* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789387789999
  • Edition : 1
  • Publishing Year : JULY 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 128
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SARJA, AN OX, TELLING HIS STORY. A VERY SAD INCIDENCE MARKS THE BEGINNING OF THIS STORY. SARJA AND HIS MATE RAJA HAVE A FRIEND, KHILARI. SARJA IS MORE ATTACHED TO HER. THEY ARE SEPARATED FROM EACH OTHER AS THEIR OWNER HAS SOLD THEM DUE TO THEIR AGEING. THE CONTINUOUS DROUGHT CONDITIONS HAVE ADDED TO THE MISERY OF THE FARMER, WHO IS UNABLE TO FEED HIS LIVESTOCK. PACKED IN A TEMPO, THE TRIO SETS OUT ON THEIR JOURNEY TO THE UNKNOWN LAND AND UNKNOWN DESTINY. ON WAY, KHILARI IS MADE TO DISEMBARK AT SOME UNKNOWN PLACE. SARJA AND RAJA ARE FURTHER TAKEN TO THE SLAUGHTER HOUSE. UPON REACHING THERE, SARJA SENSES THE STRONG EVIL VIBES OF DEATH AND MANAGES TO RUN AWAY. SARJA, WAS CALLED AS SHAMBHOO BY HIS ORIGINAL OWNER. THE OWNER SELLS HIM TO ANOTHER PERSON WHO NAMES HIM SARJA. THERE, SARJA MEETS RAJA AND KHILARI. A SPECIAL BOND DEVELOPS BETWEEN SARJA AND KHILARI. AFTER A WHILE, THE OWNER SOLDS SARJA, RAJA AND KHILARI. THIS IS HOW THE TRIO GETS SEPARATED. SARJA SUCCEEDS IN RUNNING AWAY FROM THE SLAUGHTER HOUSE. HE MEETS UPASHYA, A POOR FELLOW. UPASHYA, IN TURN COLOURS SARJA AS A `NANDI BAIL` AND STARTS EARNING MONEY. A FEW DAYS AFTER BEING WITH UPASHYA, SARJA MEETS KHILARO. UPASHYA UNDERSTANDS THE BONDING BETWEEN THESE TWO. HE THEN TAKES THEM BOTH TO AN INSTITUTION WHICH LOOKS AFTER AGED LIVESTOCK. SARJA, TOUCHES THE SOUL OF READERS WITH HIS FEELINGS AND EXPRESSIONS. A MUST READ.
‘सर्जा’ हे एका बैलाचं आत्मकथन आहे. या आत्मकथनाची सुरुवात एका करुण प्रसंगाने होते. सर्जा, त्याचा जोडीदार राजा आणि त्यांची (विशेषत: सर्जाची) जोडीदारीण खिलारी यांची ताटातूट होते. त्यांच्या मालकाने दुष्काळामुळे आणि ते म्हातारे झाले म्हणून त्यांना विकलेलं असतं. त्या तिघांनाही एकाच टेम्पोमध्ये घातलेलं असतं; पण खिलारीला मध्येच उतरवलं जातं आणि सर्जा-राजाची रवानगी एका कत्तलखान्यात केली जाते. सर्जा कसाबसा तिथून निसटतो. सर्जाचं आधीचं नाव असतं शंभू; पण त्याचा मालक त्याला विकतो आणि दुसरा मालक त्याचं नाव ठेवतो...सर्जा. तिथेच त्याची राजाशी आणि खिलारीशी भेट होते. सर्जा आणि खिलारीमध्ये प्रेम निर्माण होतं. काही काळाने मालक सर्जा-राजा-खिलारी यांना विकून टाकतो. कत्तलखान्यातून पळालेल्या सर्जाची उपाश्या नावाच्या माणसाशी भेट होते. उपाश्या सर्जाला नंदीबैल करतो आणि पैसे मिळवायला लागतो. उपाश्याबरोबर भटकंती करत असताना अचानक एके दिवशी सर्जाची गाठ खिलारीशी पडते. कालांतराने सर्जा आणि खिलारीचं वय लक्षात घेऊन उपाश्या त्या दोघांना गाय-बैलांचा प्रेमाने सांभाळ करणाऱ्या एका संस्थेत नेऊन सोडतो. तर असं हे ‘सर्जा’चं भावपूर्ण आत्मकथन वाचनीय आणि मनाला भिडणारं आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SARJA #SARJA #सर्जा #BIOGRAPHY #MARATHI #KHATMODERAMCHANDRA "
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA 03-01-2020

