* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SELECTIVE MEMORY
  • Availability : Available
  • Translators : APARNA VELANKAR
  • ISBN : 9788177663075
  • Edition : 8
  • Publishing Year : MARCH 2000
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 624
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE EXPLOSIVE AUTOBIOGRAPHY OF INDIA`S MOST CONTROVERSIAL WRITER SHOBHAA DÉ HAS BEEN MANY THINGS TO MANY PEOPLE: SUPERMODEL, CELEBRITY JOURNALIST AND BEST-SELLING AUTHOR; FRIEND, RIVAL, COLLEAGUE AND CONFIDANTE. IN THIS ENGAGINGLY CANDID MEMOIR, A WOMAN WHO HAS BEEN A FAMILIAR FACE AND NAME TO MILLIONS (ALTHOUGH FEW KNOW HER) FINALLY REVEALS THE TRUE SELF BEHIND THE PUBLIC PERSONA. INSIDERS KNOW THAT BESIDES HER COMMITMENT TO WORK AND THE FRANTIC PACE OF HER LIFE, SHOBHAA DÉ`S FIRST PRIORITY IN LIFE HAS ALWAYS BEEN HER FAMILY. HERE SHE WRITES POIGNANTLY OF HER EARLY YEARS, AND OF HER RELATIONSHIP WITH HER PARENTS AND SIBLINGS, HER HUSBAND AND HER CHILDREN. SHOBHA DE`S HIGH VOLTAGE CAREER `HAPPENED` IN UNEXPECTED WAYS, STARTING WITH HER UNPLANNED ENTRY AS A TEENAGER INTO THE GLAMOROUS WORLD OF MODELING, AND MOVING ON TO HER HIGH-PROFILE YEARS AS A MAGAZINE EDITOR. IN THESE AVATARS SHE KEENLY OBSERVED AND ASTUTELY CHRONICLED THE NEW INDIA— BRASH, AFFLUENT AND AMBITIOUS. HIGH-SOCIETY HI-JINKS, MOVIE STAR FOLLIES, CELEBRITY NEUROSIS— NONE OF THESE ESCAPED HER UNSPARING EYE. AND NOW SHE TELLS IT ALL, JUST AS IT WAS, JUST AS SHE SAW IT. IN HER INIMITABLY FORTHRIGHT FASHION, SHE WRITES OF THE CHOICES SHE MADE, THE DECISIONS SHE TOOK AND THE INFLUENCES THAT SHAPED HER. WRITTEN IN A VOICE THAT IS CONSISTENTLY CONFIDENT AND CANDID, SELECTIVE MEMORY: STORIES FROM MY LIFE IS REMARKABLE FOR THE HONESTY WITH WHICH IT CAPTURES THE ESSENCE OF A FASCINATING WOMAN WHO HAS BECOME A LEGEND IN HER OWN TIME. WITH MORE THAN 30 PHOTOGRAPHS.
शोभा डे... या नावाकडं पाहण्याच्या अनेक नजरा आणि असंख्य दृष्टिकोन. सुपर मॉडेल... ‘सेलिब्रिटी’ पत्रकार... अनेक ‘बेस्ट सेलर’ पुस्तकं नावावर असलेली ख्यातनाम लेखिका... जिवलग स्नेही... कट्टर प्रतिस्पर्धी... सहकारी... आणि जिच्याजवळ विश्वासानं मन मोकळं करावं, अशी मैत्रीण ! ‘शोभा डे’ हे नाव आणि झगमगत्या ग्लॅमरचं वलय असलेला चेहरा लाखो लोकांना परिचित आहे, पण त्या वलयाआडच्या स्त्रीचं संवेदनशील, पारदर्शी व्यक्तित्त्व अत्यंत मोजके स्नेहीजन जाणतात. त्या व्यक्तित्त्वाचे रूपरंग मनमुक्तपणे उलगडून दाखवणारी ही स्मरणयात्रा.... सिलेक्टिव्ह मेमरी ! विविध दिशांनी धावणा-या कामाचा, करीअरचा जबरदस्त आवाका आणि अफाट वेग हा शोभा डे यांच्या जगण्याचा स्थायिभाव असला, तरी त्यांचं व्यक्तिगत जीवन मात्र कुटुंबाभोवती विणलेलं आहे. परस्परांमध्ये गुंतलेल्या नातेसंबंधांची वीण सतत ताजीतवानी,रसरशीत ठेवण्याचं आव्हान शोभा डे यांनी मोठ्या कौशल्यानं पेललं, कारण त्यांच्या जीवनप्रवासात ‘कुटुंब’ या संकल्पनेला सदैव अग्रक्रम राहिला. निडर बेधडकपणाची बीजं रुजवणारे बालपणातले अवखळ, बंडखोर दिवस... आई-बाबा आणि भावंडांबरोबरचे स्नेहबंध... जोडीदाराबरोबरच्या सहजीवनाचे तरल रंग आणि वाढत्या वयातल्या मुलांशी सतत स्वत:ला जोडून ठेवणारं समर्पित मातृत्व... स्वत:च्या व्यक्तिमत्त्वामधल्या अशा अनेक धाग्यांचं मनोज्ञ वर्णन शोभा डे यांनी या ‘स्मरणयात्रे’ मध्ये केलं आहे. आंतरराष्ट्रीय वर्तुळात स्थान मिळवणाNया शोभा डे यांच्या व्यावसायिक जीवनाचा आरंभबिंदू अगदी अवचित त्यांच्या हाती गवसला आणि यश-कीर्तीकडं घेऊन जाणारी नंतरची वाटचालही अत्यंत अनपेक्षितपणे ‘घडत’ राहिली. नकळत्या वयात मॉडेलिंगच्या मोहमयी दुनियेत योगायोगानंच झालेला प्रवेश... नंतर ‘संपादक’ म्हणून बहराला आलेली कारकीर्द... स्तंभलेखन... टी.व्ही.साठी पटकथालेखन आणि ‘लेखिका’ म्हणून मिळालेली आंतरराष्ट्रीय ख्याती. या प्रवासातल्या हरेक टप्प्यावर समाजात वेगानं घडणाNया बदलांचा अत्यंत सूक्ष्म वेध शोभा डे यांनी घेतला. आधुनिक भारतात उदयाला आलेल्या उद्धट,एककल्ली,नवश्रीमंतांची बेपर्वा जीवनशैली... आसुरी महत्वाकांक्षा आणि वैभवानं, उपभोगांनी गजबजलेलं पोकळ आयुष्य यांवरचं तिखट,परखड भाष्य, मर्मभेदी शैलीत शोभा डे यांनी वाचकांपुढं ठेवलं. अतिश्रीमंत वर्गातली स्वैर मौजमस्ती, रुपेरी पडद्यावर झगमगणा-या तारे-तारकांचं अंधळं अर्थहीन जगणं, सत्ता आणि संपत्तीच्या बळावर ‘सेलिब्रिटी’ म्हणून मिरवणाNया स्त्री-पुरुषांचे बुरख्याआडचे गलिच्छ व्यवहार... यांतलं काहीच शोभा डे यांच्या नजरेतून सुटलं नाही. झगमगत्या जगाचे अंधारे कोनेकोपरे पालथे घालताना हाती लागलेल्या अशा अनेक गोष्टी त्यांनी या स्मरणयात्रेमध्ये मोकळेपणानं नोंदवल्या आहेत. निर्भीड आणि रोखठोक शैली हे शोभा डे यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य. त्याच वळणानं जाणा-या या स्मरणयात्रेत त्यांनी वेध घेतलाय् स्वत:चा... आयुष्याच्या हरेक टप्प्यावर अगदी सहज पायांखाली येत गेलेल्या अपरिचित वाटांचा, धडाडीनं शोधलेल्या नव्या दिशांचा आणि व्यक्तित्त्वाला आकार देणा-या व्यक्तींचा !मित्रांचा... आणि शत्रूंचा ! पारदर्शक सच्चेपणा हा या लेखनाचा प्राण आहे. त्यातूनच गवसते एका विलक्षण स्त्रीच्या बहुपेडी जगण्याची वीण... आणि ‘आख्यायिका’ बनून राहिलेल्या ‘शोभा डे’ या बहुचर्चित नावामागची जादूही !
