- महाराष्ट्र टाइम्स संवाद
सत्तरीच्या लेखाजोखा....
डॉ. रोशन दलाल या इंग्रजी लेखिका असून त्यांची `पुफीन हिस्टरी ऑफ वर्ल्ड` आणि `रीलिजन्स ऑफ इंडिया` ही अभ्यासपूर्ण व संशोधनात्मक पुस्तक गाजली आहेत. पुस्तकांच्या याच रांगेत त्यांच्या `INDIA AT 70` या पुस्तकाचा देखील समावेश करवा लागेल. याच नव्या पुस्तकाचा जेष्ठ विज्ञान लेखक जोसेफ तुस्कानो यांनी केलेला मराठी अनुवाद `सत्तरीतील भारत` नुकताच प्रसिद्ध झाला आहे.
१४ ऑगस्ट १९४७ रोजी मध्यरात्री ब्रिटिशांचा युनियन जॅक जाऊन भारताचा तिरंगी झेंडा अस्मानात विहार करू लागला. त्या रोमहर्षक ऐतिहासिक दिवसापासून गेली ७० वर्ष भारत खंडात ज्या ज्या राजकीय सामाजिक, साहित्यिक, ऐतिहासिक, आर्थिक, आरोग्य, व कला- क्रीडा विषयक घडामोडी घडलेल्या आहेत, त्या साऱ्यांचा या पुस्तकात धांडोळा घेण्यात आला आहे. या प्रत्येक क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीचा आढावा या पुस्तकात प्रामाणिकपणे घेण्यात आलेला आहे.
एखाद्या व्यक्तीने आपल्या वयाची सत्तरी पार करणे हि सर्वसामान्य घटना असते; मात्र एखाद्या देशाने सत्तरीची हि घोडदौड करणं खूप अभूतपूर्व आणि ऐतिहासिक घटना असते. या पुस्तकात गेल्या सत्तर वर्षातल्या काळातील प्रत्येक वर्षी घडलेल्या घटनांवर दृष्टिक्षेप टाकण्यात आलं आहे. भारतातील राजकीय पार्शवभूमीवर या देशातील भव्य-दिव्य समृद्ध संस्कृती, ख्यायकीर्त व्यक्ती आणि सर्व क्षेत्रातील यशोगाथा यांचा मागोवा अभ्यासू वृत्तीने घेतलेला आहे.
प्रत्येक प्रकरणाचा प्रारंभ त्या त्या वर्षीच्या मुख्य राजकीय घटनेवर प्रकाशझोत टाकून केलेला आहे. तदनंतर निवडक व्यक्ती आणि त्या यावर्षीच्या सांस्कृतिक, साहित्यिक, कला-क्रीडा विषयक घटना उद्धृत केल्या आहेत. अखेरीस काही ठळक घटनांचा नाममात्र उल्लेख केला आहे आणि त्याचबरोबर समर्पक छायाचित्रे, रेखाटने दिलेली आहेत. हि सारी माहिती पेश करताना लेखिकेने पानोपानी तळटीपेच्या रूपात संदर्भग्रंथांची सूचीही देण्याचा सुज्ञपना दाखवला आहे. त्यामुळे जिज्ञासू व अभ्यासू वाचक अधिक माहितीसाठी मूळ स्रोताकडे जाऊ शकतात.
कोणत्याही देशाची प्रतिमा ही चित्रपट, साहित्य, संगीत, नृत्य आणि चित्रकला अशा विविध क्षेत्रात घडलेल्या घटनांतून अधोरेखित होत असते. त्या घटनांतून संबोधित राष्ट्राची समृद्धी, श्रीमंती व विकासाकडे केलेल्या वाटचालीचाच प्रत्यय येत असतो. या पुस्तकातील अभ्यासपूर्ण, संशोधनात्मक माहितीमुळे वाचकांच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल.
या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे आपण हवे ते पान उघडावे आणि त्या त्या वर्षी घडलेल्या मनोवेधक घटना वाचून इतिहासाच्या काळात वावरावे, वर्तमानकाळाच्या प्रकाशात भविष्याचा वेध घेत राहावे. साध्या सोप्या ओघवत्या, पण लालित्यपूर्ण भाषेत पुस्तकाची मांडणी केलेली आहे. तिथे अनुवादकाचे कसब नजरेत भरते. ...Read more
- Maharashtra times 24th May 2020
सत्तर वर्षांचा लेखाजोखा...
...
