* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"IS IT TRUE THAT QUEEN SOYRABAI POISONED SHIV CHHATRAPATI? DID SHIVAJI HAVE CONCUBINES? WHY DID SAMBHAJI JOIN DILERKHAN? WAS HE ANNOYED WITH SHIVAJI MAHARAJ? SHIVAJI RAJE DECIDED TO PUT AN END TO ‘WATANDARI’. WAS THIS DECISION A BEGINNING OF SOCIAL REVOLUTION? WAS SHIVAJI BORN IN THE ‘GAVALI-DHANGAR’ CLAN? WHAT IS THE JAMES LANE ISSUE? DR. JAISINGRAO PAWAR HAS DISCUSSED MANY SUCH ISSUES IN THIS BOOK. "
"राणी सोयराबार्इंनी शिवछत्रपतींवर विषप्रयोग केल्याचा आरोप खरा आहे काय?... शिवछत्रपतींना उपस्त्रिया होत्या काय?.... संभाजीराजे शिवछत्रपतींना रुसून दिलेरखानास का मिळाले?.. वलने खालसाचा शिवछत्रपतींचा निर्णय म्हणजे एक आमूलाग्र समाजक्रांतीच कशी होती?...... शिवछत्रपतींचे कूळ ‘गवळी-धनगर’ होते काय?... ‘जेम्स लेन प्रकरण’ काय आहे?.... या व यासारख्या अनेक प्रश्नांची चर्चा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार आपल्या या लेख-संग्रहात करत आहेत. "

No Records Found
No Records Found
Keywords
#JAYSINGRAO PAWAR #SHIVACHHATRAPATI EK MAGOVA# #जयसिंगराव पवार #शिवछत्रपती एक मागोवा #
Customer Reviews
  • Rating StarTushar Kute

    इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर चिकित्सक पद्धतीने लिहिलेले हे पुस्तक होय. शिवरायांच्या विविध अंगांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकातून केला आहे. शिवछत्रपतींच्या पूर्ण परिवाराची माहिती या पुस्तकात सापडल. त्यांनी तत्कालीन समाज पद्धतीचा विचार करून समाज क्रांतीची बीजे रोवली होती. याचा सविस्तर आढावा डॉ. पवार घेतात. शिवाजी महाराजांसाठी आत्मबलिदान करणारा शिवा काशीद नक्की कोण होता व त्यासंबंधी माहिती नक्की कशी उजेडात आली? शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे संबंध कसे होते? या प्रश्‍नांच्या उत्तरांचासह संभाजी महाराजांच्या जीवनाचा सारांश या पुस्तकात वाचायला मिळेल. महाराणी सोयराबाई व येसूबाई यांच्या विषयी सारांशरुपी मागोवा डॉ. पवार यांनी घेतला आहे. शिवाय शिवाजी महाराजांचे कुळ कोणते? तसेच जेम्स लेन प्रकरण नक्की काय होते? याची विस्तृत माहिती या पुस्तकातील दोन प्रकरणात मिळते. त्यामुळे शिवचरित्राची आणखी बारकाईने ओळख करून घ्यायची असेल तर कथा-कादंबऱ्या पेक्षा अशाप्रकारे इतिहासकारांच्या दृष्टीतून लिहिलेले साहित्य निश्चितच उपयोगी पडेल. ...Read more

  • Rating StarRajiv Lute.

    जेष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी मराठ्यांच्या इतिहासाबद्दल आणि शिवरायांच्या कामगिरीवर वेळोवेळी आणि प्रसंगानुरूप अनेक लेख लिहले आहेत. त्यातील सहा लेखांचा संग्रह म्हणजे शिवछत्रपती : एक मागोवा’ हे छोटेखानी पुस्तक होय. १)शिवछत्रपती आणि त्यंचा परिवार:- शिवाजी महाराजांच्या राजपरिवारातील महत्त्वाच्या व्यक्तींशी असलेल्या शिवाजी महाराजांच्या भावनिक नात्याची चर्चा करणारा हा लेख आहे. २)शिवाजी राजांसाठी आत्मबलिदान करणारा शिवा काशीद:- दुसरा लेख ‘शिवा काशीद’ या शिवकालातील एका सामान्य माणसाच्या असामान्य हौतात्म्याबद्दल आहे. ३)शिवछत्रपती आणि युवराज संभाजीराजे:- तिसरा लेख युवराज संभाजीराजांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीची व पितापुत्राच्या संबंधांची चर्चा करणारा आहे. ४)शिवछत्रपतींचा समाजक्रांतीचा एक महान प्रयत्न:- चौथा लेख शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत स्वराज्यात घडवून आणलेल्या एका महान सामाजिक क्रांतीची ओळख करून देणारा आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना ही महाराजांची थोर राजकीय कामगिरी सर्वांना सुपरिचितच आहे. त्यामुळे एक महान राजकीय क्रांतिकारक म्हणून त्यांची प्रतिमा जनमानसात रुजली आहे; पण महाराजांची ‘स्वराज्या’ची संकल्पना केवळ परकीय दास्यापासून स्वजनांची मुक्तता एवढ्यापुरतीच मर्यादित नव्हती; तर जुलमी स्वकीयांच्या पिळवणुकीपासूनची त्यांची मुक्तताही त्यामध्ये त्यांना अभिप्रेत होती. ५)शिवछत्रपतींचे कुल : वास्तव कोणते आणि मिथक कोणते?:- शिवाजी महाराजांचे घराणे जरी रजपूत कुलोत्पन्न असले‚ तरी त्यांनी स्वत:ला ‘रजपूत’ म्हणवून घेण्यात अभिमान बाळगलेला नाही‚ हेही एक ऐतिहासिक वास्तव आहे. महाराज आपणास इतर मराठा क्षत्रियांप्रमाणे ‘मराठा’च मानत होते व त्यामध्ये त्यांना भूषण वाटत होते‚ असा तत्कालीन कागदपत्रांतील‚ म्हणजे खुद्द त्यांच्याच एका पत्रातील दाखला आहे. कर्नाटक दिग्विजयाच्या मोहिमेवर असताना मार्च १६७७मध्ये महाराजांनी कुतुबशहाशी भेट झाल्यावर मुधोळच्या मालोजीराजे घोरपडे यांना आपणास या मोहिमेत येऊन मिळावे‚ म्हणून आवाहन करणारे पत्र पाठविले होते. ६)जेम्स लेनचे शिवचरित्र आणि त्याचे ‘कवित्व’:- शेवटचा लेख - ‘जेम्स लेनचे शिवचरित्र व त्याचे कवित्व’ हा लेनच्या शिवचरित्राने व भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर झालेल्या हल्ल्याने महाराष्ट्रात उठलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर लिहिला गेला आहे. या सहा लेखांचे मिळून बनलेले ‘शिवछत्रती: एक मागोवा’ हे पुस्तक शिवप्रेमी, ऐतिहासिक विषयावरील वाचन लेखन करणारे आणि मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करणार्यां तमाम मराठी वाचकास मार्गदर्शक आहे. ...Read more

