* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SHANTARAM
  • Availability : Available
  • Translators : APARNA VELANKAR
  • ISBN : 9788184980530
  • Edition : 4
  • Publishing Year : APRIL 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 1428
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A NOVEL OF HIGH ADVENTURE, GREAT STORYTELLING AND MORAL PURPOSE, BASED ON AN EXTRAORDINARY TRUE STORY OF EIGHT YEARS IN THE BOMBAY UNDERWORLD. ‘IN THE EARLY 80S, GREGORY DAVID ROBERTS, AN ARMED ROBBER AND HEROIN ADDICT, ESCAPED FROM AN AUSTRALIAN PRISON TO INDIA, WHERE HE LIVED IN A BOMBAY SLUM. THERE, HE ESTABLISHED A FREE HEALTH CLINIC AND ALSO JOINED THE MAFIA, WORKING AS A MONEY LAUNDERER, FORGER AND STREET SOLDIER. HE FOUND TIME TO LEARN HINDI & MARATHI, FALL IN LOVE, AND SPEND TIME BEING WORKED OVER IN AN INDIAN JAIL. THEN, IN CASE ANYONE THOUGHT HE WAS SLACKING, HE ACTED IN BOLLYWOOD AND FOUGHT WITH THE MUJAHEDEEN IN AFGHANISTAN... AMAZINGLY, ROBERTS WROTE SHANTARAM THREE TIMES AFTER PRISON GUARDS TRASHED THE FIRST TWO VERSION. IT`S A PROFOUND TRIBUTE TO HIS WILLPOWER... AT ONCE A HIGH-KICKING, EYE -GOUGING ADVENTURE, A LOVE SAGA AND A SAVAGE YET TENDERLY LYRICAL FUGITIVE VISION. TIME OUT ‘EXTRAORDINARILY VIVID...A GIGANTIC, JAW-DROPPING, GRITTILY AUTHENTIC SAGA` DAILY MAIL ‘POWERFUL AND ORIGINAL... A REMARKABLE ACHIEVEMENT` SUNDAY TELEGRAPH ‘VIVID AND COMPASSIONATE... IMPRESSIVE` GUARDIAN ‘A PUBLISHING HENOMENON` SUNDAY TIMES
दूर देशाहून आलं होतं एक गोरं पाखरू. पळून आलं होतं. तुटलं होतं माणसांपासून... मातृभूमीपासून... जगण्यापासूनच! मागावर असलेले पोलीस आणि स्वत:च्या डागाळलेल्या आयुष्याची लाज वाटणारं मन यापासून त्याला पळून जायचं होतं... लपून राहायचं होतं.ते उतरलं होतं मुंबईत. अंधारी, काळी, कलकलाटाची दुनिया. पिचलेली... तरीही ताठ उभ्या कण्याची! क्षणात नरडीचा घोट घेणारी, क्षणात प्रेमाची पाखर घालून पोटाशी कवटाळणारी दुनिया! घर सुटलेलं, कुटुंब तुटलेलं, जिवलग दुरावलेले, अशा शून्य अवस्थेत भिरभिरणारं ते एकुट पाखरू शिरलं मुंबईच्या कुशीत. – आणि बघता बघता सारं बदललं. एक नवीच दुनिया उलगडत गेली. प्रेमाचा पाऊस... द्वेषाचा जाळ... विश्वासघाताचे सुरे... रहस्यांचं चक्रव्यूह आणि गुपितांच्या गुहा! शरीरसुखाच्या उफाळत्या लाटांवर नाचणारा उत्कट प्रणय आणि तुरुंगाच्या अंधारकोठडीतला रक्तरंजित छळ. जगण्याच्या लढाईत धगधगणा-या झोपड्या आणि पंचतारांकित हॉटेलातलं थंडगार ऐश्वर्य. अंडरवल्र्डमधल्या टोळीयुद्धांच्या चिखलात रुजलेली तत्त्वज्ञानाची कमळं आणि बॉलीवुडच्या झगमगाटाआडचा सुन्न अंधार. या कहाणीत काय नाही? तिच्या पोटाशी आहे पंखांवर खिळे ठोकणा-या नियतीला झुगारून, जगण्याचा अर्थ शोधत भिरभिरणारं एक पाखरू, त्याच्या पंखांवरचे प्रेमाचे रंग आणि एक शहर – मुंबई.
`द फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स, न्यू दिल्ली` तर्फे`शांताराम` या पुस्तकाच्या मुखपृष्टासाठी प्रथम पुरस्कार २०१०