डॉ. रोशन दलाल या प्रसिद्ध इंग्रजी लेखिका असून त्यांची `पुफिन हिस्टरी ऑफ इंडिया`, `पुफिन हिस्टरी ऑफ वर्ल्ड` आणि `रीलिजन्स ऑफ इंडिया` ही अभ्यासपूर्ण व संशोधनात्मक पुस्तकं गाजली आहेत. पुस्तकांच्या याच रांगेत त्यांच्य `India at 70` या पुस्तकाचादेखील समावेश करावा लागेल. याच नव्या पुस्तकाचा ज्येष्ठ विज्ञान लेखक जोसेफ तुस्कानो यांनी केलेला मराठी अनुवाद `सत्तरीतला भारत` नुकताच प्रसिद्ध झाला आहे.
१४ ऑगस्ट १९४७ रोजी मध्यरात्री ब्रिटिशांचा युनियन जॅक जाऊन भारताचा तिरंगी झेंडा अस्मानात विहार करू लागला. त्या रोमहर्षक ऐतिहासिक दिवसापासून गेली ७० वर्षं भारत खंडात ज्या ज्या राजकीय, सामाजिक, साहित्यिक, ऐतिहासिक, आर्थिक, आरोग्य व कला-क्रीडा विषयक घडामोडी घडलेल्या आहेत, त्या साऱ्यांचा या पुस्तकात धांडोळा घेण्यात आला आहे. या प्रत्येक क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीचा आढावा या पुस्तकात प्रामाणिकपणे घेण्यात आलेला आहे.
एखाद्या व्यक्तीने आपल्या वयाची सत्तरी पार करणे ही सर्वसामान्य घटना असते; मात्र एखादया देशाने सत्तरीची घोडदौड करणं खूप अभूतपूर्व आणि ऐतिहासिक घटना असते. या पुस्तकात गेल्या सत्तर वर्षातल्या काळातील प्रत्येक वर्षी घडलेल्या घटनांवर दृष्टिक्षेप टाकण्यात आला आहे. भारतातील राजकीय पार्श्वभूमीवर या देशातील भव्य-दिव्य समृद्ध संस्कृती, ख्यायकीर्त व्यक्ती आणि सर्व क्षेत्रातील यशोगाथा यांचा मागोवा अभ्यासू वृत्तीने घेतलेला आहे.
प्रत्येक प्रकरणाचा प्रारंभ त्या त्या वर्षीच्या मुख्य राजकीय घटनेवर प्रकाशझोत टाकून केलेला आहे. तद्नंतर निवडक व्यक्ती आणि त्या वर्षीच्या सांस्कृतिक, साहित्यिक, कला-क्रीडा विषयक घटना उद्धृत केल्या आहेत. अखेरीस काही ठळक घटनांचा नाममात्र उल्लेख केला आहे आणि त्याचबरोबर समर्पक छायाचित्रे, रेखाटने दिलेली आहेत. ही सारी माहिती पेश करताना लेखिकेने पानोपानी तळटिपेच्या रूपात संदर्भग्रंथांची सूचीही देण्याचा सुज्ञपणा दाखवला आहे. त्यामुळे जिज्ञासू व अभ्यासू वाचक अधिक माहितीसाठी मूळ स्रोताकडे जाऊ शकतात.
कोणत्याही देशाची प्रतिमा ही चित्रपट, साहित्य, संगीत, नृत्य आणि चित्रकला अशा विविध क्षेत्रात घडलेल्या घटनांतून अधोरेखित होत असते. त्या घटनांतून संबंधित राष्ट्राची समृद्धी, श्रीमंती व विकासाकडे केलेल्या वाटचालीचाच प्रत्यय येत असतो. या पुस्तकातील अभ्यासपूर्ण, संशोधनात्मक माहितीमुळे वाचकांच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल.
या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे आपण हवे ते पान उघडावे आणि त्या त्या वर्षी घडलेल्या मनोवेधक घटना वाचून इतिहासाच्या काळात वावरावे, वर्तमानकाळाच्या प्रकाशात भविष्याचा वेध घेत राहावे. साध्या सोप्या ओघवत्या, पण लालित्यपूर्ण भाषेत पुस्तकाची मांडणी केलेली आहे. तिथे अनुवादकाचे कसब नजरेत भरते.
प्रस्तुत पुस्तक शिक्षक, विद्यार्थी, लेखक, पत्रकार, पालक, साऱ्यांसाठी उपयुक्त आहे. तसेच आयएएस, आपीएस, यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्यांसाठीही ते मार्गदर्शक ठरू शकते.
