* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SEIZURE
  • Availability : Available
  • Translators : PRAMOD JOGLEKAR
  • ISBN : 9788177667943
  • Edition : 2
  • Publishing Year : MARCH 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 404
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :PRAMOD JOGLEKAR COMBO SET - 29 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
THE BRILLIANT SCIENTIST DANIEL LOWELL, WHO HAS DEVELOPED THE TECHNIQUE OF CLONING OF THE HUMAN CELLS AND TREATING THE PATIENTS WITH PARKINSON DISEASE USING THIS TECHNIQUE AND AN AMBITIOUS SENATOR MR. BUTLER, WHO FULFILLS HIS POLITICAL CAUSES BY PLAYING WITH THE EMOTIONS OF PEOPLE AROUND; THEY FACE EACH OTHER. FINALLY, DANIEL AGREES TO THE UNLAWFUL PROPOSAL BY THE SENATOR, HE AGREES TO USE THE GENETICS IN A WAY NO ONE HAS EVER DREAMT OF BEFORE. BUT DANIEL PUTS ONE CONDITION FOR THE SENATOR TO FULFILL; HE INSISTS THAT THE GENES NEEDED FOR THIS EXPERIMENT SHOULD COME STRAIGHT FROM THE SHRINE OF JESUS CHRIST. THIS LEADS TO A SERIES OF CHECK AND CHECKMATE.
पेशींचे क्लोनिंग करून मानवजातीला ग्रासणा-या पार्किन्सन्ससारख्या आनुवंशिक विकारांवर उपचार करण्याचे तंत्र विकसित करणारा, विलक्षण बुद्धिमत्तेचा शास्त्रज्ञ डॅनियल लॉवेल आणि लोकांच्या भावनांशी खेळून स्वत:चा राजकीय मतलब साधणारा एक महत्त्वाकांक्षी सिनेटर, एकमेकांच्या समोर उभे ठाकतात. पेचातून सुटका व्हावी म्हणून डॅनियल सिनेटर बटलरचा अनैतिक प्रस्ताव मान्य करून, कोणी कधी न केलेले जनुक उपचार करायला तयार होतो. उपचारासाठी लागणारे जनुक थेट खिस्ताच्या रक्तापासून मिळवण्याची विलक्षण अट बटलर घालतो आणि त्यातून सुरू होते ती पेच-डावपेचांची जीवघेणी मालिका...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #प्रमोदजोगळेकर #रोबिनकुक #COMA #TOXIN #SONS OF FORTUNE #FALSE IMPRESSION #CONTAGION #SEIZURE #CRISIS #CRITICAL #NOT A PENNY MORE, NOT A PENNY LESS #MARKER #कोमा #टॉक्सिन #कन्टेजन #सीजर #क्रायसिस #क्रिटिकल #मार्कर "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA

    नव्या वैद्यकीय संशोधनाची थरार कथा… डॉ. रॉबिन कूक यांच्या ‘क्रोमोसोम-६’, ‘कोमा’ आणि ‘टॉक्सिन’ या कादंबऱ्या मराठीत आलेल्या आहेत. त्यानंतर आता ‘सीजर’ या नवीन कादंबरीची भर पडत आहे. डॉ. प्रमोद जोगळेकर यांनी हा अनुवाद केला आहे. डॉ. कूक यांच्या कादंबऱ्याचे सर्वांत मोठे वेगळेपण म्हणजे कथानकाची उभारणी करताना वापरण्यात आलेली वैद्यकीय पार्श्वभूमी. वैद्यकीय क्षेत्रातील एखादे नवे संशोधन, त्या संशोधनाशी निगडित असलेले आंतरराष्ट्रीय औषध उत्पादक संस्थांचे आर्थिक बळ, त्या संशोधनात