* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SHEVATCHI LADHAI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177661026
  • Edition : 4
  • Publishing Year : MARCH 2002
  • Weight : 120.00 gms
  • Pages : 124
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS THE THIRD COLLECTION OF ITS TYPE BY MR. YADAV. THE HUMOUR IN THIS COLLECTION TAKES A DIFFERENT TURN FROM THE PREVIOUS TWO COLLECTIONS. THE POLITICAL AND SOCIAL ASPECTS HAVE TAKEN A DIFFERENT TURN DURING THESE 50 YEARS. THEY HAVE CREATED A CONTROVERSY AMONG THEMSELVES. THE AUTHOR SHADES A LIGHT WITH A SARCASTIC AND SATIRICAL NOTE. THE COMMON MAN WHO IS THE SUBJECT OF ALL THE STORIES IS FALLEN A PREY IN THE HANDS OF THE CORRUPTED SOCIAL LIFE, THE SELFISH AND SCHEMING MINDS OF THE POLITICIANS, THE OPPORTUNISTS, THE GREEDY GOVERNMENT SERVANTS, THE SO CALLED COSMOPOLITAN LADIES LOST IN THE SHALLOW IMAGES OF BEAUTY AND FALSE STATUS, THE DRUNKARDS AND THE TERRIBLE ATTITUDE OF THE SOCIETY. IN THIS BOOK, THE AUTHOR IS NOT PLAYING THE ROLE OF AN ENTERTAINER, BUT THAT OF A COMMENTATOR WHO IS TRYING TO BRING THE REAL PICTURE OF THIS SPOILED MARATHI PEOPLE. HE DOES THIS WITH A TINGE OF SARCASM TO THE HUMOUR. THE HUMOUR SUCCEEDS IN MAKING US HAPPY BUT NOT LEAST IS THE TINGE OF SATIRE WHICH DOES MAKE US LOOK AT THINGS FROM A DIFFERENT ANGLE. IT MAKES US THINK ABOUT IT INWARDLY. WE MUST APPRECIATE THE UNIQUENESS OF THIS COLLECTION.
‘शेवटची लढाई’ हा आनंद यादवांचा तिसरा विनोदी कथासंग्रह वाचत असताना लक्षात येते, की पहिल्या दोन संग्रहांपेक्षा या संग्रहातील विनोदाने वेगळे वळण घेतलेले आहे. आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत, पन्नास वर्षांत विविध प्रकारच्या विसंगती निर्माण झालेल्या आहेत. त्यांच्यावर प्रखर प्रकाशझोत प्रस्तुत पुस्तकात विनोद आणि उपरोधउपहास यांच्या अंगांनी यादवांनी टाकलेला दिसतो. भ्रष्ट समाज जीवन, स्वार्थी आणि मतलबी राजकारण, संधिसाधू, हपापलेला शासकीय नोकरवर्ग, उथळ सौंदर्यात आणि खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पनांत रमलेला श्रीमंत स्त्रीवर्ग, दारूत बुडालेला आणि समाजाच्या भेसूर वर्तनात सापडलेला सामान्य माणूस, या कथांतील विनोदाचा आणि कारुण्याचाही विषय झाला आहे. या संग्रहातील आनंद यादवांची भूमिका ही केवळ मनोरंजनकाराची नाही; तर ती सध्याच्या भ्रष्ट मराठी जीवनाचा विनोदउपरोधाच्या अंगांनी वेध घेणाऱ्या भाष्यकाराचीही आहे. त्यांच्या या दृष्टीमुळेच या संग्रहाचा आस्वाद घेणारा वाचकही हसता हसता शेवटी अंतर्मुख होतो, हे या संग्रहाचे खास वेगळेपण मानावे लागते.
