* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789387789937
  • Edition : 1
  • Publishing Year : JULY 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 208
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
RIKTA` IS MOHANA PRABHUDESAI JOGLEKAR`S SECOND STORY COLLECTION. EACH STORY FROM THIS COLLECTION SHOWS DIFFERENT SHADES AND VARIATIONS IN HUMAN NATURE. BECAUSE OF THE AUTHOR`S RESIDENCE IN BOTH THE UNITED STATES AND INDIA, HER KALEIDOSCOPE OF STORIES INCLUDE PECULIAR SUBJECTS. MOHANA`S UNIQUE STYLE KEEPS READERS INVOLVED AND BUILDS CURIOSITY TO READ FURTHER. HER STYLE TO SHOW EACH CHARACTER`S MICROSCOPIC REACTIONS AND THINKING IS AMAZING AND GIVES JUSTICE TO ALL OF THE CHARACTERS IN THE STORY.
‘रिक्त’ या कथासंग्रहात वेगवगळ्या कारणांमुळे भावनांच्या आवर्तात सापडलेल्या व्यक्तिरेखांच्या मनाचं सूक्ष्म दर्शन घडविणाऱ्या कथा आहेत. परिाQस्थतीशरण, कोणता ना कोणता सल मनात बाळगत जगणारी किंवा एखाद्या घटनेने जीवनात उलथापालथ झालेली अनेक माणसं ‘रिक्त’ या कथासंग्रहातून भेटतात. मग समलिंगी आकर्षणातून मुलीने एखाद्या मुलीशी लग्न करण्याच्या निर्णयामुळे अस्वस्थ झालेली ‘जोडीदार’ कथेतील डॉ. मीरा असेल किंवा एका तरुण मुलाच्या अपघाती मृत्यूला कारणीभूत ठरलेला ‘वाट’ कथेतील शिंदे ड्रायव्हर असेल, नवऱ्याच्या संशयीपणाचं भूत मानगुटीवर असहायतेने वागवणारी ‘अस्तित्व’ कथेतील उज्ज्वला असेल किंवा सावत्रआईमुळे वडिलांच्या प्रेमाला पारखी झालेली ‘समाधान’ कथेतील कमू असेल. या कथा मनोविश्लेषणात्मक असल्या तरी त्या वाचकाची उत्कंठा वाढवत राहतात. व्यक्तिरेखांचं मनोविश्लेषण आणि ओघवती, लालित्यपूर्ण भाषा या बलस्थानांसाठी वाचकांनी हा कथासंग्रह मुळातून वाचावा असा आहे. वाचनीय आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#RIKTA# MOHANA PRABHUDESAI JOGLEKAR#रिक्त# मोहना प्रभुदेसाई जोगळेकर#पाश# किनारा# अमरचा दिवस# जोडीदार# संभ्रम# पूल# वाट# अस्तित्व# समाधान# सावट# मळभ# मार्ग
Customer Reviews
  • Rating StarNilesh Malvankar

    प्रसिद्ध लेखिका मोहना जोगळेकर यांचा रिक्त हा मेहता प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला कथासंग्रह वाचनात आला. बऱ्याच काळाने दर्जेदार कथा वाचल्याचं समाधान मिळालं. या कथांमधून मानवी स्वभावाचे विविध कंगोरे समर्थपणे उलगडून दाखवले आहेत. मानवी मनाच्या भावभावनांचंबारकाईने केलेलं चित्रण या कथांमधून जाणवतं. विक्षिप्त स्वभावाच्या माणसांमुळे त्यांच्या जवळच्यांना सोसावे लागणारे त्रास. पालकांच्या अमेरिका-भारत-अमेरिका अशा स्थलांतरामुळे मुलांना स्थिरावण्यात