* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE FIRST INDIAN
  • Availability : Available
  • Translators : MUKTA DESHPANDE
  • ISBN : 9789353172169
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 300
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
  • Sub Category : MEMOIRS, DIARIES, LETTERS & JOURNALS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AN ENGROSSING NARRATIVE OF ONE MAN’S STRUGGLE TO ACHIEVE HIS DREAM AGAINST ALL ODDS, THIS IS BOTH A FAST-PACED ADVENTURE AND A TELLING COMMENTARY ON HOW HEROES ARE OFTEN MADE DESPITE THE SYSTEM THEY OPERATE IN, BY DINT OF SHEER PERSEVERANCE AND COMMITMENT TO A CHOSEN PATH. ABOVE ALL, IT’S A PAEAN TO THE POWER OF SELF-BELIEF THAT SERVES TO INSPIRE, MOTIVATE AND EXHILARATE. ON 19 MAY 2010, AS HE SAILED INSV MHADEI INTO MUMBAI HARBOUR, COMMANDER DILIP DONDE EARNED HIS PLACE IN INDIA’S MARITIME HISTORY BY BECOMING THE FIRST INDIAN TO COMPLETE A SOLO CIRCUMNAVIGATION UNDER SAIL, SOUTH OF THE 3 GREAT CAPES. THE FEAT, SUCCESSFULLY COMPLETED BY JUST OVER 200 PEOPLE IN THE WORLD, HAD NEVER BEEN ATTEMPTED IN HIS COUNTRY BEFORE. IN HIS OWN WORDS, THE BOOK CHRONICLES HIS PROGRESS OVER FOUR YEARS, FROM BUILDING A SUITABLE BOAT WITH AN INDIAN BOAT-BUILDER; WEAVING HIS WAY THROUGH THE ‘SEA-BLIND’ AND OFTEN QUIXOTIC BUREAUCRACY; AND TRAINING HIMSELF WITH NO PRECEDENT OR KNOWLEDGE BASE IN THE COUNTRY, TO FINALLY SAILING SOLO AROUND THE WORLD. DURING THIS GRUELLING TASK HE WAS MENTORED BY SIR ROBIN KNOX-JOHNSTON, THE FIRST MAN TO SAIL SOLO NON-STOP AROUND THE WORLD.
आयएनएसव्ही ‘म्हादेई’ या शिडाच्या बोटीतून एकट्याने पृथ्वीप्रदक्षिणा करणारे कमांडर दिलिप दोंदे हे अशा प्रकारची पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिले भारतीय ठरले. ‘सागरी परिक्रमेचा पराक्रम’ या पुस्तकात त्यांचा पाच वर्षांतील प्रवास व प्रगती त्यांच्याच शब्दांत मांडण्यात आली आहे. अनेक अडथळे आणि संकटांना तोंड देत त्यांनी पृथ्वीप्रदक्षिणा कशी पूर्ण केली, याचे अत्यंत रोचक वर्णन त्यांनी केले आहे. विपरीत परिस्थितीचा सामना करताना एका माणसाने आपली स्वप्ने कशी साध्य केली, याची गुंगवून टाकणारी ही कहाणी एक साहसयात्रा तर आहेच, पण त्याबरोबर स्वतःवरच्या अटळ विश्वासाची विजयगाथाही आहे.

