A RECITAL IS LIKE THE FULL-MOON NIGHT, BILAS. THE RAGA THAT IS RENDERED IS THE MOON OF THAT NIGHT. AT SUCH TIMES, THE DULLER STARS CANNOT EVEN BE SEEN. ONLY THE BRIGHT ONES ARE THE MOONS CONSORTS. THE REST DISAPPEAR IN THE MOONLIGHT. WE SEE ONLY THOSE STARS THAT HAVE THE CAPABILITY TO ACCOMPANY THE MOON. IT IS THE SAME WITH THE RAGA THAT WE SING. WE MUST LOOK ONLY AT THE VAADI AND SAMVAADI NOTES. ONLY THEN DOES THE RAGA BLOSSOM.
GULSHAN, IT IS INDEED DIFFICULT TO FIND A GURU LIKE ABBAJAAN! HIS FIRST NOTES ARE ENOUGH TO BRING CONTENTMENT TO ONE EARS!
A PLAY THAT PAYS TRIBUTE TO THE RECITALS OF TAANSEN. THE VOCALIST PAR EXCELLENCE.
‘गाणं हे पौर्णिमेच्या रात्रीसारखं असतं, बिलास. जो राग आळवला जातो, तो त्या रात्रीचा चंद्र असतो. अशा वेळी निस्तेज तारे दिसूही शकत नाहीत. जे ठळक तारे आहेत, त्यांच्याच सोबतीनं चंद्र प्रवास करीत असतो. बाकीचे सारे तारे चंद्राच्या प्रकाशात लुप्त होतात. ज्यांची चंद्राला साथ करण्याची कुवत असते, तेवढेच फक्त दिसतात. जो राग आपण गातो, त्याचंही असंच आहे. वादीसंवादी तेवढेच स्वर आपण पाहायला हवेत. तरच तो राग खुलतो.’ ...गुलशन, अब्बाजानसारखा गुरू मिळणं कठीण! त्यांनी नुसता आकार लावला, तरी कान तृप्त होतात. संगीतसम्राट तानसेन यांची मैफल सजवणारं नाटक!