* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: INSIDE THE VEILED KINGDOM
  • Availability : Available
  • Translators : AVINASH DARP
  • ISBN : 9788177667486
  • Edition : 4
  • Publishing Year : FEBRUARY 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 179
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
11TH SEPTEMBER 2001- THE ECLIPSE TO THE LIGHT. THIS WAS THE DAY WHEN TWO AIRPLANES ATTACKED THE TWIN TOWERS OF THE WORLD TRADE CENTER, IN NEW YORK. THIS CAUSED PANIC NOT ONLY IN NEW YORK OR THE U.S.A. BUT ALSO THROUGHOUT THE WORLD. ALL THOSE WHO HAD GREAT CONCERN ABOUT HUMANITY WERE SHATTERED BEYOND BELIEF. WHEN CARMEN BIN LADEN HEARD THIS NEWS IN GENEVA, SHE LOST HER SENSES. ALL SHE COULD SEE IN FRONT OF HER EYES WERE THE CLOUDS OF SMOKE GUSHING OUT OF THE TWIN TOWERS; FROM THE CLOUDS AROSE THE FIGURE OF OSAMA BIN LADEN, HER YOUNGER BROTHER-IN-LAW. SHE WAS TERRIBLY UPSET WHEN HER DAUGHTERS WERE ACCUSED OF HELPING OSAMA IN THIS HIDEOUS JOB. THE NEWS CHANNELS, THE NEWS PAPERS WERE ALL SAYING IT AGAIN AND AGAIN. CARMEN HAD DIVORCED HER HUSBAND, YESLAM, YEARS BACK WITH ONE INTENTION IN HER MIND, FREEDOM FOR HER DAUGHTERS, AND HAD SETTLED DOWN IN GENEVA. BUT THE ACCUSATIONS CREATED HAVOC IN HER LIFE, NOT ONLY HERS BUT HER DAUGHTERS` LIVES WERE ALSO AT STAKE. SHE GAVE INTERVIEWS TO THE NEWS CHANNELS, TO THE NEWS PAPER; SHE EXPLAINED HER ALOOFNESS FROM THE LADEN FAMILY, SHE MADE THEM REALIZE THAT SHE AND HER FAMILY WAS NO MORE A PART OF THE LADEN FAMILY. VERY REALISTICALLY, SHE PRESENTS SOME OF HER SWEET AND BITTER MEMORIES DURING HER STAY IN SAUDI ARABIA. THIS IS THE STORY OF HER FIGHT, FOR THE SAKE OF HER DAUGHTERS AND THEIR HAPPINESS.
११ सप्टेंबर २००१ -प्रकाशाला लागले ग्रहण! न्यूयॉर्कमधील वल्र्ड ट्रेड सेंटरच्या जुळ्या भावंडांप्रमाणे असलेल्या टॉवर्सवर दोन विमानांनी धडक दिली आणि केवळ त्या देशावरच नव्हे तर सा-या जगावर भीतीचं सावट पसरलं... मानवतेवर प्रेम करणा-यांची मनं होरपळून निघाली. कारमेन बिन लादेननं जिनिव्हात ही भयंकर बातमी ऐकली आणि ती सुन्न झाली. तिच्या डोळ्यांपुढे त्या इमारतींतून घुसमटत बाहेर पडणारे धुराचे ढग उभे राहिले. त्या ढगातून एकच आकृती नाचत होती... ती आकृती होती कारमेनच्या धाकट्या दिराची... ओसामा बिन लादेनची. या कृत्यामागे कारमेनच्या मुलींचा हात असावा असा आरोप वर्तमानपत्रातून आणि दूरदर्शनवरून होऊ लागल्यावर ती अधिक व्यथित झाली. आपल्या लेकींना स्वतंत्र आयुष्य जगता यावं यासाठी येस्लामबरोबर रीतसर घटस्फोट घेऊन कारमेन जिनिव्हात रमली होती; परंतु एखाद्या मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारल्यावर माशा चवताळून