FOR CORPORATE LEADERS, THE CHALLENGE IS TO FIND NEW WAYS OF DOING THINGS. SMART LEADERSHIP: INSIGHTS FOR CEOS PRESENTS TWELVE CEOS WHO HAVE DONE JUST THAT, AND SET NEW BENCHMARKS FOR GROWTH AND PERFORMANCE IN THEIR RESPECTIVE INDUSTRY IN THE PROCESS. MORE OUTSTANDINGLY, WHETHER IT IS KUMAR MANGALAM BIRLA, N.R. NARAYANA MURTHY, RAHUL BAJAJ OR K.V. KAMATH, THEY HAVE SHOWN HOW SUCH GROWTH CAN BE SUSTAINED, YEAR AFTER YEAR, EVEN AS THE BUSINESS ENVIRONMENT BECOMES, IN THE WORDS OF ONE CEO, ‘FEROCIOUSLY COMPETITIVE, RAPIDLY CHANGING AND FLUID’. IN THIS COMPACT BUT INSIGHTFUL BOOK, GITA PIRAMAL AND JENNIFER NETARWALA DRAW INSIGHTS FROM THESE CEOS, HEADING COMPANIES AS DIVERSE AS LIJJAT PAPAD TO TATA CONSULTANCY SERVICES, ON HOW THEY ACCOMPLISHED THEIR GOALS IN SUCH A COMPETITIVE ENVIRONMENT, AND WHAT OTHERS CAN LEARN FROM THEM. THEY COME UP WITH LESSONS ON SOME OF THE CORE ASPECTS OF LEADERSHIP: DECISION-MAKING, BUILDING TEAMS, NURTURING TALENT, MANAGING CHANGE, AND AN UNWAVERING FOCUS ON GROWTH. INDIAN COMPANIES ARE TODAY GRAPPLING WITH THE CHALLENGE OF MOVING UP TO THE NEXT LEVEL OF COMPETITION—ONE WHERE AN ORGANIZATION HAS A DEMAND FOR ITS PRODUCT OR SERVICE ANYWHERE IN THE WORLD. SMART LEADERSHIP OFFERS PRACTICAL TIPS ON EFFECTING THAT TRANSFORMATION FOR EXECUTIVES AT ALL LEVELS
बहुराष्ट्रीय उद्योगाच्या प्रमुखांना कार्यक्षमता वाढवायचे नवनवे मार्ग शोधावे लागतात. `स्मार्ट लीडरशिप – सीईओसाठी नवी दृष्टी` या पुस्तकामध्ये बारा यशस्वी सीईओंनी (चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजे प्रमुख कार्यकारी अधिकारी) आपले मनोगत व्यक्त केलेले आहे. या सर्वांनी विकासाचे आणि कार्यक्षमतेचे नवे मापदंड निर्माण केले, आपापल्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला.
सर्वश्री कुमारमंगलम् बिर्ला, एन.आर. नारायण मूर्ती, राहुल बजाज,के.व्ही. कामत यांनी वर्षानुवर्षे गुणवत्ता राखून विकासाच्या वेगात
सातत्य राखता येते, हे दाखवून दिले. त्यांच्या अनुभवसमृद्धतेतून उद्योगक्षेत्रातील व्यवहाराबद्दल काही मूलभूत धडे शिकता येतात. नेतृत्व करणे, निर्णय घेणे, योग्य माणसे निवडून टीम बांधणे, गुणवत्ता ओळखून उत्तेजन देणे, बदल पचवणे आणि हे सर्व करताना विकासावरील लक्ष ढळू न देण्याचे मर्म सांगितले आहे.
परिवर्तन घडवण्यासाठी `स्मार्ट लीडरशिप` सर्व स्तरांवरच्या व्यवस्थापकांना काही अनुभवसिद्ध व्यवहार्य सूचना देऊ पाहते.