No Records Found
No Records Found
Keywords
#दफर्स्टइंडियन #सागरीपरिक्रमेचापराक्रम #दिलीपदोंदे #मुक्तादेशपांडे #नमळलेलीवाट #अमूल्यउमेदवारी #सुयोग्यबोटीच्याशोधात #पुन्हाउमेदवारी #गोदी(बोटयार्ड) च्याशोधात #जुन्यापुराण्यासमीरवरप्रशिक्षण #गणवेशातलाविनोद #प्रशिक्षणबोट #एल्दमेरचाकिस्सा #नझालेल्याप्रशिक्षणाचीरणधुमाळी #नवीनबोटीसाठीगर्भगृह #रॉबिनयांचीपहिलीभेट #पहिलाअडथळा #म्हादेईचीपहिलीपावलं #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #THEFIRST INDIAN #SAGARI PARIKRAMECHA PARAKRAM #DILIP DONDE #MUKTADESHPANDE #MHADEI #A PATHLESSTRAVELLED #ANINVALUABLEAPPRENTICESHIP #ASUITABLEBOAT #APPRENTICESHIPAGAIN #FINDINGABOATYARD #TRAININGONOLD SAMEER #HUMOUR INUNIFORM #TRAINING BOAT #THEELDEMEREPISODE #TRAININGSORTIETHAT WASNT #AWOMB FORTHEBOAT #FINALLYSOMESAILING #ROBINSFIRSTVISIT #THE FIRSTHURDLE #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarNayana Bagul

    पुस्तक क्रमांक ६९ #सागरी_पर हे पुस्तक आपल्याला चार वर्षे चाललेल्या सागर परिक्रमा या मोहिमेची सफर घडवून आणते. पहिल्या दर्यावर्दी भारतीयाची ही यशोगाथा आहे. भारतात प्रथमच बांधलेल्या #म्हादेई_या_शिडाच्या_बोटी च्या बांधणी पासून अविश्वसनीय #पृथ्वी_परदक्षिणा कशी पूर्ण केली याचे अद्भूत आणि चित्तथरारक वर्णन पुस्तकात आहे. हे पुस्तक वाचकाला खिळवून ठेवते. सागराचा एव्हरेस्ट मानल्या गेलेल्या सागरी प्रदेशांमधून केलेले प्रवास वर्णन वाचून आपण थक्क होतो. अडचणींचे डोंगर पार करून आपले ध्येय साध्य करणाऱ्या दिलीप दोंदे यांची ही कहाणी प्रेरणा देणारी आहे. उदासीन नोकरशाही आणि सरकारी लाल फितीत अडकलेल्या फाइलींn look I`ll iio ना लीलया तोंड देणारा सागर वीर आपल्याला पुस्तकातून भेटतो. सिंदबादच्या सफरी आपण वाचल्या आहेत पण दहा वर्षांपूर्वी केलेली ही सागरी परिक्रमा वाचनीय आहे. तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस आपले ध्येय कसे गाठतो हे वाचून तरुण पिढीला नक्कीच स्फूर्ती मिळेल. शिडाच्या बोटीतून एकट्याने पृथ्वी प्रदक्षिणा करणारे भारताच्या सागरी इतिहासातले पहिले भारतीय ,दिलीप दोंदे आहेत. ते भारतीय नौदलात कॅप्टन आहेत. त्यांनी प्रवास केलेली बोटीची बांधणी, एका भारतीयाने भारतात सुयोग्य रितीने बांधली हे तिचे वैशिष्ट्य आहे. भारतीय नौदलाने त्यांना पाठबळ दिले. विरंगुळा म्हणून छोट्या होड्या घेऊन नौकाविहाराला जाणे आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा समुद्रावर आनंद लुटायला जाणे एवढाच मर्यादित अनुभव त्यांच्या गाठीशी होता. नेव्हीने या संपूर्ण मोहिमेचा खर्च करण्याची तयारी दाखवली हे ऐकल्यावर त्यांना या मोहिमेमध्ये भाग घ्यावा असे वाटले. सागरी इतिहासात प्रथमच एकट्याने आणि न थांबता शिडाच्या बोटीतून पृथ्वीप्रदक्षिणा करणाऱ्या सर रॉबिन यांच्याबरोबर काम करून मार्गदर्शन मिळवावे असे नेव्हीने त्यांना सांगितले. त्यासाठी ते लंडनला गेले प्रत्यक्ष बोटीवर काम करण्याचा अनुभव मिळवला. बोटीची तळकाठी घासून गुळगुळीत कशी करायची, जोडणी कशी करायची, बोटीवर उपकरणे कशी