* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SAMBHAJI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666519
  • Edition : 20
  • Publishing Year : NOVEMBER 2005
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 864
  • Language : MARATHI
  • Category : HISTORICAL
  • Available in Combos :VISHWAS PATIL COMBO SET - 10 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SAMBHAJI, THE YOUNG KING, THE SECOND MARATHA CHHATRAPATI WHO SUCCEEDED THE THRONE AFTER HIS FATHER THE GREAT SHIVAJI MAHARAJ, CONTINUOUSLY FOUGHT THE MUGHALS FOR EIGHT CONSECUTIVE YEARS, BUT DID NOT LET THE MOGHUL ARMY CAPTURE EITHER ANY OF THE MARATHA FORTS OR ANY OF THE SHIPS. HE OFFERED HIMSELF BUT DID NOT BOW DOWN IN FRONT OF THE MUGHAL EMPEROR; HE DIED A HERO`S DEATH AT A VERY YOUNG AGE, WHEN HE WAS JUST 32 YEARS OLD. FOR THE PAST 325 YEARS, SAMBHAJI WAS OFTEN PAINTED IN BLACK. HE HAD A POETIC MIND, HE WAS A VERY INTELLIGENT PERSON, HE WAS CONCERNED ABOUT HIS PEOPLE, HE WAS BRAVE, HE WAS A GREAT THINKER, BUT ALL HIS GOOD QUALITIES WERE OVER-LOOKED; HIS PERSONALITY WAS ALWAYS LOOKED UPON WITH SUSPICION. VISHWAS PATIL, THE MOST GIFTED AUTHOR TODAY, TELLS US MORE ABOUT SAMBHAJI RAJE, AS HE HAS SEEN HIM THROUGH THE REFERENCES IN HISTORY, AS HE HAS FOUND HIM IN THE VERY VALUABLE YET IGNORED DOCUMENTS, AS HE HAS HEARD HIM IN THE HILLY REGIONS OF SAHYADRI MOUNTAIN RANGES, AMONG THE CREEKS OF THE ARABIAN SEA. SAMBHAJI, SON OF SHIVAJI MAHARAJ, A NOVEL PERSONALITY WITH HIS EQUALLY IMPRESSIVE, BREATH-TAKING, SPECTACULAR, STORMY YET VERY TRUE STORY.
औरंगजेबाच्या पाच लाख फौजेशी सलग आठ वर्षे कडवी झुंज देणारा मराठ्यांचा दुसरा छत्रपती, ज्याने वयाच्या बत्तीसाव्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर आपले मस्तक दिले; पण शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील एकही महत्त्वपूर्ण किल्ला विंÂवा आपल्या आरमारातील एकही जहाज गमावले नाही! गेली सव्वातीनशे वर्षे या विचारी,कवी-राज्यकत्र्याची आणि पराक्रमी सेनानीची गाथासंशयाच्या धडप्यामध्ये गुंडाळून ठेवली गेली होती!आजचे अग्रगण्य प्रतिभावंत कादंबरीकार विश्वास पाटील यांनासह्याद्रीच्या निबिड दऱ्याखोऱ्यांनी,सागरखाड्यांनी आणि दुर्लक्षिलेल्या दुर्मिळ कागदपत्रांनी सांगितलेली शिवपुत्र संभाजीराजांचीचित्तथरारक, वादळी, पण वास्तव गाथा!!
* सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील पुरस्कार २००५ * कवी माधव पुरस्कार २००६ * अक्षरगंध पुरस्कार २००६

No Records Found
No Records Found
Keywords
#YESUBAI #SHIVAJI #PUTALABAI #RAJARAMSAHEB #SOIRABAI #EKOJI #DURGABAI #RANUBAI #HARJIRAJEMAHADIK #AMBIKABAI #GANOJISHIRKE #RAJKUNWAR #MAHADJINIMBALKAR# SAKAVRABAI #PILAJISHIRKE #HIROJIFARJAND #HAMBIRAOMOHITE #BALAJIAAWAJI #KHANDOJIBALLAL #MOROPANTPINGALE #KESOTRIMALPINGALE #NILOPANTPINGALE #KAVIKALASH #PRALHADNIRAJI #ANNAJIDATTO #SOMAJIDATTO #KAZIHAIDER #KONDAJIFARJAND #YESAJIGAMBHIRRAO #YESAJIKANK #KRUSHNAJIKANK #JYOTYAJIKESARKAR #DAULATKHAN #DADJIPRABHUDESHPANDE #AURANGZEB #DILERKHAN #SHAHABUDIKHAN #28TH NOV #SAMBHAJI(1.SAHAKAR MAHARSHI SHANKARRAO MOHITE PATIL PURSKAR 2005 2.KAVI MADHAV PURSKAR 2006 3.AKSHARGANDH PURSKAR 2006 ) #NOT GONE WITH THE WIND #BANDA RUPAYA #KRANTISURYA #NAGKESHAR #VISHWASPATIL #संभाजी(१.सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील २.कवी माधव पुरस्कार २००६ ३.अक्षरगंध पुरस्कार २००६) #नॉट गॉन विथ द विंड #बंदा रुपया #क्रांतिसूर्य #नागकेशर #विश्वासपाटील
Customer Reviews
  • Rating Starनवनाथ इंगोले