आघाडी मिळवण्यासाठी चाललेली ‘प्रचंड स्पर्धा, त्यासाठी रचण्यात येणारी कटकारस्थाने, साखळी हॉस्पिटल्स व आरोग्य विमा योजना राबवणाऱ्या संस्थांचे यात गुंतलेले हितसंबंध, डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्स यांची पेशंटकडे पाहण्याची आपमतलबी दृष्टी नव्या औषधांचे प्रयोग करण्याबाबतचे संकेत आणि त्याबाबत चालणारे गैरप्रकार, हॉस्पिटलमध्ये पेशंटची होणारी हेळसांड आणि प्रसारमाध्यमांना त्याबद्दल पत्ता लागला तर त्यांना मिळणारी प्रतिकूल प्रसिद्धी आणि या सर्वांशी निगडित असणारी सामाजिक तसेच नैतिक मूल्ये यांचा एक विस्तृत पट समोर ठेवून डॉ. कूक आपल्या कादंबरीच्या कथावस्तूत समर्पक अशा घटना आणि व्यक्ती यांची योजना करतात. त्यात उत्कंठावर्धक, नाट्यपूर्ण खळबळजनक प्रसंगांची गतिमान मालिका यांची काळाशी शर्यत लावून ‘पुढे काय’ याबद्दलची वाचकांची जिज्ञासा सारखी वाढत राहावी, अशा प्रकारे निवेदनाचे टप्पे पाडण्यातही डॉ. रॉबिन कूकचा हातखंडा आहे. एकूणच डॉ. कूक यांच्या कादंबऱ्या वैद्यकीय व्यवसायातील बारकावे प्रकट करतानाच मानवी संबंधाचाही एक खूप चढउतार असलेला भावनापट उभा करतात. वाचक त्यात गुंतून राहतो. ‘सीजर’ ही कादंबरीही त्यांच्या या परंपरेला साजेशा आहे. या कादंबरीचे कथानक २० फेब्रुवारी २००२ ते २५ मार्च २००२ या पस्तीस दिवसात घडते. वॉशिंग्टन डीसी, न्यूयॉर्क, बोस्टन, इटलीतील ट्युरीन श्राउड (येशूचे कफन, त्या कफनावरच्या एका वस्त्रावर येशूच्या रक्ताचे डाग असल्याची लोकांची श्रद्धा आहे), पॅरिस, नसाऊ बेटावरील वंध्यात्वावर उपचार करण्याबाबत नावाजलेले क्लिनिक अशा वेगवेगळ्या ठिकाणी या कादंबरीतील घटना घडतात. हॉर्वर्ड विद्यापीठातील डॉ. डॅनिएल लोवेल हा जीवरेणूशास्त्र मूलपेशीचे क्लोनिंग करून पार्किन्सन विकारावर उपचार करण्याबाबत संशोधन करत असतो. आता या संशोधनाचे व्यपारी तत्वावर उत्पादन करण्यासाठी क्युअर ही कंपनी त्याने काढली आहे. त्याची मदतनीस म्हणून डॉ. स्टेफनी डी, अ‍ॅगोस्टिनो ही काम करीत असते. डॉ. डॅनिएल लोवेलने आपल्या शोधाच्या वैद्यकीय प्रयोगासाठी स्वत: क्युअर नावाची एक कंपनी काढलेली असते. डॉ. लोवेल क्वोनिंग रेणूचे प्रयोग उंदरावर करीत असतो. या कंपनीला त्याची सहकारी डॉ. स्टेफनी डी अ‍ॅगोस्टिनो हिच्या भावाने दोन लाख डॉलर्स भांडवल पुरवलेले असते. या भावाला गुन्हेगारी पार्श्वभूमी असते. त्याच्यावर अफरातफरीचा आरोप असतो असाही गौप्यस्फोट सिनेटर अ‍ॅशले बटलर करतो तेव्हा या एकूणच प्रकरणाला आणखी एक परिमाण लाभते... बिल क्र. ११०३ मांडून सिनेटर लोवेलची क्युअर ही कंपनी बंद करू शकतो हेही या समितीच्या सुनावणीवरून लक्षात येते. पण याच वेळी या कथानकाला वेगळे वळण लागते. सुनावणीच्यानंतर काही वेळाने सिनेटर अ‍ॅशले बटलर याला स्वत:लाच पार्किन्सन विकार असल्याचे निदान त्यांचे डॉक्टर करतात. या विकारावर कोणतेही औषध