* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CRY OF THE KALAHARI
  • Availability : Available
  • Translators : MANDAR GODBOLE
  • ISBN : 9789353174651
  • Edition : 1
  • Publishing Year : APRIL 2020
  • Weight : 500.00 gms
  • Pages : 432
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS THE STORY OF THE OWENS TRAVEL AND LIFE IN THE KALAHARI DESERT. HERE THEY MET AND STUDIED UNIQUE ANIMALS AND WERE CONFRONTED WITH DANGER FROM DROUGHT, FIRE, STORMS, AND THE ANIMALS THEY LOVED. THIS BEST-SELLING BOOK IS FOR BOTH TRAVELERS AND ANIMAL LOVERS.
‘क्राय ऑफ कालाहारी’ हे पुस्तक म्हणजे कालाहारी वाळवंटात सात वर्षे राहिलेल्या मार्क आणि डेलिया ओवेन्स यांच्या जंगली प्राण्यांच्या सहवासातील अनुभवांवर आधारित कादंबरी आहे. त्याचा मंदार गोडबाले यांनी मराठी अनुवाद केला आहे. बदली कपड्यांचा एक जोड आणि एक दुर्बीण वगळता बाकी विशेष काही न घेता मार्क आणि डेलिया या तरुण अमेरिकन जोडप्याने प्राणिजीवनाचा अभ्यास करण्यासाठी आफ्रिकेचे विमान पकडले. तिथे पोहोचल्यावर एक जुनाट लँडरोव्हर गाडी विकत घेऊन त्यांनी कालाहारी वाळवंटात (डिसेप्शन व्हॅली) खोलवर मजल मारली. ते सात वर्षे त्या परिसरात राहिले. विशेष म्हणजे त्या ठिकाणी कोणीही मानव कधीही गेलेला नव्हता, तिथे ना कोणते रस्ते होते, ना कोणी माणसे. हजारो चौरसमैलांच्या परिसरात पाण्याचा कोणताही स्रोत नव्हता. त्यांच्या आजूबाजूला जे प्राणी होते, त्यांनीही कधी माणूस पाहिला नव्हता.

No Records Found
No Records Found
Keywords
#CRYOFKALAHARI #MARKANDDELIAOWENS #MANDARGODBOLE #HINA #RODAVEL #MAKADIKADICHERAN #DECEPTIONVALLY #BILTONG #VHANDERWESTUIZEN #KORHAN #FLYKACHER #ZIZIFAS #RANCHAR #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #क्रायऑफकालाहारी #मार्कआणिडेलियाओवेन्स #मंदारगोडबाले #हायना #रोंडावेल #मकाडीकाडीचेरण #डिसेप्शनव्हॅली #बिल्टाँग #व्हॅनडरवेस्टुईझेन #कोरहान(पक्षी) #फ्लायकॅचर #झिझीफस #रांचर #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक
Customer Reviews
  • Rating Starधवल रामतीर्थकर

