* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SHADOW MAN
  • Availability : Available
  • Translators : UDAY BHIDE
  • ISBN : 9788184984231
  • Edition : 2
  • Publishing Year : OCTOBER 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 528
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
FBI AGENT SMOKY BARRETT IS NO STRANGER TO THE DARKER RECESSES OF THE HUMAN MIND. BUT NOTHING COULD HAVE PREPARED HER FOR THE DAY SHE HAD TO WATCH HER HUSBAND AND DAUGHTER DIE AT THE HANDS OF A SERIAL KILLER. SHE BEARS THE SCARS, MENTAL AND PHYSICAL. MOST PEOPLE WOULD RUN – FROM WORK, FROM LIFE, FROM EVERYTHING ASSOCIATED WITH THE PAIN OF A SHATTERED EXISTENCE. BUT SMOKY DOESN’T KNOW HOW TO RUN – AND WHEN THE JOB THAT HAS DEFINED HER LIFE COMES CALLING ONCE AGAIN WITH THE NEWS THAT HER BEST FRIEND FROM HIGH SCHOOL HAS BEEN BRUTALLY MURDERED, SHE FINDS HERSELF BACK IN THE FIRING LINE, CHASING A HIDDEN KILLER WHO WILL STOP AT NOTHING TO CONFRONT HER. FACE TO FACE.
एफबीआयसाठी स्पेशल एजंट म्हणून काम करणारी स्मोकी बरेट एकामागून एक खून करणा-या खुन्यांचा माग काढण्यात तरबेज होती; पण एका खुन्याने मात्र तिचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त केलं. तिच्या पतीला आणि मुलीला ठार मारून तिच्या चेह-याबरोबर आत्म्यावरही एक खोल जखम केली. ज्याच्यासाठी जगायचं; ते सगळं संपलं होतं.... आता काय करेल स्मोकी? रिव्हॉल्वरच्या नळीचा थंडगार स्पर्श ओठांनी अनुभवून; झटकन चाप ओढून सगळं एकदाचं संपवून टाकेल की तिच्या मानगुटीवर रहस्यमय अस्तित्वाची दहशत ठेवणा-या, बुद्धिमान पण विकृत मनोवृत्तीच्या ‘त्या सावली’चा शोध घेऊन छडा लावेल? रहस्यमय घटनांची गुंफण असलेली चित्तथरारक कादंबरी!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SHADOWMAN #SHADOWMAN #शॅडोमॅन #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #UDAYBHIDE #उदयभिडे #CODYMCFADYEN
Customer Reviews
  • Rating StarDnyaneshwar Garkal

    Supabaab !!!

  • Rating StarPooja Kuchekar

    एकदातरी वाचायलाच हवं😨👉 "शॅडो मॅन"🤙

  • Rating StarDAINIK SAMANA 30-08-2015

    कोडी मॅकफॅदियेन हा लेखक मूळचा वेबसाईट डिझायनर म्हणून पोटापाण्याचा व्यवसाय करीत होता. १९८६ मध्ये टेक्सासला हा जन्मला. ‘शॅडोमॅन’ ही त्याची पहिलीच कादंबरी. तुफान गाजली अन् अफाट खपली. नंतर आली ‘फेस ऑफ डेथ’ तीही बेस्टसेलर ठरली. प्रस्तुत कादंबरीत स्मोकी बेट नामक एक सुंदरी असून ती असते एफबीआय या गुप्तहेर संघटनेची स्पेशल एजंट. एकामागून एक खून होतात. या भयानक मालिकेची खुनी कोण आहे याचा शोध घेते. ती अत्यंत निष्णात गुप्तहेर असूनही एक खुनी माणूस मात्र तिला आपल्या जाळ्यात असा काही गुंतवतो की, तिचा संसार विस्कटून जातो. एवढे नाही तर तिच्या पतीला तो खुनी इसम ठार मारतो. हे कमी वाटते म्हणून की काय, तिच्या मुलीचाही मुडदा पाडतो. तिला भयानक मानसिक धक्का बसतो. ज्यासाठी आणि ज्याच्यासाठी जीवन जगायचे तेच नाहीसे झाल्यावर करायचे काय? हाच एक प्रश्न तिला सतत सतावतो. आत्महत्या करावी की बदला घ्यावा. याचा निर्णय तिला घेणे कठीण होऊन बसते. सतत ‘खुनी साया’ तिच्यावर हुकूमत गाजवतो. तो छायापुरुष हुशार असतो, परंतु विकृत मनोवृत्त्तीमुळे वाया गेलेला असल्याने ती प्रतिबिंबाद्वारे बिंबाचा शोध घेते का ? याचे उत्त्तर मिळविण्यासाठी वाचायला हवी. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more