बसवायची हे सर्व ते तेथे शिकले. एखाद्या मस्तवाल जनावराला काबूत ठेवणे जितकी कठीण तितकेच बोट चालवायला कठीण असे वर्णन लेखकाने केले आहे. एक मोठी बोट म्हणजे प्रचंड मोठी गुंतवणूक असते. सागरी परिक्रमेच्या संकल्पनेमुळे केवळ भारतीयांची सागरी सफरी करण्याची क्षमताच जगापुढे सिद्ध होणार नव्हती तर बोट बांधणीच्या कौशल्यातही भारतीय कमी नाहीत हे सगळ्या जगाला दिसणार होते. बोट बांधणीची जागा शोधणे, नक्की करणे, टेंडर्स मागवणे, करार करणे आणि शेवटी बोटीची बांधणी अशा अनेक खडतर टप्प्यांमधून जावे लागणार होते नेव्हीने सहा कोटी या मोहिमेसाठी सॅंक्शन केले होते. त्यापैकी चार कोटी कोटीसाठी आणि दोन कोटी उर्वरित प्रकल्पासाठी खर्च होणार होते. मोहिमेसाठी लागणाऱ्या निधीच्या कागदपत्रांची फाईल पुढे का सरकत नव्हती हे बघायला ते दिल्लीला गेले. सरकारी कारभार कसा असतो याचे यथार्थ वर्णन वाचायला मिळाले. अडेलतट्टू भारतीय नोकरशाही कडून काम करून घेताना होणारी दमछाक इथे मांडली आहे. तीन वर्ष यासाठी ते झगडत होते. पृथ्वी प्रदक्षिणा करताना फक्त चार ठिकाणी थांबण्याचा सल्ला नेव्हीने त्यांना दिला. 19 ऑगस्ट 2009 ला त्यांनी मोहिमेला सुरुवात केली. वाऱ्याचा झंजावात, लाटांचे तांडव नृत्य, समुद्रपक्षी तसेच डॉल्फिन आणि सील मासे तसेच बोट दुरुस्ती त्यानेच करायची, बोट चालवायची त्यानेच, वादळाला तोंड देताना बोटीवरच्या उपकरणांची काळजी घेणे तसेच स्वयंपाक हे त्यांनीच करायचे या सर्व आघाड्या एकट्याने सांभाळायचे म्हणजे कॅप्टन दोंदे किती ग्रेट होते साहसी होते हे समजते. पुस्तकात रंगीत फोटो बघून वादळाची, लाटांची आणि पाण्याची भिंत का म्हंटले आहे त्याची जाणीव झाली. विषुववृत्त आणि मकरवृत्त कसे पार पडले, प्रत्येक ठिकाणी सागरी मैल किती अंतर पार केले तसेच सागरातले एवरेस्ट कसे जिंकले याची वर्णने वाचून अंगावर काटा आला. दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात येताना वाऱ्याचा वेग कसा होता, चक्रीवादळ झाल्यावर बोटीची काय परिस्थिती होते हे खूप थरारक आहे. पूर्ण झोप मिळायचे नाही डुलक्या कसे काढायचे, तसेच बोटीवरला गॅस सिलेंडर संपल्यावर हवाबंद डब्यातले जेवण कसे खावे लागले यावरून ही साहस यात्रा होती हे मनोमन जाणवले. पुस्तकाच्या शेवटच्या पानात नौकानयन यासंबंधीच्या संज्ञा दिल्या आहेत तसेच बोटीच्या प्रत्येक भागांची नावे चित्र काढून दाखवली आहेत त्यामुळे बोट बांधणी किती कठीण असते, शिडे कशी लावतात, डोल काठी कशी असते, रडार कुठे बसवतात, चालकाची जागा कुठे असते याची कल्पना आली. नऊ महिन्यांनी कॅप्टन दिलीप दोंदे यांनी ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. मुंबई बंदरावर त्यांचे जल्लोषात स्वागत झाले. पुस्तक वाचून आत्मविश्‍वास काय असतो, अडचणींचा डोंगर कसा शिताफीने पार पडता येतो, मनोधैर्य कसे टिकवायचे याची माहिती मिळाली. आणि पुस्तक वाचल्यानंतर कॅप्टन दोंदे यांचे युट्युब वरचे व्हिडीओ बघावेसे वाटले हे त्या पुस्तकाचे श्रेय आहे. सौ नयना बागुल २३/८/२१ ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 06-06-2021