    जंगल म्हणजे काय? जंगली प्राण्यांचे, मांसभक्षी प्राण्यांचे घर. वाळवंट म्हणजे काय? सताड मोकळा, अत्यंत कोरडा, पाण्याचे दुर्भिक्ष असलेला प्रदेश अवलिया म्हणजे कोण? मार्क आणि डेलिया ओवेन्स जे आफ्रिकेतल्या कालाहारी वाळवंटात, तुटपुंजी मदतीने जंगली प्राणयांच्या सहवासात राहिले हे पुस्तक नाही तर एक प्रवास आहे, ओवेन्स दाम्पत्यासह. कालाहारी वाळवंटात जिथे मैलोंमैल नुसती सताड बोडकी जमीन पसरलेली असते, जिथली नदी वर्षातील फक्त दोन महिने वाहते, जिथले प्राणीही हा मनुष्य कोणता प्राणी आहे याबद्दल अनभिज्ञ असतात अशा ठिकाणी मार्क आणि डेलिया प्राण्यांचा अभ्यास करण्यासाठी जाण्याचे नाही तर राहण्याचे ठरवतात. एके दिवशी हे प्राण्यांच्या अभ्यासाने हपापलेले दाम्पत्य १२० मैल लांब वसलेल्या मॉन खेड्यातून एक जुनी लॅन्ड रोव्हर गाडी विकत घेतात, त्यात काही कॅन पाणी भरतात, काही दिवस पुरेल एवढे अन्न कोंबतात आणि रस्ता नसलेल्या कालाहारी वाळवंटात आपले नशीब अजमावायला निघतात. आता वाळवंट म्हटलं की पहिली गोष्ट जी डोक्यात येते ते आहे पाणी. हे पाणी जपण्यासाठी, साठवण्यासाठी हे जोडपे काय काय उद्योग करतात ते वाचून आपण जे बादलीभर पाणी अनायासपणे वापरतो त्याबद्दल अचंबा वाटल्याशिवाय राहवत नाही. एका ठिकाणी तर मार्क नमूद करतो की पाण्याचा उत्तम आणि कमीतकमी वापर कसा ते करायचे. (पानाचा फोटो जोडला आहे). मी सांगण्यापेक्षा ज्यांनी अनुभवले आहे त्यांच्याकडून ऐकलेलेच बरे. आता हे पाणी यात फक्त मार्क आणि डेलिया साठी नव्हते. तर यांच्या बाभळीच्या झाडाखाली वसलेल्या कॅम्प वर येणाऱ्या असंख्य पक्षी,रात्री येणारे कोल्हे, तरस आणि सिंह हेही वाटकरी असत. जसे पाणी तसेच अन्न. मॉन खेड्यातून आणलेले अन्न कमीतकमी खाऊन जास्तीत जास्त दिवस कसे टिकवायचे याकडे दोघांचा कल. तपासाची मार्क ताजे मास जमिनीखाली गाडून ठेवायचा ज्यामुळे ते फ्रिज शिवाय जास्त वेळ टिकेल.आता गंमत अशी की यांची कॅम्प ज्या ठिकाणी असते तो बाभळीच्या झाडांचा समूह सोडून चोहीकडे मोकळी जमीन, वाळवंट पसरलेला. त्यामुळे सावलीसाठी पक्षी, प्राणी याच झाडाखाली येणार, म्हणजे यांच्या कॅम्प मध्येच. हळूहळू प्राण्यांना तंबू, माणसे बघून सवय होते आणि चक्क सिंह, तरस आणि कोल्हे यांच्या अन्नाचा चट्टामट्टा करतात किंवा नासधूस करून आरामात निघून जातात. पण मार्क आणि डेलिया फक्त निरीक्षण आणि नोंदी करत राहतात आणि त्या प्राण्यांबरोबर या वाळवंटात एकजीव होऊन जातात. इथून पुढे सुरु होते त्यांची रात्र रात्र जागून प्राण्यांच्या मागावर जाणे, त्यांचे राहणे, वागणे, खाणे, कुटुंब पद्धती, एकमेकातील नाती यांचा अभ्यास करणे आणि नोंदी करणे. हळू हळू त्यांना अर्थसहाय्य मिळू लागते. परिसराचा नीट अभ्यास करण्यासाठी ते एक छोटे विमान खरेदी करतात आणि मग त्यांच्या अभ्यासाला खरी दिशा मिळते. कारण सिंह, तरस यांची हद्द अनेक मैल पसरलेली असते. अनेक वेळा दाट झाडीत जिथे गाडी पोहोचू शकत नाही अशा ठिकाणे ते राहणे पसंद करतात. अशा वेळी हवेतून निरीक्षण केल्याने त्यांना प्राण्याची अचूक जागा समजू लागली आणि अभ्यास अजून खोल जाऊ लागला. प्राण्यांना त्यांची सवय होऊ लागते. धडधडत्या हृदयाने सिंहापासून १० फूट बसून मार्क आणि डेलिया त्यांचे निरीक्षण करतात. एकदा तर एक तरस जवळ येऊन डेलियाच्या केसांचा वास घेऊन जातो. एक सिंह मार्कच्या बुटपाशी येतो आणि चामड्याचा वास घेऊन तो न खाताच निघून जातो. असे अनेक रोमहर्षक दोघांसाठी रोजचेच असतात. हळू हळू जग बदलू लागते, शिकारी मार्क आणि डेलिया च्या ओळखीच्या सिंहाची हत्या करतात. हेही ते दोघात सहन करतात आणि आपले काम चालूच ठेवतात. त्यांच्या अकल्पनीय जगात जर डोकावून पाहायची, कालाहारी वाळवंटात राहण्याची, हिंस्त्र प्राण्यांबरोबर जगण्याची इच्छा असेल तर कालाहारीला जावे, म्हणजेच हे पुस्तक नक्की वाचावे! ...Read more

