* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666472
  • Edition : 8
  • Publishing Year : APRIL 1996
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 84
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET- 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SHEKARA IS AN EXCELLENT AND THE LAST SPECIMEN OF RANJIT DESAI`S NOTEWORTHY INGENUITY. SHEKARA IS A KIND OF SQUIRREL, GREY COLOURED, WITH A BLACK FURRY TAIL. IT IS FAMOUS FOR JUMPING FROM ONE TREE TO ANOTHER. THE MAIN CHARACTER OF THIS NOVEL IS A LONELY SQUIRREL. THIS STORY TAKES PLACE IN THE MIDST OF A DENSE FOREST. SHEKARA ROAMS THROUGHOUT THE JUNGLE FOR ITS FOOD, THROUGH ALL THE REGIONS AND SEASONS. WHILE DOING SO IT OBSERVES OTHER ANIMALS, THEIR HABITS, THEIR EFFORTS TO FIND FOOD, THEIR HELPLESSNESS WHILE STRUGGLING TO STAY ALIVE. SHEKARA OFTEN WITHESSES THIS, AND ITSELF BECOMES THE PREY TO HELPLESSNESS. RANJIT DESAI HAS PICTURED THE WHOLE STORY THROUGH SHEKARA`S EYES AND MIND. AFTER READING THE THE BOOK READER ALSO FEELS THAT HE/SHE IS AS LONELY AS THE SHEKARA. IT COMPELLS A DISCREET READER TO INTROSPECT ONCE AGAIN.
शेकरा हा खारीच्या जातीचा विशेषत: जंगलात आढळणारा, झाडावर राहाणारा, या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारत मुक्तपणे फिरणारा व आवश्यकतेप्रमाणे जमिनीवर येणारा प्राणी. शेकरा खारीसारखाच दिसणारा, पण खारीहून कितीतरी मोठा, झुबकेदार शेपटी असलेला शाकाहारी प्राणी आहे. वेगवेगळ्या झाडांवरची फळे खात हिंडण्याबरोबरच जंगलातील वन्य पशुंचे जीवननाट्य तो बिटबिट्या, लालबुंद डोळ्यांनी दुरून पाहात असतो. या निरीक्षणात तटस्थता नसते. खूप उत्सुकता असते; जमेल तेथे सहभाग आणि पलायनही असते. शेकराच्या नजरेतून लेखकाने जंगलातले जीवन दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. शेकराला दिसलेला निसर्ग, ऋतुमानानुसार त्यामध्ये होणारे विविध बदल तसेच अनेक पशु-पक्ष्यांच्या स्वाभाविक प्रेरणा, त्यांचा जीवनसंघर्ष यामध्ये चित्रित केला आहे. यामध्ये शेकराच्या दैनंदिन जीवनाबरोबरच त्याने पाहिलेल्या इतर नानाविध प्राण्यांच्या आयुष्यातील घटना-प्रसंगांचे हुबेहुब वर्णन आहे. शेकरा एका डोहाकाठी असलेल्या वडाच्या झाडावर बसून निसर्गाचे, तेथे पाणी पिण्यास येणार्या विविध पशु-पक्ष्यांचे निरीक्षण करतो. यामध्ये काळतोंड्या हुप्प्यांचं दात विचकून, भीती दाखवत अंगावर येणं, अस्वलाचं जमिनीवर पालापाचोळा हुंगत जाणं, मधमाश्यांच्या चाव्याची पर्वा न करता पोळं पाडून त्यातला मध पिणं आणि पिलांना मागे सारून वारुळात तोंड खुपसून अधाशासारखी एकट्यानेच वाळवी खाणं, वाघाची शिकारीला