No Records Found
No Records Found
Keywords
"#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #SHANTARAM #SHANTARAM #शांताराम #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #APARNAVELANKAR #अपर्णावेलणकर #GREGORYDAVIDROBERTS "
Customer Reviews
  • Rating StarNitin Marathe

    अभिनय व लेखनाची आवड , प्रथमोपचारा चे ज्ञान आणि सामान्य लोकांच्या भले पणावर विश्वास असणारा हा तरुण. प्रस्थापित सत्ते विरूद्ध उठाव करता करता वाईट संगतीमुळे ड्रग च्या नशे चा बळी,त्या मुळे बँका लुटायचे सत्र , घट स्फोट व शेवट तुरुंगात. पण नंतर हा ऑस्ट्ेलिया मधून तुरुंग फोडून फरार होतो व बनावट पासपोर्ट वर 1982 मध्ये भारतात प्रवेश करतो. मुंबई मध्ये काही दिवस सामान्य हॉटेल मध्ये राहिल्यावर मराठी मित्राबरोबर जळगाव च्या जवळ मित्रा च्या गावात सहा महिने मुक्काम. या दिवसात मराठी वर शिव्यांच्या बारकाव्या सहित प्रभुत्व. इथेच मित्रा ची आईने शांताराम असे बारसे करते. गावाकडून परतल्यावर कुलाब्याच्या झोपडपट्टीत मुक्काम कारण बरोबर आणलेला पैसा खतम. तिथे याच्या लिंडसे या नकली नावाचे " लिन बाबा " असे नामकरण त्याचा मित्र करतो.विदेशी नागरिकांना currency बदलून देणे ,गांजा हशीश पुरवणे असे उद्योग करून गुजराण करू लागतो. या ही दिवसात झोपडपट्टीत प्राथमिक वैद्यकीय सेवे करता दवाखाना चालवतो आणि तेथील स्थानिक लोकांच्या जीवनाशी सर्वर्था ने एकरूप होऊन जीवनाचा आनंद घेत असतो . या माणसाने मुंबई तील फोर्ट भागातील गल्ली न गल्ली पाया खालून घातली. लिओपोल्ड या इराणी कॅफे / बार मध्ये तासन तास विदेशी मित्रां बरोबर पडीक. मुंबई तील गुन्हेगारी,त्या मध्ये इराणी , अफगाणी , लेबानिस , पाकिस्तानी आणि नायजेरी टोळ्यांचा सहभाग. विदेशी चलन , बनावट पासपोर्ट / विसा , ड्रग राकेट आणि वेश्याव्यवसाय या सर्व गैर धंद्या ची सखोल माहिती. या सर्व गोष्टी वाचून आपण चकित होऊन जातो. आपल्याला मुंबई च्या गुन्हेगारी विश्वाचे नागडे दर्शन होते. या नंतर त्याचे प्रेमप्रकरण आणि मैत्रिणी करता कुंटन खान्या च्या मॅडम बरोबर पंगा घेतल्या मुळे हा हकनाक आर्थर रोड च्या जेल मध्ये पिचत पडतो. जेल मधले त्याचे अनुभव वाचून अंगावर अक्षरशः शहारे येतात. local डॉन पैसे देऊन याची सुटका करवतो. नंतर हा त्या डॉन साठी foreign currency आणि बनावट पासपोर्ट च्या धंद्यात काम करू लागतो. आता पैसा त्याच्या पायाशी लोळत असतो. या पुस्तकात जागोजागी जीवन , मित्र, प्रेम आणि ईश्वरा विषयीचे तत्वज्ञान , भारतीय लोकां चा जगण्यातल्या साध्या साध्या गोष्टीचा आनंद घ्यायची वृत्ती आणि मुंबई तील झोपडपट्टी मधील दादागिरी ते आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी अशा वेगवेगळ्या गोष्टी हातात हात घालून वावरत आहेत. कौतुक याचे वाटते की हा विदेशी माणूस झोपडपट्टी किंवा भारतातली गरिबी याची तक्रार करत नाही तर येथील लोकांच्या जिंदादिली मुळे , आयुष्य जगणं कसे सोपे होते ते सांगतो. भारतीय लोक दिवस भर हिंदी गाणी गात , चित्रपट बघत , वेग वेगळे सण साजरे करत जीवनाचा उत्सव करतात असे त्याला वाटते. आजही मुंबई ला तो आपले Home town मानतो. शेवटी तो डॉन च्या आग्रहा मुळे अफगाणिस्तान मध्ये तेथील युद्धात भाग घेण्यास जातो. हा सर्व भाग अविश्र्वनिय आहे. शेवटी ही एक कादंबरी आहे पण यातील बराचसा भाग लेखकाने अनुभवला आहे. आपल्याच मुंबई ची आणि तेथल्या रगेल आणि रंगेल जनतेची ग्रेग आपल्याला वेगळीच ओळख करून देतो. आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ... मराठी वर प्रेम करणाऱ्या ग्रेग ने मराठी अनुवाद केलेली प्रकरण ऐकून हे भाषांतर आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट भाषांतर आहे अशी अपर्णा वेलणकर यांना पावती दिली. कारण ही कादंबरी 38 भाषांमध्ये translate झाली आहे. अपर्णा ताईंचे कौतुक जेवढे करावे तेवढे थोडेच , कारण आपण अस्सल भारतीय गोष्ट वाचतोय असे वाटते. ...Read more