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #SELECTIVEMEMORY#APARNAVELANKAR #SHOBHADE #अपर्णा वेलणकर #सिलेक्टिव्ह मेमरी
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAMANA 10-09-2000

    बहुरंगी व्यक्तिमत्त्वाच्या चाकोरीबाहेरील आठवणी... लौकिक अर्थाने स्त्रीची जशी वेगवेगळी रूपे असतात तशीच कर्तृत्ववान स्त्रीचीही अनेक रूपे असतात. प्रसंगानुसार भूमिका वठवावी लागते. महाराष्ट्राला अशा कर्तृत्ववान स्त्रियांची विशिष्ट परंपरा आहे. त्यातीलच एकमहत्त्वाचं नाव आहे शोभा डे! गेली तीन दशके हे नाव केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभर गाजत आहे. शोभा डे या मूळच्या मराठी. त्यांचे माहेरचे आडनाव राजाध्यक्ष. राजाध्यक्ष ते डे पर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजे सुखदु:खांच्या आठवणींचा पूल. इंग्रजी वृत्तपत्रांच्या वाचकांना त्या स्तंभलेखिका म्हणून परिचित आहेत, तर काहींना ‘स्टारडस्ट’च्या जुन्या संपादिका म्हणून. लहानपणापासून आयुष्यात काही तरी भव्यदिव्य, चाकोरीबाहेरच काम करण्याची महत्त्वाकांक्षा उराशी बाळगलेल्या डे यांनी अगदी मॉडेलिंगच्या क्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी केली. साधारणपणे २०-२५ वर्षांपूर्वी एखाद्या मराठी मुलीने ‘बिनधास्त’ वागून ‘मॉडेल’ बनण्याची इच्छा बाळगणं म्हणजे भलतंच धाडस! परंतु कौटुंबिक व सामाजिक विरोध झुगारून शोभा डे यांनी या क्षेत्रात पदार्पण करून तेथेही आपला ठसा उमटवला. या क्षेत्रातील बरे-वाईट अनुभव घेतले. ‘स्टारडस्ट’सारख्या फिल्मी मासिकाच्या संपादिका म्हणून त्यांचा ‘बॉलीवूड’मधील अनेक प्रसिद्ध कलाकारांशी जवळचा संबंध आला. विविध क्षेत्रांत काम करीत असताना आलेल्या अनुभवांची शिदोरी उघडावी असे आयुष्याच्या वळणावर कधी तरी वाटू लागते. शोभा डे यांनाही तसं वाटणे साहजिक आहे. लेखिका म्हणून त्यांची अनेक पुस्तके, कादंबऱ्या गाजल्या. त्यांची स्वत:ची लेखनाची खास शैली आहे. ती वाचकांना आवडली म्हणूनच त्यांची पुस्तके हातोहात संपतात. आयुष्याचे अर्धशतक पार करीत असतानाच त्यांचे ‘सिलेक्टिव्ह मेमरी’ (माझ्या आयुष्याची स्मरणयात्रा...) हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. हे आत्मचरित्र नसून आठवणींचा संग्रह आहे. एका लेखिकेची, मॉडेलची, संपादिकेची जडणघडण कशी झाली हे या पुस्तकावरून दिसून येते. या आठवणी व्यक्तिगत असल्या तरी वाचक नकळत त्यात मिसळून जातो. या पुस्तकाचा तेवढाच समर्थ व खुसखुशीत अनुवाद अपर्णा वेलणकर यांनी केला आहे. शोभा डे यांनी हे पुस्तक लिहिण्यामागची भूमिका अतिशय प्रामाणिकपणे पृष्ठ क्रमांक ५९४ वर स्पष्ट केली आहे. त्या म्हणतात, ‘मी स्वत:बद्दल लिहायचं ठरवलं, तेव्हाच एक गोष्ट निश्चित केली होती. माझ्या आयुष्याबद्दल जेवढं मला आनंदानं सांगावंसं वाटेल त्याबद्दल फक्त मी लिहीन. आयुष्याच्या एकेका टप्प्यावर स्वत:हूनच बंद केलेले क्लेशदायक कप्पे उघडून स्वत:ला रक्तबंबाळ करून घेणं माझ्या स्वभावात नाही. स्वत:बद्दल लिहिताना काही गोष्टी मी लपवल्या आहेत, ‘खासगी’ राहू दिल्या आहेत. हे खरं! पण हे विस्मरण नाही, चलाखी तर नाहीच नाही. विलक्षण सुखाचे, अतीव दु:खाचे काही क्षण ही माझी अत्यंत व्यक्तिगत, खासगी आणि मौल्यवान संपत्ती आहे. त्यातला थोडाही वाटा वाचकांबरोबर ‘शेअर’ करण्याची माझी तयारी नाही.’ ‘स्टारडस्ट’ची संपादिका म्हणून काम करीत असताना चंदेरी दुनियेतील त्यांना अतिशय विलक्षण अनुभव आले. डिंपल कापडियाचं जुगार खेळणं, अमिताभ बच्चनसारखा ‘दादा’ अभिनेता घरी आल्यानंतरचं त्याचं वागणं, नटनट्यांची लफडी ‘स्टारडस्ट’मधून उघड केल्यानंतर निर्माण झालेल्या वादळाला सामोरं जाणं, मॉडेलिंगच्या क्षेत्रांतील झगमगाट, ग्लॅमरस दुनिया, कॉलेजमध्ये व्याख्यान देण्याचा अनुभव, बड्या व्यक्तींच्या मुलाखती, कोर्टबाजीला सामोरं जाणं, कॉलेजजीवनातील बिनधास्त सोनेरी क्षण यांसारखे अनेक प्रसंग या पुस्तकात वाचनीय ठरले आहेत. स्वत:च्या आठवणींमध्ये वाचकांनाही सामील करून घेण्याची विलक्षण शक्ती या लेखनशैलीत आढळते. सर्व क्षेत्रं धाडसीपणाने पादाक्रांत करूनही मायावी दुनियेला न भुलता अथवा त्यात वाहून न जाता लेखिकेने आपले ‘स्त्री’पण व ‘आईपण’ जपले हे अतिशय महत्त्वाचे आहे. कौटुंबिक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून डे यांनी आपले बाहेरील विश्व जपले. त्यांनी स्वत:च याबाबत आपल्या मनोगतात म्हटले आहे, ‘‘या सगळ्याहून मला भावलं ते शोभा डे या स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वामध्ये रसरसून रुजलेलं आईपण...?’’ स्वातंत्र्यवादी विचारांचा एकारला हव्यास झुगारून मन:पूर्वक जोपासलेलं स्त्रीत्व! आधुनिक व्यक्तिवादाच्या शुष्क कोरड्या मोहात न पडता आयुष्याला लावलेली तजेलदार भावभावनांची प्रसन्न प्रेमळ तोरणं! या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लेखन हा व्यवसाय म्हणून स्वीकारल्यानंतर शब्द, कागद आणि लेखणी हा शोभा डे यांच्या जीवनाचा श्वास बनला आहे. आठवणी लिहून झाल्यानंतर एक जणू मोकळा श्वास लेखिकेनं घेतला आहे. तरुण-तरुणींनी या आठवणी आवर्जून वाचाव्यात. त्यातून निश्चितच काहीतरी मार्गदर्शन मिळेल. -माधव डोळे ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 30-04-2000

