* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: RESHIMREGHA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662276
  • Edition : 3
  • Publishing Year : JANUARY 2002
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 88
  • Language : MARATHI
  • Category : POEMS
  • Available in Combos :SHANTA SHELKE COMBO SET - 21 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SHANTABAI IS WELL KNOWN AS A POETESS. BUT WE ALL ARE AWARE THAT SHE IS EQUALLY FAMOUS AS A LYRICIST COMPOSING FOR MOVIES AND DRAMAS. SHE IS A LEADING LYRICIST TODAY. WHILE COMING UP WITH LYRICS SHE HAS TRIED DIFFERENT FORMATS OF IT. SHE HAS WRITTEN MUCH IN THE FORMAT OF `LAVANI` AND `GOULAN` AND GIVEN A CERTAIN DEPTH TO THESE FORMATS. THIS BOOK IS COMPILED OF MANY SUCH FORMS, IT INCLUDES MANY OF HER FAMOUS DUETS. THOUGH SHE WROTE IT ON A COMMERCIAL BASIS, SHE DID NOT LOSE HER PASSION FOR WRITING. THE COMPOSITIONS HERE HAVE A MIDAS TOUCH.
कवयित्री म्हणून सर्वपरिचित असलेल्या शान्ताबार्इंनी विपुल गीतलेखनही केले आहे. चित्रपट, नाटके याचप्रमाणे ध्वनिमुद्रिका, ध्वनिफिती अशा माध्यमांतून त्यांची अनेक गीते लोकांपर्यंत पोहोचली आणि ती लोकप्रियही झाली. शान्ताबाई या आजच्या एक आघाडीच्या गीतकार आहेत. गीतांसाठी विविध रचनाबंध त्यांनी हाताळले आहेत, त्याचप्रमाणे आशयाचीही त्यात विस्मयकारक विविधता आहे. लावण्या आणि गौळणी या पूर्वापार चालत आलेल्या गीतप्रकारांत शान्ताबार्इंनी अनेक गीते लिहिली, इतकेच नव्हे तर त्या प्रकारांना त्यांनी स्वत:चे असे एक परिमाणही दिले. ‘रेशीमरेघा’ या संकलनात शान्ताबार्इंनी लिहिलेल्या अनेक लावण्या, गौळणी आहेत, तसेच त्यांत काही वेधक द्वंद्वगीतेही आहेत. व्यावसायिकतेला झालेला निर्मितीक्षमतेचा स्पर्श आणि कारागिरीला लाभलेली काव्यगुणांची जोड म्हणजेच या प्रसन्न ‘रेशीमरेघा’.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#RESHIMREGHA #SHANTA #J #SHELKE #LAVANI #GEETE #रेशीमरेघा #शान्ता #ज #शेळके #लावणीगीते
Customer Reviews
  • Rating Starमीना कश्यप शाह

    शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 17-11-2002

    शांताबार्इंच्या गीताचे संकलन रेशीम रेघा... कवयित्री शांता शेळके यांनी मनाशी संवाद साधणारी तरल कविता लिहून एक वेगळे नाव महाराष्टभर मिळविले आहे. गेल्या चार दशकांपासून सातत्याने कवितालेखन करणाऱ्या शांताबार्इंनी नाटक व चित्रपटांसाठी गाणी आणि लावण्याही लहिल्या आहेत. ‘रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी...’ या लावणीने तर एकेकाळी सर्वत्र चांगलाच कहर माजविला होता. त्यांची काही गीते ध्वनिमुद्रिका व ध्वनिफितीतून रसिकापर्यंत पोहोचली आहेत पण या सर्व गीतांचे एकत्रित संकलन ‘रेशीम रेघा’ या पुस्तकाद्वारे मेहता पब्लिशिंगने केले आहे. लावण्या, गौळणी, द्वंद्वगीते आदी प्रकारची ७९ गीते या पुस्तकात संकलित केली आहेत. गीतांचे वैविध्य शांताबार्इंनी किती आकर्षकपणे हाताळले आहे, याचा प्रत्यंतर हे पुस्तक वाचताना येतो. उत्तम निर्मितीक्षमता असणाऱ्या शांताबाईचे हे संकलनाचे पुस्तक मराठी गीतांची आवड असणाऱ्या सर्वांनाच अत्यंत उपयुक्त असेच झाले आहे. ‘काय, बाई सांगू? कसं गं सांगू? मलाच माझी वाटे लाज, काहीतरी होऊन गेलंय आज’, ‘हिची चाल तुरुमुरु, उडती केस भुरुभुरु’, ‘मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजणी’, ‘रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी’ या व इतर गाजलेल्या गीतांचा समावेश असणाऱ्या या पुस्तकात शांताबार्इंचा एक वेगळाच पैलू एकत्रितपणे मराठी वाचकांना उपलब्ध झाला आहे. याशिवाय चित्रपट आणि नाटकांसाठी मागणीनुसार लिहिलेली काही गीते या पुस्तकात असली तरी त्यांना एक वेगळे परिमाण लाभले आहे. त्यातील बहुतेक गाण्यांच्या चाली परिचित असल्यामुळे ही गीते एखाद्या कार्यक्रमात बसवायची असली तर त्यांचा शोध घेणे अवघड होते पण या पुस्तकाच्या माध्यमातून ही अडचण दूर झाली आहे. ‘माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा’, ‘रात सारी तुम्हा संगती जागते’, ‘रातीची झोप मज येईना’, ‘साज मी फुलांचा केला’, ‘कशी गौळण राधा बावरली’ ही व इतर गीतेही संकलन असणारे हे पुस्तक नवीन गायकांना उपयुक्त आहे. -विलास पगार ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 09-06-2002

