OUR LIVES ARE PRETTY SIMILAR TO THE CHARACTERS WE PLAYED IN THE FILMI WE`VE GONE FROM BEING FROM THE SLUMS OF GARIB NAGAR IN BANDRA EAST TO THE RED CARPET OF THE OSCARS- NINE-YEARS-OLD RUBINA`S JOURNEY HAS BEEN AN ASTONISHING ONE,ALMOST AS ASTONISHING AS JAMAL`S QUIZ SHOW VICTORY IN SLUMDOG MILLIONAIRE. THIS IS HER STORY- OF PLAYING MARBLES IN THE GULEES OF GARIB NAGAR WITH HER FRIENDS, RELUCTANTLY GOING TO SCHOOL, DREAMING OF ACTING IN FILMS, AND THEN HAVING IT COME TRUE. BUT UNDERNEATH THIS FAIRY TALE LIES A GRIMMER REALITY, THE REALITY THAT FACES COUNTLESS NUMBER OF SLUM CHILDREN. RUBINA BRINGS ALIVE THE WORLD OF THE CHAWLS WITH ITS WASTELANDS AND SHANTY DWELLINGS, THE LIVES OF THE CHILDREN WHO GROW UP IN THEM, THE STORY OF HER CART-PULLER FATHER, AND THE REST OF HER FAMILY. SHE TELLS US ABOUT LIFE ON THE FILM SET, THE AFTERMATH OF THE OSCARS (INCLUDING THE CONTROVERSY OVER HER FATHER), AND HOW IT FEELS TO HAVE THE MEDIA SPOTLIGHT ON HER. WHAT DOES IT MEAN FOR A LITTLE GIRL TO MOVE FROM SLUMKID TO STAR SO QUICKLY? WHAT WILL THE FUTURE HOLD FOR HER?
रुबिना अली. मुंबईच्या एका झोपडपट्टीत राहून चंदेरी चित्रपट सृष्टीतली चमचमती तारका बनण्याचे स्वप्न पाहणारी एक सिनेमावेडी मुलगी. वय केवळ ८-९ वर्षांचं. मात्र तिचं हे स्वप्न एक दिवस खरोखरीच साकार होतं आणि ती थेट ऑस्करपर्यंत मजल मारते.
‘स्लमडॉग मिलेनिअर’मधल्या या चिमुरड्या चित्रतारकेचा हा ऑस्करपर्यंतचा प्रवास आपल्याला या पुस्तकात बघायला मिळेल– तोही तिच्याच शब्दांत!
ऑस्कर जिंकूनही पुन्हा त्याच बकाल वस्तीत परत येणा-या रुबिनामधे बालसुलभ निरागसता आणि परिस्थितीनं शिकविलेलं शहाणपण यांचं मजेदार मिश्रण आढळतं.
कादंबरीच्या अखेरच्या भागात तर अतिक्रमण विभागाकडून तिचं ते झोपडंही पाडण्यात येतं आणि नाईलाजाने ते लोक तिच्या अब्बांच्या मित्राच्या घरी राहायला जातात.
एकीकडे असं चटका देणारं दाहक वास्तव तर दुसरीकडे हॉलीवुडच्या झगमगत्या दुनियेत. अनुभवलेली रेड कार्पेट ट्रीटमेंट!! तो मानसन्मान, ते सत्कार समारंभ, ती यशाची धुंदी!.... या सा-यांचा ताळमेळ घालत रुबिना एक दिवस फार मोठी अभिनेत्री बनण्याची स्वप्न पाहतीये. हा तिचा दुर्दम्य आशावाद; तो ही इतक्या लहान वयात; कौतुकास्पदच!