-जॉन गोन्सालविस ...Read more
- DAINIK LOKMAT (MANTHAN) 03-NOV-2019
राष्ट्राच्या वैशिष्टपूर्ण इतिहासाचा आढावा
१९४७ हे साल स्थित्यंतराचं ठरलं. सुमारे २०० वर्षांच्या ब्रिटिश राजवटीनंतर भारत देशाला एक स्वतंत्र राजकीय अस्तित्व मिळाले. त्यावेळी एक प्रश्न भेडसावत होता. हा नवा भारत देश कुठल्या प्रकारचे राज्य असेल? या प्रश्ाचं उत्तर हवं असेल, तर या पुस्तकाचं एकेक पान चाळत जा म्हणजे गेल्या सत्तर वर्षातला झंझावती प्रवास तुमच्या नजरेस पडेल. फाळणीपासून १९६२ सालचं चीनचं आक्रमण, आणीबाणीपासून ते कलामची छापे, लोकपाल बिलापासून ते नोटबंदीचे धोरण, या सार्या आठवणी या पुस्तकातील पाना-पानांतून दर्शनास येतात. त्यातून आपल्या देशाची विस्तीर्ण अन् समृद्ध संस्कृती, भिन्न भाषांतील वेगळेपण आणि उल्लेखनीय विविधता, राजकीय घडामोडी, भारदस्त व्यक्तिमत्त्वे आणि नजरेत भरणारी सार्वभौम प्रगती यांची ओळख होती. सत्याची कास धरून थोडक्यात मजकूरात पेश केलेली ही माहिती चित्रे आणि आलेख यांनी सजवलेली आहे व स्वतंत्र भारताची ओळख करून देण्यास ती समर्थ आहे. भारतवर्षाची ही कहाणी स्वातंत्र्योत्तर काळातली, गेल्या ७० वर्षांची कहाणी आहे. थोडक्यात काय तर, या ग्रथांत सातत्यानं नवे रूप घेत गेलेल्या आवेशपूर्ण भारतवर्षाचे रुप प्रतिबिंबीत झालेले दिसेल. ...Read more
- जॉन गोन्सालविस
सत्तर वर्षांचा जोखालेखा ऐवज...
डॉ. रोशन दलाल या उच्चविद्याविभूषित असून शाळांपासून ते विश्वविद्यालयापर्यंत त्यांनी शिक्षिका म्हणून ज्ञानदानाची भूमिका बजावली आहे. त्याच वेळी त्यांनी ‘पुफिन हिस्टरी ऑफ इंडिया’, ‘दी पुफिन हिस्टरी ऑफ वर्ल्ड’, दी रिलिजन्स फ इंडिया’ ही त्यांची अभ्यासपूर्ण संशोधनात्मक मार्गदर्शक अशी गाजलेली पुस्तके नजरेआड करता येणार नाहीत. ‘India At 70’ या इंग्रजी पुस्तकाचाही त्यात समोवश करावा लागेल. या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘सत्तरीला भारत’ या नावाने विज्ञान लेखक जोसेफ तुस्कानो यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून साकारला आहे. मेहता पब्लिशिंग हाऊस या ख्यातनाम प्रकाशनाने प्रकाशित केलेले आहे.
१४ ऑगस्ट १९४७ रोजीच्या मध्यरात्री ब्रिटिशांचा युनियक जॅक झेंडा जाऊन भारताचा तिरंगी झेंडा अस्मानात विहार करू लागला. त्या रोमहर्षक, ऐतिहासिक दिवसापासून गेली ७० वर्षे भारत खंडात ज्या ज्या राजकीय, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य व क्रिडा विषयक घडामोडी घडलेल्या आहेत. या प्रत्येक क्षेत्रात भारत देशाने केलेल्या प्रगतीचा आढावा या पुस्तकात प्रामाणिकपणे होण्याचा प्रयत्न स्पृहणीय आहे.
एखाद्या व्यक्तीने आपल्या वयाची ‘सत्तरी’ पार करणे ही सर्वसामान्य घटना असते; मात्र एखाद्या देशाने ‘सत्तरी’ची घोडदौड करणे हे खूप अभूतपूर्व, ऐतिहासिक घटना असते. या पुस्तकात गेल्या सत्तर वर्षातल्या काळातील प्रत्येक वर्षी घडलेल्या घटनांवर दृष्टीक्षेप टाकण्यात आला आहे. भारतातील राजकीय पार्श्वभूमीवर या देशातली भव्य, दिव्य, समृद्ध, संस्कृती वैविध्यपूर्ण विविधता, विविध भाषा, ख्यातकिर्त व्यक्ती आणि सर्व क्षेत्रांतली यशोगाथा यांचा मागोवा प्रामाणिकपणे व अभ्यासू मनोवृत्तीने घेतलेला दिसून येतो.
