* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SARTHA LITERALLY MEANS A TRADING CARAVAN. IN ANCIENT INDIA, SUCH CARAVANS WOULD TRAVEL TO DISTANT LANDS TO TRADE WITH THEM. SARTHA IS A REMARKABLE NOVEL, WHICH WORKS SIMULTANEOUSLY ON TWO PLANES. IT IS A PHYSICAL JOURNEY ACROSS INDIA, AS WELL AS A SPIRITUAL INWARD JOURNEY OF AN EIGHTH-CENTURY SCHOLAR BORN TO A TRADITION OF VEDIC STUDIES. NAGABHATTA, THE SCHOLAR, IS DEPUTED BY AMARUKA, THE KING, TO STUDY THE SECRETS OF CARAVANS OF OTHER LANDS IN ORDER TO IMPROVE THE ECONOMY OF HIS KINGDOM. DURING HIS EXTENSIVE TRAVELS, NAGABHATTA BECOMES A WITNESS TO AND COMES UNDER THE INFLUENCE OF DOZENS OF RELIGIOUS, SOCIAL, AND CULTURAL MODES. UNUSUAL EXPERIENCES AND PEOPLES ARE DEPICTED IN A HISTORICALLY CHANGING TIME IN THE HISTORY OF INDIA. THE NOVEL IS A RESULT OF A DEEP AND EXTENSIVE STUDY OF HISTORY AND RESEARCH CONDUCTED AT ACTUAL LOCALES, LIKE NALANDA. IT SEARCHES, CREATIVELY, THE ROOTS OF CONFLICTING RELIGIOUS BELIEFS WHICH INDIA IS CONSTANTLY FACING. BHYRAPPA IS WELL KNOWN FOR HIS PROFOUND STUDY OF PHILOSOPHICAL QUESTIONS. IN SARTHA, HE GOES BACK IN TIME TO RECREATE THE ATMOSPHERE OF A BYGONE ERA WITH AN AUTHENTICITY THAT IS HIS HALLMARK. THROUGH THIS GRIPPING NARRATIVE, A VAST PANORAMA OF THE PAST UNFOLDS BEFORE US. IT IS A NOVEL THAT ABOUNDS IN DETAILS OF EIGHTH-CENTURY INDIA, CREATING AN EXPERIENCE THAT IS RICH AND STRANGE--STRANGE TO READERS UNINITIATED INTO THE WEALTH AND DIVERSITY OF THE INDIA OF MORE THAN A THOUSAND YEARS AGO. SARTHA CAN BE DISCUSSED AT SEVERAL LEVELS. IT IS A HISTORICAL NOVEL PAR EXCELLENCE, DEFYING WESTERN CRITICS` OPINION THAT INDIAN FICTION LACKS HISTORICAL SENSE. ON ANOTHER LEVEL, IT IS A PICARESQUE NOVEL, IN SO FAR AS IT CONCERNS ITSELF WITH THE ESCAPADES OF THE PROTAGONIST. ON YET ANOTHER PLANE IT IS A METAPHYSICAL NOVEL, DEALING WITH THE PHILOSOPHY OF ADVAITIC THOUGHT. FINALLY, IT IS A ROMANCE, A VERY READABLE STORY ABOUT THE TRUE LOVE OF NAGABHATTA AND CHANDRIKA.
आठव्या-नवव्या शतकात घडणारी कथा ‘सार्थ’. ‘सार्थ’ म्हणजे ‘व्यापारी तांडा’. कथेची सुरुवात होते ब्राह्मण नागभट्ट आणि राजा अमरुक यांच्यात असणा-या मैत्रीने. राजा अमरुक हा स्त्रीलंपट आहे. नागभट्टाचा हा बालपणीचा मित्र आहे. नागभट्टाच्या पत्नीला हस्तगत करता यावे म्हणून तो नागभट्टाला हेरगिरीच्या निमित्ताने सार्थांबरोबर राज्याबाहेर पाठवतो. वर्ष-दीड वर्ष सरल्यावर नागभट्टाला बातमी मिळते की, आपल्या पत्नीने आणि जिवलग मित्राने आपल्या विश्वासघात केला आहे. पुन्हा घराकडे न फिरकणे, हेच त्याला योग्य वाटते. भाषेवर प्रभुत्व असणारा नागभट्ट एका नाटक मंडळीच्या संपर्कात येतो. कृष्णावर आधारित असणा-या नाटकात त्याला मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळते. ‘कृष्णानंद’ नावाने त्याची कीर्ती सर्वदूर पसरते. बायकोने केलेल्या विश्वासघाताने खचलेला नागभट्ट त्याची नाटकातली सहकलाकार असणारी नटी ‘चंद्रिका’ हिच्या प्रेमात पडतो. परंतु ध्यानमार्गाचा अवलंब करणारी ‘चंद्रिका’ शरीर पातळीवरील प्रेम मानत नसते. नागभट्टावर प्रेम करत असूनही ती ते मान्य करत नाही. त्यामुळे नागभट्ट तिच्यापासून दूर जाण्याचे ठरवतो. एक ब्राह्मण असूनही तो तंत्रसाधनेचा मार्ग धरतो. अनेक अनुचित मार्ग तो अवलंबतो. पण तरीही एका वळणावर त्याची आणि चंद्रिकेची भेट होते. बौद्ध धर्माचा उदय, त्याला वैदिक धर्माचा विरोध, मुघलांची आक्रमणे यांच्या पार्श्वभूमीवर ही ‘सार्थ’ची कथा घडते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SARTH #SARTH #सार्थ #FICTION #TRANSLATEDFROMKANNADATOMARATHI #UMAKULKARNI #उमाकुलकर्णी #BHAIRAPPAS.L. #भैरप्पाएस.एल. "
Customer Reviews
  • Rating Starहेमंत सांबरे

    गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

  • Rating StarMandar Paranjape

    *सार्थ - एका अमृतमंथनाची गोष्ट* भारताचा पूर्व-मध्ययुगीन इतिहास म्हणजे साधारण इसवीसनाच्या आठव्या ते दहाव्या शतकातला इतिहास मोठा रोचक आहे. जुनी वैदीक संस्कृती, नव्याने उसळणारे बौद्ध-जैन विचारधारणांचे प्रवाह, आणि वायव्य सीमेवर धडका मारणारा म्लेंच्छ ध्म! या पार्श्वभूमी वरील भैरप्पा यांची "सार्थ" ही कादंबरी नुकतीच वाचली. भारतीय संस्कृती विषयी आस्था असलेल्या प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी ही कादंबरी आहे. उमा कुलकर्णी (पती विरुपाक्ष यांच्या मदतीने) यांनी या कादंबरीचा तरल अनुवाद मराठीत केला आहे हे ओघाने आलेच, वेगळे सांगायला नको! कर्मकांडांना सर्वाधिक महत्त्व ज्यात आहे अशी वैदिक संस्कृती आणि कर्मकांडांना नाकारून केवळ मानसिक पातळीवरील प्रयत्नांनी बौद्धत्व प्राप्त करून घेता येते असे सांगणारे बौद्धमत यातील संघर्ष मानसिक/वैचारिक पातळीवरचा होता. वादविवाद करायचा, जो वादविवादात पराभूत होईल त्याने जेत्याचे मत मान्य करायचे असा साधा अहिंसक, बहुजन समाजाची घडी न विस्कटणारा प्रकार घडत होता. राजमान्यताही सहिष्णू होती. सम्राट अशोकाच्या कालखंडांत सुरू झालेली बौद्ध क्रांती देशभर व्याप्त होत होती. त्याचवेळी वायव्येच्या सीमेवर एक हातात तलवार आणि दुसऱ्या हातात कुराण घेऊन अरबी धर्म वावटळ बनून तुटून पडला. गांधार (कंधार), मूलस्थान (मुलतान) येथील वैदिक आणि बौद्धमत वादळात कोसळणाऱ्या वृक्षांप्रमाणे उन्मळून पडले. एतद्देशीय प्रजेच्या श्रद्धास्थानांवर घणाचे घाव घालून त्यांच्या श्रद्धा नामोहरम करण्याचा म्लेंच्छांचा डाव इराणातील अग्निपूजकांविरुद्ध यशस्वी झाला होता, तोच गांधार, मूलस्थानात वापरला गेला. धर्मकारणापाठोपाठ अर्थकारण ताब्यात घ्यायचे आणि समग्र समाजजीवनात स्वतःचा एकेश्वर धर्म बलपूर्वक लादायचा म्लेंच्छांचा डाव होता. याला अहिंसक प्रतिछेद देण्याची एकांडी क्रांती श्रीमद शंकराचार्यांनी घडवून आणली असे अप्रत्यक्ष प्रतिपादन कादंबरीत केले आहे, त्यातील ऐतिहासिक तथ्य तपासून पाहावे लागेल, मात्र वैचारिक पातळीवर ते सिद्ध करण्यात भैरप्पा पूर्णपणे यशस्वी झाले आहेत. कोणत्याही कर्मकांडांच्या पलीकडचे केवळ अध्यात्मिक पातळीवरचे अद्वैत तत्त्वज्ञान मोठ्या वेगाने आसेतुहिमाचल भारतवर्षात प्रस्थापित करण्यात आचार्य यशस्वी ठरले. मंदिरे, स्तूप, विद्यापीठे, बौद्धविहार या भौतिक गोष्टी नष्ट करण्यात म्लेंच्छ यशस्वी झाले, तरी, आचार्यांनी रुजविलेला अद्वैत विचार त्यांना समूळ नष्ट करता आला नाही. तेव्हढी म्लेंच्छ लोकांची बौद्धिक पात्रताच नव्हती. आज आपण हिंदू आहोत ते आचार्यांमुळे ही भावना मनात रुजविण्यात कादंबरी सफल ठरते, हेच तिचे सर्वात मोठे यश आहे. इस्रायल, इराण म्लेंच्छांनी पादाक्रांत केले, इंडोनेशिया, मलेशिया जिंकला, भारतवर्ष त्यांना जिंकता आले नाही, कारण, कदाचित आचार्य श्रीमद शंकराचार्यांनी ती लढाई अशा प्रतलावर नेऊन ठेवली होती की तिथे म्लेंच्छ पोहोचूच शकले नाहीत. अर्थात हे विचार "सार्थ" ही कादंबरी वाचून मनात उठलेले तरंग आहेत. यातून आचार्यांच्या विचारांना आपल्या योग्यतेच्या प्रतलावर समजून घेण्याची प्रेरणा नक्की झाली आहे. लेखनसीमा. - मंदार परांजपे ...Read more

