* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177661736
  • Edition : 3
  • Publishing Year : AUGUST 2001
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 88
  • Language : MARATHI
  • Category : LITERATURE
  • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET- 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
LITERATURE IS NOT AN INDEPENDENT ENTITY. IT IS A SORT OF CONSORT OF SOMETHING ELSE. HUMAN LIFE IS BASED ON CERTAIN BELIEFS AND VALUES. LITERATURE IS BASED ON THESE VERY BELIEFS AND VALUES. BUT AN AUTHORS OWN EXPERIENCES AND HIS VISION OF LIFE IS NOT ENOUGH FOR THE BIRTH OF LITERATURE. HE IS NOT JUST A PRESENTER OF REALTY. IT IS NOT AS IF EVERY ASPECT OF REALITY APPEALS TO HIM. SOME THINGS TOUCH HIM DEEPLY AND AWAKEN HIS MIND. IT IS SUCH A MIND, PRIMED BY A PERSONAL INSIGHT INTO REALITY THAT CREATED LITERATURE WHEN IT IS TOUCHED BY IDEALISM. THE RAYS OF THE SUN FALLING UPON THE SURFACE OF WATER DO NOT PRODUCE A RAINBOW. IT IS ONLY WHEN THE RAYS, REFLECTED BY THE CLOUDS PASS THROUGH THE MYRIAD DROPLETS OF DEW IN THE ATMOSPHERE, THAT WE SEE THE BRILLIANT HUES OF THE RAINBOW. WHEN REALITY GETS THE MAGICAL TOUCH OF IDEALISM, ONLY THEN LITERATURE REACHES A DIFFERENT DIMENSION…! AS THE CHIEF GUEST OF VARIOUS LITERARY MEETS, RANJIT DESAI HAS DELIVERED MANY SPEECHES THAT HAVE TOUCHED UPON CLASSIC LITERATURE AND THE INSPIRATIONS BEHIND IT. THIS IS A SELECT COLLECTION OF SOME OF HIS SPEECHES!
... साहित्य ही निरपेक्ष वस्तू नाही. ती कोणाच्यातरी सह जाणारी वस्तू आहे. आपलं मानवी जीवन अनेक निष्ठांच्या बळावर जगलं जातं. साहित्यातून याच निष्ठा साकारत असतात. लेखकाच्या स्वानुभवातून त्याला घडणारं जीवनदर्शन एवढ्यानं साहित्यनिर्मिती होत नसते. त्याचं साहित्य सहित म्हणजे हितासाहित असावं लागतं. लेखक निव्वळ वास्तवता टिपत नसतो. वास्तवाच्या साऱ्याच गोष्टींनी त्याचं मन भारलं जात नाही; काही गोष्टी त्याच्या अनुभूतीला भिडतात; त्यातूनच त्याचं मन जागं होतं. या वास्तवाच्या अनुभूतींतून जाग्या झालेल्या मनाला कुठंतरी आदर्शाच्या स्पर्श होतो आणि त्याचं साहित्य साकारतं. नुसते सूर्यकिरण पाण्यावर पडून इंद्रधनुष्य उमटत नाही. मेघावरून परावर्तीत झालेले सूर्यकिरण जेव्हा आकाशातून स्त्रवणाया दवबिंदुंवर पडतात, तेव्हाच सप्तरंगांचं इंद्रधनुष्य प्रगटतं. वास्तवाला आदर्शाचा जेव्हा स्पर्श होतो, तेव्हाच त्या साहित्याला वेगळं रूप लाभतं...! अभिजात साहित्य आणि त्याच्या निर्मितिप्रेरणा यासंदर्भात वेगवेगळ्या निमित्तांनी, वेगवेगळ्या संमेलनांत श्री. रणजीत देसाई यांनी अध्यक्षपदावरून केलेल्या निवडक भाषणांचा एकत्रित संग्रह !
