* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SCHAPELLE
  • Availability : Available
  • Translators : SUNITI KANE
  • ISBN : 9788184983050
  • Edition : 1
  • Publishing Year : NOVEMBER 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 214
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
SEVEN YEARS AFTER FIRST PUBLICATION OF HER NUMBER-ONE BESTELLING MEMOIR, SCHAPELLE CORBY REMAINS IN JAIL, AND HER BOOK REMAINS HER ONLY DIRECT COMMUNICATION WITH THE AUSTRALIAN PUBLIC. IT WAS MEANT TO BE A TWO-WEEK BREAK TO A TROPICAL PARADISE. BUT FOR SCHAPELLE CORBY IT ENDED UP A WAKING NIGHTMARE. SHE WAS ARRESTED AT DENPASAR AIRPORT AFTER 4.2 KILOGRAMS OF MARIJUANA WERE FOUND IN HER BAG. SCHAPELLE HAD BECOME THE REAL-LIFE VICTIM OF EVERY TRAVELLER`S DARKEST FEAR - DRUGS HAD BEEN PLACED IN HER BAG AFTER SHE CHECKED IT IN. THOUGH INNOCENT, SHE WAS FORCED TO FACE THE CONSEQUENCES OF ANOTHER`S CRIME IN A COUNTRY WHERE THE PENALTIES FOR DRUG SMUGGLING ARE AMONG THE HARSHEST IN THE WORLD. HER TRIAL AND CONVICTION BECAME ONE OF THE BIGGEST STORIES OF THE DECADE IN AUSTRALIA, AND THE ENTIRE NATION WATCHED IN HORROR AS SHE WAS SENTENCED TO TWENTY YEARS IN JAIL. HER STORY HAS RARELY LEFT THE HEADLINES IN THE YEARS SINCE. IN HER SEARING AND COMPELLING BOOK WE HEAR HER TELL HER OWN STORY: OF BEING WRENCHED FROM A CAREFREE HOLIDAY INTO A STINKING POLICE CELL, OF AN ALIEN LEGAL SYSTEM WHERE HER ATTEMPTS TO PROVE HERSELF INNOCENT WERE THWARTED AT EVERY TURN, AND OF LEARNING TO SURVIVE - DAY BY TERRIBLE DAY - IN THE SQUALOR, DISCOMFORT AND VIOLENCE OF A THIRD-WORLD JAIL. SCHAPELLE`S STORY IS LIKE NO OTHER - A YOUNG WOMAN EXPERIENCING THE UNIMAGINABLE, AND ENDURING THE UNENDURABLE WITH COURAGE, STRENGTH AND HUMOUR.
शॅपेल कॉर्बीच्या बॅगेत देनपसार एअरपोर्टवर ड्रग्ज सापडल्यावर, इंडोेनेशियात तिला वीस वर्षं करावासाची शिक्षा ठोठावली गेली आणि सा-या जगाचं लक्ष तिच्याकडं गेलं. क्वीन्सलंडमध्ये ब्यूटी थेरपीचं प्रशिक्षण घेणारी ही मुलगी सध्या केरोबोकनच्या तुरुंगात एक-एक दिवस मोजत असताना, नरकप्राय यातना भोगत आहे. तरीही उमेद न हरता आब राखून जगायचा प्रयत्न करते आहे. असं धीरानं जगणं सोपं नाही; कारण सध्या तरी ती २०२४ पूर्वी सुटेल अशी शक्यता दिसत नाही. शॅपेलच्या खटल्यासंदर्भात कोर्टानं लावलेल्या शोधा मागचं सत्य... प्रसारमाध्यमांनी केलेले दोषारोप आणि वस्तुस्थिती यातली तफावत... ह्या खटल्याबाबतच्या अतिरंजित वावड्या... या सर्वांचं अत्यंत वस्तुनिष्ठ, संयत वर्णन ‘SCHAPELLE’ ह्या पुस्तकात शोध-पत्रकार टोनी विल्सन यांनी केलेलं आहे. टोनी विल्सन यांचा शॅपेलचं निर्दोषत्वावर नेहमीच दृढ विश्वास राहिला. आणि शॅपेलच्या हादरवून टाकणाऱ्या खटल्याबाबतच्या मथळ्यांमागचं सत्य जगापुढे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी ह्या पुस्तकात केलेला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #TONYWILSON #SUNITIKANE #SCHAPELLE
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more