‘RUTU NYAHALNARE PAAN’ IS A COLLECTION OF INTERVIEWS OF V.S.KHANDEKAR. THESE INTERVIEWS ARE TAKEN DURING 1935 TO 1976 WHICH WAS WRITING PERIOD OF KHANDEKAR. IT CONTAINS INTERVIEWS TAKEN BY MAGAZINES LIKE ‘VIHANGAM’ & ‘SAMARTH’. THIS COLLECTION COVERS ALMOST FOUR DECADES & WIDE RANGE OF VIEWS OF KHANDEKAR EXPRESSED IN VARIOUS INTERVIEWS.
खांडेकरांशी हितगुज करणं, असतो एक मनमोकळा संवाद! असतो एक शब्दातीत साहित्यानंद!! संभाषणात विविध विषय आपसुक निघतात... जुना कणखर आवाज पेट घेतो, मग चिरंतन मूल्यांची होणारी कत्तल जळजळत्या शब्दांतून व्यक्त होत रहाते... पुढे गतकाल जिवंत होतो. शिशिर सरतो, पानगळ जाऊन वसंत बहरतो. ऋतू मागं टाकत उमलणारं असं प्रत्येक पान, असतं गतकालाचं वैभव नि वर्तमानातील वैयथ्र्य! त्यात एकामागून एक संवाद साकारतात, अन् आकारतं, ‘ऋतू न्याहाळणारं पान.’ .... काळाचा साक्षीदार अन् साक्षात्कारही! एक पान झाडावरचं. सर्व ऋतू न्याहाळतं नि मगच गळून पडतं. मुलाखतीत असतं असं समग्रपण! लेखक समजून घ्यायचा तर अशी पानं न्याहाळायलाच हवीत!