  • Rating StarSwamish Naik

    हे पुस्तक काही वर्ष आधी वाचाय चा योग्य आला ... खूप पाने आहेत आधी तर उचलू कि नाही असा झाला ... पण लेखकांची अक्खी दुनिया भावली आहे खिळली आहे ... काय ते लिखाण काय ती पात्र वाह !

  • Rating StarShriprasad Kulkarni

    लॉकडाउन च्या पार्श्वभूमीवर पुण्यावरून गावाकडे निघत असताना माहीत होतं की हा मोठ्ठा टप्पा, त्यात घरातून काम (वर्क फ्रॉम होम) त्यात आमच्या सिटीबँकेच्या च्या रामनवमी, पाडवा, महावीरजयंती या आणि अश्या बऱ्याच सणांच्या सुट्ट्यामुळे महिनाभरात जवळपास फक् 10-12 दिवस ऑफिस. घराबाहेर कोरोना. त्यात वडील मोबाईल मध्ये जास्त डोकं घालू देत नाहीत. ☺️ तर घरात हा इतका वेळ घालवायचा तर पुस्तकच पाहिजे, तेही तितक्याच तोलामोलाचं. खिळवून ठेवणारं. मागे जवळपास सहा महिन्यांपूर्वी अविनाश धर्माधिकारी सरांनी "शांताराम" च्या अपर्णा वेलणकर यांनी केलेल्या मराठी अनुवादाचा उल्लेख केला होता. सरांनी सांगितलं म्हणून मागवलं पुस्तक. पुस्तक 1400 पानांचं, म्हणून वाचायची ताकत झाली नाही कधी.फक्त घरातल्या बुक शेल्फ ची शोभा वाढवत होतं. पण या अश्या मोकळ्या आणि निवांत वेळेसाठी पुस्तक कोणतं घ्यायचं, लागलीच "शांताराम" डोक्यात आलं,म्हणून गावाकडे निघताना उचललं आणि टाकलं गाडीत. तर "शांताराम" लिहिलंय ग्रेगरी डेव्हिड रोबर्ट्स यांनी. हो लेखक विदेशी आहे, ऑस्ट्रेलिया चा. मागे पाचएक वर्षाखाली शांताराम ची मूळ इंग्रजी आवृत्ती वाचलीय. त्यावेळेस उद्देश होता इंग्रजी वाचुन इंग्रजी सुधारण्याचा. खरंच फरक पडला. एकाच पुस्तकात थरार आहे, रोमान्स आहे, साहस- ऍडव्हेंचर तर आहेच सोबत आहे तत्वज्ञान तेही तुम्हा आम्हाला रुचेल आवडेल पटेल अश्या भाषेत. त्यामुळे पुस्तकाचा जॉनर- शैली सांगणं अवघड. असो, "डेव्हिड" कथेचा नायक, स्वतः लेखक - जेमतेम विशीतला. सशस्त्र दरोड्याचा गंभीर आरोपाखाली वीस वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेला, ऑस्ट्रेलियातील तुरुंग फोडून पळाला, ऑस्ट्रेलिया चा "मोस्ट वॉन्टेड मॅन" ज्याचं नाव इंटरपोल च्या यादीतही आहे. न्युजिलँड मार्गे लिंडसे नावाने बनवलेल्या बनावट कागदपत्राद्वारे सत्तरीच्या च्या दशकात मुंबईत येतो. आणि पुस्तकाच्या पहिल्या पानापासून थरारक कहाणी सुरू होते. "लिंडसे" मुंबईत पाऊल टाकतो आणि या शहराच्या प्रेमात पडतो. मुंबईत आल्या आल्या गाईड म्हणून प्रभाकर उर्फ प्रभू त्याला भेटतो, नंतर तो त्याचा एकदम जवळचा मित्रही होतो. प्रभाकर लिंडसे ला "लिन" असं नाव देतो. कार्ला सारखी मैत्रीण भेटते सोबत