    पानिपत वाचून झाली होती. श्री. विश्वास पाटील लिखित संभाजी कादंबरी त्याच तोडीची असेल या हेतूने थोड्या दिवसांनी वाचायला घेतली. काय ते लिखाण... अद्भुत.. अद्वितीय.. अगदी वाचकाच्या बोटाला धरून ते त्या काळात ढकलून देतात. सर्व इतिहास जवळून पाहिला. फंद, फिूरी काय असते, स्वराज्य प्रेमाला काय म्हणतात, आणि, बेडर, मृत्यूला हसत हसत कसा धरायचा. भाऊबंद, पाहुणे रावळे, त्यांच्या आत्मघातकी चाली.. अतिशय भयावह.. एकदा वाचाच.. संभाजी : लेखक, विश्वास पाटील. माझ्या कडून टीप : ज्यांना ह्रदयाचा त्रास आहे किंवा ज्यांचं मन कमकुवत आहे त्यांनी हे पुस्तक हातातही धरू नये... ...Read more

  • Rating Starनवनाथ इंगोले

    पानिपत वाचून झाली होती. श्री. विश्वास पाटील लिखित संभाजी कादंबरी त्याच तोडीची असेल या हेतूने थोड्या दिवसांनी वाचायला घेतली. काय ते लिखाण... अद्भुत.. अद्वितीय.. अगदी वाचकाच्या बोटाला धरून ते त्या काळात ढकलून देतात. सर्व इतिहास जवळून पाहिला. फंद, फिूरी काय असते, स्वराज्य प्रेमाला काय म्हणतात, आणि, बेडर, मृत्यूला हसत हसत कसा धरायचा. भाऊबंद, पाहुणे रावळे, त्यांच्या आत्मघातकी चाली.. अतिशय भयावह.. एकदा वाचाच.. संभाजी : लेखक, विश्वास पाटील. माझ्या कडून टीप : ज्यांना ह्रदयाचा त्रास आहे किंवा ज्यांचं मन कमकुवत आहे त्यांनी हे पुस्तक हातातही धरू नये... ...Read more

  • Rating StarSuresh Phadnis

    विश्वास पाटील यांची छ्त्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील कादंबरी.मेहता publication.खूप छान कादंबरी,जणू इतिहासच समोर उभा राहतो.आजच वाचून संपली.फितुरी कशी असते याचे जवळचे उदाहरण.

  • Rating StarJyoti Kshirsagar

    विश्वास पाटील यांची *संभाजी*कादंबरी बऱ्याच दिवसापासून घरात होती ती वाचायची होती पण एवढी मोठी साडेआठशे पानांची कादंबरी केव्हा वाचून होईल असे वाटत होते, पण एक दिवस सुरुवात तर करू असे म्हणून ती हातात घेतली आणि वाचतच गेले, विश्वास पाटलांची ती भाषाशैली आण संभाजी राजांविषयी ते वर्णन भारावून गेल्यासारखे वाचन चालू झाले, स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी राज्यांच्या जाज्वल्य इतिहासाने मन भारावून गेले‌. शिवरायांनंतर सलग नऊ वर्ष औरंगजेबाच्या पाच लाख सैन्याविरुद्ध संभाजीराजे कसे लढले, पातशहा औरंगजेबाला कसे झुलवत ठेवले. रामशेज किल्ला घ्यायला औरंगजेबाच्या सैन्याला साडेसहा वर्षे झुंजावे लागले, संभाजी राजांपुढे औरंगजेब अक्षरश: हतबल झालेला होता. किती प्रयत्न केले परंतु शिवाचा हा छावा औरंगजेबाच्या हाती लागत नव्हता. परंतु घात झाला आणि फितुरीने हा छावा औरंगजेबाच्या हाती लागला संभाजी राजे पकडले गेले. पकडल्यानंतर संभाजी राजांची आणि कवी कलश यांची केलेली विटंबना वाचून मन सुन्न झाले. केवळ स्वराज्यासाठी आणि धर्म रक्षणासाठी संभाजीराजांनी औरंगजेबाचे हाल सहन करून मृत्यूला कवटाळले. परंतु त्याच्या पुढे झुकले नाही,अवघ्या 32 वर्षाच्या एका छत्रपतीला औरंगजेबाने हाल हाल करून मारले. स्वराज्यासाठी जगावे हे शिवरायांनी शिकवले तर आपल्या मातीसाठी कसे मरावे हे शंभूराजांनी शिकवले. संभाजीराजांबद्दल आदर होताच परंतु वाचनानंतर तो कैकपटीने वाढला. स्वराज्याचे धाकले धनी, दुसरे छत्रपती संभाजी राजे यांना मानाचा मुजरा.🙏🙏 ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