येणाऱ्या अडचणी, ताणतणाव. हुशार पण शिकायची इच्छा असूनही परिस्थितीमुळे हतबल झालेला अमर दोन मुलींचा स्वतःबद्दलचा शोध आणि त्याचे त्यांच्या कुटुंबावर होणारे परिणाम समाजसेवेच्या क्षेत्रात आलेले काही अनुभव आणि त्याचा एका तरुणीच्या आयुष्यावर होणार परिणाम. परदेशातून बऱ्याच वर्षांनी भारतात आल्यावर गावी ओळखीच्या खुणा शोधणारी स्त्री. एका चुकीमुळे आयुष्यभराची होणारी फरफट संशयी नवऱ्यामुळे द्विधा मनस्थितीत असणारी स्त्री. काही काही गोष्टी जेव्हाच्या तेव्हा होण्याला अर्थ असतो हे सांगणारी कमुताईची कथा. आईवडिलांच्या संबंधांचं पुढे मुलीच्या आयुष्यावर पडणारी छाया. प्रेमविवाहामुळे माहेरच्यांनी संबंध तोडले, तरी जिद्दीने स्वतःच्या हिंमतीवर संसार समर्थपणे निभावून नेणारी स्त्री. परक्यांच्या मुलासाठी झटणारी तरुणी. अनोरेक्सीयाशी झगडणारी युवती अशा विविध विषयांवरील कथा या संग्रहात आहेत. बरेचसे विषय मराठीत कदाचित पहिल्यांदाच हाताळले गेलेले आहेत. हे विषयांचं नावीन्य तसेच त्या विषयांचा खोल अभ्यास कथेतून जाणवतो. एवढं असूनही कथा प्रवाही आहेत. वाचकांची उत्सुकता टिकवून ठेवण्यात कथा यशस्वी ठरतात. हा कथासंग्रह किंडलवरदेखील उपलब्ध आहे. या पूर्वी मोहना जोगळेकर यांचा `मेल्टिंग पॉट` हा कथासंग्रह प्रकाशित झाला होता आणि त्याला कोमसापचं पारितोषिक मिळालेलं आहे. माहेर, श्री व सौ, अनुराधा, प्रसाद, रोहिणी, साप्ताहिक सकाळ, मायबोली, BMM वृत्त तसेच अमेरिकेतील विविध दिवाळी अंकांमध्ये मोहना जोगळेकर यांच्या कथा प्रकाशित होत असतात. त्या व्यतिरिक्त लोकसत्ता, रत्नागिरी टाइम्स, प्रहार, सकाळ अशा वर्तमानपत्रांमधूनही त्यांनी लेख आणि सदरलेखन केलं आहे. लेखिकेस पुढील लेखनासाठी शुभेच्छा !! ...Read more

  • Rating Starसंवेदनशील, प्रवाही आणि वाचनीय कथा

    प्रसिद्ध लेखिका मोहना जोगळेकर यांचा रिक्त हा मेहता प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला कथासंग्रह वाचनात आला. बऱ्याच काळाने दर्जेदार कथा वाचल्याचं समाधान मिळालं. या कथांमधून मानवी स्वभावाचे विविध कंगोरे समर्थपणे उलगडून दाखवले आहेत. मानवी मनाच्या भावभावनांचंबारकाईने केलेलं चित्रण या कथांमधून जाणवतं. विक्षिप्त स्वभावाच्या माणसांमुळे त्यांच्या जवळच्यांना सोसावे लागणारे त्रास. पालकांच्या अमेरिका-भारत-अमेरिका अशा स्थलांतरामुळे मुलांना स्थिरावण्यात येणाऱ्या अडचणी, ताणतणाव. हुशार पण शिकायची इच्छा असूनही परिस्थितीमुळे हतबल झालेला अमर दोन मुलींचा स्वतःबद्दलचा शोध आणि त्याचे त्यांच्या कुटुंबावर होणारे परिणाम समाजसेवेच्या क्षेत्रात आलेले काही अनुभव आणि त्याचा एका तरुणीच्या आयुष्यावर होणार परिणाम. परदेशातून बऱ्याच वर्षांनी भारतात आल्यावर गावी ओळखीच्या