    जीवनकहाणी सर्जाची... ‘एका बैलाची हृद्य जीवनकहाणी-सर्जा’ या रामचंद्र खाटमोडे लिखित पुस्तकातील कथेचा प्रारंभ होतो तेव्हा कथानायकाला टेम्पोतून कुठंतरी नेलं जात असतं. सोबत असतात त्याचे जिवलग साथी - राजा आणि खिलारी. एके ठिकाणी खिलारीला उतरवून सर्जा आणि रजाला कत्तलखान्यात नेलं जातं. कत्तलखान्यातून सर्जा बाहेर पडतो. त्या धडपडीत जीवावरचं शेपटीवर निभावतं आणि तो बिनशेपटीचा बैल होतो. आता त्याला ओढ लागते ती खिलारीला भेटण्याची. त्या नादात केलेल्या वाटचालीत त्याला आठवतो तो भूतकाळ. त्याची आई, त्याचं बालपण. त्याच्या मालकाचं कुटुंब आणि त्याचा मैतर कृष्णा. आपल्यासारखं सर्जालाही आहे त्याच्या पहिल्यावहिल्या गोष्टीचं कौतुक. मग ते बत्ताशासोबत गाडीला जोडणं असो, नांगराला जुंपणं असो, औत फिरवणं असो. गणेशोत्सवात पाहिलेल्या चित्रपटांबद्दलची चर्चा असो किंवा कीर्तन सप्ताह असो ते पाहणं, ऐकणं आणि त्याचा विचार करणं ही सर्जाची प्रवृत्ती होती. बैलांसाठीच्या महत्त्वाच्या सणाचं अर्थात बैलपोळ्याचं वर्णन त्याच ओघात येतं. बैलांच्या गप्पांतल्या विषयांत नंदीबैल हा त्यांच देव आणि बैल हे सगळ्यांचं आडनाव ठरतं. एका टप्प्यावर सर्जाला विकलं जातं. मालक त्याच्या हातातलं दावं समोरच्या माणसाच्या हातात देतो, सर्जाची त्यावर टिप्पणी अशी की, सरकारी अधिकाऱ्यांच्या कशा बदल्या होतात, तशी माझी जणू बदलीच झाली होती- कामासाठी. इकडून तिकडे. भूतकाळातून बाहेर येताना सर्जा शहरातल्या जीवनाला सामोरा जातो. तिथं एका सहा जन्म उपाशी असावा असा माणूस गाठतो. सर्जा त्या माणसाचं नाव उपाशा ठेवतो. उपाशा रातोरात सर्जाला नंदीबैल करतो आणि मनातून कितीही नाकारलं तरी जगण्यासाठीचा व्यवसाय म्हणून तो नंदीबैल होणं स्वीकारतो. स्वत:च्या नावात होणारे बदल पाहून त्याचा अहं दुखावला जातो. नंतर ते अनेक शहरांत फिरतात. तिथली वैशिष्ट्य तो सांगतो. दरम्यान त्याला पुन्हा एकदा भूतकाळ आठवायला लागतो. नव्या मालकाचं घरदार, तिथलं वातावरण आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे खिलारी. राजाशी झालेली ओळख आणि पुढं पक्की दोस्तीदेखील. मग खिलारीशी जुळलेले भावबंध, सर्जा-राजाचं शर्यतीत पळणं आणि सततचं जिंकणं. चित्रपटात दाखवतात तशी कॅलेंडरची पानं झरझर सरतात. शरीर थकतं. ट्रॅक्टरसारख्या यंत्रांचं आक्रमण होतं. त्यातच दुष्काळाचा तेरावा महिना उगवतो. तिथून सर्जाची कत्तलखान्यातली रवानगी होते. त्यातून वाचल्यावर खिलारी दिसते. सर्जा आणि तिची भेट होते का, ते कसे जगतात हे कथेतच वाचलेलं चांगलं. या कादंबरीचा जीव लहान असला, तरी तिचा आवाका मोठा आहे. केवळ कृषीसंस्कृतीच नव्हे तर शहरी जीवन, त्याचं खेड्यांत होणारं अंधानुकरण, श्रद्धा-अंधश्रद्धा, दृष्टावा आणि माणुसकी, परिस्थितीशरणता आणि आल्या संकटांना बेधडक सामोरं जायची वृत्ती हा सगळ्या मानवी मनातल्या-जीवनातल्या बाबींचं रोपण सर्जाच्या कथेत झालेलं दिसतं. त्याच्या सुखाच्या गाठोड्याच्या शोधाची गोष्ट वाचण्याजोगी आहे. – राधिका कुंटे ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 26-08-2018

    रामचंद्र खाटमोडे या तरुण लेखकानं सर्जा या एका बैलाची कहाणी अतिशय सुंदर रितीनं मांडली आहे. एक बैल कसायाच्या तावडीतून सुटतो आणि स्वत:ची कहाणी सांगतो अशा प्रकारची ही कादंबरी. बैलाचं मन अतिशय भावनात्मक रितीनं आणि सुखखुशीतपणे लेखकानं उलगडलंय आणि मध्येमध्य तिरकस टिप्पणी करत मजा आणली आहे. एक वेगळ्या प्रकारची आणि वेगळी दृष्टी देणारी ही कादंबरी. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more