    शांताबाई शेळके या ख्यातकीर्ती प्रतिभावंत कवयित्रीचे नाव मराठीत जसे काव्याच्या प्रांतात अग्रणी आहे तसेच ते ललितलेखनाच्या प्रांतातही आहे. भावगीतांच्या क्षेत्रातसुद्धा बार्इंनी कितीतरी अस्सल गीते मराठी माणसांना अमोल ठेव्यासारखी बहाल केली आहेत. त्यांची बुसंख्य गीते ही चित्रपट आणि नाटकांसाठी आणि मागणीनुसार आणि प्रसंगाच्या गरजेनुसार लिहिली होती. काही द्वंद्वगीते, लावण्या, गौळणी, नृत्यगीते तर तीस-चाळीस वर्षांपूर्वीची आहेत. तरीही आजसुद्धा त्यांचे वास्तवात साहित्यमूल्य, काव्यमूल्य अबाधित आहे. त्यातलीच काही गाणी ‘रेशीमरेघा’ या काव्यसंग्रहात संकलित आहेत. काव्यरचनेमागे कलाकुसरीपेक्षा प्रतिभेचा भाग अधिक असतो आणि गीतरचनेत तंत्र आणि कौशल्य अधिक असते, असे म्हटले जाते. शांताबार्इंची रेशीमरेघातील काही गीते या संकेताला अपवाद आहेत. तंत्रकौशल्य आणि प्रतिभा या त्रिवेणी संगमामुळेच ही गीत लक्षणीय आणि स्मरणीय झाली आहेत. उदा. रिमझिम बरसत श्रावण आला, काय बाई सांगू, कसं ग सांगू? का धरिला परदेश, कशी गौळण राधा बावरली, कशी नागीण सळसळती, मनाच्या धुंदीत लहरीत, शालू हिरवा पाचू न मरवा अशी कितीतरी गीते सांगता येतील. या ‘रेशीमरेघा’त एकूण ७९ गीते आहेत. त्यातल्या निम्म्याहून अधिक लावण्याच आहेत. गीतांसाठी बार्इंनी विविध रचनाबंध वापरले आहेत. व्यावसायिकतेला झालेला निर्मितीक्षमतेचा स्पर्श आणि कारागिरीला लाभलेली काव्यगुणांची जोड म्हणजेच या रेशमांच्या रेघांचे कशिदी रूप. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 04-01-2004

    साहितच्या क्षेत्रात संवेदनक्षम आणि तरल मानवी भावभावनांचे यथार्थ चित्रण घडवणाऱ्या साहित्यिक कवयित्री शांताबाई शेळके यांच्या ‘रेशीमरेघा’ हा काव्यगीत संग्रह. ७५ गीतांचा हा सुबक, सुरेख संग्रह. पुस्तकाच्या देखण्या मलपृष्ठावर त्यांच्या गीतांवर, ती गीते, लाण्या, गौळणी लिहिण्याच्या अनोख्या पद्धतीविषयी आणि शांताबाई शेळके यांच्या कवयित्री म्हणून असलेल्या अलौकिकत्वाबद्दलही ओझरता तरीही मार्मिक उल्लेख आढळतो तो असा, ‘कवयित्री म्हणून सर्वपरिचित असलेल्या शांताबार्इंनी विपुल गीतलेखनही केले आहे. चित्रपट, नाटके याचप्रमाणे ध्वनिमुद्रिका, ध्वनिफिती अशा माध्यमांतून त्यांची गीते लोकांपर्यंत पोहोचली आणि ती लोकप्रियही झाली. रेशीमरेघा या संकलनात शांताबार्इंनी लिहिलेल्या अनेक लावण्या, गौळणी आहेत. तसेच त्यात काही वेधक द्वंद्वगीतेही आहेत. व्यावसायिकतेला झालेला निर्मितीक्षमतेचा स्पर्श आणि कारागिरीला लाभलेली काव्यगुणांची जोड म्हणजेच या प्रसन्न ‘रेशीमरेघा’. लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर आणि त्यांचे कलाकार सहकारी यांना स्नेहादरपूर्वक शांताबार्इंनी रेशीमरेघाची अर्पणपत्रिका सुरुवातीला सादर केलीय. त्यानंतर आपली दोन पानी प्रस्तावना लिहून आपल्या रसिकांशी संवाद साधलाय. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more