डीडीयर, उल्ला, मोदेना या पत्रांभोवती कथा फिरत राहते. कार्ला च्या एकतर्फी प्रेमात पडतो. गाईड प्रभूचं काम असतं मुंबई ची ओळख करून देणं, इथली चाल चलन शिकवणं. प्रभुही एकदम हाडाचा गाईड, तो शहरातल्या वैध अवैध गोष्टी कश्या चालतात याची एका पाठोपाठ रोज एका ठिकाणी घेऊन जाऊन माहिती देतो. त्याला मराठी शिकवतो हिंदी सुद्धा. प्रभू लिन ला मुंबई सोडून खरा भारत कसा आहे हे दाखवायला त्याच्या जळगाव जिल्ह्यातल्या त्याच्या गावी घेऊन जातो. लिन च्या नजरेतून गावाची संस्कृती वाचायला मजा येते. लिन साठी भारतीय पद्धतीने तांब्याने बकेटातील पाणी खांद्यावर घेऊन अंघोळ करायचा अनुभव सुद्धा एकदम नवीन असतो. पिके चित्रपटातील परग्रहावरून आलेल्या पिकेप्रमाणे लिनबाबा ची अवस्था असते. परत मुंबई. परत कार्ला, उल्ला, डीडीयर,मोदेना आणि अशी इतर पात्र येत राहतात, आणि पुढे अंडरवर्ल्ड चा थरार, वेश्याव्यवसाय, ड्रग्स हे सर्व चालू असतंच पण मुळात शांताराम मध्ये आहे प्रेम. प्रेम- दोन मित्रातलं, प्रेम- इथल्या लोकांवरचं, प्रेम-मुंबई शहरावरचं, भारतीय संस्कृती वरचं. इथल्या भाषेवरचं. मग त्याला इतकं सगळं इथलं आवडलंय तर लिन परत ऑस्ट्रेलिया जातो का? तो इतक्या मोठ्या बेस्ट सेलर पुस्तकाचा लेखक झाल्यावर त्याला त्याचा देश स्वीकारतो का? की राहतो इथेच आपल्या देशात. यांची उत्कंठा शेवट पर्यंत असतेच पण त्यासोबत आणखीन एक प्रश्न पूर्ण पुस्तक वाचत असताना सतत आपल्या डोक्यात असतो, पुस्तकाचं नाव "शांताराम" कशामुळे? कारण एकही पात्र नाहीये ज्याचं नाव शांताराम आहे. त्याचं उत्तर मिळतं पुस्तकाच्या मध्यात. मराठी अनुवाद माझाही अजून पूर्ण वाचून झाला नाहीये. पण इतकं मात्र नक्की. "शांताराम" हातात घेतला की खाली ठेववत नाही. खिळवून ठवतो. वाचनीय आणि संग्रहनिय असं पुस्तक. ...Read more

  • Rating StarHemant Suryavanshi

    ग्रेगरी राॅबर्ट ची "शांताराम" उत्कृष्ट आहे....

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
अनिरुद्ध गुप्ते, नागपूर.

स्वतः लेखक समोर बसून गप्पा मारत आहेत असा भास होतो. सर्वच कथा सुंदर आहेत. पुस्तक पुर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेववत नाही, ह्यातच लेखकाचे यश आहे. *"मोबाईल माॅकरी"* कथेत पात्रांविषयी उत्सुकता निर्माण होते. *अगा, जे घडलेचि नाही* कथेतील इलेक्शन ड्यूीचा अनुभव मस्त कथन केला आहे. *थर्मास* सर्वोत्तम असे माझे मत आहे. लेखकाचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा !! ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more