नाही हेही स्पष्ट करतात. तेव्हा सिनेटरना एकदम डॉ. डॅनिएल लोवेलच्या या नव्या संशोधनाने आपला पार्किन्सन विकार बरा होऊ शकेल अशी आशा वाटते. त्या प्रयोगावर बंदी घालणारे विधेयक सिनेटमध्ये मांडण्याचा विचार रद्द करून डॉ. डॅनिएलला ते भेटायला बोलवतात. एका कारमध्ये ही भेट होते. त्या भेटीत सिनेटर डॉ. डॅनिएलला आधी तो डॉ. डॅनिएलला ऑफर देतो, मी हे विधायक आणण्याचा निर्णय रद्द करतो. मात्र तू माझ्या पार्किन्सनला जबाबदार असणाऱ्या दूषित पेशींच्या जागी तुझ्या तंत्राने नव्या निरोगी पेशी स्थापित कर. हे काम अत्यंत गुप्तपणे व्हायला हवे. त्यासाठी कितीही खर्च आला तरी चालेल. ही उपाययोजना करायला अमेरिकेत कायद्याने बंदी आहे. तेव्हा ती आपण बहामा देशातील नसाऊ येथील एका अत्यंत अद्ययावत क्लिनिकमध्ये करू. डॉ. डॅनिएलला सिनेटरच्या या सगळ्या उतावीळ योजनेबद्दल साशंकता वाटते. तो त्याला म्हणतो, ‘हे सर्व हास्यास्पद आहे. एकतर प्रत्यक्ष प्राण्यांवर आमचे प्रयोग अजून चालू आहेत. ‘पण मी स्वत: गिनीपिक व्हायला तयार आहे. तुमची एचटीएसआर पद्धत वापरून मला गुप्तपणे बरं केलंत तर मी माझं एस ११०३ हे बिल उपसमितीकडून पुढं सरकणार नाही अशी व्यवस्था करीन. पुढे अ‍ॅशले बटलर आणखी एक सूचना करतो, ‘माझे वडील बॅप्टिस्ट धर्मगुरू होते. आई आयरिश कॅथलिक... तिची येशू खिस्तावर भयंकर श्रद्धा होती... ट्युरीनच्या चर्चमधील कफनाबद्दलची आख्यायिका ती मला नेहमी सांगायची. हे जे कफन आहे ते प्रत्यक्ष येशूच्या शरीराभोवती गुंडाळलेले होते... रेडिओकार्बन कालमापन पद्धतीनसुार ते कफन तेराव्या शतकातलं असल्याचं संशोधन झालेलं असलं तरी माझ्या आईच्या हृदयात त्या कफनाला मोठं स्थान होतं. तिनं मला लहानपणी ते कफन दाखवायला मुद्दाम नेलं होतं. त्या कफनाच्या कापडावर रक्ताचे डाग आहेत. ते रक्त प्रत्यक्ष येशूचे आहे अशी तिचीही श्रद्धा होती. माझ्या उपचारासाठी वापरात जाणारा डीएनएचा रेणू त्या कफनावरच्या रक्तातून घ्यावा अशी माझी इच्छा आहे.’ सिनेटर बटलरला आपल्या पार्किन्सन विकारावर डॉ. डॅनिएलने एसटीएसआर तंत्राने गुप्तपणे उपचार करावा असे वाटते. त्यासाठी तो त्याला प्रस्तावित विधेयक जाणार नाही असे आमिष दाखवतो. हॉस्पिटलची व खर्चाची व्यवस्था करायची तयारी दाखवतो. आवश्यक ते डीएनएरेणू मात्र येशू खिस्ताच्या कफनावरील रक्ताच्या डागातून घ्यावेत, अशी भावनात्मक इच्छा व्यक्त करतो. डॉ. डॅनिएलची सहकारी डॉ. स्टेफनी डी अगोस्टिनो हिच्या भावाने दोन लाख डॉलर्स डॉ. डॅनिएलच्या क्युअर या औषधनिर्मिती संस्थेत गुंतवलेले असतात. ते पैसे लवकर परत मिळावे म्हणून त्यांचा तगादा असतो. डॉ. स्टेफनी म्हणते, ‘डॉ. लोवेलने शोधलेल्या पद्धतीबद्दल आणि उपचारसाठी क्लोनिंग करणे याबद्दल मला विश्वास वाटू लागलाय... या वेळी काहीतरी तांत्रिक गडबड झाली. पण त्याचा पार्किन्सन विकार बरा झाला हेही खरं आहे. यावर अधिक