* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SAHITYIKACHA GAON
  • Availability : Available
  • ISBN : 9788177661002
  • Edition : 3
  • Publishing Year : FEBRUARY 2004
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : MARATHI
  • Category : LITERATURE
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
YOU AND ME, EVERYONE IS THE MEMBER OF SAME SOCIETY, SO ARE THOUSAND OTHERS. BUT, A VERY FEW POSSESS A MIND WHICH IS SENSITIVE, CONTEMPLATIVE AND EMOTIONAL TOO. THIS IS SURELY A MIND OF A WRITER. THE THINGS WHICH WE CONSIDER AS VERY SIMPLE ARE NOT SO IN THE EYES OF A WRITER. WHAT WE FAIL TO NOTICE IN THE SIMPLE MODES AND ASPECTS OF LIFE HAVE A HIDDEN POWER IN THEM, HIDDEN MEANING IN THEM. IT IS THE WRITER WHO FINDS A MEANING FAVOURABLE TO THE SOCIETY IN THE SIMPLE THINGS AROUND US. HE CONTEMPLATES OVER THEM, AS THEY TOUCH VERY DEEPLY HIS EMOTIONAL SENSITIVE MIND. MANY A TIMES, IT IS SEEN THAT THE ROUTINE CULTURAL AND TRADITIONAL EVENTS HAVE LOST THEIR TRUE MEANING OVER THE PERIOD OF TIME. THE TURN THE RITUALS AND THE FESTIVALS TAKE ARE SOMETIMES NOT SO ELEGANT. ON THE CONTRARY, THEY TEND TO BE HIDEOUS IN A WAY OR OTHER. BUT A CONTEMPLATIVE MIND GOES BEYOND THE RITES AND RITUALS, TRIES TO FIND THE ORIGIN OF THE RITUALS, THE CULTURES, AND THE IDEAS BEHIND HAVING THEM. ONCE THE IDEA IS KNOWN THEN THE SAME SIMPLE RITUALS, FESTIVALS ARE BATHED IN A CERTAIN AURA. WE LOVE THE SIMPLEST OF THEM ALL. ONCE THIS MEANING IS MADE CLEAR THEN OUR MIND ENRICHES WITH THE VERY THOUGHT OF THEM. AN INQUISITIVE PERSONALITY OFTEN WONDERS ABOUT THE ORIGIN, BIRTH PLACE, THE EVENTS AND THE SURROUNDINGS OF A LITERATURE. THIS INQUISITIVENESS MAKES IT POSSIBLE FOR ANY PERSON TO QUENCH THE THIRST AND TO FIND THE SECRETS OF BIRTH OF LITERATURE. ONE ALSO COMES ACROSS TO KNOW THE FATHER OF LITERATURE BETTER. ONE FINDS IMMENSE PLEASURE IN KNOWING THE SECRETS. THE STORIES UNDER THIS COLLECTION ARE BASED ON SOCIETY, CULTURE AND LITERATURE. THESE WILL NOT ONLY GIVE THE READERS IMMENSE PLEASURE WHILE LEADING LIFE BUT THEY WILL MAKE EVERYONE THINK, AT LEAST FOR SOME TIME.
समाजात वावरणारं साहित्यिकाचं मन सामान्यांपेक्षा अधिक संवेदनशील, चिंतनशील आणि भावनाशील असतं. त्यामुळं इतरांना साध्या, सरळ वाटणाऱ्या घटनाही साहित्यिकाला मात्र सामाजिक दृष्ट्या अधिक अर्थपूर्ण वाटतात. त्यांच्यावर तो अधिक गंभीरपणे चिंतन करतो. त्याच्या भावनाशील मनाला त्या अधिक खोलवर भिडतात. पुष्कळ वेळा पारंपरिक संदर्भ असलेल्या, सणादी सांस्कृतिक संदर्भ असलेल्या नेहमीच्या घटनांचा महत्त्वाचा उदात्त संदर्भ जनलोक हरवतात. त्यामुळे त्या सणांना विकृती, विपरीत गती प्राप्त झालेली असते. त्या विकृतिविपरीत गतीच्या पलीकडे जाणीवपूर्वक जाऊन त्या सणांचे मूळ जन्मप्रयोजन विचारी मन शोधते. प्रयोजन कळले की साधे सणही श्रीमंत आणि