  • Rating StarSandip R Chavan

    जेष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी मराठ्यांच्या इतिहासाबद्दल आणि शिवरायांच्या कामगिरीवर वेळोवेळी आणि प्रसंगानुरूप अनेक लेख लिहले आहेत. त्यातील सहा लेखांचा संग्रह म्हणजे शिवछत्रपती : एक मागोवा’ हे छोटेखानी पुस्तक होय. १)शिवछत्रपती आणि त्ांचा परिवार:- शिवाजी महाराजांच्या राजपरिवारातील महत्त्वाच्या व्यक्तींशी असलेल्या शिवाजी महाराजांच्या भावनिक नात्याची चर्चा करणारा हा लेख आहे. २)शिवाजी राजांसाठी आत्मबलिदान करणारा शिवा काशीद:- दुसरा लेख ‘शिवा काशीद’ या शिवकालातील एका सामान्य माणसाच्या असामान्य हौतात्म्याबद्दल आहे. ३)शिवछत्रपती आणि युवराज संभाजीराजे:- तिसरा लेख युवराज संभाजीराजांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीची व पितापुत्राच्या संबंधांची चर्चा करणारा आहे. ४)शिवछत्रपतींचा समाजक्रांतीचा एक महान प्रयत्न:- चौथा लेख शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत स्वराज्यात घडवून आणलेल्या एका महान सामाजिक क्रांतीची ओळख करून देणारा आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना ही महाराजांची थोर राजकीय कामगिरी सर्वांना सुपरिचितच आहे. त्यामुळे एक महान राजकीय क्रांतिकारक म्हणून त्यांची प्रतिमा जनमानसात रुजली आहे; पण महाराजांची ‘स्वराज्या’ची संकल्पना केवळ परकीय दास्यापासून स्वजनांची मुक्तता एवढ्यापुरतीच मर्यादित नव्हती; तर जुलमी स्वकीयांच्या पिळवणुकीपासूनची त्यांची मुक्तताही त्यामध्ये त्यांना अभिप्रेत होती. ५)शिवछत्रपतींचे कुल : वास्तव कोणते आणि मिथक कोणते?:- शिवाजी महाराजांचे घराणे जरी रजपूत कुलोत्पन्न असले‚ तरी त्यांनी स्वत:ला ‘रजपूत’ म्हणवून घेण्यात अभिमान बाळगलेला नाही‚ हेही एक ऐतिहासिक वास्तव आहे. महाराज आपणास इतर मराठा क्षत्रियांप्रमाणे ‘मराठा’च मानत होते व त्यामध्ये त्यांना भूषण वाटत होते‚ असा तत्कालीन कागदपत्रांतील‚ म्हणजे खुद्द त्यांच्याच एका पत्रातील दाखला आहे. कर्नाटक दिग्विजयाच्या मोहिमेवर असताना मार्च १६७७मध्ये महाराजांनी कुतुबशहाशी भेट झाल्यावर मुधोळच्या मालोजीराजे घोरपडे यांना आपणास या मोहिमेत येऊन मिळावे‚ म्हणून आवाहन करणारे पत्र पाठविले होते. ६)जेम्स लेनचे शिवचरित्र आणि त्याचे ‘कवित्व’:- शेवटचा लेख - ‘जेम्स लेनचे शिवचरित्र व त्याचे कवित्व’ हा लेनच्या शिवचरित्राने व भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर झालेल्या हल्ल्याने महाराष्ट्रात उठलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर लिहिला गेला आहे. या सहा लेखांचे मिळून बनलेले ‘शिवछत्रती: एक मागोवा’ हे पुस्तक शिवप्रेमी, ऐतिहासिक विषयावरील वाचन लेखन करणारे आणि मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करणार्यां तमाम मराठी वाचकास मार्गदर्शक आहे. (पुस्तकाच्या प्रस्तावना आणि पुस्तकांमधील माहितीचे संक्षिप्त स्वरूपात संकलन) डॉ. जयसिंगराव पवार यांची ग्रंथसंपदा नव्या व आकर्षक छपाई/बांधणीत व किंडल ईबुक मध्ये उपलब्ध करून दिल्याबद्दल मेहता पब्लिशिंग हाउस धन्यवाद.🙏🙏 ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more