प्रत्येक प्रकरणाचा प्रारंभ त्या त्या वर्षाच्या मुख्य राजकीय घटनेवर प्रकाशझोत टाकून केलेला आहे. तद्नंतर निवडक व्यक्तिमत्त्वे आणि त्या वर्षीच्या सांस्कृतिक, साहित्यिक, क्रीडाविषयक घटना यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. अखेरीस काही ठळक घटनांचा नाममात्र उल्लेख आहे. त्याचवेळी समर्पक छायाचित्रे, रेखाटने दिलेली आहेत. आणि हे देत असताना तळटीप म्हणून पानोपानी संदर्भग्रंथांची सूचीही देण्याचा सूज्ञपणा दाखवला आहे. त्यामुळे जागृत, जिज्ञासू व अभ्यासू वाचकांना मूलस्त्रोताकडे जाता येऊ शकते.
कोणत्याही देशाची प्रतिमा ही चित्रपट, साहित्य, संगीत, नृत्य आणि कला या विविध क्षेत्रांत घडलेल्या घटनांतून आविष्कृत होत असते. त्या त्या घडलेल्या घटनांमुळे संबंधित देशाची समृद्धी, श्रीमंती व विकासाकडे केलेली वाटचाल याचा प्रत्यय येत असतो. त्यामुळे ‘मी एक भारतवासी’ म्हणून हे सर्व वाचून उरात अभिमान भरून येतो. भारतातील या महान विभूती व त्यांनी केलेल्या कार्यामुळे आदर दुणावतो. या अभ्यासपूर्ण, संशोधनात्मक माहितीमुळे काही वाचकांच्या ज्ञानाची उजळणी होईल. काही वाचकांच्या ज्ञानात अधिक भर पडेल, काही वाचकांची जिज्ञासा अधिक जागृत होऊन अधिक जाणून घेण्याची जाणीव वृद्धिंगत होईल.
या पुस्तकात विविध अंगाने परामर्श घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ‘‘मी जर पशु-पक्ष्यांवर प्रेम करत नसेल तर मी परमेश्वरावर देखील प्रेम करत नसतो.’’ असे कळकळीने सांगणारे शिक्षणतज्ज्ञ साधू वासवानी भेटतात. ‘‘मुलांना वाचनातून प्रथम जगातील जादूई किमयेची माहिती मिळाली पाहिजे.’’ असे आवर्जून भाष्य करणारे भारताचे माजी राष्ट्रपती झाकीर हुसेन आपल्याला प्रभावित करतात. तसेच ‘मिस वर्ल्ड’’ हा किताब जिंकणारी पहिली एशियन तरुणी रिरा फारियाची त्यांच्या प्रेमकहाणीचे दर्शन घडले. ‘भारत माझा देश आहे’, ही राष्ट्रीय प्रतिज्ञा लिहिणारे तेलगू लेखक पी. व्ही. सुब्बाराव सोबत ‘उडणारा शीख म्हणजे मिल्खा सिंग आपल्या नजरेत भरतो. त्याचवेळी कवयित्री कमला दास यांच्या कवितेच्या ओळीही मनाला साद घालतात–
‘मी आहे लाखो मृत्युंची प्रतिनिधी
सुकून गेलल्या बियांच्या झुपक्यासारखी
गळून पडेल मातीत, पुन्हा रुजवण्यासाठी
आणखीन कुणाच्या तरी आठवणीत’
या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे आपण हवं ते पान उघडावे आणि त्या-त्या वर्षी घडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घटना वाचून इतिहासाच्या काळात वावरत असताना वर्तमानकाळाच्या प्रकाशात भाविष्याचा वेध घेऊ शकतो. साध्या, सोप्या, ओघवत्या पण ललित्यपूर्ण भाषेत पुस्तकाची मांडणी केलेली आहे.
सदर पुस्तक शिक्षक, विद्यार्थी, प्राध्यापक, अभ्यासक, पत्रकार, लेखक व पालक यांना जसे उपयुक्त आहे तसेच IAS, IPS विविध स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना उपयुक्त ठरेल. तसेच गेला बाजार, ‘कौन बनेगा करोडपती’ विविध प्रश्नमंजूषा स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यासाठी मार्गदर्शक ठरेल. या पुस्तकात गेल्या ७० वर्षांतील स्वातंत्र्योत्तर काळातील राजकारण, समाजकारण, अर्थकारण, खेळ, संगीत, साहित्य इ. क्षेत्रांतील ठळक घटनांचा उहापोह आहे. ...Read more