  • Rating Starमोईन के

    काही दिवसांपासून मी `मार्क नि डेलिया`या जोडप्यासोबत कालाहारी वाळवंटात वास्तव्य करत होतो.`अशा ठिकाणी आम्ही राहत होतो जिथे कोणीही मानव कधीही गेलेला नव्हता,तिथे ना कोणते रस्ते होते, ना कोणी माणसे.`हजारो चौरस मैलांच्या परिसरात पाण्याचा कोणताही स्रोत नव्हं..`हा जोडपं आपला प्राणीशास्त्राचा अभ्यास करत होता नि मी त्यांना फक्त बघत अन् अनुभवतं होतो.`हा `कालाहारी`चा प्रवास खूप काही शिकवणारा नि समृद्ध करणारा होता. या प्रवासात ब्राउन हायना,कोल्हे,सिंह नि इत्यादी विविध प्राण्यांशी ओळख अन् मैत्री झाली,`त्यांच्याबद्दल मार्क नि डेलियांकडून महत्वपूर्ण अशी माहिती मिळाली.जी फारच रोचक नि हटके होती.`या जोडप्याच्या आयुष्यात पावलोपावली येणारी वेगवेगळी संकटे व त्यांनी या संकटावर केलेली यशस्वी मात हे सर्व जणू डोळ्यांनी बघताना,अनुभवताना मी पूर्णपणे यातच गुंतून गेलो होतो..! आता हा प्रवास मी कशाप्रकारे करून आलो ?तर मी हा प्रवास `मार्क&डेलिया ओवेन्स लिखित (Cry Of The Kalahari) म्हणजेच `साद घालतो कालाहारी`या 416 पृष्ठसंख्या असलेल्या पुस्तकातून करून आलो...! `प्राणीशास्त्राचा` अभ्यास नि संशोधन करण्यासाठी आफ्रिकेतील `कालाहारी वाळवंटात`गेलेल्या एका अमेरिकेन जोडप्याने त्यांच अनुभवकथन या अप्रतिम पुस्तकातून वाचकांसमोर आणलं आहे.`आंतराष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च खपाच्या या इंग्रजी पुस्तकाचे मराठी अनुवाद`मंदार गोडबोले`यांनी केले असून जे खूपच वाचनीय व उत्तम झाले आहे.`हा अनुवाद वाचताना आपण काही अनुवादित वाचतोय असं अजिबात वाटतं नाही. मला हे पुस्तकं फार आवडलं नि भावून गेलं.`अरण्य,प्राणी, पक्षी नि निसर्गाबद्दल वाचणे मला नेहमीच आवडतं व यामुळेच मला हे पुस्तकं जरा जास्तच आवडलं.`खूपच इंटरेस्टिंग नि माहितीपूर्ण असलेलं हे पुस्तकं वाचकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.`जणू आजूबाजूला घडतं असलेलं घटनाक्रम आपण स्वतःच्या डोळ्यांनी बघतोय असं आपल्याला वाटतं राहतं.`यांनी वेगवेगळ्या प्राण्यांना दिलेले नाव आपल्या ओठांवर सारखे खेळत असतात.लेखकांनी ज्याप्रकारे आपले अनुभव आपल्यासमोर मांडले आहेत ते वाचतांना आपण पूर्णपणे यात हरवून जातो.आपल्याला आजूबाजूचं भान राहतं नाही एवढं नक्की...! आपल्याबरोबर एक बदली कपड्याचा जोड आणि एक दुर्बिण वगळता बाकी विशेष काही न घेता हे तरुण अमेरिकन जोडपं,आफ्रिकेचे विमान पकडतात. ``आफ्रिकेतील एखादा मोठा मांसाहारी प्राणी त्यांना अभ्यासायचा होता, तसा अभ्यास करून त्या संशोधनाचा उपयोग, आफ्रिकेतील प्राणिसंवर्धनाचा एखादा कार्यक्रम हाती घेण्यासाठी करायचा त्या दोघांनी निश्चय केला होता. मानवाच्या पदस्पर्शाने प्रदूषित न झालेली एखादी जागा अजूनही शिल्लक आहे, हे आपल्या डोळ्यांनी बघावे, असेही कदाचित त्या दोघांना वाटत होते." आफ्रिकेत येऊन तिथे एक थर्ड हँड लँड रोव्हर गाडी विकत घेऊन ते कालाहारी वाळवंटात खोलवर मजल मारतात.तिथे ते एकूण सात वर्षे वास्तव्य करतात, अशा ठिकाणी जिथे कोणीही मानव कधीही गेलेला नव्हता, तिथे ना कोणते रस्ते होते, ना कोणी माणसे. हजारो चौरस मैलांच्या परिसरात पाण्याचा कोणताही स्त्रोत नव्हता. या प्रचंड जंगलात ओवेन्स जोडपं आपला प्राणिशास्त्राचा अभ्यास सुरू करतो. त्यांच्या आजूबाजूला जे प्राणी होते त्यांनी कधीही माणूस पाहिला नव्हता. यांच्या सिंहांबरोबरील आणि ब्राऊन हायना, कोल्हे, जिराफ आणि त्यांना भेटलेल्या इतर अनेक प्राण्यांबरोबरचे विविध अनुभव या पुस्तकातून आपल्या समोर येतात.`जे खरंच खूपच रोचक नि वाचनीय आहेत..` मार्क नि डेलियाने तब्बल सात वर्षे नेमकं काय केलं याबद्दल विस्तुत जाणून घ्यायचं असेल तर हे पुस्तकं आवर्जून वाचा.. ...Read more

  • Rating StarAnuradha Pawar

    कालहारी वाळवंटाच्या अत्यंत दुर्गम भागात ,अतिशय अवघड परिस्थितीत, केवळ विलक्षण प्राणी प्रेमासाठी, दुर्दम्य इच्छाशक्तीने सात वर्ष राहिलेल्या जोडप्याची ही चित्तथरारक कथा आहे. वन्यजीवन ,वन्य प्राणी यांचे लेखकाने केलेले अनुभव वाचताना आपणच कालहारी च्या वाळवटात अनुभव घेत आहोत असे वाटते . रहस्यकथे पेक्षाही अत्यंत उत्कंठा लावणारे हे पुस्तक आहे. ...Read more

  • Rating Starविनया जंगले

    तुमचं "साद घालतो कालाहरी " हे अनुवादित पुस्तक वाचून झालं .पुस्तक अतिशय सुंदर आहे .अनुवादही सरस झाला आहे .

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more