IN A SOUTHERN AFRICA VIOLENTLY SPLIT DURING APARTHEID, KOBA IS TAKEN AWAY FROM HER KALAHARI DESERT-TRIBE AFTER WITHNESSING HER PARENTS BEING MURDERED BY A PARTY OF WHITE HUNTERS. SHE SLOWLY LEARNS TO ADAPT AND SURVIVE IN A DANGEROUS BUT BEAUTIFUL ENVIRONMENT. HOWEVER, SHE IS PLAGUED BY THE KNOWLEDGE THAT UNLESS SHE LEAVES THOSE WHO HAVE GROW TO LOVE HER, SHE FACES EXILE FROM HER OWN PEOPLE. THE ONLY ANSWER MAY BE TO RISK ALL THROUGH THE BRUTAL LAWS THAT CONDEMN HER. OFFERING A RARE GLIMPSE INTO AN ENDANGERED CULTURE,SALT & HONEY IS AN EPIC, MOVING AND FASCINATING STORY OF ENDURANCE AND UNDERSTAINDING. ""CANDI MILLER`S ACHIEVEMENT IS TO HAVE WRITTEN A SMALL BOOK WITH TRULY BIG THEMES. IT`S AN AMBITIOUS NOVEL WITH IMPRESSIVE RANGE AND A VERY AUTHENTIC FEEL.`` BARBARA TRAPIDO
कोबा! वर्णद्वेषाच्या वणव्यात होरपळणाऱ्या दक्षिणी आफ्रिकेतील कलहारी वाळवंटातल्या भटक्या आदिवासी जमातीतली एक लहानगी! गोऱ्या लोकांच्या एका शिकारी चमूकडून आपल्या आईवडिलांची झालेली निर्घृण हत्या स्वत:च्या डोळ्यांनी पाहिल्यावर तिला तिच्या स्वत:च्या जगापासून दूर, त्या गोऱ्यांच्या जगात नेलं जातं. त्यांच्या त्या सुंदर पण तिच्यासाठी धोक्याच्या असलेल्या जगाशी जुळवून घ्यायला. त्यात टिकाव धरायला ती हळूहळू शिकते. तरीही एक जीवघेणी जाणीव तिला सतत टोचणी लावून असते ती म्हणजे जर तिला स्वत:च्या जमातीकडून बहिष्कृत व्हायचे असेल, त्यांच्यापासून पूर्णपणे तोडले जायचे नसेल तर तिला त्या माणसांचा, ज्यांच्यावर तिचा जीव जडला आहे, त्यांचा त्याग करावाच लागेल. अखेर तिलाच दोषी ठरवणाऱ्या गोऱ्यांच्या त्या अत्याग्य कायद्यांच्या माध्यमातून सर्वस्व पणाला लावणे हाच कदाचित त्यावर उपाय असू शकतो.
एका नष्ट होऊ घातलेल्या संस्कृतीच्या जीवनशैलीच्या अंतरंगाची दुर्मिळ झलक दाखवणारी ही कादंबरी हे महाकाव्यच आहे सहनशक्ती आणि चिवटपणा तसेच सामंजस्य व सहिष्णुतेची ही एक मन हेलावून टाकणारी रोमहर्षक कहाणी आहे.
वँÂडी मिलरचं श्रेय हेच आहे की एका छोट्याश्या पुस्तकात तिने फार मोठा आशय व्यक्त केला आहे. ह्या महत्वाकांक्षी कादंबरीचा आवाका फार मोठा आहे आणि तिला मातीचा स्पर्श आहे.
– बार्बरा ट्राजिडो