संशोधन आपण पुढे चानू ठेवायला हवे. भविष्यकाळात अनेक रोगांवर उपाय करण्याचे सामर्थ्य त्यात आहे. बटलरची सहकारी कॅरोल म्हणते, ‘मला बटलरची जागा मिळाली तर मी त्यासाठी सर्व मदत करीन. एखाद्या वैद्यकीय तंत्राचे वा नव्या शोधाचे अमेरिकन शैलीतले संशोधन, त्याचे व्यापारी तत्वावरचे उत्पादन, त्याचे हॉस्पिटलमधील प्रात्यक्षिक यावर प्रकाश टाकणारी ही कथा थरारकथेच्या अंगाने विकसित करताना कसकशी नाट्यपूर्ण वळणे घेते याचा एक रोमांचकारक नमुनाच येथे पहायला मिळतो. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित थरार कादंबरी … डॉ. रॉबिन कूक यांची डॉ. प्रमोद जोगळेकर यांनी मराठीत अनुवादित केलेली ही तिसरी कादंबरी. वाचायला सुरुवात केल्यानंतर खाली ठेवू नये असे वाटायला लावणारी वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित थरार जाणवत ठेवणारी - सीजर ही रॉिन कूक लिखित कादंबरी मराठीमध्ये अनुवादित केली आहे डॉ. प्रमोद जोगळेकर यांनी. डॉ. रॉबिन कूक यांचा हेतू मनोरंजनाचा असला तरी त्यांच्या प्रत्येक कादंबरीत काही ना काही सामाजिक मुद्दा असतो. अर्थपूर्ण, ओघवती आणि वेधक भाषा, शब्दांची अचूक निवड, वैद्यकीय क्षेत्रातील फेरबदल आणि त्यांचा समाजावर होणारा परिणाम याचे अत्यंत वास्तवदर्शी चित्रण डॉ. रॉबिन कूक करतात. कोणत्याही क्षेत्रात व्यवसायात चांगले आणि वाईट लोक असतातच. नेमके त्याचेच दर्शन डॉ. रॉबिन कूक यांच्या कादंबरीतून घडते. वाचकांना अस्वस्थ करणारे विचार करायला भाग पाडणारे हे दर्शन अनुवादकार घडवतात. डॉ. प्रमोद जोगळेकर मौलिक स्पष्टीकरणासाठी दिलेल्या टिपांसह हा सहज सुंदर भाषाशैलीत ओघवता झालेला अनुवाद त्यातल्या कथानकातील राजकारण आणि जीवनशास्त्राच्या टकरीसह रोमहर्षक थरात अधिक गुंतवून घेण्यात यशस्वी झाला आहे. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित अशा थरार कथानकांच्या अंतरंगी संलग्न असणारा सामाजिक मुद्दा वाचकांना या कादंबरीतील कल्पित कथानकामधील विज्ञान-गंभीर स्वरूपाच्या आजारांवर उपचार म्हणून होऊ शकणारा क्लोनिंगचा उपयोग अर्थात पुनरुत्पादन विज्ञान-गंभीर स्वरूपाच्या आजारांवर उपचार म्हणून होऊ शकणारा क्लोनिंगचा उपयोग अर्थात पुनरुत्पादन विज्ञान आणि जीवशास्त्राच्या वाटचालीतील यशाचा विचार करायला लावतो. मानवपणालाच बाधा येईल की काय अशी आशंका यावी आणि या प्रगतीवर अंकुश ठेवता यावा हेही योग्य वाटते. मानवजातीच्या अस्मितेलाच धक्कादायक असं काही घडू नये याचाही वाचक डॉ. रॉबिन कूकशी सहमत होत विचार करीत राहतो. ..... या संस्थेने १९९८ साली प्रकाशित केलेल्या अहवालाचा निर्वाळा देता स्टेम सेल आणि वैद्यकीय उपचारांसाठीचे क्लोनिंग त्यासाठी गर्भाच्या रचनेशी करावी लागणारी तोडमोड उपचारांसाठी लागणाऱ्या क्लोनिंगमध्ये वापरलेल्या स्टेम सेल (स्कंधपेशी/मूलपेशी) प्रत्यक्ष गर्भ तयार होण्याच्या अगोदरच्या