  • Rating StarAshwini Kulkarni-Umbrajkar

    वाचन सार्थ करणारी ‘सार्थ’ नावाची ‘सार्थ’ कादंबरी... एस. एल. भैरप्पा यांची ‘आवरण’ हि कादंबरी वाचली आणि या कादंबरीने अशी काही मोहिनी घातली कि जिथून मिळेल तिथून भैरप्पा वाचायायचे असे निश्चित केले. आवरण नंतर हातात आली ती हि ‘सार्थ’ कादंबरी.. पहिल्या ानापासूनच अलगदपणे ७व्या, ८व्या शतकात आपले मन कसे जाते हे समजत नाही.. ‘सार्थ’ म्हणजे व्यापाऱ्यांचा तांडा. पंचविशीत असणाऱ्या नागभट्ट नावाच्या तरुणाची हि कथा. राजाच्या आज्ञेनुसार प्रवासाला निघालेला हा युवक, वाटेतच त्याला पत्नीच्या व्याभिचाराविशय समजते. त्यामुळे घरी न परतता सार्थासोबत वाट मिळेल तिथे आणि नशीब नेईल तिकडे जाण्याचे ठरवतो. या प्रवासामध्ये अनेक व्यक्ती त्याला भेटतात. अनेक मानसिक स्थित्यंतरातून त्याला जावे लागते. हटयोग आणि अघोरी तंत्रविद्या आत्मसात करण्यापायी त्याचे जीवन भरकटले जाते.. त्याचवेळी त्याच्या आयुष्यात चंद्रिका नावाची नाट्य कलाकार येते. हि चंद्रिका त्याला ‘सार्थ’ जगणे शिकवते. नागभट्ट आणि चंद्रिका यांच्यामधील नाते लेखकाने अगदी तरलपणे उलगडले आहे. या कालखंडामध्ये बौध्द धर्माने बहुतांश भारत व्यापला होता. बौध्द धर्मीय लोक वैदिक लोकांना त्यांच्या धर्माचे महत्व पटवून देत असल्याचा विलक्षण प्रसंग मोठ्या खुबीने या कादंबरीमध्ये लिहिला आहे. अभावितपणे नागभट्टाची गाठ गुरु कुमारील भट्टांशी पडते. तत्कालीन समाजामध्ये पंडित कुमारील भट्ट हि अतीव आदरणीय अशी व्यक्ती होती. कुमारील भट्टांची वैदिक धर्मावर अपार श्रद्धा असते. तरीही बौध्द धर्म जाणून घेण्यासाठी ते बौद्ध धर्म स्वीकारतात.. धर्मांतरण हि त्या काळी खूप निंदनीय गोष्ट होती.. अशा व्यक्तीला पूर्वीच्या धर्माचा नैतिक अधिकार राहत नाही.. परंतु वैदिक धर्माचरण हा कुमारील भट्टांचा श्वास होता. त्यामुळे सर्वांसमक्ष स्वतः चिता रचून ते आत्मदहन करण्याचे ठरवतात. स्वधर्माची महती जाणून घेण्यासाठी प्रसंगी धर्मांतरणाचे पाप करून, प्रायश्चित्त म्हणून प्राणांचे बलिदान देणारे पंडित कुमारील भट्ट भैरप्पानी ठळक चित्तारले आहेत. कुमारील भट्टांची धर्मनिष्ठा आणि चंद्रीकेचे निर्व्याज प्रेम या दोन गोष्टींमुळे नागभट्टाच्या भरकटलेल्या आयुष्यात खूप मोठा बदल होतो. सार्थाबरोबरच्या या प्रवासात त्याला जीवनाची सार्थता लाभते..!! एस. एल. भैराप्पांची ओघवती लेखणी आणि उमा कुलकर्णी यांचा यथोचित अनुवाद यामुळे हि कादंबरी सदैव स्मरणात राहील. सर्वांनी ती आवर्जून वाचावी.. © सौ. अश्विनी कुलकर्णी-उंब्रजकर ...Read more