    सागरी परिक्रमेचा अविस्मरणीय अनुभव... सागरी परिक्रमा करणारे पहिले भारतीय म्हणून दिलीप दोंदे यांना ओळखलं जातं. भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी असून गोव्यात राहतात. त्यांच्या या परिक्रमाने प्रेरित झालेल्या आठ जणांनी यांच्याच मार्गदर्शनात नंतर सागरी परि्रमेचा अविस्मरणीय अनुभव घेतला. त्यापैकी सहा महिलांच्या चमूची कामगिरी लक्षणीय आहे. पृथ्वी पालथी घालायची, पण सागरी मार्गाने, तीही एकट्याने आणि शिडाच्या बोटीतून नऊ महिने चालेलेल्या मोहिमेतून. ही सुरस व चमत्कारिक कथा नसून दोंदे यांनी साहसी समुद्र पर्यटन क्षेत्रात रचलेला अनोखा इतिहास आहे. ते म्हणाले, ‘‘एकोणीस ऑगस्ट वीसशे नऊ रोजी मुंबईपासून सुरू झालेली ही सागर परिक्रमा एकोणीस मे वीसशे दहाला पुन्हा मुंबइला पोहोचून संपली. या नऊ महिन्यांत, नेमवंâ सांगायचं तर दोनशे त्र्याहत्तर दिवसांपैकी एकशे सत्तावन दिवस मी पाण्यात होतो. चार बंदरांवर मुक्काम केला. या प्रदक्षिणेत मी तेवीस हजार सागरी मैल अंतर पार केलं. या मोहिमेत वापरण्यात आलेली बोट भारतीय बनावटीची होती. रत्नाकर दांडेकर यांनी ती तयार केली होती. ही साहसी परिक्रमा भारतीय नौदलाचा एक उपक्रम म्हणून करण्यात आली. यासाठी मी स्वेच्छेने पुढाकार घेतला होता. अशा तNहेचा कुठलाही पूर्वानुभव नसताना निर्धार, कौशल्य व कमालीच्या धाडसाची आवश्यकता होती. ते करू शकलो. यासाठी नंतर ‘शौर्यचक्र’ या पुरस्कारासह आणखी काही मानाच्या पुरस्करांनी मला गौरविण्यात आलं.’’ ...Read more

  • Rating StarSAPTAHIK SAKAL 24-04-2021

    रोमांचक प्रवास... फर्डिनांड मॅगेलन आणि खिस्तोफर कोलंबसच्या काळातल्या आणि आजच्या शिडाच्या नावांमध्ये प्रचंड फरक असला तरी आजही समुद्र तोच आहे, हवामान तितकेच बेभरवशाचे आहे. तुमच्या हाताशी नानाविध साधने असली तरी उधाणलेल्या समुद्रावर स्वार होऊन पुढे जाण्ासाठी आजही तितकेच कौशल्य आवश्यक आहे. यामुळेच एकविसाव्या शतकातही असे धाडस कुणी करायला गेले तर त्याचे जगाला अप्रूप वाटतेच. दिलीप दोंदे यांनी हे धाडस केले आणि शिडाच्या नावेतून एकट्याने पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिलेच भारतीय ठरले! त्यांच्या कामगिरीची रोचक कहाणी म्हणजेच त्यांनी लिहिलेले पुस्तक ‘द फर्स्ट इंडियन.’ या विलक्षण कामगिरीची सुरुवात होण्यामागे प्रेरणा होती, ती व्हाईस अ‍ॅडमिरल मनोहर आवटी यांची. ‘भारतीय व्यक्तीची शिडाच्या बोटीतून पृथ्वीप्रदक्षिणा’ हे त्यांनी उराशी बाळगलेले स्वप्न होते. ते स्वप्न भारतीय नौदलाचे कमांडर दिलीप दोंदे यांनी साकार केले. दिलीप दोंदे यांना आपल्या कामाचा भाग म्हणून नौदलाच्या बोटीवर काम करण्याचा अनुभव होता, परंतु याट (Yacht) मधून नौकाविहार करण्याचा त्यांना कोणताही अनुभव नव्हता, तरीही त्यांनी आव्हान स्वीकारले. या प्रकल्पासाठी दोंदे यांना नौदलाच्या परवानगीपासून अनेक तांत्रिक बाबींची पूर्तता करावी लागली आणि भारतीय नोकरशाही काय चीज आहे याची खऱ्या अर्थाने जाणीव होऊ लागली. समुद्रातल्या दिव्यातून पार पडण्यापूर्वी लालफितीच्या दिव्यातून पार पाडण्यासाठी काय काय करावे लागले याचे तपशील पुस्तकाच्या पूर्वार्धात विस्ताराने मांडले आहेत. पुस्तकाचा हा भाग अतिशय उत्तम