चावे घ्यायला उठतात, तसेच काहीसे झाले. मग तिनं वर्तमानपत्रांना, दूरदर्शनवर जाऊन सा-या सा-या गोष्टींचा सविस्तर खुलासा केला. त्या काळातल्या सौदी अरेबियातील कडूगोड आठवणी तिनं या पुस्तकात वस्तुनिष्ठपणे मांडलेल्या आहेत. मुलीच्या सुखासाठी तिनं दिलेल्या झगड्याची ही कहाणी आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #LEENASOHONI #AVINASHDARP #CARMENBINLADEN #BIOGRAPHY&TRUE STORIES #INSIDE THEVEILEDKINGDOM
Customer Reviews
  • Rating StarSagar Shinde

    ओसामा तिचा दिर होता ... वाचावं असं पुस्तक ... ओसामा बिन लादेन च संपूर्ण कुटुंब कसं होतं .आणि ते किती मोठं होतं. लेखिका त्याच्या मोठ्या भावाच्या प्रेमात कशी पडते व लग्न करून सौदी त जाते . तिथं तिने काढलेल्या आयुष्याची कहाणी . ९/११ नंतर तिच्या बदेल्या आयुष्याची गोष्ट तिच्या शब्दात... जरुर वाचा ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 26-08-2007

    ओसामाच्या वहिनीची आत्मकथा... शेख महंमद बिन लादेन हा एक जबरदस्त इसम होता. एकेकाळी अरबस्तानचाच भाग असलेल्या पण आता येमेन किंवा यमन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या देशातला शेख महमंद बिन लादेन नावाचा एक सामान्य कामगार १९३० साली सौदी अरेबियात आला. आपल्या अंगचया गुणांनी तो लवकरच एक नामांकित बांधकाम कंत्राटदार म्हणजे बिल्डर झाला. ही १९४०च्या दशकातली कथा आहे. त्यावेळी बिल्डर या पदवीभोवती सत्ता, संपत्ती अगर बदमाषी असं कोणतंच वलय नव्हतं. त्या काळात दर्जेदार बांधकाम करून शेख महंमद हे सुलतान अब्दुल अजीझ यांचे आवडते बनले. १९६७ साली शेख महमंद बिन लादेन विमान अपघातात मृत्यू पावले. त्यावेळी त्यांच्या जनानखान्यात बावीस बायका आणि चोपन्न मुलं एवढा प्रचंड कुटुंब संभार जमा झालेला होता. या चोपन्नातलाच एक म्हणजे सध्याचा जागतिक खलनायक ओसामा बिन लादेन. प्रस्तुत ‘साम्राज्य बुरख्यामागचे’ या आत्मवृत्ताची लेखिका कारमेन ही ओसामाचा थोरला सावत्र भाऊ येस्लाम याची बायको. कारमेनची आई इराणी मुसलमान, तर बाप स्विस खिश्चन. त्यामुळे तिचा जन्म, बालपण जिनिव्हात स्वित्झर्लंडमध्ये गेले. त्यांच्या घरात सुट्टीच्या दिवसांत भाडेकरू म्हणून राहायला आलेल्या येस्लाम बिन लादेनच्या प्रेमात पडून ती सासुरवाशीण म्हणून सौदी अरेबियात राहायला आली. कुठे पृथ्वीवरचा स्वर्ग मानला जाणारा निसर्गसुंदर स्वित्झर्लंड नि कुठे अरबस्तानच रखरखीत वाळवंट. पण कारमेनला लागोपाठ तीन मुलीच झाल्या. त्यामुळे येस्लामचं नि तिचं फाटलं केवळ येस्लामच्या प्रेमाखातर अरबी वाळवंट नि त्यापेक्षाही दु:सह असा इस्लामी कर्मठपणा सहन करणाऱ्या कारमेनला हे सगळं असह्य झालं. ती येस्लामपासून वेगळी झाली आणि आपल्या तीन मुलींसह जिनिव्हात राहू लागली. पण आपलं बिन लादेन हे अडनाव मात्र तिने कायम ठेवले. परिणामी ११ सप्टेंबर २००१ च्या भयानक घटनेनंतर आख्ख्या युरोपच्या टेलिफोन डिरेक्टरीत बिन लादेन हे आडनाव लावणारं एकच घर दिसू