जाताना झाडाच्या सालीमध्ये नखांनी ओरबाडून ती साफ करण्याची सवय, मादी गव्याच्या प्रसूतीच्या वेळी खुद्द गवा आणि इतर माद्यांनी केलेले तिचे आणि वासराचे संरक्षण, सुसरीचं डोहाच्या काठावर येऊन ऊन अंगावर घेताना तोंडाचा आ वासून पक्ष्यांकडून दात साफ करून घेणं आणि डोहात शिरल्यावर किंचित डोके वर काढून पाणी पिण्यास आलेल्या भेकरास अलगद पाण्यात ओढून नेणं, प्रणयभंगास कारणीभूत ठरणार्या गजेंद्राच्या सोंडेला महाभुजंगाने घेतलेला चावा आणि त्यात झालेला दोघांचाही मृत्यू, नाग उंदराला खाण्याच्या पवित्र्यात तर झाडाच्या ढोलीतून बाहेर आलेले घुबड नागाला पकडण्याच्या तयारीत, भुकेलेल्या अजगराने सशाला लक्ष्य करणं; हे सारे प्रसंग अधूनमधून शेकराच्या डोळ्यांसमोर घडत असतात. दरम्यान, जंगलाला लागलेल्या आगीमध्ये सारे भस्मसात होते; साहजिकपणे बहुतेक सारे पशु-पक्षी हे जंगल सोडून आपल्या वाटेने दुसर्या जंगलात आश्रयास जातात. शेकरा मात्र या जागेने आजवर दिलेले सुख लक्षात घेऊन हे जंगल सोडून इतरत्र जात नाही; तर अशा प्रसंगातही तो बिळात असलेल्या सशाच्या दोन पिलांना कोवळे गवत देतो आणि त्यांच्याशी खेळतो तसेच तो सुतारपक्ष्याने चोचीने झाडामध्ये तयार केलेल्या पोकळीतील पिलांशी खेळण्याचा प्रयत्न करतो. अखेर एका दुर्दैवी क्षणी वाढत्या वयानुसार चपलताहीन झालेले शरीर आणि खचलेल्या मनाचा शेकरा पाणी पिण्यास येतो आणि बेसावधपणे खोकडाची शिकार होतो.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक #शेकरा#रणजीत#देसाई
Customer Reviews
  • Rating StarDAINIK PUDHARI 20-10-1996

    अंतर्मुख करणारी एक विलक्षण लघु कादंबरी… रणजित देसाई यांची अखेरची अभिव्यक्ती म्हणजे सुजाण वाचकास अंतर्मुख करणारी एक विलक्षण लघु कादंबरी म्हणजे ‘शेकरा’ असे म्हणावे लागेल. या कादंबरीचा नायक शेकरा हा खारीसारखा दिसणारा पण खारीहून मोठा असलेला शाकाहारी प्रणी. कादंबरीकारांनी शेकराद्वारे केलेले निवेदन हे मनोवेधक असून कादंबरीभर जंगल जीवनाचे चित्रण अगदी हुबेहूब केले आहे, त्यामुळे कादंबरीची मांडणी सुरेख झाली आहे. वाचक ही कादंबरी वाचताना शेकराच्या जीवनाशी एकरूप तर होतोच शिवाय शेकराच्या निवेदनाबरोबर जंगलातून फेरफटका मारूनही येतो. अनोळखी प्राणी जगत पाहून आल्याचा वास्तव पातळीसारखा अनुभव या कादंबरीतून येतो. रणजित देसाई हे लेखक भूतकाळात रमणाऱ्या प्रवृत्तीचे असून वाचक जेव्हा ही कादंबरी वाचतो, तेव्हा प्राणी जीवनाशी तो आपल्या जीवनाची तुलना सहजच करतो. पशुत्वापासून मानवतापर्यंत केलेला भुतकाळातील प्रवास आहे. आदिमकाळातील जीवनाचे जिवंत अवशेष म्हणजे ‘शेकरा’तील जंगली जीवनाचा आलेख आहे. मानवाच्या केलेल्या प्रदीर्घ प्रवासाचा आरंभ बिंदू मानता येईल इतके प्रभावी कलात्मक लेखन शेकरा या कादंबरीत आकारास आले आहे. शेकरा जंगलात भटकंती एकाकी जीवन