असतो. ही सर्वसामान्य वाचकांची नस नेमकी हेरत कुलकर्णी यांनी संपूर्ण कादंबरीत मंत्रीमंडळातील मंत्री, प्रशासनातील अधिकारी यांच्याशी संबंधित खुसखुसीत चर्चा कादंबरीत ठिकठिकाणी पात्रांच्या तोंडून उदधृत केल्या आहेत. मुख्यमंत्री, मंत्री, सचिव, जिल्हाधिकारी, पत्रकार यांचा एकमेकांशी प्रत्यक्ष व दूरध्वनीच्या माध्यमातून होणार संवाद अभिजित कुलकर्णी यांनी आपल्या ओघवत्या शैलीत कादंबरीत शब्दब्ध केला आहे. यामुळे वाचक म्हणून आपण या संवाद शैलीच्या प्रेमात अधिक पडत जातो. जिल्हाधिकारी महेश राऊत यांना अडकविण्यासाठी विदेश दौऱ्यांत त्यांच्यावर लावण्यात आलेला ‘हॅनी ट्रॅप’ बाबत आपली उत्कंठा वाढत जाते. जिल्हाधिकारी या ‘हॅनी ट्रॅप’ मध्ये फसतील का ? याची क्षणा-क्षणाला उत्कंठा वाढत जाते. व काळजी पण वाटत जाते. मंत्रालयात महेश राऊत यांची बदली झाल्यानंतर राऊत हताश, निराश होतात. प्रसंगी नोकरी सोडण्याचा निर्धार करतात. मात्र त्यांचा पत्रकार मित्र त्यांची समजूत घालतो. आणि त्यांना मंत्रालयात रूजू होण्याचा सल्ला देतात. महेश राऊत मंत्रालयात रूजू झाल्यानंतर आपणास वाटते. हा संघर्ष आता संपला ; पण मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून राऊत ‘बांद्रा’ तील भूखंड हळपण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव उघळून लावतात की ते त्यात अपयशी ठरतात ? हा संघर्ष कादंबरीत वाचण्यासारखा आहे.
कादंबरी एकूणच उत्कंठावर्धक, वाचकांची अभिरूचीची भूक सांभाळणारी, खुसखुसीत, खुमासदार झालेली आहे. शेवटी जाता-जाता ऐवढेच म्हणावे वाटते की, ‘मुंबई दिनांक’ व ‘सिंहासन’ या अरूण साधूंच्या मराठी कादंबरीनंतर बऱ्याच दिवसांनी एका पत्रकाराने लिहलेली दर्जेदार मराठी कादंबरी वाचण्यात आली ती म्हणजे ‘रेडटेप !’ ...Read more
- DAINIK SAKAL 03-02-2019
सरकारी अधिकाऱ्याची संघर्षगाथा...
साधारणपणे पुस्तकाचं बाह्यरूप, लेखक असं बघून पुस्तक वाचायचं की नाही, हे मी ठरवतो. पुस्तकांच्या दुकानात नवीन काय हे चाळताना ‘रेड टेप’ समोर आलं. लेखक नवीन असल्यानं मला प्रश्न पडला. मुखपृष्ठ खूपच लक्षवेधक असल्यानं त्यावरं फाइलचा लाल बंध असलेलं छान चित्र पाहून ही सरकारी कारभारावरची कादंबरी असली पाहिजे, असा अंदाज बांधला. या लाल फितीचा जाच सर्वसामान्य माणसाला फार होत असतो. काही व्यक्ती त्याविरुद्ध, त्यातल्या अन्यायकारक गोष्टींविरूद्ध लढतात हे आपण अधूनमधून वर्तमानपत्रांतून वाचतो, बघतो. कधीकधी अनुभवतोसुद्धा; पण आपण थंड बसतो. या पार्श्वभूमीवर ‘रेड टेप’ वाचावी अशी ऊर्मी आली. ते पुस्तक वाचायला घेतलं आणि एकहाती वाचून संपवून टाकलं.
