* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: RUSI MODI : THE MAN WHO ALSO MADE STEEL
  • Availability : Available
  • Translators : ANJANI NARAVANE
  • ISBN : 9788184981117
  • Edition : 2
  • Publishing Year : JUNE 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 228
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
  • Available in Combos :ANJANI NARAWANE COMBO SET-22 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
DESTINY`S CHILD! PERHAPS THAT WOULD BEST DEFINE RUSSI MODY`S PERSONA, GIVEN HIS INDELIBLE IMPRINT ON THE CHAPTERS OF INDIA`S CORPORATE HISTORY. TO THE MANOR BOM, HE UNDERTOOK A SEA VOYAGE FROM BOMBAY TO THE BRITISH SHORES, AND ENTERED THE PORTALS OF HARROW AT AGE TWELVE. THIS HARROVIAN BECAME THE PRESIDENT OF OXFORD UNION, AND DURING HIS ACADEMIC PURSUIT OF HISTORY AT CHRIST CHURCH COLLEGE GOT SMITTEN BY THE VERY DEMEANOUR OF THE FRENCH CONQUEROR NAPOLEON BONAPARTE, RATTLING OFF THE NAMES OF HIS TWENTY-SIX GENERALS; AND PLAYED PIANO ACCOMPANYING THE NOBEL LAUREATE NUCLEAR PHYSICIST ALBERT EINSTEIN ON VIOLIN IN THE PRECINCTS OF THE UNIVERSITY IN THE 1930S. IN THE SAME DECADE, COMMENCED HIS PROFESSIONAL BAPTISM BY FIRE AT TATA STEEL (TLSCO), IN BIHAR`S REMOTE PROVINCIAL TOWN OF JAMSHEDPUR AS A KHALASI (MANUAL WORKER). WHAT A PARADOX IN TERMS OF HIS ARISTOCRATIC UPBRINGING AND ENGLISH EDUCATION! BUT THIS `MAN-MOTIVATOR` PROVED HIS "METTLE` AS MUCH TO HIMSELF AS TO HIS DETRACTORS, COVETING THE MARSHAL`S HOT SEAT AS THE CHAIRMAN OF THE LARGEST PRIVATE COMPANY IN INDIA. A HISTORIC ASSOCIATION OF FIFTY-THREE YEARS WITH THE HALLOWED TATA EMPIRE WON HIM INTEMATIONAL ACCLAIM IN "INDUSTRIAL RELATIONS`, AND HE PENNED HIS OWN MANTRA OF PRACTICAL WISDOM BY LEADING FROM THE FRONT, WINNING HEARTS AND MINDS ALIKE. AHEAD OF HIS TIMES, AS EXPECTED OF A VISIONARY, HE IS AMONG THE PIONEERS IN INDUSTRY WHO INVESTED IN "HUMAN RESOURCE DEVELOPMENT` WHEN SUCH MANAGEMENT JARGONS HAD NOT BEEN INVENTED. FIRST AND FOREMOST, HE CONNECTED WITH HIS WORKERS AS A HUMAN BEING, AND THE REST AS THEY SAY IS HISTORY. FOR SOMEONE WHO COURTED CONTROVERSIES AT EVERY GIVEN STEP OF HIS STUPENDOUS CAREER, HE HAS LITERALLY LIVED BY HIS WITS. A MAN OF STEELY DETERMINATION, BUT ALWAYS KNOWN TO WEAR A SMILE, HIS BONHOMIE COULD PIERCE THROUGH THE MOST OMINOUS SITUATION. `WIT IS A WAY OF LIFE` WITH THIS CORPORATE. CZAR, WHO WAS COMPLIMENTED AS "A LEGEND IN HIS LIFETIME`, BY NONE OTHER THAN HIS MENTOR JRD TATA. PASSIONATE, JUST ABOUT EVERYTHING, HE LIVED LIFE KING-SIZE, RAISING A TOAST WITH THE HOI-POLLOI OF THE CHARMED CIRCLE; AND HIS ANNUAL SORTIES TO THE SOUTH OF FRANCE TO SAVOUR GOOD TIMES AT RIVIERA BECAME PART