जिवंत वाटू लागतात. मग ते हवेहवेसे वाटतात. त्यांचे जिवलग, घनिष्ठ नाते संस्कार हरवलेल्या आपल्या मनाला कळते आणि मनही सजग, समृद्ध होते. चांगल्या साहित्याच्या र्निमितीच्या प्रत्यक्षातील जन्मखुणा, घटनास्थळे यांच्याविषयीची जिज्ञासा सुजाणसुशिक्षित माणसाला सतत असते. त्या जिज्ञासापूर्तीमुळे साहित्यकृतींची जन्मरहस्ये कळतात, जन्मदात्या साहित्यिकाच्या वृत्तिप्रवृत्ती समजतात. जिज्ञासापूर्तीचा निखळ आनंद मिळतो. प्रस्तुत संग्रहात याच (समाज, संस्कृती आणि साहित्य) तीन पैलूंवर आधारित लालित्यपूर्ण शब्दशिल्पे आणि रंगचित्रे समाविष्ट आहेत. रसिकांना ती अंतर्मुख करतील, जगण्याचे उत्कट क्षण देतील, अनुभवसमृद्ध करतील.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 04-04-2004

    अंतमुर्ख करणारे लेखन... आनंद यादव यांचे साहित्यिकाचा गाव हे पुस्तक अंतर्मुख करणारं आहे. यादव यांची अतिशय मनस्वी, सुरेख अशी शब्दकळा गुंगवून टाकते. आपल्या सभोवती सहजतेने घडणाऱ्या विविध घटनांच्या मागे काय दडलंय याचा शोध साहित्यिकाचं मन सतत घेत असतं. त्ामुळेच इतरांना साध्या सरळ वाटणाऱ्या घटना लेखकाला अधिक अर्थपूर्ण, चिंतनीय वाटू शकतात. याची जाणीव यादव यांचे हे ललितलेख वाचल्यावर होते. वरवर साध्या वाटणाऱ्या प्रसंगाच्या निमित्ताने यादव यांनी समाज, संस्कृती आणि साहित्य या माणसाच्या तीन पैलूंवर सुंदर भाष्य केलं आहे. हे पुस्तक वाचकाची जिज्ञासापूर्ती करणारं आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 24-10-2004

    अस्वस्थ ग्रामीण चित्रण... समकालीन मराठी साहित्यिकांमध्ये डॉ. आनंद यादव हे एक महत्त्वाचं नाव आहे. ग्रामीण साहित्य हा वाङ्मय प्रकार मराठी साहित्याला नवा आहे, असे नव्हे. पण मराठीतले बहुतेक ग्रामीण कथाकार हे बालपणी खेड्यात, गावात राहिलेले होते. त्यांचे ्रामीण कथाविश्व हे त्यांच्या त्यावेळच्या अनुभवांवर, आठवणींवर आधारलेले म्हणजेच स्मरणरंजनात्मक असे होते. त्यात फक्त भूतकाळ होता. वर्तमानकाळ किंवा अगदी नजिकच्या भूतकाळातील ग्रामीण जीवनाचा त्यांना काही परिचयच नव्हता. कारण शिक्षण, नोकरी, व्यवसाय यासाठी ते जे एकदा शहरात आले, ते कायमचे शहरवासीच झाले. नोकरी व्यवसाय करताकरता ते कथा लिहू लागले. साहित्यिक म्हणून प्रतिष्ठित झाले. परंतु त्यांची ग्रामीण कथा वर्तमानात आलीच नाही. मधल्या कालखंडात देशाच्या, महाराष्ट्राच्या समाजजीवनात फार मोठी स्थित्यंतरं घडली. देश स्वतंत्र झाला, संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. परकी सत्ता आणि सरंजामदारी समाजव्यवस्था बदलून लोकशाही अवतरली. विविध सरकारी योजना, विकास कार्ये, शेतीच्या तंत्रातले बदल, कारखानदारी यांचे बरे नि वाईट परिणाम ग्रामीण जीवनावरही होऊ लागले. त्या जुन्या प्रतिष्ठित ग्रामीण कथाकारांच्या कथांमध्ये हा बदलता महाराष्ट्र कुठेच दिसेना. कारण त्यांच्या भावविश्वात तो नव्हताच मुळी. त्यांचा ग्रामीण जीवनाशी असलेला संबंध, सुट्टीत गावात जाऊन चार दिवस मौजमजा करण्यापुरताच उरला होता. ही कोंडी फोडून मराठी ग्रामीण कथेत वर्तमानकाळ आणण्याचे काम करणाऱ्या मोजक्या साहित्यिकांमध्ये डॉ. आनंद यादवांचे स्थान अव्वल आहे. यादवही तसे आता शहरवासीच बनलेले आहेत. पण त्यांची