प्रथमपासून सुरू होणारं सूत्र शेवटपर्यंत टिकवण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. त्या लेखनात पत्रकाराचं वृत्तलेखन सतत जाणवत राहतं. अनेक प्रसंगांची गुंफण विशिष्ट शैलीत सलगपणे केलेली असल्यानं आपण प्रथम चकित होतो. नंतर विचारप्रवृत्त होतो. चीड येते आणि मनापासून प्रस्थापित चुकीच्या गोष्टींविरुद्ध लढणाऱ्या माणसाच्या बाजूनं उभा राहतो. समाजकारण, राजकारण, सरकारी कारभार आणि सर्वसामान्य माणूस या सर्वांचं एक वेगळं दर्शन, एक वेगळा पैलू पुस्तक वाचताना जाणवत राहतं.
सुमारे २६४ पानांचं हे पुस्तक ओघवत्या भाषेत आणि वास्तवाच्या पातळीवर असल्यानं मनाला भावतं. भिडतं. महेशसारख्या अधिकारी सद्य:स्थितीत खूप आवश्यक आहे, असं वाटतं. अशा अधिकाऱ्यांची फळी निर्माण झाली, तर परीवर्तन होऊ शकेल. समाजात, सरकारमध्ये, प्रशासनात, पत्रकारितेत सारंच वाईट नाही. ‘सब घोडे बारा टक्के’ असं आपण समजतो तसं नाही. काही अधिकारी, पत्रकार, राजकारणी, इतर माणसं चांगली आहेत हे समजतं. मात्र, सन्मार्गी आणि कर्तबगार अधिकाऱ्याच्या वाटेत कसे पेरले जातात, याचं उत्कृष्ट वर्णन पुस्तकात केलेलं आहे. उच्चपदस्थ अधिकारी, मंत्री, कायदा खातं इत्यादी जर भ्रष्ट असेल, तर त्यातले लागेबांधे कसे घट्ट असतात यावर लेखकानं छान झोत टाकला आहे. महेशसारख्या अधिकाऱ्याचं प्रशासकीय कौशल्य, काटेकोरपणे कायदा पाळणं आणि आपलं काम करत राहणं हे किती जिकीरीचं हे लक्षात येते. वाचकामध्ये कधीकधी विषण्णता, कधी खेद, कधी उत्कंठा, कधी चीड अशा अनेक वेगवेगळ्या भावना उचंबळून येतात. शेवटी बुद्धी विचार करू लागते. असं विचारप्रवृत्त करणं हेच लेखकाचं कौशल्य आहे. नवेदित असूनही त्याला ते जमलं आहे. आयएएस दर्जाचे अधिकारी एकमेकांशी कसे वागतात, किती ताणतणावात असतात, त्यांचे कुटुंबीय कशाकशाला तोंड देतात, ते या कादंबरीत समर्थपणे रेखाटण्यात आलं आहे.
समाज जडणघडणीच्या वाटचालीत अशी पुस्तकं मोठा वाटा उचलतात. एकूण सजग वाचकांनी, स्पर्धा, परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी, समाजकारण्यांनी, पत्रकारांनी आणि अधिकाऱ्यांनीसुद्धा वाचावं असं हे पुस्तक आहे. प्रथम अपत्याचं इतकं छान रूपडं रेखाटण्यात लेखक अभिजित कुलकर्णी यशस्वी झाले आहेत. त्यांनी असंच शोधपत्रकारितेतलं लेखन करावं यासाठी शुभेच्छा.
– डॉ. हिरेन निरगुडकर ...Read more
- MAHARASHTRA TIMES
आजच्या व्यवस्थेवर फटकारे...
अप्रामाणिकपणा आणि भ्रष्टाचार हे आपल्या देशाच्या पाचवीलाच पूजले आहेत, अशी बहुसंख्य भारतीयांची भावना आहे. आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी, वर्तमानपत्रातल्या बातम्या आणि सरकारी, कधी खासगीदेखील कार्यालयात येणारे अनुभव यामुळे तर ही ावना अधिकच पक्की होत जाते. पण याचबरोबर या परिस्थितीतही सावकाश का होईना देशाची प्रगती होते आहे, निदान देश बऱ्यापैकी ‘ओके’ चालला आहे, असेही मत वा निरीक्षण आपल्यातल्या बहुतेकांचे असते. तसेच हा देश जो तगून आहे तो काही प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या, काही कर्तृत्ववान नागरिकांच्या आणि काही निष्ठावान व्यावसायिकांच्या जोरावर याविषयी आपल्याला शंका नसते. असे प्रामाणिक लोक जीवनात विविध वळणांवर आपल्याला भेटत असतात, पण या बरबटलेल्या व्यवस्थेमध्ये त्यांची काय घुसमट होत असेल, याची आपल्याला कल्पना येतेच असे नाही.
