* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666144
  • Edition : 9
  • Publishing Year : JANUARY 1952
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 104
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET- 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS COLLECTION INCLUDES THE SHORT STORIES BY RANJIT DESAI WHICH HE PENNED DOWN DURING HIS EARLY YEARS AS A WRITER. THESE STORIES WERE PUBLISHED IN STANDARD MAGAZINES LIKE MAUJ, SATYAKATHA, KIRLOSKAR, ABHIRUCHI, JANWANI ETC. RANJIT DESAI REVEALS HIS SECRET ABOUT THESE SHORT STORIES, WHATEVER COMES TO MY MIND TAKES FROM OF STORY. WHATEVER I WRITE IS WRITTEN WITH ALMOST HONESTY. THERE MIGHT BE MANY DRAWBACKS, MANY FAULTS, MANY A TIMES I MIGHT HAVE GIVEN MORE WEIGHTAGE TO RURAL LIFE THAN THAT COMPARED TO URBAN LIFE, BUT NO WHERE I HAVE BEEN DECEITFUL. I HAVE ONLY ONE REQUEST TO THE READERS, IF EVER YOU DECIDE TO CHECK THE TRUENESS OF MY STORIES, REMEMBER MY HONEST AND FRANKNESS.
रणजित देसाई यांनी अगदी आरंभीच्या काळात ज्या काही लघुकथा लिहिल्या, त्यांतील निवडक कथा या संग्रहात संग्रहित केल्या आहेत. या कथा ‘मौज’, ‘सत्यकथा’, ‘प्रसाद’, ‘किर्लोस्कर’, ‘अभिरुचि’ व ‘जनवाणी’ अशा दर्जेदार नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत. या कथांविषयी लिहिताना स्वत: रणजित देसाई म्हणतात : ‘.... एक ‘गुजगोष्ट’ सांगावीशी वाटते, की मी जे काही लिहिले आहे, ते अगदी मनापासून लिहिले आहे. त्यात उणिवा असतील, दोष असतील, विस्तार कमीअधिक असेल, नागरी जीवनापेक्षा ग्रामीण जीवनाचेच जास्त चित्रण असेल; परंतु त्यात अप्रामाणिकपणा मात्र खास नाही. माझ्या कथांना कसोटी लावलीच, तर ती ‘प्रांजलपणा’चीच लावावी, एवढेच ‘पसायदान’ मी वाचकांपुढे मागतो.’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA# SANCHIT# BHAIRAV# NANDA# MAIDAN# SEEMOLANGHAN# ROOPMAHAL# CHEI AGAD CHEI# ABAJI PATIL# DHANGARACHI JAAT# JEEVA-SHIVA# #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे – #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित# नाटक # भैरव# नंदा# मैदान# सीमोल्लंघन# रुपमहाल# चै आगद चै# आबाजी पाटील# धनगराची जात# जीवा-शिवा#
Customer Reviews
  • Rating StarAstana Pathan

    vachale he pustak.chhan aahe.