खुणा शोधणारी स्त्री. एका चुकीमुळे आयुष्यभराची होणारी फरफट संशयी नवऱ्यामुळे द्विधा मनस्थितीत असणारी स्त्री. काही काही गोष्टी जेव्हाच्या तेव्हा होण्याला अर्थ असतो हे सांगणारी कमुताईची कथा. आईवडिलांच्या संबंधांचं पुढे मुलीच्या आयुष्यावर पडणारी छाया. प्रेमविवाहामुळे माहेरच्यांनी संबंध तोडले, तरी जिद्दीने स्वतःच्या हिंमतीवर संसार समर्थपणे निभावून नेणारी स्त्री. परक्यांच्या मुलासाठी झटणारी तरुणी. अनोरेक्सीयाशी झगडणारी युवती अशा विविध विषयांवरील कथा या संग्रहात आहेत. बरेचसे विषय मराठीत कदाचित पहिल्यांदाच हाताळले गेलेले आहेत. हे विषयांचं नावीन्य तसेच त्या विषयांचा खोल अभ्यास कथेतून जाणवतो. एवढं असूनही कथा प्रवाही आहेत. वाचकांची उत्सुकता टिकवून ठेवण्यात कथा यशस्वी ठरतात. हा कथासंग्रह किंडलवरदेखील उपलब्ध आहे. या पूर्वी मोहना जोगळेकर यांचा `मेल्टिंग पॉट` हा कथासंग्रह प्रकाशित झाला होता आणि त्याला कोमसापचं पारितोषिक मिळालेलं आहे. माहेर, श्री व सौ, अनुराधा, प्रसाद, रोहिणी, साप्ताहिक सकाळ, मायबोली, BMW वृत्त तसेच अमेरिकेतील या विविध दिवाळी अंकांमध्ये मोहना जोगळेकर यांच्या कथा प्रकाशित होत असतात. त्या व्यतिरिक्त लोकसत्ता, रत्नागिरी टाइम्स, प्रहार, सकाळ अशा वर्तमानपत्रांमधूनही त्यांनी लेख आणि सदरलेखन केलं आहे. लेखिकेस पुढील लेखनासाठी शुभेच्छा !! ...Read more

  • Rating Star- संजय वैशंपायन, 21/1/2020

    आशयाने परिपूर्ण रिक्त कथासंग्रह भारतातून अमेरिकेत स्थायिक होऊन पुढची पिढी हाताशी आणि तरी भारतीयत्वाची नाळ तुटत नाही हेच खरं आणि अशाच प्रकारच्या भावना व विचार मूळच्या रत्नागिरीकर मोहना प्रभुदेसाई-जोगळेकर, यांनी त्यांच्या स्वतंत्रपणे प्रकाशित झालेल्या‘रिक्त` या कथासंग्रहामधील कथांमधून मांडल्या आहेत. लेखिकेचा ‘मेल्टिंग पॉ` हा पहिला कथासंग्रह. त्याची फार मोठी चर्चा झाली होती. कोमसापचा लेखिकेचा पुरस्कारही या पुस्तकाच्या मध्यमातील सृजनासाठी लेखिकेला प्राप्त झाला आहे. यामुळे ‘रिक्त` या संग्रहातून मोठ्या अपेक्षा होत्याच आणि त्या पूर्ण होतात, असंच म्हणावं लागेल. मुखपृष्ठ पाहताच यामधील कथा नव्या युगाच्या, नव्या धाटणीच्या असणार असंच वाटतं. ‘रिक्त` कथासंग्रहातील कथाविषय, पात्र, घटना, काळ यांचे निराळे संदर्भ घेऊन येतात आणि त्यामुळेच दीर्घ काळ मनात रेंगाळत राहतात. पात्रांचा कथेतील घटनांबद्दल स्वत:चा दृष्टीकोन हेही कथांचं वैशिष्ट्य. वाटेत घडलेल्या घटनेने बदललेलं आयुष्य, आईच्या निधनानंतर परदेशातून आलेली ती, स्वत:ची ओळख पटलेल्या दोन मुलींमुळे त्यांच्या घरात उठलेलं वादळ, मुलीवर आपल्या हातून अन्याय झाला हे अखेर तिच्यासमोर कबूल करणारे वडील, शाळकरी मुलाला त्याच्या पालकांनीच शाळेत