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 23-09-2001

    ‘स्वामी’कारांच्या साहित्य निष्ठेचे ‘संचित’... ललित लेखन व मराठी कादंबरीला वेगळे वळण देणारे रणजित देसाई ‘स्वामी’च्या माध्यमातून घरोघरी जावून पोहोचले. रमा-माधवाचं सुंदर भावविश्व त्यांनी साकारून मराठी रसिकांच्या हृदयात मानाचं स्थान पटकावलं. ‘स्वामी’ च्ा अगोदर प्रसिद्ध झालेली त्यांची ‘बारी’ ही कादंबरी मात्र विशेष वाचकप्रिय झाली नाही. एखादी साहित्यकृती वाचकप्रिय का व कशी होते? एखादी का होत नाही? साहित्यनिर्मिती मागील लेखकाची प्रेरणा केवळ ‘स्वानय सुखाय’ असते की आणखी घटक परिणामकारक ठरतात? हे प्रश्न साहित्य सृष्टीत नेहमीच उत्सुकतेचा विषय ठरले आहेत. रणजित देसाई यांनी विविध साहित्य संमेलने, ग्रंथालय चळवळी येथील व्यासपीठांवर केलेल्या भाषणाचे हे पुस्तकरूपी ‘संचित’ साहित्यिकांच्या अशाच मूळ प्रेरणांचा तळ शोधणारे ठरले आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित या पुस्तकाचे संपादन पांडुरंग कुंभार यांनी केले आहे. अनुक्रमणिका, प्रस्तावना अशा उपचारांना स्थान न देता मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात ७४ व्या वार्षिक उत्सवाचे डिसेंबर ७२ मध्ये अध्यक्षस्थान भूषविताना देसाई यांनी केलेल्या भाषणाने या पुस्तकाचा प्रारंभ होतो. विविध ठिकाणची अशी नऊ अध्यक्षीय भाषणे या ‘संचिता’मध्ये समाविष्ट आहेत. ‘वास्तवा’ला जेव्हा ‘आदर्शा’चा स्पर्श होतो तेव्हाच साहित्याला वेगळं रूप लाभतं. भकास, उजाड, पर्णहीन वनांमध्ये कुजलेल्या पालापाचोळ्यातून सरपटत जाणारा सरडा हे आपलं रूप वाटतं आहे. हे कलावंताचं खरं रूप नव्हे. त्या पर्णहीन नावाची अवस्था जाणून, धीट मनानं त्या वनात प्रवेश करून भविष्यातल्या वसंताचं आगमन सांगणारा कोकीळ हा कलावंत मनाचा प्रतीक आहे असे रणजित देसाई सांगतात. या विविध भाषणांमध्ये देसाई यांनी अन्य देशातील समकालीन वास्तवाचा, उत्कट मानवी अनुभूतीचा वेध घेणाऱ्या कोणत्या साहित्यकृती आपल्याला भावल्या त्याचाही उल्लेख वेळोवेळी केला आहे. मराठी साहित्यात समाजमन घुसळून काढणाऱ्या कलाकृती का निर्माण होत नाही, दिवाळी अंकासाठी आगाऊ चेक आल्यानंतरच आमच्यातील अनेक लेखकांची प्रतिभा का जागी होते यांसारख्या प्रश्नांमुळे झालेली अस्वस्थताही त्यांनी अनेक ठिकाणी व्यक्त केली आहे. एका भाषणात ते म्हणतात, महाराष्ट्राच्या सीमाभागाने आमच्या मनाला तडे गेले. पण हजारो मैलांचा मुलुख गमावला याचं दु:ख आम्हाला वाटत नाही. त्याची वेदना जाणवत नाही. लेखकाच्या अनुभूतीचं विश्व एवढं लहान असून कसं चालेल? रशियामध्ये राहूनच दास्तरनाकनं डॉ. झिवागो लिहिली ना! अर्नेस्ट हेमिंग्वेच्या ‘फॉर हून दि बेल रोल्स’, ‘अ‍ॅक्रॉस दि रिव्हर इंटू द ट्रीज’ किंवा इस्रायलच्या नवजीवनावर आधारलेली ‘एक्सोडस’ सारखी कादंबरी या कलाकृती का भाडोत्री, प्रचारकी समजायच्या? प्रादेशिकतेची कक्षा ओलांडून भारतीय रूप घेणारी, कलाकृती आम्ही केव्हा पाहणार आहोत? एकंदरीत पाहता नवोदितांबरोबरच प्रस्थापितांच्या प्रतिभेला उत्तेजना देणारे असेच हे ‘संचित’ असून ‘स्वामी’कारांची साहित्यनिष्ठ त्यातून वेळोवेळी प्रगट झाली आहे. चांगला लेखक व्हायचा असेल तर केवळ शब्द सामर्थ्य आणि कल्पनाविलास पुरेसा नसतो. त्यापेक्षाही आंतरिक तळमळ ही महत्त्वाची ठरते. हा ‘स्वामी’ कारांचा कानमंत्र साहित्याच्या वाटेवरील सर्वांनाच अंतर्मुख करणारा आहे! -निलेश मदाने ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.