* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CALM AT WORK
  • Availability : Available
  • Translators : SUNANDA AMRAPURKAR
  • ISBN : 9788177666595
  • Edition : 4
  • Publishing Year : JANUARY 2006
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 320
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SELF HELP, HEALTH & PERSONAL DEVELOPMENT
Quantity
Buying Options:
  • Print Books:
DO YOU FEEL THE STRESS AT WORK? DO YOU FIND IT VERY HARD TO FINISH THE DAILY TASKS? THEN THIS BOOK IS JUST THE RIGHT ONE FOR YOU. THE MAIN AIM OF THE BOOK IS NOT JUST TO DISCUSS YOUR PROBLEMS BUT TO PROVIDE YOU WITH SOLUTIONS FOR THE SAME. THE AUTHOR HERE WANTS TO ASSURE YOU OF THE WAYS TO MAKE YOUR DAILY BUSINESS A WONDERFUL EXPERIENCE. EACH AND EVERY PAGE OF THIS BOOK WILL REVEAL THE SECRETS OF FINDING PEACE AND ENTERTAINMENT IN THE ROUTINE WORK YOU WERE FINDING VERY BORING TILL TODAY. THIS BOOK WILL SUGGEST YOU THE WAYS TO MAKE YOURSELF MORE USEFUL FOR YOUR OWN BETTERMENT. HE HAS PENNED DOWN EVERYTHING VERY CAREFULLY, AFTER A LOT OF RESEARCH, STUDY, AND TESTS. WORK IN AN ENVIRONMENT WHICH IS POSITIVE AND WHICH IS ALSO TENSION FREE AND ENJOY THE PLEASURE OF BEING PEACEFUL.
कामाचा ताण जाणवतो? रोजचे काम तुम्हांला ओझ्यासारखे वाटते का? मग हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. पुस्तकाचा उद्देश तुमच्या प्रश्नांचा नुसता ऊहापोह करणे, हा नसून त्याची उत्तरे शोधणे हा आहे. तुमचा व्यवसाय करणे तुम्हांला आनंददायक कसे करता येईल, हेच लेखकाला सांगायचे आहे. त्याच त्याच वंÂटाळवाण्या कामात शांतता, समाधान मिळवण्याचे मार्ग तुम्हांला या पुस्तकाच्या प्रत्येक पानात दिसतील. काम करताना तुम्हांला स्वत:कडूनच अपेक्षित असलेली सर्व मदत कशी घेता येईल, याचे सोपे उपाय या पुस्तकात दिलेले आहेत. हे सर्व उपाय सर्वांगीण अभ्यास करून, संशोधन, चाचण्या करून मगच तुमच्यापर्यंत पोचवले आहेत. तणावरहित, सकारात्मक वातावरणात काम करा. आणि शांत होण्याचा आनंद अनुभवा.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #CALMATWORK #SUNANDAAMARAPURKAR #PAULWILSON #SHANTATENAKAAMKARA #सुनंदा अमरापूरकर #शांततेनं काम करा!
Customer Reviews
  • Rating StarSAPTAHIK SAKAL - 13-01-2007

    रोजच्या कामातून आनंदाची जाणीव… कामातून वेळ होत नाही, श्वास घ्यायलाही फुरसत नाही, अशी वाक्यं नेहमीच ऐकायला येतात. काळ-काम-वेग यांचे गणित प्रत्यक्ष व्यवहारात चुकतच जाते, असा सर्वसाधारण अनुभव असतो. ‘शांततेनं काम करा’ हे सुनंदा अमरापूरकर यांचे अनुवादित ुस्तक सर्वांनाच उपयोगी होते. पॉल विल्सन हे या पुस्तकाचे मूळ लेखक, त्यांनी कारकून, कंपनीचा मुख्य अधिकारी, सल्लागार मालक, तसेच ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करताना घेतलेल्या अनुभवांमधून हे पुस्तक लिहिले आहे. त्याचा ओघवता अनुवाद करण्याचे काम लेखिकेने केले आहे. रोजच्या कामांचा, व्यवसायाचा, तिथल्या घडामोडी, सहकारी यांचा परिणाम व्यक्तीच्या मनावर हात असतो. या साऱ्यातूनच प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व घडत-बिघडत असते. हे लक्षात घेऊन मनाचे आरोग्य सांभाळणारी चतु:सूत्री, कामाच्या ठिकाणी ताण देणारे सप्तरंग, स्वत:च्या आवडीनिवडी, सवयी, ताणमागची शारीरिक कारणं, ताणाला आमंत्रण देणारी जीवनपद्धती यांचा सोप्या भाषेतील परिचय पुस्तकात आला आहे. ‘शांततेच्या दिशेने पाहिले पाऊल’, ‘तुमची शांतता उपयांची फाईल’ आणि दीर्घकालीन शांततेसाठी अशा तीन विभागातील