राज्य पुरस्कार २००१-०२
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 02-06-2002

    विनोदाच्या आवरणाखाली दडलेले उपरोधिक चिंतन... आनंद यादव हे मराठी साहित्यातील प्रथितयश व्यक्तिमत्त्व. ग्रामीण कथेखेरीज त्यांची आत्मकथेची मालिकाही गाजली. ‘झोंबी’, ‘नांगरणी’, ‘घरभिंती’ यांनी मराठी साहित्याची वेगळी मांडणी केली. ग्रामीण बाज हा गंभीरतेच्यादिशेने जरी वळत असला तरी आनंद यादव यांनी विनोदी कथांनाही न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आज दिसणाऱ्या मूल्यव्यवस्थेत एक लपलेली विसंगी आहे आणि ती विसंगती आनंद यादवांच्या निरीक्षणाचा भाग झाली आहे. उपरोधिकपणे त्यांनी आपल्या शब्दांची तलवार चालवली आहे आणि अब्रू असलेल्या चाडदार माणसाला ते शब्द झोंबणारे आहेत. ‘शेवटची लढाई’ हे प्रस्तुत पुस्तक म्हणजे यादवांचा तिसरा विनोदी कथासंग्रह आहे आणि मेहता पब्लिशिंग हाऊसने तो प्रसिद्ध केला आहे. एकंदर नऊ कथांच्या या पुस्तकाला मुखपृष्ठ मिळाले आहे ते शि. द. फडणीस यांचे आणि ते समाजातील मूल्यहीनतेचे दर्शन घडविणारे आहे. ‘गोपाळ भटजी आणि निवडणुकेश्वर’ या कथेत भटाभिक्षुकांनी लोकांना आपल्या नादी कसे लावले आहे याचे दर्शन आपल्याला घडते. हेच तसे उलट अर्थानेही म्हणता येईल. लोकांना जगण्यासाठी काहीतरी आधार हवा असतो आणि भटभिक्षुक त्यांना तो देतात. गोपाळ भटजी अगदी शिस्तबद्धरित्या कसा धनवान बनतो याचे नाट्यमयरित्या चित्रण करताना संस्कृतप्रचुर भाषेचा फुलोरा यादवांनी छान फुलवलाय. ‘शीर्षस्थानी थोडे केस वाढवून त्यावर काळ्या रंगाचे टोपीनामक शिरस्त्राण घालू लागले’ हे त्यापैकी एक उपरोध ठायी ठायी भरलेली ही कथा राजकारणावर येऊन संपते. ‘पीळ’ या कथेत पंताच्या चिवट स्वभावाचे दर्शन घडते. यातून विनोदाचे दर्शन घडत असले तरी त्या आवरणाखाली असलेले कारुण्यच प्रधान वाटते. गंगाधर या नातवाच्या वाढदिवसाला लोणी मिळत नाही म्हणून सत्तर वर्षाचा हा खवट व जिद्दी म्हातारा सोने विकून म्हैस घरात आणतो. गावातील इरसाल नमुने पेश करणारी ही कुरेबाज कथा वस्तुस्थितीकडे बिनबोभाट वळते. छत्रपती शिवरायांचे शिष्यत्व सांगणाऱ्या एका महाराजांच्या वाढदिवसाचे पुण्यातील पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या रायगडातील वर्णन महाराजांचा वाढदिवस’ यात आले आहे. दांभिकपणाचा जागोजागी आलेला उल्लेख परिस्थितीची जाणीव करून देतो. प्रासंगिक विनोदाचा आधार अशा कथामधून यादव घेताना दिसतात. वाढदिवसाला जनता धाडदिवस म्हणजे या कोटीतूनच कथेचा अन्वयार्थ लावता येतो. शिवा गवळ्याने वाघिणीचे दूध काढले या प्रसंगावर बेतलेली पुढची कथा वास्तवापेक्षा कल्पनात्मक ढंगाकडे झुकते. वाघीण शिवा गवळ्याला दूध काढू देते ही कल्पना रंजनात्मक विशेष दाखविणारी आहे. चुकून घडलेल्या घटितांचे रूपांतर ‘पराक्रम’ आणि सक्तारात शिवा गवळी करतो. यातही पुन्हा राजकीय आणि किडलेल्या समाजव्यवस्थेचे वर्णन् अपरिहार्यपणे येते. या पुस्तकातील कथांचे विषय पाहिले तर संधीसाधू नेते, भ्रष्टाचारी नोकरवर्ग, उथळ विचारांच्या श्रीमंत (पैसेवाल्या) बायका, लोकांच्या भावनांचा बाजार मांडणारे