लागलं. कारमेन बिन लादेन, जिनिव्हा, स्वित्झर्लंड! त्यामुळे कारमेन व तिच्या मुलींना असह्य मनस्ताप सोसावा लागला. मग कारमेनने वृत्तपत्रं, दुरदर्शन यांना मुलाखती देऊन आपली कहाणी सविस्तर सांगितली. ती कहाणी म्हणजेच प्रस्तुत पुस्तक. आजच्या अत्याधुनिक समजल्या जाणाऱ्या जगातही मुसलमान स्त्रियांना किती भयंकर जाच धर्माच्या नावावर केला जातो हे मुद्दाम वाचावं असं उतरलं आहे. विशेषत; हिंदू धर्मातल्या कर्मठपणावर येता-जाता तोंडसुख घेणाऱ्या कथित निधर्मवाद्यांनी आणि फाजील स्त्रीमुक्तीवाल्यांनी तर इस्लामी स्त्रियांची ही घुसमट अवश्य वाचावी. मूळचे मराठी, पण आता न्यूझिलंडवासी झालेल्या अविनाश दर्प यांनी केलेला मराठी अनुवाद फार कृत्रिम झाला आहे. बाकी मुद्रण, मांडणी, मुखपृष्ठ इत्यादी तांत्रिक बाबी ठिक. ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 09-04-2007

    सांस्कृतिक तुलना हा या पुस्तकाचा गुण आहे. दोन संस्कृतीत वाढलेली कारमेन सौदी चालीरीतींबाबत डोळसपणे लिहिते. तिचं लेखन युरोपीय नजरेनं बघितल्यामुळॆ काहीसं एकारलेलं वाटलं तरी ते अतिरेकी नाही. सौदी अरेबियातलं ८०च्या दशकातलं स्थित्यंतर तिनं अतिशय उत्तम पद्धीनं टिपलं आहे. सौदी मधला वाढता धार्मिक कडवेपणा, मुतावांचं वर्चस्व, इराणच्या क्रांतीचे परिणाम, मक्केतलं ‘टेक ओव्हर’ नाट्य आणि बिन लादेन कुटुंबाचे संबंध, ओसामाचे वाढते प्रस्थ या साऱ्याबद्दल कारमेन शांतपणे लिहिते. अजून खोलात जाऊन, अधिक तीव्र समीक्षा करणे तिला शक्य होते कदाचित, परंतु ‘समीक्षा’ हा या कथनाचा हेतू नाही. अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यानंतर ‘९/११ नंतरची पुस्तके’ हा एक प्रकारच (जाँ, geme) बनून गेला. मध्यपूर्वेचे राजकारण, दहशतवाद, अफगाणिस्तान या विषयांवरची अनेक पुस्तके ९/११ नंतर बाजारात आली. कारमेन बिन लादेनचे ‘साम्राज्य बुरख्यामागचे’ हे पुस्तकही याच पठडीतले. महत्त्वाचे पुस्तक आहे. अविनाश दर्प यांनी ‘द व्हेल्ड किंगडमचे’ अतिशय ओघवते भाषांतर ‘साम्राज्य बुरख्यामागचे’ या नावाने केले आहे. कारमेन बिन लादेन ही ओसामाच्या भावाची बायको. सौदी साम्राज्याची तिला झालेली ओळख तिनं या आत्मचरित्रात्मक कथनाद्वारे मांडली आहे. श्री. दर्प यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे वस्तुनिष्ठता आणि संयमित साधी भाषा हे या पुस्तकाचे गुणविशेष आहेत. ९/११ ची घटना जग बदलवणारी होती. अमेरिकेच्या अभेद्य साम्राज्याला मुस्लिम दहशतवादाचे प्रचंड हादरा दिला. वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या दुर्दैवी हल्ल्यानंतर जागतिक राजकारणातील अनेक समीकरणे बदलली. कारमेन या स्विस बाईचे आणि वफा, नाजिया आणि नूर या तिच्या तीन मुलींचे आयुष्यही अनपेक्षितरीत्या बदलले. महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांचे आडनाव होते ‘बिन लादेन’ ओसामाशी असलेल्या नात्याचा परिणाम म्हणून संशयाच्या सुया त्यांच्याकडेही वळल्या. पाश्चिमात्त्य संस्कृतीत वाढलेल्या