  • Rating StarRama Naamjoshi

    वेळ काढून वाचावे असे काही `सार्थ`..... एस् एल् भैरप्पा यांचं पुस्तक ज्याचा अनुवाद उमा कुलकर्णी यांनी केलाय. ते वाचायला घेतलं आणि भारल्यासारखी वाचतच गेले. `सार्थ` या शब्दाचा सामान्य माणसाला अभिप्रेत असलेला अर्थ म्हणजे अर्थासह पण या कादंरीत या शब्दाचा अर्थ पूर्णतः वेगळा आहे. ही कादंबरी साधारणपणे आठव्या शतकातील आहे. ज्या काळात सार्थ हा शब्द व्यापार्‍यांचा तांडा या नावाने प्रसिद्ध होता. नागभट्ट हा कथेचा मुळ नायक आहे जो मंडनमिश्रांच्या गुरुकुलात वेदाध्ययन केलेला आहे. नव्याने राज्याभिषेक झालेल्या अमरुक राजाचा तो परममित्र आहे. म्हणूनच राजा एक महत्वाची कामगिरी विश्वासाने आपला मित्र असलेल्या नागभट्टावर सोपवितो. इथूनच कथानकाची सुरुवात होते. अशाच एका सार्थात नागभट्ट सामिल होतो. व्यापारातील अनेक खाचाखोचा समजून घेण्यासाठी. हा सार्थ म्हणजे सामान्य माणूस कल्पनाही करू शकणार नाही असं प्रकरण असतं. हा तांडा थोडाथोडका नाही तर व्यापार्‍यांसाठी आवश्यक असलेले सामान लादलेले पंच्याहत्तर घोडे, दोनशे बैलगाड्या, शंभर गाढवं, दररोजच्या आहारासाठी लागणारं धान्य, इतर सामान, गाड्यांची, चाकाची धाव सुटली तर बसवायला सुतार,लोहार इतका प्रचंड काफिला ज्यात बहुतेक माणसं अशी ज्यांना तलवार चालवता येते आणि स्वतःच्या व इतरांच्याही जीवाचं तसंच मौल्यवान वस्तूंचं संरक्षण करता येतं. अशा सार्थात सहभागी होऊन मार्गक्रमण करणारा नागभट्ट या मोहीमेतून नेमकं काय शिकतो. हा वरवर दिसणारा भौगोलिक प्रदेशातील प्रवास करत असताना त्याच्या अंतरंगातही एक अविरत प्रवास चालू आहेच. अनेक धर्म- पंथातल्या तात्विक मतभेदालाही त्याला सामोरं जावं लागतं आहे. मध्ययुगीन कालखंडातील अनेक सत्य आणि कल्पित घटनांद्वारे ही कादंबरी उलगडत जाते. नालंदा विद्यापीठ, पूर्वेचं सूर्यमंदिर ही ऐतिहासिक स्थळं कादंबरीचा प्रवाह सखोल करत जातात. नागभट्टाचा अनुभव कथन होतं असताना रसिक वाचकही त्यात खेचला जातो. मध्ययुगीन कालखंडातील अनेक उलटसुलट अनुभव नागभट्टाला परिणामी वाचकालाही येतात. आयुष्यातला नेमका धागा कोणता यावर विचार करायला वाचकाला भाग पाडतात. नागभट्टाची होणारी तगमग, सगळीकडे त्याला येणारा अपूर्णत्वाचा अनुभव आणि तरीही त्याचा सतत नेमक्या सत्याचा शोध घेत राहाणं यांनीच या कादंबरीचा पट घट्ट होत जातो. आणि त्याला अंतिमतः झालेल्या सत्याच्या शोधाशी वाचक सहज स्वाभाविकपणे जोडला जातो. माणसाच्या अंतरंगातील प्रवास, त्याची सत्य शोधण्याची चिकाटी, आणि तीही आयुष्याच्या प्रवासाचं प्रतिबिंब असलेल्या `सार्थ` च्या पार्श्वभूमीवर. या सार्‍या अनुभवांसाठी आवर्जून वाचावं असं पुस्तक धन्यवाद, सौ. रमा नामजोशी 🌹🍃🌹 ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more