    प्रसिद्धीच्या झोतात राहिलेल्या बहुढंगी जीवनाची चित्तरकथा... स्पर्धा कोणतीही असो, शर्यत कितीही लांब पल्ल्याची असो, मला जिंकण्याचं व्यसनच होतं. व्हिक्टरी स्टँडवरची सर्वोच्च जागा फक्त आपल्यासाठीच असे मला वाटे. सर्वांपेक्षा पुढे, सर्वांपेक्षा श्रेष्ठ...तीच आपली जागा. अखेरपर्यंत आपण तिथेच राहणार... पराभव मला जणू ठाऊकच नव्हता. असा अहंकार... शोभा डे यांना स्वत:चीच जाणवलेली ही प्रतिमा... पन्नाशीत आल्यावर आपल्या आयुष्यातील निवडक स्मृतींना शब्दांकित करताना मात्र त्यांना वाटतं, ‘‘धावतपळत आयुष्य जगायची सवय झालेली माझ्यातली स्त्री या लेखनाच्या निमित्तानं प्रथमच घडीभर शांत उभी राहून स्वत:च्या भूतकाळाकडे कुतूहलानं बघतेय. मनातल्या मनात मोर्चेबांधणी करीत पन्नाशीनंतरचं आयुष्य हिमतीनं जगायचं, त्याही शर्यतीत जीव तोडून धावायचं ठरवते. मात्र एक फरक मनोवृत्तीत पडला आहे. शर्यतीत उतरायची उर्मी असली तरी जिंकण्याची ईर्षा उरलेली नाही... हा फरक... उतावीळपणा क्षोभ, चिडचिड, अस्वस्थता, बेचैनी, हट्ट, दुराग्रह यापासून अलिप्त होऊन अपार मन:शांतीपर्यंत पोहोचण्याची ही प्रक्रिया... तू सौम्य झाली आहेस. निवळली आहेस; असे परिचित व्यक्ती कदाचित म्हणतील पण हे निवळणे म्हणजे स्वत:चं व्यक्तिमत्व, स्वत:चा चार्म गमावणं तर नव्हे ना?’’ हा विचारही झटकून शोभा डे स्वत:लाच विचारतात, ‘‘सो व्हॉट? मी बदलले आहे. आणि बदलणारच. माझ्या स्नेही सोबत्यांनी या रूपात एक तर मला स्वीकारलं पाहिजे किंवा सहन केलं पाहिजे. पन्नाशीत पोचल्यावर मी कोवळी तरुणी का राहीन? का म्हणून? मला हे नवं रूप आवडतं आहे.’’ आणि या मूडमध्ये शोभा डे यांचे सिलेक्टिव्ह मेमरी हे आत्मवृत्तपर लेखन झाले आहे. हे पुस्तक म्हणजे माझ्यामधल्या बऱ्यावाईट क्षणांचा साथीदार.... या लेखनामुळे मी स्वत:च्याच आयुष्याकडे अलिप्तपणे पाहायला शिकले. स्वत:चीच परीक्षा घेतली. स्वत:चे मूल्यमापन केले. निष्कर्ष काढत... आयुष्य जाणून घेत. सगळ्या बऱ्यावाईट संचिताचा स्वीकार केला. समंजपणे...’’ रक्तबंबाळ होत मोठा रस्ता तुडवणं हे आत्मपर लेखन करणे काही सोपे नाही. ‘‘रक्तबंबाळ होत, वेदना सोसत एक मोठा रस्ता तुडवणं... वर्तमानाच्या उन्मादात जगताना भूतकाळाशी असणारे धागेच तोडून काढलेले ते पुन्हा जोडून पाहणे....’’ हा अनुभव म्हणजे आपणच जन्म दिलेल्या पुस्तकाच्या पानांनी आपल्याविरुद्ध कट रचलाय की काय अशी शंका येणे.’’ शोभा डे या मूळचा राजाध्यक्ष. सातारला जन्म. वडील गोविंद हरी राजाध्यक्ष सातारला स्पेशल मॅजिस्ट्रेट होते. तिसरी कन्या म्हणून आईच्या डोळ्यात अश्रू. परंतु या धाकट्या लेकीचा पायगुण चांगला ठरला. वडिलांना केंद्र सरकारचे असि. सॉलिसिटर म्हणून नोकरी मिळाली. दिल्लीला वास्तव्य घडले. आणि शोभा डे म्हणजे नुस्ता लाडोबा - आईचा पदर धरून दिवसभर तिच्या मागे फिरत राहायचे.’’ सातव्या वर्षांपर्यंत शाळेचे नाव नाही. दहाव्या वयापर्यंत आई-वडिलांच्या बेडरुममध्ये झोपण्याचा हट्ट... स्वत:चे फोटो काढून घ्यायची हौस... झकपक राहण्याचा राजेशाह शौक... भरपूर लाड... मनाविरुद्ध जरा काही झालं की थयथयाट! चर्चगेटचा श्रीमंत परिसर दहा वर्षे दिल्लीत राहिल्यावर वडिलांची कायदा मंत्रालयात जॉइंट सेक्रेटरी म्हणून मुंबईला बदली झाली. आरंभी घाटकोपरला वास्तव्य. पुढं चर्चगेटला फ्लॅट. त्या श्रीमंती एरियातील जीवनाला महानगरी वेग होता. भपकेबाज दुकानं, थिएटर्स, कॉफी हाउस, मुलांमुलींच्या रंगीबेरंगी गर्दीनं फुलून गेलेले कॉलेज कॅम्पस, युनिव्हर्सिटी आणि फाईव्ह स्टार हॉटेल्सचं झकपक श्रीमंती राम्राज्य... ‘‘मला माझ्या अस्तित्वाचा अर्थ गवसला.’’ असा साक्षात्कार झाला. चालण्याबोलण्यात बंबईया झाक आली. ‘‘टीन एज संपण्यापूर्वीच मी मनानं व शरीरानं पुष्कळच मोठी झाले. माझ्या अ‍ॅपियरन्स बदलला. शिष्टसंमत नसणाऱ्या असभ्य स्लंग भाषेतला रांगडेपणा मला आवडू लागला. पॉप म्युझिक, सिगरेट, तिघी बहिणी... नवनव्या अनुभवांची चटक... तिघींची अळीमिळी गुपचिळी मुक्त मनानं तारुण्याच्या उंबरठ्यावरची मजा भरपूर लुटता आली.’’ असं त्या काळाचं चित्र शोभा डे पुढे उभे करतात. आरंभापासून आकर्षण केंद्र रनिंगच्या ट्रॅकवर लहान गटातल्या स्पर्धेत भाग घेऊन पहिला नंबर हे आयुष्यात जिंकलेलं पहिलं बक्षीस. वेगाची नशा... स्पीड वाढावा म्हणून धडपड. स्वत:ची वेगळी आयडेंटिटी... लांब उडी धावणे. राज्य पातळीवरचे विक्रम. बास्केटबॉल, हॉकी... राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड. क्वीन्स मेरी स्कूलमधून एस.एस.सी.