ग्रामजीवनाची नाळ अजिबात तुटलेली नाही. उलट अभिजात मराठी साहित्य नि अभिजात इंग्रजी साहित्य यांच्या अध्ययनातून त्यांच्या साहित्यिक जाणिवांची मुळे ग्रामीण मातीत अधिकच घट्टपणे रुजलेली दिसतात. विविध ग्रामीण साहित्यिकांच्या कथांमधून वाचकांच्या डोळ्यासमोर ग्रामीण जीवनाची काही ठराविक चित्रे निर्माण झालेली आहेत. दारिद्र्य, अवकळा, दुष्काळ, लाचारी, वतनदार मंडळींचा मुजोरपणा, लंपटपणा, सण, उत्सव, जत्रा, तमाशे, फरशा, कुऱ्हाडी, दरोडे, हिरवाकंच निसर्ग, प्राणीजीवन, पक्षीजीवन, शिकारी, सुगीच वर्णनं इत्यादी चित्रे आता ठरीव साच्याची बनून गेली आहेत. यादवांच्या कथा-कादंबऱ्यांमध्ये ही चित्रे नसतातच असे नाही; ती असतातच; पण त्यापेक्षाही वेगळे असे काही असते, जे वाचकाला आजच्या ग्रामजीवनाचं नेमकं भान आणून देते. याचे कारण असे की, यादवच ग्रामीण जीवनाकडे नुसते कथालेखनाचा कच्चा माल म्हणून बघत नाहीत. त्यांच्या चिंतनात समग्र समाज, साहित्य आणि मराठी संस्कृती यांचे जे ताणेबाणे विणले जात असतात, तेच शब्दरूपाने कागदावर उतरतात आणि म्हणूनच ते वाचकाच्या मनाला कुठेतरी जाऊन भिडतात. प्रस्तुत ‘साहित्यिकाचा गाव’ हा डॉ. यादवांचा नवा कथासंग्रह रूढार्थाने ग्रामीण कथांचा संग्रह नाही. किंबहुंना यातल्या कथा या कथाही नव्हेत. कथेच्या बाजाने लिहिलेल्या चिंतनात्मक ललित लेखांचा हा संग्रह आहे. माणूस आधुनिक बनला आहे. विज्ञानयुगाने त्याला सर्व सुखसोयी दिल्या आहेत. अगदी खेड्यापाड्यात डांबरी रस्ते सुगीची वर्णनं इत्यादी चित्रे आता ठरवी साच्याची बनून गेली आहेत. यादवांच्या कथा-कादंबऱ्यांमध्ये ही चित्रे नसतातच असे नाही; ती असतातच; पण त्यापेक्षाही वेगळे असे काही असते, जे वाचकाला आजच्या ग्रामजीवनाचं नेमकं भान आणून देते. याचे कारण असे की, यादव ग्रामीण जीवनाकडे नुसते कथालेखनाचा कच्चा माल म्हणून बघत नाहीत. त्यांच्या चिंतनात समग्र समाज, साहित्य आणि मराठी संस्कृती यांचे जे ताणेबाणे विणले जात असतात, तेच शब्दरूपाने कागदावर उतरतात आणि म्हणूनच ते वाचकाच्या मनाला कुठेतरी जाऊन भिडतात. प्रस्तुत ‘साहित्यिकाचा गाव’ हा डॉ. यादवांचा नाव कथासंग्रह रूढार्थाने ग्रामीण कथांचा संग्रह नाही. किंबहुंना यातल्या कथा या कथाही नव्हेत. कथेच्या बाजाने लिहिलेल्या चिंतनात्मक ललित लेखांचा हा संग्रह आहे. माणूस आधुनिक बनला आहे. विज्ञानयुगाने त्याला सर्व सुखसोयी दिल्या आहेत. अगदी खेड्यापाड्यांत डांबरी रस्ते नि वीज पोहोचली आहे. धरणं नि कालव्याच्या पाण्याने ग्रामीण भागातही भौतिक समृद्ध पोहोचली आहे. सध्या यालाच विकास असे म्हणतात. पण हा विकास होत असताना काही चांगले हरवत चालले आहे. माणूस कृत्रिम, पोषाखी आणि आळशी बनतो आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनातला हा ‘विकास’ लेखकाला अस्वस्थ करतो, ती अस्वस्थता आक्रस्ताळी, राणाभीमदेवी थाटाच्या भाषणांमधून मांडण्याऐवजी लेखक कथेच्या अंगाने इथे मांडतो आहे. एकंदरीत लेखसंग्रह वाचनीय, अस्वस्थ करणारा, ज्याला प्रत्यक्ष काम करायचंय त्याला प्रेरणा देणारा असा आहे. निर्मिती, कोल्हापूर यांनी तयार केलेले मुखपृष्ठ अत्यंत आकर्षक. मेहता प्रकाशनाची निर्मिती सुबक. ...Read more

  • Rating StarDAINIK KESARI 06-06-2004