प्रकारे जमून आलेला आहे. ‘आपल्या देशातच तयार झालेली नौका या प्रवासासाठी वापरली जावी,’ असा नौदलाचा आग्रह होता. पृथ्वीप्रदक्षिणेच्या या मोहिमेत एक खूप मोठे आव्हान होते ते म्हणजे नौकाबांधणीचे. भारतात हौशी नौकानयन हा प्रकार मुळातच इतका कमी आहे, की स्वाभाविकपणे त्यासाठी लागणाऱ्या नौकेच्या बांधणीबद्दलही अतिशय थोडी माहिती भारतातल्या कंपन्यांना आहे. अशा परिस्थितीत गोव्याच्या नौकाबांधणी कंपनीचे प्रमुख रत्नाकर यांनी स्वत:देखील नौकाबांधणीच्या या संधीकडे एक आव्हान म्हणून पाहिले. देशविदेशांतून कच्चा माल मिळवणे, त्यामध्ये ऐनवेळी काही समस्य असल्याचे निदर्शनास आल्यावर आपले संपूर्ण व्यावसायिक ज्ञान, अनुभव यांचा वापर करून चटकन दुसरे पर्याय शोधणे, ‘डेडलाईन्स’चे संपूर्ण भान राखत सर्व अडचणींवर मात करत दिलीप दोंदे आणि रत्नाकर यांच्या समन्वयातून आकाराला येत जाणारी बोट आणि अखेर ती बोट सज्ज होऊन समुद्रात उतरणे हा प्रवास मुख्य सागरप्रवासाइतकाच खिळवून ठेवणारा आहे. सेलिंग (Sailing) म्हणजेच नौकानयन ही अशी गोष्ट आहे, की ‘थिअरी’ कितीही व्यवस्थित असली तरी प्रत्यक्ष ‘प्रॅक्टिकल’ कसे पार पडेल, कुठली आव्हाने उभी राहतील याबद्दल खात्रीशीरपणे काही सांगणे अशक्य असतं. दिलीप दोंदे यांना समुद्रप्रवासातही अकल्पित संकटांचा सामना करावा लागला. कधी शिडाच्या डोलकाठीला तडा जाणे, कधी शीड फाटणे, कधी जनरेटर बंद पडणे, कधी महत्त्वाचा भाग तुटणे अशा गोष्टींचा त्यांना भर समुद्रात सामना करावा लागला. कधी आपल्या पूर्वानुभवांच्या, आपल्या अंतर्मनाच्या कौलाच्या जोरावर त्यांनी पटापट निर्णय घेत त्या समस्यांवर ज्या प्रकारे मात केली ते वाचून दिलीप दोंदे यांच्या कौशल्याला आणि समयसूचकतेला दाद द्यावीशी वाटते. दिलीप दोंदे यांचे अनुभव अनोखे असले, तरी पुस्तक अतिशय वाचनीय होण्यास कारणीभूत ठरली आहे ती त्यांची निवेदनशैली! उपहास, कोपरखळ्या, मिश्किलपणा यांचे मिश्रण असलेली दोंदे यांची लेखनशैली पुस्तकाला कमालीचे प्रवाही करते. त्यांच्या सागरपरिक्रमेचे अनुभव वाचण्यासाठी उत्सुक असलेल्या वाचकाला मोहिमेच्या पूर्वतयारीला वाहिलेल्या पुस्तकाच्या पूर्वार्धात कुठेही कंटाळा येऊ न देणे हे लेखक म्हणून दोंदेंचे यश आहे. भारतासाठी पहिल्यावाहिल्या असणाऱ्या या मोहिमेसाठी परवानग्या मिळवण्यासाठी, फाइल्स पुढे सरकवण्यासाठी नौदलाचे प्रोटोकॉल पाळत, कोरड्या आणि अज्ञानमूलक सरकारी प्रश्नांना उत्तरे देत एकट्याने धावपळ करणे, त्याचवेळी एकीकडे शिडाच्या बोटीच्या निर्मितीवर जातीने लक्ष ठेवणे आणि या सगळ्यांतून वेळ काढून शिडाची बोट चालवण्याचा सराव करणे या सगळ्या गोष्टी मोहीम सुरू होण्याआधीच थकवणाऱ्या ठरल्या. पण त्या सगळ्या रगाड्यातही दोंदे यांची विनोदबुद्धी शाबूत राहिली आणि त्यांनी आपल्या बोचऱ्या अनुभवांना खुसखुशीतपणाचे वेष्टण चढवले ही गोष्ट विशेष म्हटली पाहिजे. दिलीप दोंदे यांचे अनुभवकथन हसरे, खेळकर असले तरी त्याला भावनेचे अस्तरही आहे. सागरपरिक्रमेत अचानक एक सागरी पक्षी काही दिवसांपुरता बोटीवरचा वास्तव्याला येतो तेव्हा दोंदे यांच्या बोटीवरच्या वावरामध्ये नकळत झालेले बदल, समुद्रावरच्या त्या अफाट एकांतात एका