* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SAINIK HO TUMACHYASATHI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177667660
  • Edition : 5
  • Publishing Year : JANUARY 2000
  • Weight : 100.00 gms
  • Pages : 36
  • Language : MARATHI
  • Category : CHILDREN LITERATURE
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
DURING WARTIME, IT IS ALWAYS SEEN THAT PEOPLE COME TOGETHER FORGETTING THEIR PAST, PERSONAL, POLITICAL, RELIGIOUS AND COMMUNITY DIFFERENCES TO FIGHT THE WAR. THE STORIES OF SOLDIERS` VALOUR AND SPIRIT ALWAYS NURTURE THE TENDER MINDS DEEPLY. WHILE LISTENING TO THE PATRIOTIC SONGS FULL OF BRAVERY; YOUNG MINDS AUTOMATICALLY GET TUNED TO THE WORDS, RHYTHM AND THE MEANING THEREIN. THEY GET IMPRESSED WITH PATRIOTISM. THIS IS A COLLECTION OF POEMS WRITTEN IN THE MEMORY OF THOSE SOLDIERS WHO GAVE UP THEIR LIFE OR WHO FOUGHT WITH IMMENSE BRAVERY. THESE SONGS WILL SURELY INSPIRE THE YOUNG MINDS.
युद्धकाळात सारे राष्ट्र प्रादेशिक, राजकीय, धार्मिक, सामाजिक भेद विसरून एकात्म होते आणि युद्धाला सामोरे जाते. सैनिकांच्या युद्धपराक्रमांचे संस्कार बालमनावर खोलवर होत असतात. पराक्रमाची गीते ऐकताना मुलांच्या मुठी वळतात, त्या गीतांच्या लयीवर ती नाचू लागतात. नकळत राष्ट्रीय भावनेने ती प्रभावित होतात. भारतपाक यांच्यात झालेल्या युद्धांत ज्यांनी विशेष पराक्रम गाजविले, अशा सैनिकांची ही पराक्रमगीते कुमारांना निश्चितच प्रेरणादायक ठरतील.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarTARUN BHARAT, MUMBAI 02-04-2000

    आनंद यादव यांनी कुमांरासाठी ‘सैनिक हो, तुमच्यासाठी....’ हा काव्यसंग्रह लिहिलेला आहे. यात भारतीय सैनिकांची पराक्रम गीते असून आनंद यादव यांनी तो भारतीय सैनिकांना अर्पण केलेला आहे. भारत-पाक यांच्यात झालेल्या युद्धात ज्यांनी विशेष पराक्रम गाजविला अशा सैनकांचे व्यक्तिचित्रण करणाऱ्या एकूण दहा कविता असून प्रत्येक वितेत एकेका सैनिकाचा पराक्रम मांडलेला आहे. विविधतेने नटलेल्या आपल्या अखंड भारतभूमीत अनेक युरोपियन येऊन राज्य करून गेले. भरपूर संपत्ती लुटून घेऊन गेले. एवढ्याने समाधान झाले नाही म्हणून ‘हिंदू-मुस्लिम’ फुटीरतेचे बीज रोवून गेले. हे बीज रुजल्याने अखंड भारमाता खंडली गेली. पापी पाक जन्माला आले. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या आदली रात्र कशी होती हे सांगताना कवी म्हणतो - ‘रक्ताने न्हाऊन निघाली स्वातंत्र्याची आधली रात.’ भारतमातेच्या शिरारवर काश्मीरसारखा सुंदर मुकुटमणी आहे. त्याची हाव पाकला लागली. यासाठी पाकने हरतऱ्हेने प्रयत्न सुरु केले. युनोमध्ये जाऊन पाहिले, घुसखोरी सुरु केली. काश्मीरमध्ये आतंकवाद पसरवला. तरीही भारत शर्तीचा प्रयत्न करीत होता. पाक मात्र हेका सोडायला तयार नव्हते. शेवटी भारताची सहनशक्ती तुटली आणि युध्द सुरु झाले. अशी पार्श्वभूमी कवीने ‘नमनाचे पडघम’ या कवितेत तयार केली आहे. व त्यानंतर अनुक्रमे दहा कविता लिहिलेल्या आहेत. काव्यसंग्रहातील पहिली कविता ‘गुलाम कादिरची स्वदेशनिष्ठा’ ही आहे. यात ‘खाग’ ग्रामच्या गुलाम कादिर नावाच्या वीराचे शौर्य वर्णिले आहे. भारतीय सीमेवर वसलेल्या गावांच्या जागृकतेमुळे व देशप्रेमामुळेच आपण अखंड स्वातंत्र्य भोगत असतो. हे सांगताना कवी म्हणतो - ‘ही असली जवान गावे सीमेवर जागोजागी म्हणूनीच हिंदवी माता स्वातंत्र्या अखंड भोगी’ दुर्गम डोंगराळ भागातील पाकिस्तानचे दारुगोळ्याचे महत्वाचे केंद्र उदध्वस्त करणारा मेजर रणजितसिंग, रणगाड्यांच्या हल्ल्यांना कडवी झुंज देणारा हवालदार अब्दुल हमीद, नऊ रणगाड्यांच्या बदलात साठांचा धुव्वा उडवणारा कर्नल तारापोर, बरकी गाव जिंकून घेताना शहीद झालेला रामसिंह, शत्रूचा बालेकिल्ला बॉम्बने उडवणारा बालकराम यांची बहादुरी वाचून कुणारे बाहू स्फुरणार नाहीत ! रात्रीच्या वेळी गस्त घालताना सुद्धा किती सावधगिरी लागते व प्रसंगी निर्भिडपणे एकाकी शत्रूल कशी झुंज द्यावी लागते याचे वर्णन ‘शिंगारसिंगाची टेहळणी’ या कवितेत वाचायला मिळते. युध्द सुरु असताना आपल्या सैनिकांना शस्त्राचा पुरवठा करणे ही तातडीची गरज असते. असेच रणसाहित्य घेऊन चक्रधर मेजरसिंह निघाला. अनेक अडचणींवर मात करत त्याचा ट्रक धावत होता, पण शत्रूने त्याच्या देहाची चाळण केली. ट्रकलाही आग लागली अशा स्थितीतही तो नेमक्या ठिकाणी आला व गतप्राण झाला. त्याही अवस्थेत त्याची बोटे गाडीच्या चाकावर होती. अशा शूरवीराचे वर्णन काव्यसंग्रहातील शेवटची कविता ‘चक्रधर मेजरसिंह’ या कवितेत पाहायला मिळते. काव्यसंग्रहात प्रत्येक कवितेच्या सुरुवातीला त्या कवितेच्या अनुषंगाने चित्रं काढलेली आहेत, त्यामुळे ती कविता अधिक आकर्षक वाटते व कुमारांना वाचण्यास हुरुप देते. भाषा अगदी सरळ, साधी व सोपी असल्याने मुलांना कुठेही अडचण येणार नाही. संग्रहात कवीने म्हटले आहे की, ‘ज्या वीरांनी तानाजीसम रणी ठेविला माथा आदरभावे त्या अर्पी मी ओबडधोबड गाथा’ असा हा सैनिकांच्या पराक्रम गीतांचा काव्यसंग्रह कुमारांना वाचण्यास चांगला आहे. याव्दारे त्यांच्या मनात देशप्रेमाची भावना दृढ होईल व देशासाठी तन मन धन अर्पण करण्याची वृत्ती निर्माण होण्यास मदत होईल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ.प्रतिमा देसाई, नवी मुंबई.

