ALPHABETS ARE THE PILLARS OF LANGUAGE, SOCIETY, CULTURE. APART FROM SOME EXCEPTIONS, SINGLE LETTERS ARE MEANINGLESS! A MEANINGFUL SET OF TWO OR MORE LETTERS IS A `WORD`. MEANINGLESS SETS OF TWO OR MORE LETTERS ARE ALSO UNCOUNTABLE. SO WE ARE CURIOUS ABOUT HOW THE WORDS WERE FORMED AND WHO MADE THEM.
मुळाक्षरे भाषा, समाज, संस्कृतीचे आधारस्तंभ असतात. काही अपवाद सोडल्यास एकेकटी अक्षरे तशी अर्थहीनच! दोन वा अधिक अक्षरांचा अर्थवाही संच म्हणजे ‘शब्द’. दोन वा अधिक अक्षरांचे अर्थहीन संचदेखील अगणित असतात. त्यामुळे शब्द कसे तयार झाले असतील, कोणी बनवले असतील, याचे कुतूहल आपल्याला असतेच. काही निरर्थक अक्षरसंचांना अर्थ मिळतो व नवे शब्द तयार होतात. एका भाषेतला अर्थहीन अक्षरसंच दुस-या भाषेत शब्द असू शकतो. काही-काही शब्द वा अक्षरसंच वाचल्यावर कुतूहल चाळवले जाते, जसे ‘मरुला’, ‘टाटुराना’, ‘योक्टो’, ‘अँटार्टिकक स्टेअर’ वगैरे. शब्दांचा अर्थ कळला, त्यातले विज्ञान कळले की, गंमत वाटते; मनोरंजन होते व शब्दांची भुरळही पडते. अशाच काही शब्दांचा हा शब्दवेध...