छोट्या पक्ष्याची सोबतही हवीहवीशी वाटणे, त्या पक्ष्याची काळजी घेणे हा आपल्यासाठीही हृद्य अनुभव ठरतो. दोंदे यांचे आपल्या ‘म्हादेई’ या बोटीशी असणारे नाते पुस्तकात मोजक्याच शब्दात फार छान उलगडले आहे. दोंदे यांचे मोहिमेवर निघण्यापूर्वीपासून एकांतात ‘म्हादेई’शी संवाद करणे, स्वत: मोहिमेवर एकटेच निघालेले असूनही ‘We entered the port`, We sailed safely’ अशा उल्लेखांमधून ‘म्हादेई’ला जणू एक सजीव व्यक्तिमत्त्व बहाल करणे या गोष्टी ‘म्हादेई’चे त्यांच्या मोहिमेतलेच नव्हे, तर आयुष्यातले स्थानही अकृत्रिमपणे अधोरेखित करते. मोहिमेतला एक महत्त्वाचा टप्पा ओलांडल्यामुळे अफाट कष्टांचे चीज झाल्याच्या जाणिवेने भावनांचा बांध फुटण्याच्या प्रसंगाचे दोंदे यांनी मोजक्या शब्दांत केलेले वर्णन आपल्यालाही भावूक करून जाते. पहिले सागरपरिक्रमावासी भारतीय म्हणून दिलीप दोंदे यांच्या अनुभवकथनाला महत्त्व आहेच, पण त्यांचा एकूण दृष्टिकोन आणि निवेदनशैली या पुस्तकाला अधिक उंचीवर नेऊन ठेवतात. – प्रसाद फाटक ...Read more

  • Rating StarAjinkya Kulkarni

    एका साहसवीराची यशोगाथा.... मला आजही लख्ख आठवतय, साधारणातः एम एस सी च्या पहिल्या वर्षाला असेन मी. सकाळी-सकाळी काॅलेजला जायची गडबड असायची. जाता जाता दारात पडलेला लोकसत्तेवर नजर फिरवून जायची मला सवय होती. एक दिवस अचानक लोकसत्तेच्या पहिल्या पानावर कुणतरी अभिलाष टाॅमी नामक एका भारतीय नौदलातील अधिकाऱ्याने न थांबता एकल सागर परिक्रमा (solo circumnavigation of the globe) पुर्ण केल्याची बातमी मी वाचली. त्या बातमीतलं अजून एक नाव माझ्या चांगलं लक्षात राहिले. त्याचं कारण म्हणजे त्या दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर अभिलाषच्या आधी सागरी परिक्रमा पुर्ण करण्याचा विक्रम नोंदवला गेला होता. अशी सागर परिक्रमा एकट्याने पुर्ण करणारे ते पहिले भारतीय. ती व्यक्ती म्हणजे कॅ.दिलिप दोंदे होय. सावरकर म्हणतात त्या सप्तबंदीतली एक बंदी म्हणजे समुद्र न ओलांडणे ! यामुळे म्हणा किंवा `ठेविले अंनंते तैसेचि रहावे` या वृत्तीमुळे साहसी,धाडसी गोष्टी करणे हा प्रकारच आपण गमावून बसलो आहोत. याला अपवाद असतात कॅ.दिलिप दोंदे सारखे काही साहसवीर. " भारतात सव्वाशे अब्ज लोकसंख्या असताना तसेच साडेसात हजार किमी इतका मोठा समुद्र किनारा लाभलेला असताना २०१० पर्यंत कुणीच कसं एकट्याने सागरी परिक्रमा केली नाही?" हा प्रश्न सातत्याने कुणी ना कुणी कॅ. दोंदेंना विचारत असे. भारतीय नौदलात कार्यरत असलेले ॲडमिरल मनोहर आवटी यांनी एकल सागरी परिक्रमा करण्यासाठी नौदलाकडे सातत्याने तगादा लगवालेला होता. पण नौदलाने मात्र त्यांना यासाठी कधीही परवानगी दिली नाही. पुढे अशा परिक्रमेचा जेव्हा नौदलाने विचार केला तेव्हा दिलिप दोंदेंना ती संधी देण्यात आली. विचार करा! या अगोदर कोणत्याही भारतीयाने अशी एकट्याने सागर परिक्रमा केलेली नव्हती. त्यावेळी अशी सागर परिक्रमा करणारे दिलिप दोंदे हे जगातले १७५ वे खलाशी ठरले व भारतातील प्रथम. दोंदेंच्या आईने जेव्हा या मोहिमेसाठी होकार भरला तेव्हा यांचा आत्मविश्वास वाढला. घरची, नौदलाची परवानगी मिळाली म्हणजे