सर्वप्रथम पुस्तकाचं मुखपृष्ठ नजरेतून उतरून विचारात जातं. डबा ऐसपैस मधे न दिसताच जाणवणारं मित्रांचं टोळकं, बिनधास्त वृत्ती आणि खोडकर प्रवृत्ती दर्शवणारं भिरभिरतं फुलपाखरू, दप्तरातून डोकावणारी वह्या पुस्तके म्हणजे नकळत पुढील आयुष्याच्या जबाबदारीच्या जाीवा आणि __एकदम भिंगाचा चष्मा जणू तटस्थ पणे ते सगळं जगणं पहातोय. काही गोष्टी आपण म्हणतो "compliment for each other"तसं हे मुखपृष्ठ. छोट्या छोट्या गोष्टी पण काही ना काही शिकवत माणसाला कसं संस्कारीत करतात याचं उदाहरण म्हणजे " छाटितो गप्पा" . अर्थात काय शिकवणं घ्यायची ते घेणाऱ्या वर असतं. अडगळीत गेलेल्या `थर्मास` वरचा "जोकर" मनात शल्य ठेवून जातो. `गव्हातले खडे ` केवळ मनाला बोचत नाहीत तर त्यातला त्या काळातील सोशिक भाव सांगून जातो. `आनंदाची खुण` ही गोष्ट म्हणजे त्यातल्या बहिणीच्या मायेची जणू ऊबदार शाल . `हॅट्ट्रिक ` ह्या कथेतून नकळत्या वयातच आपल्या संविधानाच्या चौकटीत राहून कायद्याचा धडा गिरवला गेला त्यामुळे `टॅक्स डिपार्टमेंट` मधे असूनही हात बरबटले नाही. `मामूची उधारी ` जन्मभराचं हे ओझं नकळत सजग करून गेलं. पुरणामागची वेदना मधलं मनाला भिडलेलं चिरकालाचं दु:ख , सल डोळ्यात पाणी आणते. सगळ्याच कथा सुरवातीला हलक्याफुलक्या वाटल्या तरी त्यातील वेदना , हुरहूर, खेद अश्या अनेक भावनांचा संगम आहे. सगळ्या बद्दल थोडं थोडं लिहिलं तरी नको ईतकं लांब लचक होईल.तरी एक शेवटचं जे सगळ्यात जास्त भावलं. सुपरहिरो! वा. यातल्या एका वाक्यानी आनंदाश्रु व खंत यांची जाणीव करून दिली. ९५ वर्षाच्या व्याधींनी जर्जर झालेल्या आईचा पलंग दिवाणखान्यात ठेवून वर "दिवाणखान्याची खरी शोभा तीच तर आहे बाकी सगळं शोभेच" हे ठामपणे सांगणाऱ्या लक्ष्मण भाऊंना मनापासून दंडवत. न पाहिलेल्या या व्यक्तीला अनुभवलं ही तुझ्या लेखनाची कमाल. थोडक्यात "छाटितो गप्पा "हा ऐवज आहे अनुभवाचा . यातून पुढल्या पिढीला खुप घेण्यासारखे आहे. अनेक भावनांची गुंफण घालत, तरल अनुभव सांगताना त्यातल्या वेदना,सल,दु:ख, आनंद हळुवार उलगडत केलेलं हे लिखाण जास्त मनाला जागवतं. मनापासून आवडलं पुस्तक. प्रत्येक कथेवर भाष्य करण्याचा मोह आवरावा लागला. लेखकाचं हार्दिक अभिनंदन. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अनिरुद्ध गुप्ते, नागपूर.

स्वतः लेखक समोर बसून गप्पा मारत आहेत असा भास होतो. सर्वच कथा सुंदर आहेत. पुस्तक पुर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेववत नाही, ह्यातच लेखकाचे यश आहे. *"मोबाईल माॅकरी"* कथेत पात्रांविषयी उत्सुकता निर्माण होते. *अगा, जे घडलेचि नाही* कथेतील इलेक्शन ड्यूीचा अनुभव मस्त कथन केला आहे. *थर्मास* सर्वोत्तम असे माझे मत आहे. लेखकाचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा !! ...Read more