अनेकांनी अफगाणिस्तान किंवा मध्यपूर्वेतील सांस्कृतिक/राजकीय जीवनाबद्दल लिहिताना-एक प्रकारचा अतिरेकी स्वर आभ्वला आहे. कारमेनचे आत्मकथन त्यामानाने सरळ आहे. शॉकिंग नाही. पण त्या सरळपणामुळेच ते काहीसे नमककम झाले आहे. शिवाय मी ‘बिन लादेन’ असले ती मी वेगळी, पाश्चिमात्त्य मूल्ये मानणारी ‘गुड गर्ल’ आहे, या धर्तीचा कारमेनचा स्वर आहे. कारमेन ही पर्शियन आई आणि स्विस वडील असलेली मुलगी, कारमेन घरातली सगळ्यात मोठी. तिला तीन धाकट्या बहिणी. कारमेनची आई बंडखोर, परंतु बंडखोरीतल्या अपयशामुळे सत्याला सामोरं जायला काहिशी बिचकणारी. कारमेन वाढली ती अशा काहीशा सांस्कृतिक आणि सामाजिक अनिश्चिततेच्या वातावरणात. ना धड पर्शियन ना पूर्णत: स्विस असं तिचं लहानपण. कारमेनच्या लिखाणात एक प्रकारची तटस्थता आणि आत्मकेंद्री भाबडेपणाचं मिश्रण दिसतं. त्याची मुळं कदाचित या लहानपणाच्या संदर्भांमध्ये रुजलेली असावीत. स्वत:चं आत्मकथन मात्र अतिशय आखीव पद्धतीनं तिनं मांडलं आहे. सुरुवातीला तिनं तीन मुलींना उद्देशून एक पत्र लिहिलंय. सौदी संस्कृतीत या तिन्ही मुलींना कधीच स्वातंत्र्याची चव कळली नसती हे वाटल्यामुळे तिनं सौदी सोडून स्वित्झलँडला परतण्याचा, यास्लेमपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला याचं स्पष्टीकरण मुलींना देत या आत्मकथनाची सुरुवात होते. जागतिक आणि मध्यपूर्वेच्या राजकारणातील महत्त्वाचे टप्पे आणि कारमेन-यास्लेमचे वैवाहिक आयुष्य समांतर चालू राहते. कारमेनचा नवरा यास्लेम यांचे कुटुंब म्हणजे मोठ्ठा बारदाना. यास्लेमच्या वडिलांना बावीस बायका– त्यातल्या काही लग्नाच्या तर काही धार्मिक तांत्रिक कारणांसाठी तलाक दिलेल्या. त्याल २४ भाऊ आणि ३१ बहिणी. सौदी अरेबियात जेद्दाजवळ ७ किलोमीटर नावाचा जो प्रसिद्ध भाग आहे तिथे बिन लादेन कुटुंबियांचं मोठं कंपाऊंड, यास्लेमची आई पर्शियन! ओसामाची आई पण या बाविसांमधली एक. निक्सनचा राजीनामा, सौदी राजा फ़ैजलचा खून, अमेरिकेत आल्यावर स्टीव्ह जॉब्सची भेट अशा अनेक राजकीय आणि सामाजिक घटनांबरोबर कारमेन आणि यास्लेमचा संसार विविध टप्पे पार करत राहतो. युरोप, अमेरिका, मध्यपूर्व या तीन प्रदेशातील वेगवेगळे प्रवास आणि सांस्कृतिक वातावरण त्यांच्या संसाराला वळण लावत जाते. सांस्कृतिक तुलना हा या पुस्तकाचा गुण आहे. दोन संस्कृतीत वाढलेली कारमेन सौदी चालीरितींबाबत डोळसपणे लिहिते. सौदी अरेबियातलं ८० च्या दशकातलं स्थित्यंतर तिनं अतिशय उत्तम पद्धतीनं टिपलं आहे. सौदी मधला वाढता धार्मिक कडवेपणा, मुतावाचं वर्चस्व, इराणच्या क्रांतीचे परिणाम, मक्केतलं ‘टेक ओव्हर’ नाट्य आणि बिन लादेन कुटुंबाचे संबंध, ओसामाचे वाढते प्रस्थ या साऱ्याबद्दल कारमेन शांतपणे लिहिते. अजून खोलात जाऊन, अधिक तीव्र समीक्षा करणे तिला शक्य होते कदाचित, परंतु ‘समीक्षा’ हा या कथनाचा हेतू नाही. कारमेननी स्वत:ची बाजू मांडताना ओघानं या गोष्टी टिपल्या आहेत. तिनं सौदीमधील बायकांबद्दल जे नोंदवलं आहे ते मात्र फार