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    रणजित देसार्इंच्या कसदार ग्रामीणकथा… शालेय जीवनातच ‘भैरव’या कथेने लेखनाची सुरुवात केलेल्या रणजित देसार्इंचा पहिला कथासंग्रह १९५२मध्ये ‘रूपमहाल’द्वारे प्रकाशित झाला. त्यांच्या बहुतांश कथा ग्रामीण समाजजीवनावर आधारित असून काही ऐतिहासिक, प्राणिविषयक, संीतविषयक आणि विनोदी कथा त्यांनी लिहिल्या आहेत. ‘रूपमहाल’या पहिल्या कथासंग्रहात नऊ कथा असून त्यातील आठ ग्रामीण जीवनावरील तर एक कथा ऐतिहासिक स्वरूपाची आहे. विशेष म्हणजे ‘रूपमहाल’ ही एकच कथा ऐतिहासिक असूनही तिचे शिर्षक लेखकाने कथासंग्रहाला दिलेले आहे. यावरून ‘रूपमहाल’चे महत्त्व लक्षात येते. ग्रामीण समाजजीवन हा या कथासंग्रहाचा गाभा असून बैलांच्या शर्यती, हत्तीची साठमारी, कुस्ती, शिकार इत्यादी विषय त्यांनी हाताळले आहेत. प्रत्येक कथेत एका संघर्षाची योजना करून त्याभोवती पोषक अशा घटनांची व ग्रामीण वातावरणाची पाश्र्वभूमी त्यांनी कलात्मकरित्या रंगविली आहे. म्हणूनच या सर्व कथा वाचकांच्या मनाची पकड घेतात. भोवतालच्या रूक्ष व कृत्रिम वातावरणातून काहीशा अद्भूतरम्य सृष्टीत घेऊन जातात. नाट्यपूर्ण संघर्ष रंगवताना रणजित देसाईच्या भाषेच्या सामथ्र्याची आणि सूक्ष्म अवलोकनशक्तीची प्रचिती येते. मग ते ‘भैरव’मधील बैलांच्या शर्यतीचे रोमहर्षक वर्णन असो, ‘नंदा’मधील जीवघेण्या शिकारीचे वर्णन असो, ‘मैदान’मधील भैरू आणि शिद्दा यांच्यातील अटीतटीच्या निकाली कुस्त्यांचे वर्णन असो किंवा ‘चै आनंद चै’ या कथेतील साठमारीचे वर्णन असो; ही सर्व वर्णने वाचत असताना ते ते प्रसंग परिणामकारक रीतीने वाचकांच्या नजरेसमोर उभे करण्याचे शब्दसामर्थ्य दिसून येते. किंबहुना आकर्षक वर्णनशैली हेच या कथांच्या लोकप्रियतेचे रहस्य असल्याचे सतत जाणवते. संघर्षाचे परिणामकारक वर्णन करण्याबरोबरच प्रभावी समरप्रसंग हेही रणजित देसार्इंच्या कथालेखनाचे एक वैशिष्ट्य प्रस्तुत कथासंग्रहात पाहावयास मिळते. त्यांच्या कथेतील व्यक्ती किंवा प्राणी यांची वर्णने वाचकांच्या मनाला चटकन आकर्षित करून घेतात. हा पहिला कथासंग्रह असूनही यात पहिलेपणाच्या मर्यादा किंवा उणिवा अभावानेच व्यक्त होतात. कोल्हापुरातील संस्थानी वातावरणात वावरल्याच्या पाऊलखुणा यातून प्रकर्षाने जाणवतात. विशेषत: ‘भैरव’, ‘नंदा’, ‘चै अगद् चै’ यासारख्या प्राणिकथांतील जिवंत चित्रण पाहता लेखकाच्या संवेदनशील व्यक्तित्वाची आणि प्राणिविषयक जिव्हाळ्याची कल्पना येते. ‘रूपमहाल’विषयी प्रा.म.ना.अदवंत लिहितात, ‘‘घटना व व्यक्तिरेखन यांच्या जोडीला वातावरण निर्माण करण्याचे लेखकाचे कौशल्य विसरून चालावयाचे नाही. त्यासाठी अनेक सूक्ष्म तपशीलांचा त्याने उपयोग केला आहे. शकुनापशकुनाच्या कल्पना, जत्रेची व भेकनाची वर्णने, कुस्तीच्या फडाची वर्णने हा तपशील कथेत जिवंतपणा आणतो यात शंका नाही. थोडक्यात, अस्सल ग्रामीण जीवनाची प्रचिती देण्याचे सामर्थ्य या संग्रहात आहे व म्हणूनच त्यांच्या पुढील लेखनाबद्दल आशा वाटते.’’ प्रा. अदवंत यांची अपेक्षा सार्थ ठरावी अशाचप्रकारचे लेखन रणजित देसाईच्या हातून पुढील काळात झाले. नवकथा ऐन बहरात असताना कथालेखनाला प्रारंभ केला असूनही स्वत:चे वेगळे वैशिष्ट्य त्यांनी दाखवून दिले. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more