प्रवेश घ्यावा असं वाटायला लागणारं वास्तव, जातिभेद करायचा नाही, या निश्चयाने वेगळं पाऊल उचलणारी तरुणी, आई-वडिलांच्या घटस्फोटाचं सावट मनावर असताना लग्न केलेली युवती, समाजसेवेच्या अनुभवातून झालेली द्विधा मन:स्थिती, अनाथ मुलासाठी एका तरुणीने उचललेलं अनोखं पाऊल, घरातील ‘फूकट` गेलेला मुलगा, अशा असंख्य विषयांमधून व्यक्तिरेखांचं बारीक निरीक्षण कथेतील पात्रापात्रांतून डोकावत राहतं. सारीच पात्रं वाचकाला अलगद त्या त्या काळात नेऊन सोडतात, कथेतील काळाशी, वातावरणाशी वाचक नकळत एकरूप होऊन जातो. ‘रिक्त` कथासंग्रहातील प्रत्येक कथा ‘पुढे काय’ ही उत्कंठा वाढवणारी आणि पुढील कथेबद्दल उत्सुकता ताणणारी आहे; पण पहिल्याच ‘पाश’ या कथेमध्ये निखळ कोकणातील धोपेश्वरमधील कुटुंबाची घरातील सदस्यांमुळे झालेली परवड आणि नंतर ते रक्ताच्या नात्यांचे पाश तुटताना व तोडताना झालेली तडफड फार उत्कटपणे मांडली आहे. हा कथासंग्रह १३ भरगच्च कथांचा आहे. यामुळे सर्वच कथांबद्दल स्वतंत्रपणे लिहिणे शक्य होणार नाही; परंतु त्यातील उल्लेखनीय ‘अमरचा दिवस’ टिपिकल झोपडपट्टीतील वातावरणात वाढणार्या मुलांची घुसमट, प्रगतीची आस अन् परीस्थितीचा तणाव ही संपूर्ण मध्यमवर्गीय वाचकाला अनभिज्ञ परिस्थिती मांडण्यात व त्यातील काळीज पिळवटून टाकणारी वस्तुस्थिती अत्यंत प्रखर तीव्रतेने शब्दबद्ध करण्यात लेखिका यशस्वी झाली आहे. मोगरेबार्इंच्या रूपाने सुशेगात मध्यमवर्गीय स्थिती आणि सुटू न शकणार्या परिस्थितीच्या प्रश्नांची उकल शोधणार्या मंगलातार्इंच्या भांबावलेपणाची मांडणी सुरेखच साधली आहे. ‘संभ्रम’चा कथाविषय, खरंतर लेखिकेचं प्रोफाईल पाहिलं तर अनवट वाटणारा. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मानवी गिनीपिग्ज उपलब्ध करून देण्याचा वेगळा व्यापार, त्यातील प्रश्न आणि सज्जन मनाला पडणारे प्रश्न फार धाडसाने मांडण्यात आले आहेत. कथा जरी मीना- चेतनची असली तरी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आक्रमणात माणसांचा प्रयोग म्हणून वापर करण्याच्या प्रवृत्तीचा फायदा घेणाNयांचा उद्योग कथापटावर मांडण्यात आला आहे. ‘समाधान’ ही कथा ५५ ते ७० या कालखंडातील असल्याचे निश्चितपणे वाटते. अशा पाश्र्वभूमीवर कमू, गीताई, आबा या व्यक्तिरेखा थोडक्या लेखनात अतिशय समर्थपणे लेखिका उभ्या करते. वर्षाला बावन्न चित्रपट सावत्र मुलीला दाखवणारी गीताई आणि सावत्र मुलीची आत्या सुधा यांचे नातेसंबंध, त्यांची अपरिहार्यता उभी करण्याचे शिवधनुष्य लेखिकेने समर्थपणे पेलले आहे. भरगच्च आशयमूल्य असणार्या १३ कथा समाविष्ट असणार्या या कथासंग्रहाचं नाव ‘रिक्त’ का, याचं उत्तर या संग्रहातील शेवटची कथा ‘रिक्त’ हे आहे. वयात येणार्या अमिताकडे सगळ कुटुंब लक्ष देत असूनही शाळेतील मुलांचं चिडवणं मनाला लागतं आणि मनोरुग्ण व्हावं अशा परिसीमेने अमिता अन्न उलटून टाकणं, अवाजवी एरोबिक्स करते. युरोपात राहण्याचे भारतीयांवर होणारे मानसिक परिणाम बारीक बारीक कंगोर्यासह समर्थपणे मांडणारी कथा म्हणजे ‘रिक्त.’ खरंतर संग्रहातील सर्वच कथा परिपूर्ण आहेत; परंतु लेखिकेच्या मते यातील परमोच्च कथा ‘रिक्त’ असावी आणि त्यामुळेच संग्रहाला ‘रिक्त’ नाव दिलं असावं. मेहता पब्लिशिंग हाऊसने हे पुस्तक अतिशय व्यावसायिक पद्धतीने प्रकाशित केलं आहे. सुरेख मुखपृष्ठ, छान टाईप व कागद देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचा वापरल्याने वाचताना बरं वाटतं. लेखिकेच्या निरीक्षणाचा, स्मरणाचा आणि सगळा एकत्रित परिणाम देणारं लिखाण फार आश्वासक आणि साहित्य जगात उज्ज्वल भवितव्य निश्चित करणारं आहे. खरंतर संग्रहातीलच एखाद्या कथेचं नाव संपूर्ण कथासंग्रहाला देण्याऐवजी स्वतंत्र ओळख ठरावी, असं नाव देणं गरजेचं वाटतं आणि बर्याच कथा या छोटी कादंबरी होण्याच्या जवळपास असल्याने भविष्यात लेखिकेने आपल्या शैलीमधील कादंबरी लेखनाचा टप्पा गाठावा, असं वाटणं साहजिकच! एकंदरीत काय, तर भरगच्च आशयाचा ‘रिक्त’ कथासंग्रह आपल्या संग्रहात हवाच. आणि हो, पुन: वाचताना देखील कंटाळा नाही येत! ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 26-08-2018

    उत्कंठावर्धक कथासंग्रह... मोहना प्रभुदेसाई जोगळेकर यांचा ‘रिक्त’ हा कथासंग्रह नुकताच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केला आहे. या कथासंग्रहातील कथाविषय, पात्र, घटना, काळ यांचे निराळे संदर्भ घेऊन येतात आणि दीर्घकाळ मनात रेंगाळत राहतात. पात्रांचा कथेतल घटनांबद्दल स्वत:चा दृष्टिकोन हेही कथांचं वैशिष्ट्य. वाटेत घडलेल्या घटनेने बदललेलं आयुष्य, आईच्या निधनांनंतर परदेशातून आलेली ती, स्वत:ची ओळख पटलेल्या दोन मुलींमुळे त्यांच्या घरात उठलेलं वादळ, मुलीवर आपल्या हातून अन्याय झाला हे अखेर तिच्यासमोर कबूल करणारे वडील, शाळकरी मुलाला त्याच्या पालकांनीच शाळेत प्रवेश घ्यावा असं वाटायला लागणारं वास्तव, जातीभेद करायचा नाही या निश्चयाने वेगळे पाऊल उचलणारी तरुणी, आईवडिलांच्या घटस्फोटाचं सावट मनावर असताना लग्न केलेली युवती, समाजसेवेच्या अनुभवातून झालेली द्बिधा मन:स्थिती, अन्याय मुलांसाठी एका तरुणीने उचललेलं एक अनोखं पाऊल, अशा असंख्य विषयांमधून व्यक्तिरेखाचं बारीक निरीक्षण कथेतील पात्रांमधून डोकावत राहतं. या सगळ्या कथांतील वातावरणाशी वाचक नकळत एकरूप होऊन जातो. या कथासंग्रहातील प्रत्येक कथा उत्कंठा वाढवणारी. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
कृष्णा DIWATE

आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more