ची परीक्षा सेकंड क्लासमध्ये उत्तीर्ण. ‘प्रमाणपत्रांच्या फाईलमध्ये आणखी एक निरुपयोगी कागद जमा झाला.’ (३५) ही भावना, ‘माझ्या भावंडांच्या तुलनेत मी अभ्यासात मठ्ठ, अभ्यासात काडीचा रस नव्हता. वर्गाच्या चार भिंतीपलीकडचं आयुष्य मला जास्त आकर्षक वाटे. तिथंच आपल्या आयुष्याची दिशा गवसणार अशी त्यावेळी खात्री होती. (३६) झेव्हियर्स कॉलेजमध्ये प्रवेश सायकॉलॉजी व सोशॉलॉजीचा अभ्यास म्हणजे वेळ व्यर्थ दडवणे... त्यामुळे आयुष्यात मित्र आले. प्रेमाबिमाचा भानगडीत न पडता नुसती मैत्री... और बात बन गयी. कॉफी शॉप जॉन बेझची गाणी. कामूची पुस्तकं, सात्र्र आणि सत्यजित रे... मारिजुआना आणि रम... गुरुशर्टस, गळ्यात मोठ्या मण्यांच्या माळा... इतर सगळं जग तुच्छ. आपली जगण्याची पद्धत ग्रेट. वंडर फुल. सतत रुंजी घालणारे दोन बॉय फ्रेंडस... पण त्यांच्याशी प्रेमप्रकरणे मात्र फारशी लांबली नाहीत. लग्न करायचं; खूप मुलांना जन्माला घालायचं मॉडेलिंगच्या क्षेत्रात अलगद प्रवेश. ताजमध्ये फॅशन शो पाहण्यासाठी वडिलांचा पास घेऊन अठरा वर्षांची शोभा गेलेली.... एक उमदे गृहस्थ विचारतात, ‘‘तू कधी मॉडेलिंग केलं आहेस का?... केलं नसशील तर करून बघायला काय हरकत आहे?’’ आठवड्यातच ऑडिशन.. उशिरा जाऊनही निवड झाली. रुटीन जगण्यातून सुटका होणार याचा आनंद तऱ्हेतऱ्हेचे कपडे घालून ठराविक ठिकाणी शरीराला सेक्सी हेलकावे देत मॉडेलिंगच्या उतरत्या रँपवरून तरंगत जाणं... त्या चालण्याची अंगात झिंग भरते. हे कळल्यावर वडील नाराज... पण फेमिना इव्हज वीकली यांच्या कव्हरवर हा चेहरा झळकला... हँडमेड पेपरचा तंग स्लीव्हलेस ब्लाऊझ... घट्ट पँट... फेमिनात मुलाखत. ‘‘आयुष्यात तुझी महत्त्वाकांक्षा काय?’’ ‘‘टू गेट मॅरिड अँड हॅव लॉटस् ऑफ चिल्ड्रन. लग्न करायचं खूप मुलांना जन्माला घालायचं.’’ हे उत्तर. मॉडेलिंग ...शोभा डे यांच्या या मोजक्या अघळपघळ आठवणीत मॉडेलिंगच्या करियरमधले लोकविलक्षण अनुभव अनेक आहेत. त्या निमित्ताने झालेले दौरे, पंचतारांकित हॉटेलमधले मुक्काम, विमानप्रवास, बरोबरीच्या मॉडेल्सच्या मौजमजा, ‘‘माझ्या नवऱ्याचा फोन आला तर सांग की मॅडम टॉयलेटला गेल्या आहेत. किंवा जे सुचेल ते.’’ हॉटेलातले उत्कृष्ट ग्लास बॅगेत कोंबून त्या मॉडेलने रूम बॉयला मिठी मारून घेतलेले त्याचे मुके... बनारसी साडीवाल्याची तिने केलेली लूट... असे अनेक नमुने भेटतात. ‘टाइम’ साप्ताहिकासाठी एक फोटो हवा होता. तर त्यासाठी फोटोग्राफरने केलेली जय्यत तयारी. आणि खर्ची घातलेले असंख्य रोल्स. (७५) फॅशन मॉडेल म्हणून महाराजे, महाराण्या, उद्योगपती, उच्चभ्रू बायका यांच्याशी आलेला संपर्क. त्यामुळे बसलेले सांस्कृतिक धक्के... एका शाम्पूच्या जाहिरात कॅपेनसाठी केशरचना करताना कंडिशनर लावून, केसांना प्रेशर कुकरने वाफ देऊन, डोक्याभावेती सोडलेले वाफेचे झोत. शरीर सैल रिलॅक्स. केस कोरडे करून नंतर इस्त्री फिरवणे. त्यामुळे चमक. स्टारडस्ट ‘‘कॅन यू राइट?’’ स्टारडस्ट मासिकांच्या पहिल्याच अंकात राजेश खन्नाचे गुप्तपणे लग्न झालेय का? ही कव्हर स्टोरी. चिडलेल्या अंजू महेंद्रूच्या आईची मुलाखत. पहिला अंक चांगला खपला. खप वाढत राहिला. मसालेदार खमंग मजकूर निर्लज्ज धीटपणा... बेधडक आरोप-प्रत्यारोप. नटनट्यांची जवळून दिसलेली स्वभाव प्रवृत्तीची रूपे... झीनत, राखी, रेखा, संजीव कुमार, राजकपूर, अमिताभ, डिम्पल, उर्मिला मातोंडकर... ‘निष्ठा मैत्री विश्वास अशा मूलभूत मानवी भावभावनापासून फिल्मी मंडळी चार हात दूरच... पण या गोष्टींचं नाटक त्यांना उत्तम करता येतं... (१३४) दहा वर्षे स्टारडस्टचे काम शोभाजींनी बघितले. त्यामुळे खूष होऊन मालक नरी हिराने त्यांना रिटर्न टिकेट टू न्यूयॉर्क दिले. पहिला परदेश प्रवास झाला. न्यूयॉर्क शहराने भुरळ घातली. ‘आयुष्याचे नवे रंग, नवी चव, नवा स्वाद... सगळं काही मी न्यूयॉर्कमध्ये मनमुराद उपभोगलं... पॅरिसमधले काही दिवस... त्या काळातल्या काही शौर्यकथांचा मौल्यवान खजिना आपल्या घरच्या माणसांपासनूही लपवून ठेवावा असा होता. तसा तो लपवलाही (१६२). फसलेला प्रयोग नंतर नरी हिराने सोसायटी मासिक काढले. तेही चांगले खपू लागले. ‘स्टारडस्ट’ आपल्या लेखणीच्या बळावर चाललेय. फायदा नरी हिराला होतोय. आपण स्वत:चेच मासिक का काढू नये? या विचारातून सेलिब्रिटी या मासिकाचा आरंभ... त्यात झालेला तोटा... त्यामुळे झालेला मनस्ताप. (२०६-२४६). शेवटी त्याचे प्रकाशन थांबवण्याचा निर्णय... कोर्टकचेऱ्यातले खेटे... एकाकीपणा. शोभाजी आपल्या पहिल्या विवाहाची हकीकत फारशी सांगत नाहीत. ‘शोभा किलाचंद’ किलाचंद कुटुंबापासून अलग पडत जातात. परदेशी जाण्यासाठी एक पत्रकारितेची फेलोशिप मिळते. तयारी चालू असताना आठ दिवस आधी दिलीप डे यांच्याकडे योगायोगाने पार्टीला जाणे होते आणि विधुर दिलीप डे शोभाजींना त्या पार्टीतून बाजूला घेऊन लग्नाची ऑफर देतात. ‘परदेश प्रवास की लग्न’ असा पर्याय ठेवतो. शोभाजी लग्नाला पसंती