मोलाचं आहे. त्यांची सुबत्तेतील घुसमट, एकटेपणा आणि अनन्वित संपत्ती असूनही होणारी मानसिक उपासमार तिनं संवेदनशील पद्धतीने रंगवली आहे. कारमेनच्या आत्मकथनात अजून एक नाव सतत येतं– ते तिची अमेरिकन मैत्रिण मेरी मार्था चं. मेरी मार्था कारमेनची रोलमॉडेल. तिचं व्यक्तिमत्त्व कारमेनचवर अतिशय प्रभाव टाकणारं होतं. कारमेनच्या आत्मकथनात थंड तटस्थपणा आहे, शिवाय राजकीय/धार्मिक इतिहासाबद्दल एक प्रकारची अनास्थाही. काही वेळेला हे निवेदन इतकं सपाट झालं आहे की जे तिच्या आयुष्यात घडलं त्यामध्ये कोणतीही जबाबदारीची भाषा वापरताना कारमेन कधीही दिसत नाही. या साऱ्यामुळेच की काय या कथनाला खोली कमी आहे. तरीही हे पुस्तक वाचनीय आहे. अविनाश दर्प यांच्याकडून यानंतरही अशा दर्जेदार भाषांतरांची अपेक्षा मराठी वाचकांना वाटत राहील. -ज्ञानदा देशपांडे ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 22-07-2005

    तिचं नाव कारमेन बिन लादेन... तिचं नाव कारमेन बिन लादेन. या नावामुळेच ११ सप्टेंबच्या अमेरिकेवरील हल्ल्यानंतर तिला आणि तिच्या तीन मुलींना जगणं मुश्किल झालं होतं. ओसामा तिच्या नवऱ्याचा भाऊ. सख्खा की सावत्र निश्चित सांगता येणार नाही, पण वडील एकच. कारमेनं लग्न बिन लादेन खानदानातल्या येस्लाम लादेनशी झालं. कारमेन राहणारी स्वित्झर्लंडची, वडील स्विस आणि पर्शियन. येस्लामशी लग्न केल्यावर युरोपियन संस्कारात वाढलेली ही मुलगी सौदी अरेबियासारख्या सर्वच बाजूंनी मागासलेल्या देशात राहायला गेली आणि तिच्या आयुष्याला एक वेगळंच वळण लागलं. येस्लामचे वडील शेख महंमद म्हणजे सौदीमधील अतिधनाढ्य प्रस्थ. एका सर्वसाधारण कामगारापासून आयुष्याची सुरुवात करून सौदीतील सगळ्यात मोठी बांधकाम कंपनी त्यांनी उभारली. त्यांना २२ बायका होत्या आणि ५४ मुलं. या २२ बायकांपैकी मोठ्या बायकोचा मुलगा येस्लाम आणि आणखी एका बायकोचा मुलगा ओसामा. सौदीच्या राजकुटुंबानंतर बिन लादेन कुटुंबाचं नाव घेतलं जायचं. त्यामुळे त्यांचे घर महणजे मोठा राजवाडाच. १९७४ मध्ये कारमेन आणि येस्लाम यांचं लग्न झालं. परदेशी असूनही कारमेनचं बिन लादेन कुटुंबातील स्वागत मोठ्या उत्साहाने झालं. पण बिन लादेनचा राजवाडा हा स्त्रियांसाठी सोन्याचा पिंजरा होता. त्यांना घराबाहेर पडायची मुभाच नव्हती. घरातही सतत बुरखा घालणं. नवरा; वडील आणि भावाशिवाय इतर पुरषाला तोंड न दाखवणं अशी अगणित बंधनं त्यांच्यावर होती. खरेदीसाठी बाजारात जाता-येत नसे. हवी असणारी वस्तू नोकराला सांगायची. नोकर दुकानात जाऊन वस्तू घेऊन येणार. त्यातली पाहिजे ती वस्तू ठेवायची आणि उरलेल्या वस्तू व पैसे पुन्हा नोकराकडे देऊन त्याला बाजारात धाडायचं अगदी सॅनिटरी पॅड आणायला सुद्धा बायकांना घराबाहेर पडायची मुभा नव्हती. स्त्रियांवर घरातल्या पुरुषांची सर्वस्वी मालकी होती. युरोपच्या बिनधास्त आणि समानतेच्या वातावरणात वाढलेल्या कारमेनसाठी हा मोठाच सांस्कृतिक धक्का होता. एकदा ती येस्लामबरोबर बाहेर जायला निघाली. तेव्हा