नुकतीच प्रकाशित झालेली ‘रेड टेप’ ही अभिजित कुलकर्णी यांची कादंबरी अशाच एका प्रामाणिक व कर्तव्यकठोर अधिकाऱ्याची कहाणी सांगते. कालखंडाचा विचार केला तर कादंबरीचा स्पॅन छोटा, म्हणजे काही महिन्यांचा आणि प्रशासकीय दृष्टीने विचार केला तर केवळ दोन प्रकरणांच्या फाइलपुरताच मर्यादित आहे. पण यातही अभिजित आपल्या माध्यम क्षेत्राची, प्रशासकीय पद्धतीची, शासकीय आणि थोडेफार लँडमाफियांच्या जगाची अशी सफर घडवतात की एकचवेळी अंतर्मुख व अस्वस्थ व्हायला होते.
कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे बांद्र्याच्या कलेक्टरपदी असलेला महेश हा सचोटीचा आयएएस अधिकारी. हा नुसता प्रामाणिक नाही तर कार्यक्षमदेखील आहे. नुसता सक्षम नाही तर जनतेची फसवणूक, लूट करणाऱ्या खुनशी व समाज विघातक शक्तींशी पंगा घेऊन त्यांना निष्प्रभ करणाऱ्या खेळी करण्याइतका चतुर आणि हिंमतवान देखील आहे. प्रकरण आहे बांद्र्याच्या मध्यवस्तीत असलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी राखीव असलेल्या भूखंडाचं व शासकीय कर्मचाऱ्यांची वसाहत विकसित करण्याच्या कामाचं. शेकडो कोटी रुपयांचा प्रश्न असल्याने अर्थातच मुख्यमंत्र्यांपासून अनेकांचे हिसंबंध यात गुंतलेले. मोठा मलिदा लाटणाऱ्या प्रमुख पात्रांबरोबरच जमेल तेवढा हात मारणारे आणि वैयक्तिक हिशेब चुकते करणारे काठावरचे खेळाडू यांचे अतिशय सुंदर चित्रण कादंबरीत येते. आयएएस अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि हितसंबंध व त्यामुळे एकाचवेळी एकमेकांवर कुरघोडी व एकमेकांना मदत करण्यासारखे गुंतागुंतीचे प्रसंग लेखकाने खुबीने रंगवले आहेत. कादंबरीची भाषा व घडामोडींचा वेग आपल्याला खिळवून ठेवतो. महेशला त्याच्या कामात मदत करणारा जया हा पत्रकार लेखकाने अतिशय प्रभावीपणे उभा केला आहे. त्याचबरोबर प्रशासकीय व्यवस्थेवर, पत्रकारितेवर, माध्यमांच्या जबाबदारीवर मार्मिक भाष्य ही कादंबरी करते.
फाइलवर हवा तसा शेरा मारावा म्हणून येणारा दबाव महेश झिडकारतोच, पण त्याचबरोबर या विषयातल्या बाधित, वंचितांचं प्रबोधन करून सामाजिक दबावही वरिष्ठांवर आणतो. धमक्या, चारित्र्यहननाचे प्रयत्न यांना न जुमानता आपल्या अधिकारपदाचा योग्य उपयोग करण्याचा त्याचा प्रयत्न आपल्यालाही कुठे तरी आशेचा किरण दाखवून जातो.
अभिजित यांची ही पहिलीच कादंबरी छान जमून आली आहे. कादंबरीचा प्लॉट उत्कंठावर्धक आहे. संवाद जिवंत आहेत आणि पात्रं रसरशीत.
–डॉ. चंद्रकांत संकलेचा ...Read more
- Read more reviews