* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788184983685
  • Edition : 5
  • Publishing Year : 1994
  • Weight : 190.00 gms
  • Pages : 140
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :VYANKATESH MADGULKAR COMBO SET - 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THOSE WHO KNOW THE VALUE OF GRAINS VERY MUCH, THEY PICK `SAR WA`. AFTER THE HARVEST OF PLAYS, NOVELS, SHORT STORIES, FINE ARTICLES, THE WRITER REMAINS WITH THE `SARA WA`. I WAS SAYING THAT YOU SHOULD SHOW PERSISTENCE TO PICK IT UP. WHATEVER IS COLLECTED IS PASA-KUDTA. GRAINS WILL COME OUT OF IT, PEBBLES AND SOIL WILL ALSO COME OUT. THIS ALSO COMES IN SARVAYA.
आपल्याकडं आता दोन प्रकारचे वाचक आहेत. एक शहरी वाचक आणि दुसरा ग्रामीण वाचक. ग्रामीण भागातल्या लोकांना काही शहरी शब्द परिचयाचे नसतात आणि शहरी लोकांना ग्रामीण शब्द परिचयाचे नसतात. ‘स र वा’ हा शब्द शहरी लोकांच्या माहितीचा नाही. कोरडवाहू जमिनीत भुईमूग, हरभरा, गहू असलं पीक निघाल्यावर काही शेंगा जमिनीत राहतात; काही लोंब्या, काही घाटे राहतात. ते वेचणं म्हणजे ‘स र वा’ वेचणं. ज्यांना धान्याचं मोल फार कळलेलं असतं, ते ‘स र वा’ वेचतात. नाटक, कादंबरी, लघुकथा, ललित लेख यांचं पीक निघाल्यावर लेखकापाशी ‘स र वा’ पडलेला राहतो. तो वेचण्याची चिकाटी दाखवावी, असं मी म्हणत होतो. जे काही गोळा झालं, ते म्हणजे पसा-कुडता. त्यात दाणे निघतील, खडे-मातीही निघेल. सरव्यात हेही येतंच.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#VYANKATESH MADGULKAR#MANTARLELE BET#BIG CITY LITTLE BOY#MANUEL KOMROFF#MANHATAN# #व्यंकटेश माडगुळकर#मंतरलेले बेट#बिग सिटी लिटील बॉय#कॉमरॉफ#
Customer Reviews
  • Rating StarNiren Apte

    पुणे आकाशवाणीमध्ये नाग आला आणि तो मारायला आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांनी व्यंकटेश माडगूळकरांना बोलावलं.... माडगूळकर बांबूच्या जंगलात हरवले. दूरदूरपर्यंत कोणी दिसेना, रात्र जंगलात काढायची वेळ आली. पण एका वाटेवर गायीचं शेण दिसलं आणि त्यावरून त्यांनी जवळच्य गावाचा रास्ता शोधला. माडगूळकरांनी एकदा अरण्यवाचन केलं. संपूर्ण रान वाचून आपल्यासमोर उभं केलं. हे सगळं वर्णन वाचायचं असेल तर त्यांचं " सरवा" पुस्तक वाचायला हवं. पुस्तकाचं नाव सरवा ठेवलं आहे. कारण शेत तोडून झाल्यावर खाली जे दाणे, पीक उरतात त्याला सरवा म्हणतात. माडगूळकरांनी विपुल लेखन केलं. त्यातून जे उरलं ते त्यांनी `सामना` दैनिकाची लिहिलं आणि त्याचं हे पुस्तक आहे. ह्या पुस्तकात प्राणी, वनस्पती ह्यांची अनेक निरीक्षणे आहेत आणि सोबत माणूसही वाचला आहे. त्यामुळे हे पुस्तक एकदा तरी वाचायला हवे. ...Read more

  • Rating StarSmita Patil

    पुस्तक हाती आलं तेव्हा कुतूहलाने `स र वा` हा शब्द नकळतच अनेकवेळा उच्चारावा असा मोह झाला. `सरवा` चा अर्थ तर फारच सुरेख आहे. अनभिज्ञ असलेले अनेक शब्द पुस्तकात गवसले. अर्थ आणि संदर्भासह शब्द संचय समृद्ध करणारं सुंदर पुस्तक.

  • Rating StarRam Bodewar

    ग्रामीण शब्दांचा रानमेवा भरभरुन भरलाय "सारव्यात" जणू वाणीचा हुरडाच.

  • Rating StarSiddheshwar Ashok Tapkir

    भुईमूग,हरभरा,गहू या पिकांची काढणी झाल्यानंतर,अन्नधान्याचे मोल जाणलेला शेतकरी सरवा करतो.म्हणजेच मागे राहिलेल्या भुईमुगाच्या शेंगा,गव्हाच्या लोम्बया, हरभर चे घाटे याची वेचणी करतो. लेखक व्यंकटेश माडगुळकर यांनीही त्यांच्या अनुभवाचा स र वा आपल्यासमोर मांला आहे,जो कि खूप वाचनीय,अंतर्मुख करणारा आहे. आकाशवाणी त नोकरी करत असताना आलेले अनुभव,निसर्गाशी जडलेली मैत्री यासंबंधीचे वर्णन खूप आनंददायी आहे.आकाशवाणी त श्री म माटे आले असता त्यांनी काढलेले उद्गार "बोलवत जा असं अधी मधी मीठ मिरचीची सोय होते"आपले मन हेलावून टाकतात. गडधू, सादील,नसरणी,अजूरा यासारख्या अनोळखी शब्दाची लेखकाला झालेली ओळख आपल्यालाही समृद्ध करते. जॉर्ज ऑर्वेल(मूळ नाव एरीक ब्लेअर)यांच्या अनुभवांचा त्यांनी अनुवाद केला आहे.त्यातील `फाशी `हा अनुभव मृत्यू व जीवन यातील सीमारेषा किती धूसर आहे याची जाणीव करून देतो. पक्षांचा आवाज ऐकणे,झाडांच्या पानांची सळसळ ऐकणे,उगवता सूर्य पाहणे यासाठी आपण कधी आवर्जून वेळ दिला? आपण यंत्रवत जगत असून मनाने निबर होत चाललो आहोत याची जाणीव`अरण्यवाचन` `सकाळी उठोनी` हे अनुभव वाचल्यावर होते. स र वा आवर्जून वाचा ,व्यंकटेश माडगुळकर व जॉर्ज ऑर्वेल यांना भेटल्याचा जीवन समृद्ध करणारा अनुभव मिळेल. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more