* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
HOW MANY NAMES DOES ARJUNA HAVE? WHY WAS YAMA CURSED? WHAT LESSON DID A LITTLE MONGOOSE TEACH YUDHISTHIRA? THE KURUKSHETRA WAR, FOUGHT BETWEEN THE KAURAVAS AND THE PANDAVAS AND WHICH FORCED EVEN THE GODS TO TAKE SIDES, MAY BE WELL KNOWN, BUT THERE ARE INNUMERABLE STORIES SET BEFORE, AFTER AND DURING THE WAR THAT LEND THE MAHABHARATA ITS MANY VARIED SHADES AND ARE LARGELY UNHEARD OF. AWARD-WINNING AUTHOR SUDHA MURTY REINTRODUCES THE FASCINATING WORLD OF INDIA’S GREATEST EPIC THROUGH THE EXTRAORDINARY TALES IN THIS COLLECTION, EACH OF WHICH IS SURE TO FILL YOU WITH A SENSE OF WONDER AND BEWILDERMENT.
"अर्जुनाची एकूण नावे किती? यमाला शाप का मिळाला? लहानशा मुंगसाने युधिष्ठिराला कोणता धडा शिकविला? महाभारतामध्ये कुरुक्षेत्री जे घनघोर युद्ध झालं, त्यात अखेर देवदेवतांनासुद्धा कोणत्या ना कोणत्या पक्षाची बाजू घेणं भाग पडलं. युद्धाविषयी तर पुष्कळ माहिती सर्वत्र उपलब्ध आहे; परंतु या युद्धाच्या आधी, युद्धाच्या दरम्यान किंवा युद्धाच्या नंतर असंख्य कथा घडल्या आहेत. या कथांमुळेच महाभारताला रंग भरतो. या कथासंग्रहांमधून अनेक पुरस्कार प्राप्त केलेल्या लेखिका सुधा मूर्ती भारताच्या या महाकाव्याचं विस्मयकारी जग वाचकांपुढे खुलं करतात. या संग्रहाद्वारे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी सर्वश्रुत नसल्यामुळेच त्यांचं हे वेगळेपण वाचकाला मंत्रमुग्ध करतं.

No Records Found
No Records Found
Keywords
#SUDHA MURTY #N.R.NARAYANA MURTY #LEENA SOHONI #UMA KULKARNI #WISE & OTHERWISE #GOSHTI MANSANCHYA #PUNYABHUMI BHARAT #THAILIBHAR GOSHTI #SUKESHINI AANI ITAR KATHA #BAKULA #AYUSHYACHE DHADE GIRAVTANA #AAJICHYA POTADITALYA GOSHTI #MAHASHWETA #DOLLAR BAHU #SAMANYATALE ASAMANYA #PARIGH #PITRURHUN #ASTITVA #HARAVALELYA MANDIRACHE RAHASYA #TEEN HAJAR TAKE #SARPACHA SOOD #GARUDJANMACHI KATHA #TRISHANKU #A BETTER INDIA A BETTER WORLD #NARAYAN MURTY : MULYA JAPNARA EK ADWITIYA AAYUSHYA #सुधा मूर्ती #एन.आर.नारायण मूर्ती #लीना सोहोनी #उमा कुलकर्णी #वाइज अँड अदरवाइज #गोष्टी माणसांच्या #पुण्यभूमी भारत #थैलीभर गोष्टी #सुकेशिनी #बकुळा #आयुष्याचे धडे गिरवताना #आजीच्या पोतडीतल्या गोष्टी #महाश्वेता #डॉलर बहू सामान्यांतले असामान्य #परीघ पितृऋण #अस्तित्व #हरवलेल्या मंदिराचे रहस्य #तीन हजार टाके #सर्पाचा सूड #गरुडजन्माची कथा #त्रिशंकू #अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड : नारायण मूर्ती #नारायण मूर्ती : मूल्यं जपणारं एक अद्वितीय आयुष्य
Customer Reviews
  • Rating StarYashashri Rahalkar