देतात. किलाचंदशी घटस्फोट, दुपारी बारा वाजता आणि दीड वाजता दिलीप डे यांच्याशी लग्न. केवळ दीड तासांचे घटस्फोटितेचे जीवन... दिलीप डे बंगाली... त्यांना आधीच्या लग्नापासूनची दोन मुले. शोभा किलाचंद म्हणून आधीची मुले... दुसऱ्या लग्नानंतर आणखी दोन अपत्ये... या सर्व मुलांचे यथायोग्य संगोपन. कादंबरी लेखन वृत्तपत्रात स्तंभलेखन. पेंग्विनच्या डेव्हिड दावीदार यांनी कादंबरी लेखनासाठी दिलेली ऑफर... कादंबरीचे लेखन... तिला मिळालेला प्रतिसाद... पुढे एकापाठोपाठ एक आलेली पुस्तके... आंतरराष्ट्रीय ख्याती... स्वाभिमान मालिकेची पटकथाकार. यशाचे कीर्तीचे एकेक नवे शिखर. या सर्व अनुभव क्षेत्रांतील कर्तृत्वशाली वावर... आणि आपल्या यशापयशाकडे काहीशा अलिप्तपणे पाहण्याची आणि ते अनुभव मोकळेपणाने रंजक शैलीत मांडण्याची आकर्षक भाषिक क्षमता यामुळे ‘सिलेक्टिव्ह मेमरी’ हा भावनांचा एक विलक्षण पट खुले करणारा खजिना ठरतो. मराठीतल्या बहुतांश लेखक लेखिकांच्या वाट्याला असे वैविध्यपूर्ण जीवन सहसा येत नाही. त्यामुळे त्यांच्या कथाकादंबऱ्यांतून घडणाऱ्या जीवनानुभवांना मर्यादा पडते. अनुभवकथनाबरोबर चिंतनही येते. पण ते कुठेच बोजड होत नाही. मातृत्वाचा, अपत्यसंभवाचा अनुभव प्रत्येक स्त्रीला असतो. आदित्यच्या जन्माची घटना तिचे वर्णन (५५६-५५८) वाचताना या मातृत्वाचे एक आगळेच भान येते. पाहिलंपहिलं मातृत्व. नर्सने आदित्यचं गोड मुटकुळं माझ्या कुशीत आणून ठेवलं तेव्हा त्याच्या झोपाळू चेहऱ्यावर मी स्वत:च्या खुणा शोधत राहिले. माझ्या त्या छोट्या गणपतींच्या कपाळावर एक ठसठशीत जन्मखूण होती. मी प्रेमभराने त्या खुणेवर हलकेच ओठ टेकले. स्वत:च्या रक्तामांसातून जन्मलेली नाजुक कोवळा जीव... त्याच्या स्पर्शाची ऊब माझ्या छातीशी भिडली आणि ईश्वराच्या साक्षीने त्या क्षणी मी अंतर्बाह्य बदलून गेले... गर्भारपण, बाळंतपण आणि मातृत्व या तिन्ही टप्प्यांमधल्या स्वतंत्र वृत्तीच्या व्यवहारी स्त्रीवर मात करून समर्पित मातृत्वाचा झरा कधी झुळझुळू लागला हे माझं मलाही कळलं नाही. ‘अखेर कमाई’ या शेवटच्या प्रकरणात बरेच आत्मचिंतन आले आहे. आयुष्याच्या एकेक टप्प्यावर स्वत:हूनच बंद केलेले क्लेशदायक कप्पे उघडून स्वत:ला रक्तबंबाळ करून घेणं, आपल्या स्वभावात नाही. काही गोष्टी लपवल्या आहेत. खाजगीच राहू दिल्या आहेत. अशी स्पष्ट दिलेली कबुली. (५९४). अंतर्बाह्य प्रामाणिक काय लिहायचं याचा विचार करताना काय लिहायचं नाही हे ठरवणं त्यामुळेच क्रमप्राप्त ठरलं. या पुस्तकात भेटणारी स्त्री ‘शोभा डे’ पेक्षा नि:संशय निराळी आहे. असे वाचकांनी समजू नसे म्हणून त्या म्हणतात, ‘‘पण तेच माझं खरं रूप आहे... माझ्या आयुष्याची ही चित्तरकथा अंतर्बाह्य प्रमाणिक आणि पूर्णपणे सच्ची आहे.’’ (५९६) ‘‘आयुष्याचा समजूतदार स्वीकार म्हणजे काय ते आता माझं खरं रूप आहे. माझ्या आयुष्याची ही चित्तरकथा अंतर्बाह्य प्रमाणिक आणि पूर्णपणे सच्ची आहे.’’ (५९६) ‘‘आयुष्याचा समजूतदार स्वीकार म्हणजे काय ते आता उमगले आहे, सुखदु:ख, मान अभिमान यांची आवरणं गळून पडून माझ्यातली निखळ स्त्रीय मागं उरली आहे...’’ ही भावना आता प्रबळ आहे. ट्रॅडिशनल, जुनाट, कर्मठ हे वर्णन आपली कन्या अरुंधती हिनं केलेलं आपल्या गुपितावर नेमकं बोट ठेवतं... आपल्या आधुनिकतेचा आवरणाखाली मनात दडून बसलेली जुनाट, कर्मठ सनातनी स्त्री आपल्यापुढे उभी राहते. ही वास्तविकता आनंददायक वाटते असेही त्यांना वाटते. ‘मी माझ्या पद्धतीने जगले’ असे त्यांना समाधान आहे. शोभा डे यांच्या नाट्यपूर्ण बहुढंगी जीवनातले हे तपशील मूळ इंग्रजीतून अपर्णा वेलणकर यांनी अगदी मन:पूर्वक मराठीत आणले आहेत. शोभा डे यांची इंग्रजी भाषाशैली खून अर्थवाही पण गुंतागुतीची असते. अपर्णा वेलणकर यांनी त्यांच्या भावनात्मक आशयाचा गाभा स्वच्छ सुरेख मराठीत आणला आहे. कुठेही आपल्याला हे भाषांतर आहे असे जाणवू नये इतक्या सहजपणे हे लेखन केले आहे. स्वत: शोभाडे यांनीही त्याना मनापासून दाद दिली आहे. ‘बेटर दॅन दि ओरिजिनल’ असे प्रशस्तिपत्र दिले आहे. ‘आपल्या लेखनाला आलेला हा सुंदर झळाळ पाहून मी मनातून तृप्त झाले.’ ‘‘आपल्या स्वतंत्र डौलदार भाषेत माझ्या मूळ इंग्रजी पुस्तकातल्या मजकूराचा आत्मा ओळखून, त्यातल्या भावभावना पारखून माझ्या आयुष्याची कहाणी अपर्णाने सांगितली आहे... शोभा डे यांना मराठीशी आपली नाळ या अनुवादाने पुन्हा जुळलीय असे वाटते. साहजिकच मराठी वाचकांना हे पुस्तक दुहेरी आनंद देणारे आहे. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    प्रतिमेहुनि प्रत्यक्ष आगळे!... ऐन तारूण्यात चोहोबाजूंनी येणारे हाकारे ऐकत चोहीकडे धावणारी... ठेचा खात, रक्तबंबाळ होत, क्षणाक्षणाने आयुष्याचे संचित जमविणारी... अपरिचित, अनाम वाटांवर हट्टाने पाऊल रोवून आपल्या व्यक्तित्वाला नवनवे आयाम जोडणारी... उच्चभ्ू वर्तुळात यश-किर्ती आणि ऐश्वर्याने झगमगणारं संपन्न आयुष्य जगतानाही सच्चा जीवनानुभवाचं श्रेयस शोधण्यासाठी आसुसलेली अत्यंत खंबीर आणि विलक्षण पारदर्शी स्री! शोभा डे यांच्या ‘सिलेक्टिव्ह मेमरी’ या आत्मकथनाचा मराठी अनुवाद करणाऱ्या अपर्णा वेलणकर यांनी मनोगतात व्यक्त केलेलं हे मत पुस्तक वाचताना अत्यंत समर्पक असल्याचं जाणवतं. शोभा डे हे एक बिनधास्त व्यक्तिमत्त्व असल्याची प्रतिमा जनमानसात तयार झाली आहे. किंबहुना ‘वादग्रस्त’ हा त्यांच्याभोवतीच्या वलयाचा स्थायीभाव! त्यांचे ‘स्टारडस्ट’, ‘सेलिब्रिट’ सारख्या नियतकालिकांतील लिखाण, सव्र्हायव्हिंग मेन’, ‘स्टोरी नाइटस्’ ‘सोशलाईट इव्हिनिंग’ मधील स्री-पुरुष संबंधाचं खुल्लमखुल्ला चित्रण निरनिराळ्या वर्तमानातील त्यांची ही प्रतिमा तयार झाली आहे. अशा तर्हेने सार्वजनिक जीवनात ‘सेलिब्रिटी’ म्हणून वावरणाऱ्या काहीएक ‘इमेज’ आपोआपच तयार होत असते. कधी ती जाणीवपूर्वक त्या व्यक्तीकडूनच घडविली जाते, तर कधी त्या व्यक्तीच्या वागण्या-बोलण्यातून व्यक्त होण्यातून ती तयार होत असते. त्याबद्दल लोकांना दोष देण्यात अर्थ नाही. ‘शोभा डे’ नामक व्यक्तीची ही जी ‘इमेज’ तयार झाली आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल, त्यांचं आयुष्य जाणून घेण्याबद्दल कुतूहल लोकांना वाटल्यास नवल नाही. ‘सिलेक्टिव्ह मेमरी’ हे त्यांचं पुस्तक बऱ्याच प्रमाणात हे औत्सुक शमवतं, हे निश्चित! अर्थात पुस्तकाच्या शिर्षकात या आत्मकथनाची सीमारेषा अगोदरच त्यांनी रेखून घेतली आहे. ‘सिलेक्टिव्ह मेमरी’ हे पुस्तक म्हणजे माझ्यामधल्या परिवर्तनाच्या बऱ्या वाईट क्षणांचा साक्षीदार आहे’, असं दस्तुरखद्द लेखिकेनं म्हटलं आहे. त्याचबरोबर प्रारंभीच्या अर्पणपत्रिकेत कुटुबियांना पुस्तक अर्पण करताना, ज्याच्यापासून मी अजूनही काही गुपितं जपली आहेत...’ असं त्यांनीच म्हटलं आहे, तेव्हा ‘सिलेक्टिव्ह मेमरी’ हे पुस्तक म्हणजे शोभा डे यांचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व आणि त्याचं आयुष्य उलगडून दाखविणारं आत्मकथन नव्हे, एवडी खुणगाठ मनाशी बांधूनच हे पुस्तक वाचाव लागतं, हेही खरं! अर्थात त्यांच्या नेहमीच्या सदरांमधली वाचनीयता या पुस्तकात आहेच. जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन आणि वय व अनुभवपरत्वे त्यात होत गेलेले बदल त्यांनी प्रांजळपणे या पुस्तकात ग्रंथित केले आहेत. एका बालसुलभ औत्सुक्याने प्रत्येक गोष्ट अनुभवून पाहण्याची त्यांची जिज्ञासू वृत्ती, योगायोगाने झटके आणि आघात, तसेच कधी स्वत:च्या आतल्या आवाजाला प्रतिसाद देऊन घेतलेल्या साहसी निर्णयांनी त्यांचं आयुष्य गजबजलेलं आहे. वृत्तीनं आणि आर्थिकदृष्टयाही ‘मध्यमवर्गीय’ असलेल्या राजाध्यक्ष कुटुंबातील शोभा ही लागोपाठची तिसरी मुलगी. त्यामुळे काहीशा नाराजीच्या सुरातच तिचं स्वागत झालेलं परंतु तिच्या जन्मानंतर घराची काहीशी भरभराट झाल्याने नंतरच्या काळात तिला सगळ्यांनीच लाडावलेलं. या लाडावलेपणातून काहीसा हेकेखोर झालेला तिचा स्वभाव. पुढे क्रीडा स्पर्धातून वगैरे चमकल्याने मिळालेला आत्मविश्वास... मॉडेलिंगची अकल्पित चालून आलेली संधी... घरच्यांच्या विरोधात न जुमानता त्यात आलेली मुशाफिर... यातून कोवळी शोभा घडत गेली. मॉडेलिंगच्या निमित्ताने उच्चभ्रू वर्तुळात वावरण्याची संधी मिळाल्याने या वर्षाची वेगळीच मूल्य तिच्या अनुभवास आली, परंतु स्वत:वरील मध्यमवर्गीय संस्कारांनी त्यातला पोकळपणा आणण्याची विवेकबुद्धी शाबूत राहिलो, अशी कबुलीही त्या मनमोकळेपण देतात. सहज एका कामासाठी म्हणून अँड एजन्सीतल्या आपल्या मैत्रिणीला भेटायला गेलेल्या शोभाला लीव्ह चेकेन्स म्हणून त्या एजन्सीत ट्रेनी कॉपी रायटरची नोकरी मिळते. नव्या अनुभवाला समोर जायच्या त्यांच्या नित्याच्या ‘जिप्सी’ वृत्तीनं उचल खाल्ल्याने क्षणार्धात ती मॉडेलिंगला रामराम ठोकून लेखनाचा श्रीगणेशा करते. अर्थात आपल्या पूर्ण जाणीव तिला असतेच. हिरासारखा बॉस तिला सांभाळून घेतो. तिच्यातला बेधडकपणा ओळखून ‘स्टारडस्ट’ मार्केटमध्ये आणि फिल्मी वर्तुळात धुमाकूळ घालते. त्यातल्या मजकुरासकट निर्मितीमूल्यातील छछोरपणा हेच त्याचं बलस्थान ठरतं. या निमित्ताने पत्रकारितेची एक वेगळीच झिंग शोभाच्या प्रत्ययाला येते. हातूनच पुढे ‘सेलिब्रिटी’ ची कल्पना जन्म घेते. परंतु स्वत:च त्यांची सगळी उस्तवार करण्याच्या त्याच्या अति आत्मविश्वासाच्या हवा अचानक कधी निघून जाते. ते त्यांनाही कळत नाही. प्रचंड अपयश पदरी घेऊन पण त्याचबरोबर अनुभवाचं मोठं संचित घेऊन ते नियतकालिक अखेर विकावं लागतं. याचदरम्यान त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातही एक मोठे स्थित्यंतर येऊन जातं. पहिल्या नवऱ्यापासून घटस्फोट! व्यक्तिगत आणि व्यवसायिक आयुष्याची त्याची नाव एकाच वेळी अशी भरकटली होती, पण त्या परिस्थितीला हार जात नाहीत. आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रकारितेची एक शिष्यवृत्ती चालून येते आणि त्यावर