ब्लास्टोसिस्ट अवस्थेतूनच मिळविण्यात येतात आणि या पद्धतीत प्रत्यक्ष गर्भ तयार होण्याच्या अगोदरच्या ब्लास्टोसिस्ट अवस्थेतूनच मिळविण्यात येतात आणि या पद्धतीत प्रत्यक्ष गर्भ तयारच होऊ दिला जात नाही. अर्थातच तोडमोडीच्या गर्भरचनेला गर्भाशयात वाढीसाठी ठेवण्याचा प्रश्नच उद्भवता कामा नये. हा विचारही सीजरच्या निमित्ताने डॉ. रॉबिन कूक यांनी ज्या परिणामकारकतेने मांडला आहे. तीच प्रत्यायकरिता या मराठी अनुवादाने जपली आहे. रॉबर्ट कूकच्या तथ्य आणि कल्पना यांच्यातील सीमारेषा पुसट जाणाऱ्या सीजरच विषय आहे. अमेरिकेत चालू असलेल्या राजकीय पुढारी आणि जीवशास्राशी निगडितांमधील वादविवादातून आकारलेले तथ्य आणि कल्पना कॉकटेल. या कादंबरीतील डॅनियल, स्टेफनी सिनेटर अ‍ॅशले यांच्या माध्यमातून डॉ. रॉबिन कूक यांनी आधुनिक विज्ञान वैद्यकीय-क्षेत्रातील फेरबदल आणि समाजावर होणारे परिणाम यांचे अप्रतिम वास्तवदर्शी चित्रण वाचकांसमोर ठेवलं आहे. पार्किंन्सन्स हा उतारवयात होणारा विकार! यामध्ये मेंदूमधील पेशीच ऱ्हास होते १८१७ मध्ये जेम्स पार्किंन्सनला या विकाराची माहिती होती. तरी पण या विकाराचा, या विकाराने पीडित रुग्णांचा अधिक अभ्यास १९६० नंतरच सुरू झाला. सीजरमध्ये या विकारसंबंधी भरपूर संदर्भ आणि त्यावरचा उपचार म्हणून स्टेम सेल्स, स्कंधपेशी याबद्दल चर्चाही आहेत. विषयाचा मांडणीत ग्रीक पुराणकथा व इतर कलाकृतींचेही कलात्मक संदर्भ आहेत. जैवतंत्रज्ञान, पेशी विज्ञान आणि एकूणच जीवशास्त्राच्या संदर्भात अनेक विषांवरची चर्चा आहे. २५ मार्च २००२ हा या कहाणीतला शेवटचा भाग अ‍ॅशले आणि डॅनियल पॅसिडान सूटच्या बाल्कनीतून खाली पडतात. कॅसा अ‍ॅण्ड्रा, भविष्य कळण्याची दैवी देणगी असलेली कॅरील आणि डॅनियलची स्टेफनी त्याचप्रमाणे क्युअरवर शेवटचा आघात ठरणाऱ्या भयंकर हेडलाइन्स बोस्टन ग्लोबमध्ये पाहणारी स्टेफनी आणि अ‍ॅशले बटलरच्या अपघाताने रिकाम्या झालेल्या गव्हर्नर पदावर नेमणूक व्हायला आपणच कशा सुयोग्य ही स्टेफनीच्या मनातील दिवास्वप्ने चर्ररऽ करणारी डॉ. लावेलनी शोधलेला क्लोनिंग आणि जैवशास्त्रीय फेरफाराच्या विश्र्लेषणांनी घडवलेले हे नाट्य आणि बेनेडिक्ट अनॉल्ड (१७४१-१८०१) सिंक्लेवर लेवीस (१८८३-१९५१). लाऊ गोहरिंगाकिकर मेरी शेलीचा- फ्रॅंकेस्टाइन, मॉकियाव्हेली (१४६९-१५२०), रोविरूद्ध वेड खटला, लुडाइट चळवळ (१८११-१८१६) कासाअँड्रा, पॅसिडॉन, वान्शी, फाऊस्ट गटे (१७४९-१८३२). अल्झयमर्स विचार, स्ट्राम थूरमॉण्ड आणि सिनेटर जेसे हेल्मस (१९२१) यांच्याबद्दलच्या सविस्तर संदर्भ देणाया टीपांमुळे या कादंबरीला आँथेटिक- अर्थपूर्ण मांडणे आणि विचारांच्या परिप्लुततेने मिळवणारे वजन लाभ्ले आहे. गुंतवून घेणारा अप्रतिम अनुवाद! ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
कृष्णा DIWATE

आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more