OF THE FOLKLORE. BUT THAT FLAMBOYANCE MASKED A DYNAMIC DISCIPLINARIAN AND ANALYTICAL ADMINISTRATOR, WHO CONTINUED TO REMAIN A CHAMPION OF THE UNDERDOG. CONFERRED THE NATIONAL HONOUR WITH PADMA BHUSHAN, HE ALSO FOUND A PRIDE OF PLACE IN THE BBC SERIES, MONEY MAKERS, THAT PORTRAYED SIX BOARDROOM POWERS AROUND THE WORLD, AND THEN MARCHED INTO THE LEAGUE OF "INTERNATIONAL WHO`S WHO OF PROFESSIONALS`. A UNIQUELY GIFTED INDIVIDUAL, RUSSI MODY MIGHT FIND IT HARD TO REPLICATE HIS OWN ACT. SIMPLY REFUSING TO RETIRE, HE SAYS "CHEERS` TO LIFE AT NINETY, CHANTING J`ATTENDRAI...TO THE STRAINS OF PIANO, WITHOUT MISSING A NOTE. AGE HAS NOT WITHERED THE SPIRIT OF A WARRIOR WHO HAS FOUGHT ALL HIS BATTLES WITH SUCH EXEMPLARY ELAN...! PARTHA MUKHERJEE HAS SERVED THE MULTINATIONAL RECKITT BENCKISER FOR TWENTY-FIVE YEARS, CLOSELY INVOLVED WITH OPERATIONS. HE HAS SCRIPTED AND DIRECTED AN AUDIO PROGRAMME ON KOLKATA, COMMEMORATING THE THREE HUNDREDTH YEAR OF THE CITY IN 1989, AND IT WAS PLAYED ON THE PUBLIC ADDRESS SYSTEMS OF ALL METRO STATIONS FOR SIX MONTHS AT A STRETCH. HIS DOCUMENTARY FILM, PULU, ON THE LIFE & TIMES OF CELEBRATED BENGALI ACTOR, SOUMITRA CHATTERJEE, AND THE FOLK DANCES OF SAMBALPUR, RECEIVED CRITICAL ACCLAIM FROM CINEASTES. JYOTI SABHARWAL HAS CO-AUTHORED THE AUTOBIOGRAPHIES OF KAPIL DEV (STRAIGHT FROM THE HEART), AMRISH PURI (THE ACT OF LIFE) AND VYJAYANTIMA/A BALI (BONDING...).
एक अत्यंत संपन्न, अत्यंत सुसंस्कृत कुटुंब. मुलांचे लाड खूप व्हायचे, पण शिस्तही तितकीच कडक असायची, कपडे साधे असायचे. असं ठासून मनावर बिंबवलं जायचं, की गरिबी, मळके कपडे यात लाजिरवाणं काहीही नाही; खोटं बोलणं, वाईट वागणं हे लाजिरवाणं आहे. शिक्षण इंग्लंडमध्ये हॅरो आणि ऑक्सफर्डला. इतिहास राहिला बाजूला, नोकरीला लागले एका मोठ्या कारखान्यात रोजावर मजूर म्हणून! कष्ट करण्याची तयारी, माणसांना समजून घेणं, माणसं जोडता येणं, सर्वांशी मिळतं घेणं हे खास विशेष गुण. शिस्तीचे आग्रही. उत्तम कलांची आवड, उत्तम खाण्याची, पिण्याची, संगीताची, पाश्चिमात्त्य नृत्याची जाण व आवड. उत्तम वक्ते, भरपूर वाचन, कारकिर्दीत प्रचंड प्रगती. ........सगळंच छान? दु:ख कशाचंच नाही? आहे ना! पण त्याचं प्रदर्शन नाही. नोकरीत अन्याय झाला– दुसरी कंपनी काढली! इतकी बहुरंगी, बहुढंगी, आगळीवेगळी, विलक्षण व्यक्ती आहे तरी कोण? ज्यांनी जमशेटपूरच्या टिस्कोमध्ये एकूण त्रेपन्न वर्षं सलग काम केलं, त्यातली नऊ वर्षं अध्यक्ष व प्रमुख संचालक म्हणून काम करून कंपनीची विक्री व नफा प्रचंड प्रमाणात वाढवला, ते आता नव्वदी पार केलेले, तरीही कामात व्यग्र असलेले आणि मजेत जगणारे, हे आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #PARTHA MUKHERJEE #JYOTI SABHARWAL #अंजनी नरवणे #ANJANI NARAVANE #नारायण मूर्ती : मूल्यं जपणारं एक अद्वितीय आयुष्य #NARAYAN MURTY: MULYO NA JATAN NI ANOKHI SAFAR #NARAYAN MURTY : MULYA JAPNARA EK ADWITIYA AAYUSHYA