छोट्या-छोट्या प्रकरणांमधून पुस्तकाची मांडणी झाली आहे. प्रत्येक प्रकरणामध्ये सर्वसामान्य वाचकाला मोलाच्या सूचना देणाऱ्या मार्मिक, नेटक्या चौकटी हे या पुस्तकाचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल्र कामातील कंटाळवाणा भाग, सहकाऱ्यांशी होणारा वाद-संवाद, स्वत:बद्दलच्या तुमच्याइतरांच्या अपेक्षा, स्पर्धा यांचा येणारा ताण या सर्वांकडे सकारात्मक नजरेने पाहिले पाहिजे. तसे करणे शक्य आहे, असा विश्वास आणि दिलासा या पुस्तकामुळे मिळतो. काम करताना येणारा ताण, होणारा मनस्ताप या साऱ्यांनाच आपण स्वत:च जबाबदार असतो. आणि या सर्व गोष्टींना ओलांडून, कामकाज, व्यवसाय आणि दैनंदिन कामातून आनंद मिळविण्याची जबाबदारीही आपल्यावरच असते, याची जाणीव हे पुस्तक करून देते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KAHANI PAHILYA AAGINGADICHI
KAHANI PAHILYA AAGINGADICHI by RAJENDRA AKLEKAR Rating Star
Sainath Chawali

श्री राजेंद्र आकलेकर लिखित कहाणी पहिल्या आगीनगाडीची हे पुस्तक आज वाचून झालं.भारतामध्ये 16 एप्रिल 1853 रोजी 3:30वाजता बोरीबन्दर ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली.धावण्यापूर्वी ही रेल्वे भारतात सुरू करण्यासाठीचा लढा,चळवळ यातील अधिकारी लोकांनी केलें प्रामाणिक काम माणसाच्या , वाचकाच्या मनाला क्षणभर विचार करायला लावत.जेम्स बर्कले ने पहिला वहिला भारतातील रेल्वे मार्ग बांधला हे आजच्या पिढीतील क्वचित लोकांना माहिती असेल.लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं.रॉबर्ट स्टीफन्सन यांच्याशी बर्कले यांची आयुष्यभर मैत्री राहिली.रॉबर्ट स्टीफन्सन हे जॉर्ज स्टीफन्सन यांचे पुत्र होते.(ज्यांनी वाफेच्या इंजिनवर चालणारी पहिली रेल्वे उभारली होती.) बर्कले साहेब 7 फेब्रुवारी1850 ला भारतात पोहचले आणि 16 एप्रिल 1853 ला रेल्वे धावली.म्हणजे अवघ्या 3 वर्षात हे सर्व काम त्यांनी केले.रेल्वे सुरू करण्याचा ब्रिटिशांचा उद्देश जरी स्वार्थी असला तरी आपल्याकडे त्यांनी सुरू करण्यापूर्वी रेल्वे नव्हती आणि त्यांनी जर आणलीच नसती तर सुरू झाली असती की नाही हा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच उत्तर नकारार्थीच असेल. ही आहे भारतातील पहिल्या रेल्वेमार्गाची कथा! आपला प्रवास मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनसपासून सुरू होईल. या मूळ रेल्वेमार्गावर पडलेल्या अवशेषांकडे बघत,त्यांचा अर्थ लावत, त्यांची नोंद घेत तो उत्तर दिशेकडे कूच करेल. या अवशेषांपैकी काही अवशेष खूप महत्त्वाचे आहेत, काही अस्ताव्यस्त पडलेले आहेत, काही तर अगदीच क्षुल्लक आहेत; पण देशातील पहिल्यावहिल्या रेल्वेमार्गाच्या विकासाची गोष्ट सांगण्यासाठी ते अजूनही आपला श्वास टिकवून आहेत. त्या काळातल्या तंत्रज्ञानाबद्दल ते माहिती देतात. तसंच हे शहर कसं वाढलं, याचीही गोष्ट सांगतात. नेमक्या याच गोष्टीसाठी GIPR म्हणजे मध्य रेल्वे आणि BB&CI म्हणजे पश्चिम रेल्वे यांची रचना कशी झाली, हे इत्थंभूत सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. या संशोधनसाठी लेखकाने व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे यादरम्यान अनेकदा रेल्वेने प्रवास केला. अनेक गोष्टी धुंडाळण्यासाठी रेल्वेमार्गाच्या कडेने चालतचालत अभ्यास झाला. अर्थात त्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाची वेळोवेळी रीतसर परवानगी घेतली होती. भूतकाळातली रेल्वे, तिचे रूळ आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टींचं कौतुक करताना आपण हे विसरता कामा नये की, मुंबईची ही रेल्वे किंवा भारतीय रेल्वे नेहमीच भविष्याकडे पाहत आली आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more