जगत असतो. त्याच्या आसपास अनेक वन्य पशुपक्षीही जीवन जगत असतात. ‘बळी तो कान पिळी’प्रमाणे जंगलातील मोठे प्राणी लहान प्राण्यांना खाऊन जीवन जगत असतात. जंगलनियमाप्रमाणे चाललेल्या घडामोडीत अनेक दुबळे प्राणी सशक्तपणाचे भक्ष्य ठरतात. त्याचे जीवननाट्य तो शेकरा आपल्या बिटबिट्या डोळ्यांनी सतत पाहात असतो. या पाहण्यातही थंड अलिप्तता असते. भरपूर उत्कंठा असते. जमेल तिथं सहभाग असतो. काही ठिकाणी पलायनाच्या शारीरिक प्रतिक्रियाही भरपूर आहेत. सबंध कादंबरीभर सगळं जंगलातील प्राणीविश्व नैसर्गिकपणे पसरलेले आहे. यात शेकरा, काळतोंडे हुप्पे, माकड, वाघ, हरीण, हत्ती, सांबर, भेकरं, अस्वलं, रानडुक्करं, गवे, घारी, गिधाडे, ससाणे, सुसर, खोकड, मोर इतर पशुपक्षी, वनस्पती, पाऊस, पाणी, कडे, पहाड, डोंगर पाण्याचे विविध प्रवाह सर्व नाट्यपूर्ण, कौशल्यपूर्ण आणि जिवंतपणे त्यांच्या सहज हालचालीसह आपल्यासमोर फिरत आहे असे दृश्य दिसते. पशु-पक्षांतील जीवनाचे अनेक बारकावे असणारे प्रसंग सिनेमासारखे पाहून सुज्ञ वाचक थक्क होऊन जातो. जंगली प्राणी जीवनाचे भक्ष्य-भक्षक संबंध त्यातील क्रौर्य, रौद्र रूप, निष्पाप, निरागसता वाचकास खिळवून ठेवते. नीतीनियम, कायदे, परंपरा, पापपुण्य, उचित-अनुचित, रुढी, संस्कृती यांनी बंदिस्त असलेला आपला मानवी समाज जंगली प्राणी जीवनापेक्षा बरा सुसह्य आहे. अशा विरोधात्मक कल्पना वाचकास सुखावतात व सुरक्षितही वाटतात. शेकरा हा ससा, हरीण यांच्याप्रमाणे निष्पाप निरागस शाकाहारी चिमुकला खारीसारखा दिसणारा भाग्यवान प्राणी असावा असा आहे. तो सुरक्षित निरागसपणे जंगल अनुभवणारा प्राणी आहे असे वाटत न वाटत तोपर्यंत तो एका खोडकाचा भक्ष्य ठरतो. प्रतिकार करायला जवळ एकही साधन नाही. असेल तर ते फक्त पलायन पण तेही करण्यास तो फसतो. असह्यपणं जंगल कायद्याचा बळी ठरतो. याचा प्रत्यय कादंबरीच्या शेवटी येतो. मानवी जीवनातही निष्पाप, निरागस, निरुपद्रवता हे सांभाळून ठेवण्याचे गुण मानले जातात. ते कोणीही कुस्करू नये अशी भावना वाचकाच्या हृदयात ठासून बसते व जीवनातील अर्थही कळतो. या कादंबरीचे लेखन एका बाजूला वास्तव, वस्तुनिष्ठ, कलात्मक अलिप्ततेने कलेले आहे. मानवी जीवनावर किंवा जंगली जीवनावर भाष्य न करताही एकाकी शेकराच्या निवेदनातून सत्य सूचित प्रतिकाचे रूप मात्र स्पष्ट हृदयाशी जाऊन भिडते. मराठीत जसे लेखन दुर्मिळ असून कादंबरीकार रणजित देसाई यांच्या दिपस्तंभासारख्या उज्ज्वल प्रतिभेला शोभणारी अशीच आहे. निरुपद्रवी, निरागस व निष्पाप अशा लोकांना व्यवहारी जगात कोणीही शेकऱ्याप्रमाणे छळू नये. असेच जणू जगाचा निरोप घेताना शेकराच्या निवेदनातून त्यांनी सांगितले असावे असे वाटून जीवाला चटका लागून राहतो. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KAHANI PAHILYA AAGINGADICHI