झालं का सगळं? अजिबात नाही! खरा संघर्ष इथून पुढे सुरु होतो. या संघर्षाचे दोंदे दोन भाग करतात. एक म्हणजे जो लढा त्यांनी जमिनीवर दिला आणि दुसरा जो त्यांनी समुद्राशी दोन हात करताना केला. नौदलाच्या अधिकाऱ्यांचा गलथान कारभार वाचताना उबग येतो. हे…आपले नौदल अधिकारी आहेत? असा संताप होतो आपला वाचाताना अक्षरशः. सगळ्यात आधी या प्रवासाची अचुक माहीती गोळा करणे हे एक मोठे काम होते. दुसरे मोठे काम म्हणजे या प्रवासाला लागणारी अत्याधुनिक शिडाची बोट. अशी बोट ना भारातात उपलब्ध होती ना त्यासंबंधी कुणी जाणकार व्यक्ती उपलब्ध होता. पण आता शिडाची बोट तर भाराताच बांधायची असा निश्चिय दोंदेनी केला. मग अशी बोट भारातात कोण बांधून देणार? हे आव्हान स्वीकारले ते गोव्यातल्या रत्नाकर दांडेकरांनी. त्यांनी व त्यांच्या ॲक्वेरिअस फायबरग्लासचे कर्माचाऱ्यांनी अथक मेहनत घेऊन एक भारतीय बनावटीची शिडाची बोट तयार केली व तिचे नामकरण केलं गेलं `म्हादेई`. म्हादेई हेच नाव का? ते कसं आलं ते सविस्तर पुस्तकात वाचावं. या सागर परिक्रमेसाठी आलेला खर्च हा जवळजवळ सहा कोटी रूपयांपेक्षा जास्त होता. सरकारी लालाफितीतून इतकी मोठी रक्कम मंजूर करणे हे ही एक दिव्यच होतं. नोकरशाहीने दिलेला त्रास, दोंदेंचा पदोपदी केलेला अपमान हे सर्व सहन करत दोंदेंनी आपली ही सागर परिक्रमा पुर्ण केली होती. सागरी परिक्रमा करण्याची कल्पना ज्या कुणाच्या डोक्यात पहिल्यांदा आली असेल त्याला खरोखर मनोमन नमस्कार आहे. त्याने अशी परिक्रमा करण्याचा प्रयत्न केला की नाही तो त्यात यशस्वी झाला का नाही झाला हे गौण आहे. कारण या अशा परिक्रमा करण्यासाठी उदंड साहस अंगात असावं लागतं. स्वतःहून आपला जीव धोक्यात घालावा लागतो. आपल्यात जगातील नवीन क्षीतिजे पादाक्रांत करण्याची उर्मी अनावर असावी लागते. तो उत्साह आपल्याला शेवटपर्यंत टिकवता आला पाहिजे. शारीरिक, मानसिक क्षमतेची प्रचंड कसोटी पाहणाऱ्या या मोहिमा असताता. समुद्रात कधी काय होईल काही सांगता येत नाही. वारा, लाटा तुमच्या बोटीला कुठे घेऊन जातील कशाचा काही भरवसा नाही. समुद्रात ही एकटी बोट पाहून कधी कोणत्या बाजूने समुद्री चाचे हल्ला करतील काही सांगता येत नाही. चहूबाजूने अथांग समुद्र त्यात हे बोटीवर एकटे. बोलायला एकजण सुद्धा कुणीही आसपास नाही. अभिलाष टाॅमीने तंत्र साहायक्काची भूमिका चोख बजावली होती. साहसावर, धाडसावर प्रेम असणाऱ्या कुणीही हे पुस्तक वाचावं. पुस्तकातील फोटो फार सुरेख आहेत. त.टी - मुक्ता देशपांडे यांनी अनुवादित केलेलं `अ बाॅय इन अ स्ट्रॅप्ड पजामा` हे पुस्तक मी वाचलेलं होतं. मी मुळ इंग्रजी `द फर्स्ट इंडियन` हे पुस्तक मी वाचलेलं नाहीये, तरीपण अनुभवाने हे सांगू शकतो की अनुवाद चांगला झालाय. मुळ इंग्रजी पुस्तकावरच्या मजकुरावर जर चांगला संपादकीय हात फिरला असता तर हे पुस्तक अजून चांगले होऊ शकले असते. तीस चाळीस पानांनी पुस्तकाच्या पानांची संख्या कमी केली असती तर चांगलं आटोपशीर पुस्तक झाले असते. काही ठिकाणी आलेल्या जास्तीच्या मजकूरामुळे पुस्तक मध्ये मध्ये जरा रटाळ होते. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ.प्रतिमा देसाई, नवी मुंबई.