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA 29 -06 -2010

    रुसी मोदींचे चरित्र देशाच्या औद्योगिक इतिहासात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे टाटा स्टीलचे अध्यक्ष रुसी मोदी यांच्या वैविध्यपूर्ण आयुष्याचा वेध घेणारं चरित्र ‘रुसी मोदी- द मॅन हू ऑल्सो मेड स्टील’ हे इंग्रजीत २००८ मध्ये प्रसिद्ध झाले. दोन वर्षांपंतरमेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीने याच महिन्यात ते प्रसिद्ध झाले आहे. या एकाच महिन्यात मेहता पब्लिशिंग हाऊसने एकदम आठ पुस्तकं प्रकाशित केली आहेत. ज्योती सबरवाल आणि पार्थ मुखर्जी यांनी रुसी मोदी यांच्या झंझावाती कारकिर्दीचा वेध घेणारे हे चरित्र लकहकले आहे. वयाच्या नव्वदीतही कार्यरत असलेले रुसी मोदी अनेक महत्त्वाच्या कामांसाठी प्रसिद्ध आहेत. अनेक पुरस्कार मिळवणारे टाटा समूहाचे साम्राज्य मोठं करणारे रुसी मोदी यांच्याबद्दल सर्व माहिती देणारं हे चरित्र प्रत्येकाने संग्रही ठेवावं असं आहे. रुसी मोदी यांच्या मते आपण कधी जिंकू, कधी हारू, पण आयुष्याचा एक दर्जा कायम राखला पाहिजे. आयुष्यात चढउतार आले तरी तो दर्जा राखण्याचा विसर पडता कामा नये, तसं वागलो तर कधी रुखरुख राहणार नाही. रुसींना एकदा विचारलं, आता नव्वद वर्ष पूर्ण झाल्यावर तेच आयुष्य पुन्हा जगायचं झालं तर...? त्यांनी तत्काळ सांगितलं ‘‘माझी काहीही तक्रार नसेल.’’ इतका सकारात्मक दृष्टिकोन, ठाम मतं ही केवळ रुसी मोदी यांचीच असू शकतात. औद्योगिक संबंध व कुशल व्यवस्थापन तज्ज्ञ असलेल्या रुसी मोदी योनी जमशेदपूरला ‘टाटा आयर्न अ‍ॅण्ड स्टील कंपनी’ (टिस्को) मध्ये ५३ वर्ष काम केलं. औधोगिक हितसंबंध याबाबतीत त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रशंसा मिळवली. टाटा समूहाबरोबरचा नंतरचा वाद यासंबंधी अत्यंत खुलेपणाने ते सांगतात, हा अधिक चांगल्या पद्धतीने हाताळता आला असता. एक कौटुंबिक भावनाप्रधान नाट्य ! असं संबोधनही त्या वादाला ते देतात. अत्यंत रसरशीत उमदं आयुष्य जगणाऱ्या रुसी मोदी यांच्यावर नेपोलियन बोनापार्टचा प्रचंड प्रभाव आहे. अत्यंत वेगळ्या अशा या माणसाचं चरित्र प्रेरणदायी तर आहेच पण जगावं कसं, हे सोप्या शब्दात सांगणारंही आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA SATARA 29 -08 -2010

    पोलाद उद्योगाचा शिल्पकार… सर जमशेटजी टाटा यांनी टाटा उद्योग समूहाचा पाया घातला. १८६८ मध्ये नवसारीहून मुंबईला आलेल्या जमशेटजींनी व्यापारी पेढी सुरू केली. कापड उद्योगापासून आरंभ करून कापड गिरण्या काढल्या. आता ‘टाटा’ हा देशातील सर्वात मोठा उद्योग समूह हे. टाटांनीही आपल्या या वेगवेगळ्या व्यवसायांच्या आणि कारखान्यांच्या संचलनासाठी हुशार, कर्तबगार व्यवस्थापन तज्ञांची मदत घेतली. त्या व्यवस्थापकांचीही निष्ठावंत घराणी घडत गेली. अशा व्यवस्थापन तज्ञांपैकी मोदी हे टाटांच्या विश्वासातले एक घराणे. मुंबईच्या भद्र न्यू हायस्कूलमध्ये गुजराती माध्यमातून रूसींचे शिक्षण झाले. पुढे रूसी १२ वर्षे इंग्लंडमध्ये होते. १९३९ मध्ये शिक्षण संपवून रूसी मोदी भारतात परतले. ऑक्सफर्डच्या या वास्तव्यात