    ‘साहित्यिकाचा गाव’ : साहित्याची समृद्धी... समाजात वावरणारं साहित्यिकाचं मन सामान्यांपेक्षा अधिक संवेदनशील, चिंतनशील आणि भावनाशील असतं. त्यामुळं इतरांना साध्या सरळ वाटणाऱ्या घटनांही साहित्यिकाला मात्र सामाजिकदृष्ट्या अधिक अर्थपूर्ण वाटतात. त्यांच्याव तो अधिक गंभीरपणे चिंतन करतो. त्याच्या भावनाशील मनाला या अधिक खोलवर भिडतात. सुख-दु:खं, आनंद, विषाद अशा विविध भावना माणसांच्या जीवनात सतत भेटत राहतात. परंतु या सर्व भावना स्वीकारताना साहित्यिकांच्या मनात विवेकाचे एक समंजस भान सतत जागे असते. सामान्य माणसांच्या मनात हिंदोळणारी लसलस येथे भेटत नाही. साहित्यिकांचे मन नियतीने जे दिले आहे, त्यामध्ये तृप्त आहे. त्यामुळे दु:खाचा स्वीकारही येथे अत्यंत समंजसपणाने भेटतो. दु:ख माणसाला जेवढे अंतर्मुख बनवते, तेवढे अन्य काहीही बनवू शकत नाही. अंतर्मुखतेमधून शहाणपण पाझरते. मन प्रगल्भ होते. क्वचित प्रगल्भ मन अवतीभवतीचे दु:खी शोधते. त्यांचे दु:ख कमी करण्याची आस लेखकमनात जागी होते. अलीकडेच प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक डॉ. आनंद यादव यांच ‘साहित्यिकांचा गाव’ हा ललित संग्रह प्रसिद्ध झाला आहे. १९६० नंतरच्या ग्रामीण साहित्यातील एक महत्त्वाचे नि वाचकप्रिय लेखन म्हणून आपण यादवांच्या साहित्यकृतीकडे पाहतो. ‘झोंबी, नांगरणी, घरभिंती, काचवेळ तसेच गोतावळा’ या साहित्यकृतींच्या आसपास भटकणारं लेखन सहजपणे ‘साहित्यिकाचा गाव’ या ललित संग्रहात आलं आहे. या संग्रहातले पुरुषार्थ, दसरा, भावा-बहिणींची दिवाळी, पोरमस्तीची होळी, स्नेही, हिरवी साय, साहित्यिकाचा गाव’ हे ललित लेख वाचकांना जीवनाचे एक समृद्ध भान देणारे आहेत. शांत जलाशयात कधी तरी पाण्याच्या प्रवाहात सोडलेले दिवे आपण पाहिलेले असतात. डोळे मिटले, की परत कधी तरी ती तेजाची रांग आपल्या डोळ्यांपुढे सहजपणाने उभी राहते. आनंदाबरोबर आपल्या मनाला निरामयता प्रदान करीत असते. यादवांचे हे लेखन मला शांत प्रवाहात सोडलेल्या दिव्यांसारखे वाटते. पुष्कळवेळा पारंपरिक संदर्भ असलेल्या, सणादि सांस्कृतिक संदर्भ असलेल्या नेहमीच्या घटनांचा महत्त्वाचा उदात्त संदर्भ जनलोक हरवतात. त्यामुळे सणांना विकृती, विपरीत गति प्राप्त झालेली असते. त्या विकृती-विपरीत गतीच्या पलीकडे जाणीवपूर्वक जाऊन त्या सणांचे मूळ जन्म-प्रयोजन विचारी मन शोधते. प्रयोजन कळले, की साधे सणही श्रीमंत अणि जिवंत वाटू लागतात. मग ते हवेहवेसे वाटतात. त्यांचे जिवलग, घनिष्ठ नाते संस्कार हरवलेल्या आपल्या मनाला कळते आणि मनही सजग, समृद्ध होते. चांगल्या साहित्याच्या निर्मितीच्या प्रत्यक्षातील जन्मखुणा, घटनास्थळे यांच्याविषयीची जिज्ञासा सुजाण-सुशिक्षित माणसाला सतत असते. त्या जिज्ञासापूर्तीमुळे साहित्यकृतींची जन्मरहस्ये कळतात. जन्मदात्या साहित्यिकाच्या वृत्ति-प्रवृत्ति समजतात. जिज्ञासापूर्तीचा निखळ आनंद मिळतो. हरपल्या श्रेयाची प्राप्ती करून देत असल्याचा भास करून देणारा हा ललितसंग्रह आहे. मराठी साहित्याची समृद्धी वाढविणारा हा संग्र असून साहित्यिकांच्या भावविश्वाचा हा विस्तार वाचकाला सुखवील, असा विश्वास वाटतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ.प्रतिमा देसाई, नवी मुंबई.