सर्वप्रथम पुस्तकाचं मुखपृष्ठ नजरेतून उतरून विचारात जातं. डबा ऐसपैस मधे न दिसताच जाणवणारं मित्रांचं टोळकं, बिनधास्त वृत्ती आणि खोडकर प्रवृत्ती दर्शवणारं भिरभिरतं फुलपाखरू, दप्तरातून डोकावणारी वह्या पुस्तके म्हणजे नकळत पुढील आयुष्याच्या जबाबदारीच्या जाीवा आणि __एकदम भिंगाचा चष्मा जणू तटस्थ पणे ते सगळं जगणं पहातोय. काही गोष्टी आपण म्हणतो "compliment for each other"तसं हे मुखपृष्ठ. छोट्या छोट्या गोष्टी पण काही ना काही शिकवत माणसाला कसं संस्कारीत करतात याचं उदाहरण म्हणजे " छाटितो गप्पा" . अर्थात काय शिकवणं घ्यायची ते घेणाऱ्या वर असतं. अडगळीत गेलेल्या `थर्मास` वरचा "जोकर" मनात शल्य ठेवून जातो. `गव्हातले खडे ` केवळ मनाला बोचत नाहीत तर त्यातला त्या काळातील सोशिक भाव सांगून जातो. `आनंदाची खुण` ही गोष्ट म्हणजे त्यातल्या बहिणीच्या मायेची जणू ऊबदार शाल . `हॅट्ट्रिक ` ह्या कथेतून नकळत्या वयातच आपल्या संविधानाच्या चौकटीत राहून कायद्याचा धडा गिरवला गेला त्यामुळे `टॅक्स डिपार्टमेंट` मधे असूनही हात बरबटले नाही. `मामूची उधारी ` जन्मभराचं हे ओझं नकळत सजग करून गेलं. पुरणामागची वेदना मधलं मनाला भिडलेलं चिरकालाचं दु:ख , सल डोळ्यात पाणी आणते. सगळ्याच कथा सुरवातीला हलक्याफुलक्या वाटल्या तरी त्यातील वेदना , हुरहूर, खेद अश्या अनेक भावनांचा संगम आहे. सगळ्या बद्दल थोडं थोडं लिहिलं तरी नको ईतकं लांब लचक होईल.तरी एक शेवटचं जे सगळ्यात जास्त भावलं. सुपरहिरो! वा. यातल्या एका वाक्यानी आनंदाश्रु व खंत यांची जाणीव करून दिली. ९५ वर्षाच्या व्याधींनी जर्जर झालेल्या आईचा पलंग दिवाणखान्यात ठेवून वर "दिवाणखान्याची खरी शोभा तीच तर आहे बाकी सगळं शोभेच" हे ठामपणे सांगणाऱ्या लक्ष्मण भाऊंना मनापासून दंडवत. न पाहिलेल्या या व्यक्तीला अनुभवलं ही तुझ्या लेखनाची कमाल. थोडक्यात "छाटितो गप्पा "हा ऐवज आहे अनुभवाचा . यातून पुढल्या पिढीला खुप घेण्यासारखे आहे. अनेक भावनांची गुंफण घालत, तरल अनुभव सांगताना त्यातल्या वेदना,सल,दु:ख, आनंद हळुवार उलगडत केलेलं हे लिखाण जास्त मनाला जागवतं. मनापासून आवडलं पुस्तक. प्रत्येक कथेवर भाष्य करण्याचा मोह आवरावा लागला. लेखकाचं हार्दिक अभिनंदन. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अनिरुद्ध गुप्ते, नागपूर.

स्वतः लेखक समोर बसून गप्पा मारत आहेत असा भास होतो. सर्वच कथा सुंदर आहेत. पुस्तक पुर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेववत नाही, ह्यातच लेखकाचे यश आहे. *"मोबाईल माॅकरी"* कथेत पात्रांविषयी उत्सुकता निर्माण होते. *अगा, जे घडलेचि नाही* कथेतील इलेक्शन ड्यूीचा अनुभव मस्त कथन केला आहे. *थर्मास* सर्वोत्तम असे माझे मत आहे. लेखकाचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा !! ...Read more