स्वार व्हायचं त्या ठरवतात, परंतु नियतीच्या मनात काही वेगळंच असतं. परदेशी जाण्यापूर्वीच्या शेवटच्या काही दिवसात दिलीप डेबरोबर अकल्पित ओळख होते आणि त्या परदेशात जाण्याऐवजी दुसऱ्या लग्नबंधनात अडकतात. आपल्या व्यक्तिगत जीवनातील वा दुसऱ्या पर्वाच समंजस चित्र शोभा डे यांनी ‘सिलेक्टिव्ह मेमरी’ मध्ये उभं केलं आहे. या पुस्तकाचे खरे तर तीन भाग पाडता येतील. सुरुवातीचा शोभा राजाध्यक्षच्या जन्मापासून, तारूण्यातील पदापर्णापर्यंतचा, दुसरा मॉडेलिंगपासून सुरु झालेला संपादक, लेखिकेपर्यंतच्या प्रवासाचा करिअर सुरु आणि तिसरा दिलीप डेबरोबर लग्न केल्यानंतरचा व्यक्तिगत आयुष्यातील समृद्ध जीवनानुभवाचा या व्यामिश्र अनुभवांनी उत्तरोत्तर प्रगल्भ समंजस होत गेलेल्या शोभा डेचं हे आत्मकथन म्हणजे गंगेच्या उगमातील खळाळ ते पठारी प्रदेशातील तिचं शांत, घनगंभीर जलाशयात झालेलं रूपांतर असचं आहे. या वाटचालीत आपल्या हातून झालेल्या चुका, वाटेत भेटलेली चित्र-विचित्र माणसं त्यांच्याबद्दलची निरीक्षण निष्कर्ष, आपल्या जीवनाचं वाट फुटेल तिकडे भरकटलेलं तारूण्य, त्या भरकटण्यातून पदरी पडलेलं अनुभव, वयानुरुप आयुष्याकडे, निरनिराळ्या घटना व्यक्तींकडे पाहण्याची बदलत गेलेली दृष्टी आणि हे सगळं होत असताना नित्य नव्या अनुभवांना सामोरं जाण्याची व आटलेली उर्मी याचं समग्र दर्शन या पुस्तकात होतं. जत्रेत रमत-गमत फिरणाऱ्या लहान मुलासारखं सगळेच अनुभव उत्सुकतेनं घेण्याची लेखिकेची वृत्ती ठायी ठायी प्रत्ययाला येते. या स्मरणयात्रेत भल्या-भल्यांचे खायचे आणि दाखवायचे दात कसे वेगवेगळे असतात, हे त्यांनी नामोल्लेखाने सांगितले आहे. काहींबद्दलची आपली मत कालौघात कशी बदलावी लागली, हेही त्यांनी रेखा, जॅकी श्रॉफच्या संदर्भात सांगितलं आहे. एम. एस. हुसेन, आशा भोसले, अमिताभ बच्चन, व्ही. एस. नायपॉल, अरुण शौरी, शाहरुख, काजोल, झीनत अमान अशा निरनिराळ्या क्षेत्रातील व्यक्तींचे आपल्याला आलेले अनुभव आणि त्यातून आपल्याला दिसलेली या ‘ग्लॅमरस’ व्यक्तिमत्त्वांची दुसरी रुपेही त्यांनी कोणताही आडपडदा न ठेवता वा कुणाची भीडभाड न ठेवता या पुस्तकात नमूद केली आहेत. एवढंच नव्हे तर एकेकाळी करणाऱ्या आपल्याला तरुण मुलांनी केलेला बंडखोरपणा कसा खटकतो हेही त्यांनी कबूल केलं आहे. ‘लिबरल’ मातृत्वाच्या तारूण्याचं नाटक वठविण्याच्या अनाठायी अट्टाहासातून हाय-काय किंवा तथाकथित पुरोगामी स्रियांची कशी ससेहोलपट होते, हे शोभा डे यांनी इतरांच्या अनुकंपामय अनुभवातून मांडले आहे. शोभा डे नामक वादग्रस्त व्यक्तिमत्त्वाच्या स्रीबरोबर संसार करणाऱ्या दिलीप डे यांच्याकडे सहानुभूतीपूर्वक पाहणाऱ्या माणसाचं त्यांना हसू येतं. खरं तर मला घरांच्या चार भिंतीच्या आतलं जगच आवडतं, असं शोभा डे म्हणतात तेव्हा आश्चर्यानं थक्क व्हायला होतं. नवरा-बायकोला आपापलं स्वतंत्र खाजगी विश्व असावं हे त्यांना मान्य नाही. बिनधास्त इमेज असलेल्या शोभा डेंनी त्यांच्या मुलीच्या अरुंधतीच्या लेखी काय प्रतिमा आहे? ‘सिलेक्टिव्ह मेमरी’ चा उत्तरार्ध म्हणजे शोभा डे नाजूक गृहिणीचं, पत्नीचं, मातेचं हृदयस्पर्शी स्केचच आहे. आपल्या मुला-माणसात सर्वस्वानं गुंतून पडलेली ही स्री बाहेरच्या तिच्या प्रतिमेशी पूर्णपणे फटकून आहे. तिचे विचारही काहीसे आदर्शांची अपेक्षा करणारे, तरीही नव्या पिढीला त्यांच्या पातळीवर समजून घेण्यासाठी आसुसलेले असे आहेत. आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील वादळांची झळ आपल्या पिल्लांना लागू नये म्हणून डोळ्यात तेल घालून दक्ष असलेली, पतीबरोबरच्या समंजस सहजीवनात तृप्त, कृतार्थ झालेली ही स्री ‘आदर्श भारतीय नारी’ च्या संकल्पनेत बसणारीच आहे. तिचं आईपण निरनिराळ्या अनुभवातून तापूनसुलाखून निघतं. आपल्या आई-वडिलांबरोबरचे, भावाबहिणींबरोबरचे तिचे भावविश्व असेच परिपक्वतेनं वलयांकित झालेले आहेत. एक समृद्ध आणि वैचित्र्यांनी भरलेलं आयुष्य जगलेल्या स्रीचं हे ‘निवडक’ आत्मकथन केवळ वाचनीयच नाही तर वाचकालाही अनुभवसमृद्ध करतं. अर्थात यापलीकडेही काही शोभा डे उरतेच. जी केवळ तिच्यापुरती आणि तिच्यासाठीच आहे! तिचं हे आत्यंतिक खाजगीपण डहुळायचा अधिकार आपल्याला नाही. अपर्णा वेलणकर यांनी ‘सिलेक्टिव्ह मेमरी’चा केलेला हा मराठी अनुवाद, अनुवाद न वाटता मूळ लेखनच आहे; असं वाटावा इतका रसाळ आणि ओघवता उतरला आहे. मूळ लेखिकेच्या अंतरंगाशी, तिच्या जीवनानुभूतीशी हे केवळ अशक्य आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने जगावेगळं आयुष्य जगलेल्या एका यशस्वी स्रीचं आत्मकथन प्रकाशित करून मराठी वाचकांचं कुतूहलमिश्रित औत्सुक्य शमवलं आहे. ...Read more

  • Rating StarALKA GARUD 21.10.16

    शोभा डेंच्या "Selective Memory " चा अपर्णा वेलणकर यांनी केलेला अनुवाद हा आदर्श अनुवादाचा वस्तुपाठच म्हणावा लागेल. स्वतंत्र कलाकृती म्हणून नावाजावं अशी त्यांची सर्जनशीलता.