पुरोहित यासारख्या विषयातून आनंद यादव उपरोध आणि उपरोध वापरत कलापूर्वक लक्ष्य साधतात. तर्कविसंगतीमधून विनोद निर्माण करताना सामान्य माणूसच नेत्यांचा लक्ष्य कसा झालाय ते दिसते. शिवा गवळ्याच्या कथेनंतर ‘साप आणि उंदीर’ यामध्ये मध्यमवर्गीयाचा नको तेवढा चाललेला विचार निरर्थकतेची छाया कथेभर ठेवत यादवांनी मांडला आहे. साप आणि उंदराच्या प्रतिकांमधून ते माणसेच निर्माण करतात. ‘बेलदाराची गाढव’ या कथेत तर न्यायवस्थेच्या विसंगतीवर यादवांनी नेमके बोट ठेवले आहे. वसंतरावासारखा शिकलेला मनुष्य दोन बायका करताना समर्थन करतो - दोन बायकांशी एकदमच लग्न केल्याने ती एकच लग्न केले आहे. खालच्या कोर्टात सुटल्यावर वरच्या कोर्टात चार बायका व एकोणीस मुले असलेले न्यायमूर्ती शेख वसंतरावांना दोषी ठरवतात या कथानकात योगायोग नसून सद्य परिस्थितीचे विदारक निंदन आहे. ‘रजिस्ट्रार साहेबांची पत्नी’ या कथेची धाटणी वेगळीच आहे. उच्च स्तरावर आपले आयुष्य ढोंगीपणाने घालवणाऱ्या बाईचे आयुष्य यादवांनी छानच रेखाटले आहे. मुलगा एरव्ही ‘मम्मी’ म्हणतो पण रडताना आईच म्हणतो याचे कारण माननीय. खरं पाहता आनंद यादवांनी अशा छोट्या छोट्या कथा जागोजागी पेरत विनोदाची खुमारी चढवली आहे. बार्इंच्या आयुष्यातील बेगडीपणा आपल्या अंगावर येतो हे यश आहे. तो देव त्यांच्या आत्म्याला शांती, सौंदर्य देवो’ या वाक्याने कथेचे मर्म ध्यानात येते. ‘शिवरामाचे आरसे’ या कथेत निरीक्षण जास्त आहे. न्हाव्याचे स्वभाव-विशेष इथे मुक्तपणे येतात. ‘शेवटची लढाई’ ही शीर्षक कथा आनंद यादवांचे निवेदन किती मुक्तपणे येते आणि त्यासाठी कथेची फारशी गरज लागत नाही दाखवणारी आहे. लोकशाहीतील निवडणूक हे भ्रष्टाचाराचे मूलस्थान कसे आहे याचे वर्णन इथे येते. समाजाच्या भ्रष्ट व्यवस्थांवर बोचरी टीका करत यादव वस्तुस्थितीचे उपरोधिक दर्शन घडवितात. प्रत्येक कथेचा शेवट करताना ते वाचकांना गुंतवतात, अंतर्मुख करतात. परिणामी विनोद हा साध्य न राहात साधन या स्वरूपात काम करतो. या कथांचे यश लोकांचे लक्ष अशा पद्धतीने वेधून घेण्यात आहे. काहीशी चिंतनात्मक डूब वाचकांच्या लक्षात यायला हवी. नेते गेंड्याच्या कातडीचे असल्याने हा कथासंग्रह त्यांच्यासाठी नाही, भांडण्यातील ताजेपणाही मनाला भावतो. -अशोक नारायण जाधव ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 31-03-2002

    सामाजिक विसंगतीवर विनोद... डॉ. आनंद यादव यांनी सामाजिक विसंगतीवर उपहास आणि विनोदाच्या ढंगाने टाकलेला प्रकाश असे त्यांच्या ‘शेवटची लढाई’ या कथासंग्रहाचे वर्णन करावे लागेल. हा कथासंग्रह मेहता प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. या संग्रहात नऊ कथा आहेत. यासंग्रहातील आनंद यादवांची भूमिका केवळ मनोरंजनकाराची नाही तर ती सध्याच्या भ्रष्ट मराठी जीवनाचा वेध घेणाऱ्या भाष्यकाराचीही आहे. साहित्याचा आस्वाद देताना हसता हसता वाचकांना अंतर्मुख करण्याची ताकद त्यांच्या कथात आहे. समाजरचनेत काही घटकाचे स्थान कसे बदलते आहे याची लेखकांनी घेतलेली नोंद अतिशय सूक्ष्म आहे. लेखकाने वापरलेली भाषा त्या त्या वर्गातील जीवनामानाचे जिवंत चित्र उभे करते आणि त्यातील विरोधाभासावर मिश्किल हास्य करायला लावते हे विशेष. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 25-08-2002

