* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KAHAI KABIR MAIN PURA PAYA
  • Availability : Available
  • Translators : MEENA TAKALKAR
  • ISBN : 9788184980332
  • Edition : 3
  • Publishing Year : AUGUST 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 280
  • Language : Translated From HINDI to MARATHI
  • Category : RELIGIOUS & SPIRITUALS
  • Available in Combos :OSHO COMBO SET - 34 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
OSHO IS THE FIRST OF THIS TYPE, ALWAYS REPRESENTING A FRESH RELIGIOUSNESS, TOTALLY NOVEL, KNOWLEDGEABLE, MYSTIC, OCCULT. KABIR`S `DOHE` ARE LIKE A SHAWL WOVEN BY THE DIFFERENT THREADS OF HUMAN EXPERIENCES AND LIFE. EACH THREAD STANDS FOR THE VALUES OF LIFE, EACH A SHINING FACET WITH A DIMENSION. LOVE, DREAM, TRUTH, EGO, TITLE, PRESTIGE, SATI. KABIR HAS EXPLAINED EACH ASPECT WITH PERFECT EXAMPLES AS WAS HIS PECULIARITY, WHILE OSHO SHEDS LIGHT ON KABIR`S QUALITIES. KABIR HIMSELF LIVES A HUMAN LIFE, BUT REVEALS THE FORMULA OF BECOMING FREE, HE ALSO SEEKS OUR ATTENTION TOWARDS LIVING IN THE PRESENT WITH AN EYE ON THE FUTURE. HE BRINGS IT TO OUR NOTICE THAT IN THIS HUGE COSMOS, WE LITERALLY POSSESS NOTHING, WHATEVER WE SEE AROUND IS ALL `HIS`, HENCE WHATEVER LEAVES AFTER WE ARE NO MORE IS THE ETERNAL TRUTH. KABIR ALSO POINTS OUT TO THE IMPORTANCE OF A TEACHER. HE TELLS US THAT GURU IS THE INDICATION TO REACH THE ALMIGHTY. AT THE END KABIR ADMITS THAT HE HAS ACHIEVED THE GOD, SAYING `KAHE KABIR MAI PURA PAYA!`
ओशो हे नेहमीच ताजेतवाने अशा धार्मिकतेचे प्रथम पुरुष. सर्वस्वी अनोखे ज्ञानी, गूढवादी. कबीरांचे `दोहे` म्हणजे मानवी जीवनाच्या विविध रूपांची विणलेली शालच! एक एक धागा म्हणजे जीवनमूल्यांचा एक एक पैलू! प्रेम, स्वप्न, सत्य, अहंकार, पद, प्रतिष्ठा, सतीप्रथा यांचा चपखल उदाहरणांसह तपशील ही कबीरांची खासियत. कबीरांचे हे वैशिष्ट्य फार विचारपूर्वक `ओशो` आपल्याला रसाळ विवेचनातून उलगडून दाखवतात. वर्तमानात जगायला शिकत भविष्यावर नजर ठेवायला सांगणारे कबीर संसारात राहून मुक्त होण्याचं सूत्र सांगतात. परमेश्वराच्या या विश्वपसाऱ्यात `आपलं` काही नाही. जे आहे ते `त्याचं` आहे म्हणूनच आपल्यानंतर जे उरतं तेच `सत्य`. गुरूची महती सांगताना `गुरू हा परमेश्वराजवळ पोहोचण्याचा संकेत आहे` असं सांगणारे कबीर अखेर म्हणतात, `मी पूर्णत: परमेश्वराला मिळवलं आहे.` `कहै कबीर मै पूरा पाया!`
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"BANDAKHOR# BHAKTIT BHIJALA KABIR# EK EK PAUL# MAZE MAZYAPASHI KAHI NAHI #HA SHODH VEGALA# HASAT KHELAT DHYANADHARANA# MEERA EK VASANT AAHE # MEERA SHYAMRANGI RANGALI # MEERECHI MADHUSHALA # MEERECHYA PREMTIRTHAVAR # MHANE KABIR DIWANA # MI DHARMIKTA SHIKAVTO DHARM NAHI # MRUTUCHE AMARATVA # MRUTYAYUSHI # MRUTYU AMRUTACHE DWAR # MUGDHA KAHANI PREMACHI # NANAK NIRANKARI KAVI # NANAK PARMATMYACHA NAD OMKAR # NANAK SANSAARI SANYASTA # NANAK SUR SANGEET EK DHUN # SAD GHALTO KABIR # SAKSHATKARACHI DENGI # SHIVSUTRA-PART 1 # SHIVSUTRA-PART II-2 # SWATHACHA SHODH #VIDROHI ##मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKASHA 29-11-2009