KAHANI PAHILYA AAGINGADICHI by RAJENDRA AKLEKAR Rating Star
Sainath Chawali

श्री राजेंद्र आकलेकर लिखित कहाणी पहिल्या आगीनगाडीची हे पुस्तक आज वाचून झालं.भारतामध्ये 16 एप्रिल 1853 रोजी 3:30वाजता बोरीबन्दर ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली.धावण्यापूर्वी ही रेल्वे भारतात सुरू करण्यासाठीचा लढा,चळवळ यातील अधिकारी लोकांनी केलें प्रामाणिक काम माणसाच्या , वाचकाच्या मनाला क्षणभर विचार करायला लावत.जेम्स बर्कले ने पहिला वहिला भारतातील रेल्वे मार्ग बांधला हे आजच्या पिढीतील क्वचित लोकांना माहिती असेल.लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं.रॉबर्ट स्टीफन्सन यांच्याशी बर्कले यांची आयुष्यभर मैत्री राहिली.रॉबर्ट स्टीफन्सन हे जॉर्ज स्टीफन्सन यांचे पुत्र होते.(ज्यांनी वाफेच्या इंजिनवर चालणारी पहिली रेल्वे उभारली होती.) बर्कले साहेब 7 फेब्रुवारी1850 ला भारतात पोहचले आणि 16 एप्रिल 1853 ला रेल्वे धावली.म्हणजे अवघ्या 3 वर्षात हे सर्व काम त्यांनी केले.रेल्वे सुरू करण्याचा ब्रिटिशांचा उद्देश जरी स्वार्थी असला तरी आपल्याकडे त्यांनी सुरू करण्यापूर्वी रेल्वे नव्हती आणि त्यांनी जर आणलीच नसती तर सुरू झाली असती की नाही हा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच उत्तर नकारार्थीच असेल. ही आहे भारतातील पहिल्या रेल्वेमार्गाची कथा! आपला प्रवास मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनसपासून सुरू होईल. या मूळ रेल्वेमार्गावर पडलेल्या अवशेषांकडे बघत,त्यांचा अर्थ लावत, त्यांची नोंद घेत तो उत्तर दिशेकडे कूच करेल. या अवशेषांपैकी काही अवशेष खूप महत्त्वाचे आहेत, काही अस्ताव्यस्त पडलेले आहेत, काही तर अगदीच क्षुल्लक आहेत; पण देशातील पहिल्यावहिल्या रेल्वेमार्गाच्या विकासाची गोष्ट सांगण्यासाठी ते अजूनही आपला श्वास टिकवून आहेत. त्या काळातल्या तंत्रज्ञानाबद्दल ते माहिती देतात. तसंच हे शहर कसं वाढलं, याचीही गोष्ट सांगतात. नेमक्या याच गोष्टीसाठी GIPR म्हणजे मध्य रेल्वे आणि BB&CI म्हणजे पश्चिम रेल्वे यांची रचना कशी झाली, हे इत्थंभूत सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. या संशोधनसाठी लेखकाने व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे यादरम्यान अनेकदा रेल्वेने प्रवास केला. अनेक गोष्टी धुंडाळण्यासाठी रेल्वेमार्गाच्या कडेने चालतचालत अभ्यास झाला. अर्थात त्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाची वेळोवेळी रीतसर परवानगी घेतली होती. भूतकाळातली रेल्वे, तिचे रूळ आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टींचं कौतुक करताना आपण हे विसरता कामा नये की, मुंबईची ही रेल्वे किंवा भारतीय रेल्वे नेहमीच भविष्याकडे पाहत आली आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more