रूसी मोदी यांची आणि शास्त्रज्ञ आइनस्टाइन यांची चांगली दोस्ती झाली. सहा महिने हे दोघे शेजार शेजारच्या खोलीत राहत होते. रूसी पियानो वाजवत. आइनस्टाइन व्हायोलीन वाजवत. ते दोघे एकत्र वाद्ये वाजवत. आइनस्टाइनच्या साधेपणाने रूसी मोदी थक्क होत. या दोघांच्या वाद्यवादनाचे काही सार्वजनिक कार्यक्रमही झाले. त्या कारखान्यातले सुरूवातीचे दिवस मात्र रूसींची परीक्षा पाहणारे होते. कारखान्याचे जनरल मॅनेजर सर जहाँगीर गांधी हे होते. अमेरिकेतील केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेऊन ते आलेले होते. त्यांनी रूसींना पहिलाच प्रश्न केला. ‘इथं तू काय होशील असं तुला वाटतं?’ रूसींनी उत्तर दिलं,‘एक दिवस या खोलीत मी बसलेला असेन’. गांधींना हे बाणेदारपणाचे उत्तर आवडले नाही. त्यांनी रूसींच्या मार्गात पुढे दीर्घकाळ अडथळे आणण्याचे जारी ठेवले. रूसींना टाटा स्टीलचे डायरेक्टर सर अर्देशिर दलाल यांनी ऑफिस असिस्टंट म्हणून काम देऊ केले. पण रूसींनी स्टील प्लँटच्या कोक ओव्हन विभागात शिकाऊ खलाशी म्हणून शारीरिक काम करण्याचा आग्रह धरला. भट्टीमधून गरम लोखंडाचा पट्टा काढून तो फरशीवरून ओढत नेऊन रोलिंगसाठी द्यायचा असे काम करावे लागे; पण त्यांनी माघार घेतली नाही. या कामाबद्दल रोज आठ आणे मजुरी मिळे. पुढे ती बारा आणे झाली. अर्थात तेवढ्यात रूसींचे भागणे शक्यच नव्हते. घरून पैसे मागवावे लागत. पोलाद बनवण्याच्या प्रक्रियेचे ज्ञान प्रत्यक्ष काम करून रूसींनी मिळवले. पहिल्या दीड वर्षात रूसी मोदी यांनी उत्पादन विभाग, जनरल मॅनेजरचे ऑफिस, गावचे प्रशासन, कोळशाच्या खाणी, सेल्स ऑफिस अशा वेगवेगळ्या विभागात काम केले. सर अर्देश दलाल यांनी या काळात त्यांना संपूर्ण सामान्य ज्ञानाचे अनुभवाचे धडे दिले. सर गांधी यांचा त्यांच्यावर राग होताच. त्यांनी रूसींना कोळशाच्या व इतर खाणींचे काम बघायला सांगून जमशेदपूरपासून दूर पाठवण्याचा आदेश काढला. रूसींनी जमशेदपूरमध्येच वास्तव्य ठेवून खाणींना भेटी देणे सुरू ठेवले. याच सुमारास रूसी मोदी यांची भावी कारकीर्द घडवणारी एक घटना घडली आणि मानवसंसाधनासाठी योग्य व्यक्ती, माणसे हाताळण्यात कुशल असणारी व्यक्ती म्हणून रूसी मोदींची प्रतिमा तयार झाली. कामगारांचा एक जमाव बोनससाठी निदर्शने करीत होता. समोर येणाऱ्या सुपरवाझर्सना पिटून काढत होता. ‘मारो साले को, मारो’ ओरडत तोडफोड करीत होता. खादीच्या हाफ शर्ट-हाफ पँटमध्ये रूसी मोदी त्या जमावापुढे गेले आणि एका स्टुलावर उभे राहून ओठात सिगार ठेवून घोषणा देणाऱ्या माणसाला म्हणाले,‘माचीस है?’ त्या माणसाने खिशातून आगपेटी काढून दिली. रूसींनी शांतपणे, संथपणे सिगार पेटवली आणि एक झुरका घेत विचारले,‘क्या है? क्या तकलीफ है? ते लोक घोषणा थांबवून बोलू लागले. रूसींनी त्यांना म्हटले, ‘आता जा. मी तुम्हाला उद्या भेटेन.’ आश्चर्य म्हणजे, ते सर्वजण शांतपणे निघून गेले. रूसींनी नंतर चार दिवस सगळ्या खातेप्रमुखांना भेटून कामगारांच्या अपेक्षा समजावून घेतल्या. एका अठवड्यात कामगारांची समजूत काढण्यात त्यांना यश आले. मुंबईहून जेआरडी तातडीने आले. अर्देशिर दलाल आले. करारावर सह्या झाल्या. जेआरडींनी रूसींना १९५३ मध्ये डायरेक्टर ऑफ पर्सोनेल केले. कामगारांबरोगर निकटचे संबंध प्रस्थापित करणे, कामगारांकडून जास्तीत जास्त काम करून घेणे यात रूसींचा हातखंडा होता. पुढे पन्नास वर्षांमध्ये कारखान्यात एकदाही संप झाला नाही किंवा काम बंद पडले नाही. कोळशाच्या खाणींचे डेप्युटी एजंट कलकत्ता, कच्या मालाचे संचालक, डायरेक्टर-ऑपरेशन, डायरेक्टर टाटा इंडस्ट्रीज, डायरेक्टर टिस्को, जॉर्इंट मॅनेजिंग डायरेक्टर अशी रूसी मोदींची बदली एका हुद्दावरून दुसऱ्या उच्च पदावर होत राहिली. माणसांना कार्यप्रवण करणारा सर्वोत्तम प्रभावी अधिकारी म्हणून रुसींची प्रतिमा उद्योगविश्वात तयार झाली.’ रूसी मोदी यांनी टाटा उद्योग समूहात केलेल्या कामाचे मोल व महत्त्व या पुस्तकात विविध तपशिलांसह सविस्तर नोंदवण्यात आले आहे. तब्बल ५३ वर्षे रूसी मोदी जमशेदपूरच्या पोलाद कारखान्यात कार्यरत होते. त्या जनता राजवटीत उद्योगमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी टिस्कोचे राष्ट्रीयीकरण करण्याचा प्रस्ताव मांडला. (जानेवारी १९७९) कंपनीच्या ७० हजार कामगारांनी केंद्र सरकारला कळवले, ‘कंपनी ताब्यात घेतलीत तर आमचे सर्वांचे मृतदेह बघावे लागतील.’ १९८३ मध्ये बिझनेस इंडियाने ‘बिझनेसमन ऑफ दि इयर’ म्हणून रूसी मोदी यांची निवड केली. जेआरडी टाटा म्हणाले, ‘माझ्या आयुष्यात खूप माणसे मला भेटली. रूसीमध्ये नेतृत्वाची जी क्षमता आहे, ती मला इतर कोणात दिसली नाही.’ १९७४ मध्ये टिस्कोचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून रूसी मोदींनी सूत्रे स्विकारली, तेव्हा टिस्कोची उलाढाल ५०० कोटींची होती. १९९१-९२ मध्ये ती २९०० कोटींपर्यंत पोचली. आधुनिकीकरण आणि विस्तारीकरण याबाबत रूसींनी धडक मारली. सिमेंट प्लान्टचाही पाया घातला. १९९३ मध्ये मात्र रूसी आणि टाटा यांच्यामधील संबंध बिघडले आणि रूसींना टिस्कोमधून बाहेर पडावे लागले. त्यावेळी जेआरडींनीही त्यांच्याबाबतात काही रदबदली करायचे टाळले. त्या बेबनावाबाबत या पुस्तकात बराच तपशील देण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकारच सुन्न करणारा आहे. ‘सदैव हसतमुख गुणग्राहक’ या प्रकरणात रूसींच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडून दाखवण्यात आले आहेत. रूसी मोदी जमशेदपूरच्या टाटांच्या कारखान्यात ५३ वर्षे कार्यरत होते. सर्वोच्च पदावर ते पोहोचले परंतु शेवटी मात्र त्यांना काहीशा नाराजीनेच आणि मानखंडना होऊन तेथून बाहेर पडावे लागले. एखाद्या शोकनाट्याचाच हा विषय म्हणावा लागेल परंतु धीरोदात्तपणे त्यांनी या अवमानाची पर्वा न करता नवी ‘मोबार’ ही कंपनी काढून तिलाही उर्जितावस्थेला नेले. जमशेदपूरच्या भूमीशी आपले असलेले तेथे कायमचे घर ठेवून बांधिलकी कायम राखली. नव्वदीतही ते तरूण सुलभ उत्साहाने काम करीत आहेत. त्यांचे हे चरित्र अंतर्मुख करणारे आहे. त्यांच्या समृद्ध व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू स्तिमित करतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामधले अंतर्विरोध त्यांच्यातील माणसाची प्रचिती देतात. एक विलोभनीय माणूस म्हणून त्यांच्याविषयीची आत्मियता द्दढ करतात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more