* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184988840
  • Edition : 4
  • Publishing Year : FEBRUARY 1993
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 168
  • Language : MARATHI
  • Category : HORROR & GHOST STORIES
  • Available in Combos :RATNAKAR MATKARI COMBO SET - 17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
‘I THINK THAT I AM SHREENATH…. I STILL THINK SO… FROM WITHIN WE ARE ONE AND THE SAME. SOMETIMES HE WORES THE MASK WITH MY NAME WHILE AT OTHERS I DO SO TO FOOL PEOPLE.’ A JEEP PASSED BY SPEEDILY AND VERY CLOSELY. IT WOULD HAVE BRUSHED UP. ‘THEY ARE OUT TO KILL US!’ THE TERROR IN SHREENATH’S VOICE WAS UNMISTAKABLE. ‘THEY ARE OUT TO KILL US! IS THIS SOME KIND OF GAME THAT DESTINY IS PLAYING WITH US? IT WANTS TO KILL US TOGETHER; BOTH THE ORIGINAL AND THE DUPLICATE, ALONG WITH THEIR FIANCÉES.’ ONCE AGAIN THE JEEP PASSED BY. IT SYMBOLIZED A KITE SWOOPING DOWN FROM HIGH SKIES UPON ITS PREY. AS IT MISSES THE PREY IT GOES BACK TO GET INTO ACTION. WHAT IS GOING TO HAPPEN NOW? WE THREE ARE SET UPON THE JOURNEY. WHERE? NO ONE KNOWS. HOW LONG? NO ONE KNOWS. WE ARE MERE PUPPETS IN THE HANDS OF DESTINY. TEN BREATHTAKING STORIES! EACH ONE CREATING DOUBT BEYOND IMAGINATION WHILE PILING UP THE TENSION. TEN STORIES THAT WOULD REALLY CREATE DOUBT! SHADED WITH GAMES PLAYED BY HUMAN MINDS THESE STORIES TAKE US TO IMMEASURABLE HEIGHT AND FATHOMLESS DEPTH AT THE SAME TIME. MATKARI HAS ONCE AGAIN PROVED THAT HIS STORIES ARE NOT JUST ENTERTAINING OR PLEASING. THEY TAKE US BEYOND THAT WHERE IT IS IMPOSSIBLE TO COMPREHEND. THEY ARE TERRIBLY FRIGHTFUL. THEY ARE MYSTERIOUS. THESE TEN STORIES ONCE AGAIN PROVE HIS COMMAND OVER WORDS AND THEMES AND EXCELLENT MANIFESTATION OF NOVEL IDEAS. THEY UNDERLINE HIS AUTHORITY IN WRITING SUCH DUBIOUS STORIES.
‘मी श्रीनाथ आहे असं मला वाटतं... अजूनही वाटतं... आतून आम्ही एकच आहोत. कधी मी त्याच्या नावाचा मुखवटा वापरला- कधी त्यानं माझा मुखवटा घालून लोकांना चकवलं! शेजारून एक जीप झपकन गेली. अगदी घासून जाईल इतक्या अंतरावरून! ``दे आर आऊट टु किल अस..`` श्रीनाथच्या स्वरात घबराट होती. दे आर आऊट टु किल अस! – नियतीचा हा शेवटचा डाव आहे का- आम्ही दोघांनी एकत्र मरावं असा? ओरिजिनल आणि डुप्लिकेट या दोघांनाही, त्यांच्या प्रियतमेसकट नष्ट करावं, असा? जीप पुन्हा एकदा झपकन जवळून गेली... घार जशी झडप घालते आणि नेम चुकला की पुन्हा तयारी करण्यासाठी दूर जाते, तशी पुढं गेली... काय होणारेय आता? आम्ही तिघं- नियतीच्या हातची खेळणी... कुठल्या प्रवासाला निघालोय? कुठवर – श्वास रोखून वाचाल अशा या दहा कथा. प्रत्येक कथा जबरदस्त संदेह निर्माण करणारी. ताण शेवटपर्यंत वाढवीत नेणारी. मराठीतल्या, अगदी मोजक्या स्वतंत्र संदेहकथांपैकी या दहा. संदेहनिर्मितीबरोबरच मानवी मनाचे झोक्यावरचे खेळही दाखवणा-या. कधी मनाची उंची मोजणाऱ्या... कधी त्याचा तळ गाठणाऱ्या. हेच रत्नाकर मतकरी यांच्या कथालेखनाचं वैशिष्ट्य. त्यांची कथा केवळ चित्तथरारक असत नाही- ती मेंदूलाही झिणझिण्या आणते. इथं प्रथमच संग्रहित झालेल्या त्यांच्या या दहा कथा, रत्नाकर मतकरींची या वेगळ्या विषयावरची हुकमत पुन्हा एकदा सिद्ध करतात. स्वतंत्र संदेहकथाकार म्हणून त्यांचं अद्वितीय स्थान निश्चित करतात.

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SANDEH #SANDEH #संदेह #HORROR&GHOSTSTORIES #MARATHI #RATNAKARMATKARI #रत्नाकरमतकरी "
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more