सर्वप्रथम पुस्तकाचं मुखपृष्ठ नजरेतून उतरून विचारात जातं. डबा ऐसपैस मधे न दिसताच जाणवणारं मित्रांचं टोळकं, बिनधास्त वृत्ती आणि खोडकर प्रवृत्ती दर्शवणारं भिरभिरतं फुलपाखरू, दप्तरातून डोकावणारी वह्या पुस्तके म्हणजे नकळत पुढील आयुष्याच्या जबाबदारीच्या जाीवा आणि __एकदम भिंगाचा चष्मा जणू तटस्थ पणे ते सगळं जगणं पहातोय. काही गोष्टी आपण म्हणतो "compliment for each other"तसं हे मुखपृष्ठ. छोट्या छोट्या गोष्टी पण काही ना काही शिकवत माणसाला कसं संस्कारीत करतात याचं उदाहरण म्हणजे " छाटितो गप्पा" . अर्थात काय शिकवणं घ्यायची ते घेणाऱ्या वर असतं. अडगळीत गेलेल्या `थर्मास` वरचा "जोकर" मनात शल्य ठेवून जातो. `गव्हातले खडे ` केवळ मनाला बोचत नाहीत तर त्यातला त्या काळातील सोशिक भाव सांगून जातो. `आनंदाची खुण` ही गोष्ट म्हणजे त्यातल्या बहिणीच्या मायेची जणू ऊबदार शाल . `हॅट्ट्रिक ` ह्या कथेतून नकळत्या वयातच आपल्या संविधानाच्या चौकटीत राहून कायद्याचा धडा गिरवला गेला त्यामुळे `टॅक्स डिपार्टमेंट` मधे असूनही हात बरबटले नाही. `मामूची उधारी ` जन्मभराचं हे ओझं नकळत सजग करून गेलं. पुरणामागची वेदना मधलं मनाला भिडलेलं चिरकालाचं दु:ख , सल डोळ्यात पाणी आणते. सगळ्याच कथा सुरवातीला हलक्याफुलक्या वाटल्या तरी त्यातील वेदना , हुरहूर, खेद अश्या अनेक भावनांचा संगम आहे. सगळ्या बद्दल थोडं थोडं लिहिलं तरी नको ईतकं लांब लचक होईल.तरी एक शेवटचं जे सगळ्यात जास्त भावलं. सुपरहिरो! वा. यातल्या एका वाक्यानी आनंदाश्रु व खंत यांची जाणीव करून दिली. ९५ वर्षाच्या व्याधींनी जर्जर झालेल्या आईचा पलंग दिवाणखान्यात ठेवून वर "दिवाणखान्याची खरी शोभा तीच तर आहे बाकी सगळं शोभेच" हे ठामपणे सांगणाऱ्या लक्ष्मण भाऊंना मनापासून दंडवत. न पाहिलेल्या या व्यक्तीला अनुभवलं ही तुझ्या लेखनाची कमाल. थोडक्यात "छाटितो गप्पा "हा ऐवज आहे अनुभवाचा . यातून पुढल्या पिढीला खुप घेण्यासारखे आहे. अनेक भावनांची गुंफण घालत, तरल अनुभव सांगताना त्यातल्या वेदना,सल,दु:ख, आनंद हळुवार उलगडत केलेलं हे लिखाण जास्त मनाला जागवतं. मनापासून आवडलं पुस्तक. प्रत्येक कथेवर भाष्य करण्याचा मोह आवरावा लागला. लेखकाचं हार्दिक अभिनंदन. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अनिरुद्ध गुप्ते, नागपूर.

स्वतः लेखक समोर बसून गप्पा मारत आहेत असा भास होतो. सर्वच कथा सुंदर आहेत. पुस्तक पुर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेववत नाही, ह्यातच लेखकाचे यश आहे. *"मोबाईल माॅकरी"* कथेत पात्रांविषयी उत्सुकता निर्माण होते. *अगा, जे घडलेचि नाही* कथेतील इलेक्शन ड्यूीचा अनुभव मस्त कथन केला आहे. *थर्मास* सर्वोत्तम असे माझे मत आहे. लेखकाचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा !! ...Read more