तिला संपूर्ण चेहरा झाकेल असा बुरखा घालावा लागला. नवरा गाडी चालवत असताना तिने मागच्या सीटवर बसायचं. गाडीला दोन्ही बाजूंनी पडदे. बाजारात जाऊनही तिला गाडीतून उतरता आलंच नाही. सुरुवातीला कारमेनला तिथल्या स्त्रियांच्या आयुष्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. पण तिची सासू, नणंदा आणि भावजया याचा दिनक्रम बघून ती हैराण झाली. दिवसभरात पाचवेळा नमाज पडायचं. स्वयंपाकात नोकरांना थोडीफार मदत करायची. मुलांना सांभाळायचं. ज्या बायका जास्तीत जास्त वेळ धार्मिक विधींमध्ये घालवतील त्यांना कुटुंबात अधिक मान असे. पण घराबाहेर जाणं, खरेदीला जाणं, कुराणाशिवाय दुसरं पुस्तक वाचणं या गोष्टींवर बंदी होती. टीव्हीवर फक्त दोनच चॅनेल दिसायचे. एकावर सतत कुराणाचे पठण आणि दुसऱ्यावर सेन्सॉर केलेल्या बातम्या. आयुष्य एखाद्या जखडून ठेवलेल्या कैद्यासारखं असूनही आपल्यावर अन्याय होतोय याची त्यांना जाणीव नव्हती. कधीतरी एखाद्या लग्नासाठी, मक्का यात्रेसाठी घराबाहेर पडता येत असे. पण त्यावेळी घरातला पुरुष किंवा नोकर तरी बरोबर हवाच. कारमेनसारख्या स्वातंत्र्यात वाढलेल्या मुलीला या गोष्टी पचवणं खूपच जड होतं. मग तिने यावर आपल्या परीने उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. येस्लामबरोबर व्यवसायानिमित्ताने बाहेर जाणं, पुस्तकं वाचणं, सौदीत थोड्याफार प्रमाणात पुरोगामी असणाऱ्या लोकांशी संबंध ठेवणं अशा काही ना काळी हालचाली करत कारमेनने पाच वर्ष सौदीत काढली. घरातल्या आणि देशातल्याही कट्टर वातावरणात दिवस काढणं खूप मुश्किल होतं. पण कारमेनला येस्लामने वेळोवेळी साथ दिली आणि व्यक्तिगतरीत्या तिच्यावर कोणतीही बंधनं लादल नाहीत. कारमेन आणि ओसामाची ओळख एका कौटुंबिक कार्यक्रमामध्ये झाली. पाश्चिमात्त्य शिक्षण घेऊनही तो कट्टर धार्मिक होता. ओसामाच्या कट्टरवादाचं कारमेनने मांडलेलं उदाहरण खूप भयानक आहे. ओसामाचा काही महिन्यांचा मुलगा चमच्याने दूध पीत नव्हता, खूप रडत होता. तेव्हा कारमेनने आपल्या लहान मुलीची दुधाची बाटली त्या मुलाला देऊ केली. पण ओसामाच्या परवानगीशिवाय त्याची बायको मात्र ती घेईना. लहान मुलाचे हाल न बघवल्याने कारमेनने येस्लामकडून ओसामाला निरोप पाठवला. पण दुधाची बाटली ही संकल्पना पाश्चिमात्त्यांकडून आल्याने ओसामाने शेवटपर्यंत आपल्या मुलाला बाटलीतून दूध पाजायची परवानगी दिली नाही. रशियाने अफगाणिस्तानच्या राजकारणात हस्तक्षेप सुरू केल्यावर आपल्या मुस्लिम बांधवांना वाचवण्यासाठी ओसामा अफगाणिस्तानात गेला. सुरुवातीच्या काळात अफगाणिस्तानी लोकांना, अन्न, वैद्यकीय सेवा पुरवण्याची कामं तो करायचा. त्यामुळे काही काळ तो सौदी अरेबियात हिरो ठरला. पण हळूहळू दहशतवादी कारवायांत त्याचं नाव पुढे येऊ लागल्यावर मात्र सौदीतून त्याला हद्दपार करण्यात आलं. त्यामुळे बिन लादेन कुटुंबाचाच नाही तर त्याच्या बायकोचाही त्याच्याशी फारसा संबंध राहिला नाही. कट्टर धार्मिक वातावरणातही कारमेन आपल्या दोन मुलींना