TANUJA Bankar

This book is so much informative. The imagination and the way of telling this kind of story is just amazing!!! It doesn`t getting bored to read this. Each page is interesting and About mysterious truth. It`s a pleasure to know about our culture and sme mysterious stories that we don`t know. I just want to Thank you so much dear AKSHAT GUPTA SIR for this wonderful book. #Must read book Lots of good wishes Akshat sir👏😊 ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा.डाॅ. राहुल हांडे .... संगमनेर

"जिसे भी देखिए वो अपने आप मे गुम है जूबा मिली है मगर हुंजुबा नही मिलता कभी किसिको मुकम्मल जहा नही मिलता..." संज्ञापन व दळणवळण याची अत्यंत वेगवान साधने सहज उपलब्ध असलेल्या आजच्या जगात वावरणाऱ्या माणसाची व्यथा उपरोक्त गझल सहजपणे व्यक्त करून जाते. मणसाच्या जीवनात भौतिक समृद्धीचा अतिरेक झालेला असताना माणसाचा माणसाशी संवाद मात्र क्षीण होत चाललेला दिसतोय. आजचा माणूस मोबाईलवर बोलायला कितीही वेळ देतोय;परंतु प्रत्यक्षात भेटून दुसऱ्याशी संवाद साधण्यासाठी त्याच्याकडे अजिबात वेळ नाही. भौतिक सुख सोयी व संज्ञापन-संपर्क साधनांचा सुळसुळाट आपल्या समाजात झालेला नव्हता तेव्हा एकमेकांशी बोलणं हा मनोरंजनच नव्हे तर एकूण जीवन व्यवहाराचा अविभाज्य भाग होता. दैनंदिन जीवन व्यवहाराच्या पलीकडे जाऊन शिळोप्याच्या गप्पा मारण्यासाठी प्रत्येक जणाला त्याच्या सोयीची कंपनी देखील उपलब्ध होती. त्यावेळी माणसाची आर्थिक व भौतिक परिस्थिती दुबळी असली तरी मनस्थिती बळकट होती. आज हे सर्व इतिहास जमा झालेले आहे. असे असताना जी. बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे भारतीय समाजाच्या गप्पामय जीवनाची आठवण पुन्हा ताजी करणारे पुस्तक नुकतेच मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे यांनी प्रकाशित केले आहे. घरातील छोट्या मोठ्या प्रसंगांपासून सुरू झालेल्या या गप्पा कार्यालयीन कामकाजात देखील रंगलेल्या आहेत. सुमारे गेल्या पाच दशकांचा मराठी समाज त्याच्या समग्र वैशिष्ट्यांसोबत ह्या गप्पांमध्ये मनमुराद वावरताना दिसतो. पुस्तकाचे लेखक जी.बी. देशमुख यांचे बोट धरून वाचक जेव्हा ह्या गप्पांच्या आखाड्यात उतरतो तेव्हा हौदातील मातीत केव्हा रंगून जातो याचे भान राहत नाही. माणसाशी माणसाचा संवाद तुटला आहे. अशी तक्रार सतत कानावर पडत असताना `छाटितो गप्पा` हे पुस्तक आपल्याला पुन्हा एकवार भोवतालच्या माणसांशी संवाद साधण्यासाठी नक्कीच प्रेरित करते. माणसाशी माणसाचा तुटलेला संवाद जोडण्याच्या प्रयत्नांमध्ये जी.बी. देशमुख यांचे `छाटितो गप्पा` हे पुस्तक निश्चितच महत्त्वाचे योगदान देणारे ठरेल यात शंका नाही. ...Read more