    पुस्तक:- सर्पाचा सूड लेखन :- सुधा मूर्ती अनुवाद:- लीना सोहोनी प्रकाशन :- मेहता प्रकार:- कथासंग्रह महाभारत हा अनेक कथांचा महाकोष म्हणावा लागेल इतकी लहानमोठी कथानके आणि उपकथानके त्यात आहेत. बहुतेक युद्ध आणि त्याची पार्श्वभूमी ह्यासंबंधी कथा आपलया वाचनात सहजी येतात पण काही कथानके अशीही आहेत जी फारशी प्रचलित नाहीत त्याच सगळ्या कथांना ह्या संग्रहात सुधाजींनी समाविष्ट केले आहे ... त्या मनोगतात अगदी प्रामाणिकपणे मांडतात की ह्या सगळ्या कथा लहानपणी त्यांनी आजीकडून ऐकलेल्या कथा आहेत... एकूण 34 कथांचा ह्यात समावेश आहे... त्यातल्या काही कथा कदाचित आपल्या पिढीच्या वाचनात आल्याही असतील जसे जन्मेजयाचा सर्पयज्ञ, यक्षाचे प्रश्न वगैरे पण सध्या जी मुले इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेताहेत त्यांच्यासाठी सगळ्याच कथा नवीन आहेत... खरेतर हे बालसाहित्य नाही पण मुलांना वाचायला द्यायला हवे इतके छान आहे... कथा रंजक पद्धतीने सांगितल्या आहे आणि काही तर खरेच नवीन आहेत जशी उडुपी राजा, बार्बारीक, घटोत्कचाची चतुराई, अर्जुनाची नावे... भन्नाट आहेत. जेमिनी ऋषींची माहितीही मला ह्याच पुस्तकातून झाली. कुरु वंश त्याचे नाव कसे पडले, वंशावळ अगदी सोपे करून मांडले आहे. मला सुधा मूर्तींच्या लेखनाचे एक वैशिष्ट्य कायम भावते ते म्हणजे आपली संस्कृती, आपली मूल्ये त्याची पाळेमुळे ह्यावर त्यांची नितांत श्रद्धा आहे आणि ती त्या प्रभावीपणे मांडत जातात. लीनाजींचा अनुवाद नेहमीसारखा चपखल... कुठेही ओढून ताणून दिलेले शब्दाला शब्द नाहीत...👍 महाभारतातल्या ह्या फारश्या प्रचलित नसणाऱ्या कथा .. जरूर वाचा! ✒️यशश्री रहाळकर, नाशिक ...Read more

  • Rating StarVaishali Patil Waghirkar

    सुधा मूर्तींच अजुन एक पुस्तक आज वाचुन संपवल. महाभारतातील अनेक न ऐकलेल्या प्रसंगांना आणि व्यक्तीरेखांना दिलेलं हे कथारुप अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मांडलेल आहे.खूप छान पुस्तक आहे.नक्की वाचा.

  • Rating StarPankaj Datare

    अर्जुनाची एकूण नावे किती? यमाला शाप का मिळाला? लहानशा मुंगसाने युधिष्ठिराला कोणता धडा शिकविला? महाभारतामध्ये कुरुक्षेत्री जे घनघोर युद्ध झालं, त्यात अखेर देवदेवतांनासुद्धा कोणत्या ना कोणत्या पक्षाची बाजू घेणं भाग पडलं. युद्धाविषयी तर पुष्कळमाहिती सर्वत्र उपलब्ध आहे; परंतु या युद्धाच्या आधी, युद्धाच्या दरम्यान किंवा युद्धाच्या नंतर असंख्य कथा घडल्या आहेत. या कथांमुळेच महाभारताला रंग भरतो. या कथासंग्रहांमधून अनेक पुरस्कार प्राप्त केलेल्या लेखिका सुधा मूर्ती भारताच्या या महाकाव्याचं विस्मयकारी जग वाचकांपुढे खुलं करतात. या संग्रहाद्वारे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी सर्वश्रुत नसल्यामुळेच त्यांचं हे वेगळेपण वाचकाला मंत्रमुग्ध करतं. ...Read more

  • Rating StarVikas Parab

    सुधा मूर्ती, ह्यांचे हे १७५ पानांचे पुस्तक म्हणजे जणू संपूर्ण महाभारताचा सारांश म्हटला तरी अतिशोयक्ती ठरणार नाही. महाभारत सुरू होण्या पूर्वची पार्श्वभूमी, महाभारत मधील घटना आणि महाभारत समाप्ती नंतर घडलेल्या घटनाक्रम याच्याशी निगडित बरयाच लहान लहानगोष्टी ह्या पुस्तकामध्ये दिल्या गेल्या आहेत. विविध घटना कश्या प्रकारे निर्माण झाल्या, त्यामागील पार्श्वभूमी, वरदान, शाप त्यांचे परिणाम, विविध महानुभवांनी घेतलेले निर्णय आणि त्यांचे बरे वाईट परिणाम अश्या सर्व विषयांवर ह्या पुस्तका मध्ये गोष्ट स्वरूपात माहिती दिली गेली आहे. ह्या पुस्तकाचे एक वैशिष्ट्य म्हणजे, हे पुस्तक लहान मुलं उत्साहाने गोष्टी स्वरूपात वाचू शकतील आणि प्रौढ माणसं हे पुस्तक वाचून महाभारत मधील घनाक्रम आणि इतर बरीच माहिती समजून घेऊ शकतील. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more