    कलाव्यवहाराची परखड चिकित्सा… ‘शेवटची लढाई’ हा यादवांचा तिसरा विनोदी कथासंग्रह. आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत स्वातंत्र्यानंतरच्या पन्नास वर्षांत अनेक प्रकारच्या विसंगती निर्माण झालेल्या आहेत, त्यांच्यावर प्रखर प्रकाशझोत प्रस्तुत पुस्तकात विनो आणि उपहास, उपरोध यांच्या अंगांनी यादवांनी टाकलेला दिसतो. ‘गोपाळ भटजी आणि निवडणुकेश्वर’, ‘महाराजांचा वाढदिवस’, ‘वाघिणीची धार काढणारा गवळी’ अशा या संग्रहातील कथा निखळ विनोदाच्या अंगाने जाणाऱ्या आहेत. भ्रष्ट समाजजीवन, स्वार्थी, मतलबी राजकारण, संधिसाधू, हपापलेला शासकीय नोकरवर्ग आणि दारूत बुडालेला सामान्य माणूस या कथांतील विनोदाचा विषय झाला आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील गावातील बदलते राजकारण आणि समाजकारण, संधिसाधू लोकांनी साधलेला स्वत:चा स्वार्थ आणि भ्रष्ट राजकारणी मंडळी या बाबी या कथांत उपरोध आणि उपहासाच्या रूपाने व्यक्त होतात. ‘गोपाळ भटजी आणि निवडणुकेश्वर’ या कथेत बदलत्या आर्थिक परिस्थितीची, समाजकारणाची, औद्योगिक संस्कृतीची दिशा ओळखून भिक्षुकी पेशात कालानुरूप चातुर्याने परिवर्तन करणाऱ्या बेरक्या गोपाळजींची व्यक्तिरेखा साकार होते, तर वाघिणीचे दूध काढणारा शिवा गवळी एका रात्रीत एकदम ‘हिरो’ बनतो, याही कथेत इतिहास आणि दंतकथा यांची सरमिसळ उपरोधाच्या स्पर्शाने जिवंत झाली आहे. महाराजांचा वाढदिवस मावळ तालुक्यांतल्या त्यांच्या गावकीतल्या मंडळींना ‘धाडदिवस’ कसा वाटतो, याचे मिस्किल चित्र या कथेत उभे राहते. ‘पीळ’ आणि ‘शिवरामाचे आरसे’ या कथा गांभीर्याकडे झुकणाऱ्या आहेत. ‘पीळ’ मधून जुन्या सरंजामशाहीचे अभिमानी पंत, जुन्या मानसन्मानाच्या निष्ठा उराशी बाळगून स्वत:च्या मनस्वीपणाचे ताठ कंगोरे कसे उभे करतात, याचा उल्लेख यादव करतात, तर ‘शिवरामाचे आरसे’ या कथेत साहित्यनिर्मितीच्या प्रवासालाच लेखकाने स्पर्श केला आहे, असे वाटते. ‘खरं’ तर वरवर सरळ दिसणारे आत वाकडेच असतात, हे भेदक सत्य लेखकाला अनेक वर्षांनी गावी गेल्यावर शिवरामाला भेटताना गवसते आणि शिवराम हाही एक आरसा आहे. त्याच्या मनाची सहा रूपं म्हणजे सहा आरसे अशा निष्कर्षापर्यंत यादव येतात. रजिस्टार साहेबांची पत्नी यात श्रीमंत उच्चभ्रू स्त्रियांच्या उथळ नटवेपणाचे प्रतिबिंब आहे, तर ‘शेवटची लढाई’मध्ये पुराणकथेचा वापर वास्तवजीवनातील राजकारणी जगातील मुर्खता व दांभिकता अधोरेखित करण्यासाठी यादवांनी चांगला केला आहे. लेखक यादवांचीच दोन भिन्न प्रतिबिंबचे या कलाकृतींमध्ये लक्षणीय रीतीने उमटली आहेत. गंभीर प्रकृतीच्या कादंबरीमध्ये कलावादाची, वाङ्मयचौर्याची, एकूण कलाव्यवहाराची परखड चिकित्सा करणारे तटस्थ यादव या कथांमध्ये प्रसन्न विनोदाचा निर्मळ शिडकावा करतात, ही त्यांच्या लेखन व्यक्तिमत्त्वाची जमेची बाजू आहे. -मिनाक्षी दादरावाला ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more