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

NAGZIRA
NAGZIRA by VYANKATESH MADGULKAR Rating Star
कृष्णा DIWATE

आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... *जंगल - काय असतं ?* म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? *जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल!* आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. *आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!* कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखकाने हे नागझिरा पुस्तक का बरे लिहिले असावे? मनोगतात ते स्वतः म्हणतात - *"महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलात जाऊन महिना दोन महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि या अनुभवाला शब्दरूप द्यावे हा विचार गेली काही वर्षे माझ्या मनात घोळत होता. काही परदेशी प्राणी शास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचण्यात आल्यापासून ही इच्छा फारच बळवली. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटले. मग शेल्लरने कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटते अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसे नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. मी शक्य तेव्हा एकट्यानेच उठून थोडेफार काम करत राहायचे ठरवले. कधी काझीरंगा, मानस या अभयारण्यावर, कधी नवेगाव-बांधावर तर कधी कोरेगावच्या मोरावर लिहित राहिलो.* *मला चांगली जाणीव आहे की हा प्रयत्न नवशिक्याचा आहे. तो अपुरा आहे, भरघोस नाही. त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, पण नव्या रानात शिरण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी वाट पाडावी लागते. पुढे त्या वाटेने ये-जा सुरू होते. मी लहानशी वाट पाडली आहे एवढेच!"* लेखक आत्ता असते तर त्यांना नक्की सांगितले असते की तुम्ही पाडलेली पायवाट आता जवळ-पास राजमार्ग बनत चालली आहे. आज अनेक वन्य-जीव अभ्यासक, जंगल भटके सुजाण व सतर्क झाले आहेत, जंगले आणि प्राणी वाचले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्या प्रयत्नांमागे लेखकासारख्या अनेक वनांचा अभ्यास करून ते आपल्यासमोर आणणाऱ्यांचा मोठा हात आहे. आज पक्षी-निरीक्षक किरण पुरंदरेंसारखे व्यक्ती शहरातील सगळा गाशा गुंडाळून जंगलात राहायला गेलेत ... काय नक्की thought -process झाली असेल त्यांची? फक्त जंगल-भटकंती करताना पाळावयाचे नियम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यत्वे-करून कुठल्याही वृक्षांचे, प्राणी-पक्ष्यांचे आपल्या असण्याने कुठलाही त्रास किंवा धोका - हानी संभवू नये, याची काळजी आपल्यासारख्या सुज्ञ भटक्यांनी नक्की घ्यावी. तरच हे भटकणे आनंद-दायी होईल. *भंडारा जिल्यातील नागझिरा हे एक अभयारण्य! फार सुंदर आहे.* हे पुस्तक फक्त लेखकाच्या दृष्टीने त्यांना भावलेलं जंगल आहे का? फक्त जंगलाचं वर्णन आहे का? तर नाही. एक पट्टीचा कथालेखक आणि मानव-स्वभाव चितारणारा लेखक केवळ वर्णन करू शकत नाही. माझ्या मते ही एक प्रक्रिया आहे, त्यांच्या अंतर्बाह्य बदलाची, जी त्यांना जाणवली, अगदी प्रकर्षाने. आणि तोच स्वतःचा शोध त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बाकी प्रत्येकाचं जंगल वेगळं, खरं जंगल नाही तर स्वतःच्या आतलं एक जंगल. ते ज्याचं त्याने शोधायचं, त्यात डुंबायच, विहार करायचा आणि काही गवसत का ते बघायचं .... लेखकानेही तेच केलं... एक स्वगत मांडलं आहे.... आणि त्यातून संवादही साधला आहे. हे पुस्तक ललित म्हणावे की कादंबरी, वर्णन म्हणावे की आत्मकथन, अशा हिंदोळ्यावर हे वाचताना मी सतत राहते. अतिशय आशयपूर्ण गहिऱ्या अर्थाचे लिखाण आहे यात. लेखकाने नागझिरा आणि त्याचे वर्णन कसे केले आहे ते आपण रसिक वाचकांनी हे पुस्तक वाचूनच त्याचा आनंद घ्यावा. ते इथे मी सांगत बसणार नाही, उगाच तुमचं आनंद का हिरावून घेऊ? मी इथे मला भावलेले लेखकच मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे, ते ही या पुस्तकाच्या माध्यमातून... पहिल्याच पानावर ते काय लिहितात बघा - *"गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या, दोनच वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थ सुद्धा दोन किंवा तीनच. स्वतःचे कामे स्वतःच करायची. पाणी आणणे, कपडे धुणे अंथरून टाकणे आणि काढणे या साध्या सुध्या गोष्टींसाठी माणसांनी दुसऱ्यावर का अवलंबून राहावे? एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्यय ही त्रिसूत्री पाळून जंगलात पायी भटकायचे, जंगलाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा या माफक अपेक्षेने गेलो आणि माझा काळ फार आनंदत गेला . रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्याच्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधी कंटाळा आला नाही. करमत नाही असे झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्न पडले असतील तर ती सकाळी आठवली नाही. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले."* हे वाचून आपल्याला नक्की काय हवे असते, आणि रोजच्या रहाटगाडग्यात आपण काय करतो, याची मनातल्या मनात तुलना व्हावी. खरंच काय हवं असतं आपल्याला? आपण सतत प्रेम, शांती, समाधान आणि मनःशांती याच्याच तर शोधात असतो ना? आणि नेमक्या ह्याच सर्व गोष्टी बाजूला पडून आपण नुसते धावतच असतो... कशासाठी?? जीवनाचं तत्वज्ञान हे फार गंभीर नाहीये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ते समजून घेऊन शकतो. फक्त ती जाण असली पाहिजे. थोडासा थांबून विचार झाला पाहिजे. मनःचक्षु उघडे पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी कुणीतरी मोठा , हा भाव पहिल्यांदा गाळून पडला पाहिजे. *अगदी तसंच जसं पानगळीच्या मोसमात जुनं पान अगदी सहज गळून पडतं ... नव्यासाठी जागा करून देतं ... जंगल आपल्याला हेच शिकवतं ... न बोलता ... त्याच्या कृतीतून ... आपली ते समजून घेण्याची कुवत आहे का?* शेवटच्या प्रकरणात लेखक परतीसाठी रेल्वे फलाटावर येतो. तेव्हाचचं त्यांचं स्वगत फार विचार करायला भाग पाडतं - *"ह्या दोन तासात करण्याजोगे असे काहीच महत्त्वाचे कार्य नसल्यामुळे मी आरशासमोर बसून दाढी केली, मिशा काढून टाकल्या. सतत अंगावर होते ते हिरवे कपडे काढून टाकले आणि इतके दिवस माझ्या कातडी पिशवीच्या तळाशी परिटघडी राहिलेले झुळझुळीत कपडे चढवून पोशाखी बनलो.`* किती साधी वाक्य आहेत, पण `पोशाखी बनलो` यातून किती काय काय सांगायचे आहे लेखकाला... गहिरेपण जाणवते! मला विचार करायला भाग पाडते. ट्रेक करून गड -किल्ल्यांहून परतताना माझीही अवस्था काहीशी अशीच व्हायची... जाड पावलांनी घरी परतणे आणि पुन्हा निसर्गात भटकायला मिळण्याची वाट पाहणे, याशिवाय गत्यंतर नसायचे. *जंगलांवर , निसर्गावर निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या अनेक वेड्यांमुळे आज आपली वसुंधरा टिकली आहे. पुढील पिढ्यांसाठी तिला असच बहरत ठेवायचं असेल, किमान टिकवायचं जरी असेल तरी आपणही थोडेसे निसर्ग-वेडे व्हायला काय हरकत आहे??* *वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे ...* धन्यवाद! जय हिंद!!! ...Read more