    अभ्यासू : साद घालतो कबीर… आचार्य रजनीश हे उत्तरप्रदेशात प्राध्यापक होते. ते पुढे आचार्यांचे भगवान रजनीश झाले आणि त्यानंतर त्यांचे रूपांतर ओशोमध्ये झाले. रजनीशांची पूर्ण कहानी महाराष्ट्रातील पुणे या शहरात घडली. आयुष्याच्या उत्तरार्धात ते अमेरिकेला गेे होते. तिकडे त्यांचा स्थायिक होण्याचा विचार होता परंतु काही कारणांमुळे ते जमले नाही. आचार्य रजनीश हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्व. सुरुवातीच्या काळात त्यांचा संभोगातून समाधीकडे हा सिद्धांत खूपच गाजला. त्यांनी पहिल्यांदा परंपरावादी भारतीय समाजाला धक्के देण्याचे काम केले. वय वाढले तसे आचार्य रजनीश यांची मनोवृत्ती आणि विचारपद्धती बदलली. शेवटच्या पर्वात ते ओशो झाले. ओशो हे एक प्रखर बुद्धिवादी व्यक्तिमत्व. जवळपास वीस वर्षे रजनीश यांचे प्रवचन चालू होते. ते दररोज सायंकाळी एक तास आपल्या अनुयायांना मार्गदर्शन करत. रजनीश यांचे वाचन अफाट असेच होते. जगातील सर्व धर्मशास्त्राचा दांडगा व्यासंग होता. सर्व प्रकारचे विचार आणि आचार यावर त्यांचे अद्भुत असे प्रभुत्व होते. विषयाची मांडणी आणि मतप्रदर्शन अत्यंत प्रभावी असायचे. त्यामुळे त्यांना जगभरातून हजारो अनुयायी मिळाले. त्यामुळेच की काय त्यांचा ओशोपंथ तयार झाला. रजनीश यांच्या विचारावरची शेकडो पुस्तके निघाली आहेत. ते जे बोलत त्यातील शब्द ना शब्द रेकॉर्ड केला जाई आणि त्याचे रूपांतर पुस्तकात होत असे. जगातल्या सर्व भाषा आणि सर्व लिपीत त्यांचे पुस्तके अनुवादित झाली आहेत. या पुस्तकांना प्रचंड अशी मागणी आहे. आयुष्याच्या एका टप्प्यावर माणूस विशेष पद्धतीने विचार करायला लागतो. माणसांसारखे मृत्यूची भीती ही जन्मापासून त्याच्या पाठीशी लागलेली असते. माणसाला मृत्यूवर विजय पाहिजे असतो. ते शक्य नाही असे लक्षात आले त्यावेळी माणसाला मृत्यू हा कमीत कमी त्रासाचा असावा असे वाटायला लागते. जगण्याच्या किंवा जीवनाच्या या पातळीवर माणसाला आशोचे विचार निश्चितच दिलासा देणारे ठरतात. ओशोने जगावे कसे, जगायचे कोणासाठी या बाबी पद्धतशीरपणे समजावून सांगितल्या. त्यांच्या प्रवचन किंवा व्याख्यानात थोर संत कबीर यांच्या विचाराचा फार मोठा वाटा असायचा. कबीराने ओशोच्या अगोदर किती तरी वर्षे माणसाला जगण्याचा मार्ग समजून सांगितला. माणसाच्या आयुष्यात येणारे दुःखाचे क्षण आणि दुःख टाळण्यासाठी माणूस करीत असलेले प्रयत्न या बाबीच्या पार्श्वभूमीवर कबीराचे विचार माणसाला खूप काही सांगून जातात. ओशोने कबीरासंबंधीचे विचार इंग्रजीत व्यक्त केले होते. त्यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊसने नुकताच आणला आहे. मीना टाकळकर यांनी ही व्याख्याने मराठीत अनुवादित केली आहेत. ओशोसारख्या प्रचंड ज्ञानलालसा, ज्ञानसाधना असलेल्या एका प्रखर बुद्धिवादी माणसाची भाषणे मराठीत अनुवाद करणे हे काम निश्चितच सोपे नाही. परंतु या कामात मीना टाकळकर या यशस्वी झाल्या आहेत. संत कबीर यांच्या विचारांविषयी ज्यांना उत्सुकता आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक खूपच वाचनीय ठरणार आहे. परमेश्वर म्हणजे काय? प्रेम म्हणजे काय? सफल प्रेम कशाला म्हणायचे? अशा अनेक गहन प्रश्नांवर ओशो यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत. भारतीय परंपरेत संत कबीर हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मानले जातात. त्यामुळे सर्व जातीधर्मात संत कबीर यांच्याविषयी कमालीचा आदर आहे. संत कबीरांची विचार सरणी घेऊन कबीर पंथ निघाला आता कबीराचे ज्ञान ओशोच्या तोंडून आलेले आहे हा एक वेगळा अनुभव म्हणावा लागेल. ज्यांना तर्कशास्त्र किंवा धर्मशास्त्राची आवड आहे, तत्त्वज्ञानाची आवड आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक हे एक पर्वणीच ठरणार आहे. छोट्या-छोट्या घटना काही वेळा प्रश्न आणि त्याची उत्तरे या पद्धतीत अत्यंत अवघड असे तत्त्वज्ञान अत्यंत सोप्या भाषेत वाचकांपर्यंत आलेले आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसचे पुस्तक म्हटले की, त्याच्या गुणवत्ता आणि दर्जाविषयी चर्चा करण्याचे कारण नाही. पुस्तकांचे मुखपृष्ठ ग्रंथाला साजेसे आहे. मुद्रण सुबक आणि स्वच्छ आहे. २७० पानांच्या या पुस्तकाची किंमत फक्त २२० रुपये आहे. ओशोसंबंधी उत्सुकता किंवा ज्यांना कबीराविषयी अधिक अभ्यास करायचा आहे त्यांनी हे पुस्तक संग्रही बाळगणे अत्यावश्यक ठरेल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
कृष्णा DIWATE

आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more