SCOTT GRAHAM WAS A FORMIDABLE SAS SOLDIER. HE WAS DECORATED FOR HIS HEROISM IN NORTHERN IRELAND AND THE FALKLANDS, AND HE FOUGHT GUM BATTLES IN WHICH MORE THAN A DOZEN IRA TERRORISTS WERE KILLED. MAIREAD FARRELL WAS PETITE, YOUNG, DARKLY BEAUTIFUL AND SHE PLANTED BOMBS FOR THE IRA. TOGETHER SHARED A DEADLY AND TERRIBLE SECRET. FOR YEARS THEY LOVED ONE ANOTHER WITH A RELENTLESS PASSION, AGAINST ALL THE TABOOS OF BOTH THEIR ARMIES. THEIR CLANDESTINE LOVE AFFAIR REACHED ITS CRESCENDO WITH THE SHOOTING OF THREE UNARMED IRA TERRORISTS ON THE ROCK OF GIBRALTAR, ONE OF THE MOST CONTROVERSIAL INCIDENTS IN THE HISTORY OF THE SAS. SHOOT TO KILL IS SCOTT GRAHAM`S TRUE STORY OF THIS EXTRAORDINARY ROMANCE, AND OF THE KILLINGS THAT SHOCKED THE WORLD.
संकटाशी दोन हात करण्याची प्रेरणा देणाऱ्या कथांमध्ये ही कथा जितकी जास्त प्रेरक तितकीच अधिक शोकात्म आहे.` - न्यूज ऑफ द वर्ल्ड स्कॉट ग्रहम एक कसलेला `एसएएस` (स्पेशल एअर सर्व्हिस) सैनिक होता. उत्तर आयर्लंड आणि फॉकलंड मोहिमेबद्दल त्याला शौर्यपदक मिळालं होतं. `आयआरए` बरोबरच्या चकमकीत त्यानं कित्येक अतिरेक्यांना कंठस्नान घातलं होतं. मायरीड फॅरेल ही `आयआरए` साठी बॉंब पेरणारी एक लहानखुरी पण नितांत सुंदर तरुणी! या दोघांचं जीवघेणं आणि भयानक असं एक गुपित होतं. आपल्या पक्षाच्या आणि सैन्याच्या नियमांना बगल देत अनेक वर्षं ते एकमेकांवर उत्कट प्रेम करत राहिले. `आयआरए`च्या तीन नि:शस्त्र अतिरेक्यांना रॉक ऑफ जिब्राल्टरवर गोळ्या घालून ठार करण्यात आलं आणि स्कॉट आणि मायरीडच्या छुप्या प्रेमप्रकरणाचा शेवट झाला. `एसएएस`च्या इतिहासाला तो एक अतिशय वादग्रस्त प्रसंग ठरला. स्कॉट ग्रहमच्या असाधारण प्रेमाचं आणि जगाला हादरवून सोडणाऱ्या तीन हत्यांचं चित्तथरारक सत्यकथन - `शूट टू किल.`