वाढवत होती. पण त्या मोठ्या होऊ लागल्यावर त्यांना आपण याच वातावरणात वाढवणार का असा प्रश्न तिला भेडसावू लागला. त्यांना शाळेत मिळत होतं फक्त कुरणाचं एकांगी शिक्षण, मुलांपासून लांब राहण्याची ताकीद होती. खेळ नाही की पुस्तकं नाहीत. कारमेनला व्यक्तिस्वातंत्र्याची किंमत माहीत होती. अशा गुलामगिरीत मुलींना वाढवू नये असा विचार वरचेवर तिच्या मनात येत होता. पण त्याच सुमारास येस्लामचा व्यवसाय चांगलाच वाढत होता. त्याला देशात चांगलीच मागणी होती. त्यामुळे हे सगळं सोडून स्वित्झर्लंडला जायचं का, अशी तिच्या मनाची घालमेल सुरू होती. येस्लामकडे येणाऱ्या पैशाचा ओघ सतत वाढत राहिला आणि त्या पैशाच्या नादात वाहवत जाऊन येस्लाम बदलत चालला. तो आपली तुलना राजघराण्यातल्या लोकांशी करू लागला. त्याचं कुटुंबावरचं लक्ष उडालं. आपल्याला काहीतरी असाध्य आजार झाले आहेत, असं वरचेवर त्याला वाटू लागलं. त्यामुळे तपासणीसाठी अनेकदा तो युरोपमध्ये जात असे. त्याला कसं समजवावं हेच कारमेनला कळेना. त्यांच्यातील दुरावा वाढत चालल्याचं तिला स्पष्ट दिसत होतं. तो सतत काळजीत, चिंतेत आणि आपल्याला झालेल्या काल्पनिक आजारात गुंग असायचा. येस्लामचे काही अनैतिक संबंध पुढे आल्यावर मात्र त्यांच्यातील घटस्फोट निश्चित झाला आणि तिचा व तिच्या तीन मुलींचा बिन लादेन घराण्याशी असलेला संबंध कायमचा तुटला. संबंध उरला तो फक्त बिन लादेन या नावापुरता. तरुण वयात प्रेमात पडून कारमेनसारखी स्वातंत्र्यात वाढलेली मुलगी येस्लामबरोबर सौदीत गेली. मनाला न पटणाऱ्या, न आवडणाऱ्या अनेक गोष्टी तिने तात्पुरत्या तरी स्वीकारल्या. सौदीच्या संस्कृतीला स्वत:ला बसवण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या मुलींनी मात्र याच वातावरणात मोठं व्हावं हे तिला मान्य नव्हतं. त्यांच्या मोकळेपणाने खेळण्या बागडण्याच्या दिवसात त्यांनी बुरख्यात घुसमटावं, पाच वेळा नमाज पडावा हे तिला पटत नव्हतं. या सगळ्या कोंडीला वाट फोडण्याचा तिने अनेकदा प्रयत्न केला. पण येस्लामच्या प्रेमाने तिला अडवून ठेवलं होतं. आजूबाजूच्या बायकांनाही तिने समजवण्याचे अनेक प्रयत्न केले. पण काही उपयोग झाला नाही. बदलत्या काळाबरोबर येस्लामध्येही होणारा बदल तिच्या लक्षात आल्यावर मात्र तिने त्याला कायमचं मोकळं केलं. पण त्या नात्यातही शेवटच्या काळात कटुताच निर्माण झाली. बिन लादेन घराण्याशी संबंध तुटल्यावरही केवळ नावामुळे ११ सप्टेंबर या दिवसानंतर तिच्या आणि मुलींच्या आयुष्यात मोठी उलथापालथ झाली. ओसामाने केलेले बॉम्ब हल्ले कारमेनला माहीत होते. त्यामुळे अमेरिकेत राहूनही तिच्या मुली मात्र वाचल्या, असे अनेक आरोप तिच्यावर झाले. ‘बिन लादेन’ नावाची ती एकमेव ज्ञात व्यक्ती अमेरिकेत राहत असल्याने माध्यमांनी तिला लक्ष्य बनवले. त्या सगळ्यांना उत्तर देता देता तिला पुन्हा एकदा सौदीतला काळ आठवला आणि त्यातून हे आत्मचरित्र लिहिलं गेलं. श्रुति गणपत्ये ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more