* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789357200622
  • Edition : 2
  • Publishing Year : JUNE 2023
  • Weight : 250.00 gms
  • Pages : 140
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :B.D.KHER COMBO SET- 24 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AS A WRITER, AS A JOURNALIST, AS A FRIEND, AS A DISCIPLE, THE COMPANY OF MANY FAMOUS PEOPLE. THE. KHER BENEFITED. HE HAS BROUGHT TO LIGHT THE MEMORIES ASSOCIATED WITH ALL THESE GREAT PERSONALITIES THROUGH THIS COLLECTION OF PORTRAITS. HE WAS INSPIRED TO WRITE A NOVEL ON THE NEHRU FAMILY ON HIS FIRST VISIT TO INDIRA GANDHI. HE SAYS THAT HE ACQUIRED MANTRA-TANTRA POWER IN THE ASSOCIATION OF NYAYARATNA DHUNDIRAJASHASTRI VINOD. TALKING ABOUT THE GREATNESS OF MANOHAR MALGAONKAR, HE MENTIONS THAT HE GAVE THE OPPORTUNITY TO TRANSLATE THE NOVEL `THE PRINCESS` INTO MARATHI WITH A NOMINAL ROYALTY OF ONE RUPEE. HE SAYS THAT HE HAS FOLLOWED THE FOOTSTEPS OF PHADKE`S MAKHMALI LANGUAGE. MR. PU. GOKHALE, SHIVAJIRAO BHOSALE, VS. S. HE HAS ALSO AWAKENED THE MEMORIES OF WALIMBE ETC. THE SOCIAL, POLITICAL AND CULTURAL CONDITIONS OF THE TIME ARE ALSO SEEN IN ACCORDANCE WITH THESE PROFILES. THIS DESCRIPTIVE MEMORY FRAGRANCE IS SURE TO HIT THE SPOT
लेखक म्हणून, पत्रकार म्हणून, मित्र म्हणून, शिष्य म्हणून अनेक नामवंतांचा सहवास भा. द. खेर यांना लाभला. या सर्व थोर व्यक्तित्वांच्या सहवासातील आठवणींना त्यांनी या व्यक्तिचित्रसंग्रहातून उजाळा दिला आहे. इंदिरा गांधींच्या पहिल्या भेटीतच नेहरू घराण्यावर कादंबरी लिहिण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद यांच्या सहवासात त्यांना मंत्र-तंत्र शक्ती प्राप्त झाल्याचे ते सांगतात. मनोहर माळगावकरांचा मोठेपणा सांगताना ‘दि प्रिन्सेस’ या कादंबरीचा मराठी अनुवाद करण्याची संधी त्यांनी नाममात्र एक रुपया रॉयल्टी घेऊन दिल्याचं ते नमूद करतात. ना. सी. फडके यांच्या मखमली भाषेच्या पाऊलवाटांचा माग घेत गेल्याचं ते सांगतात. श्री. पु. गोखले, शिवाजीराव भोसले, वि. स. वाळिंबे इत्यादींच्या आठवणीही त्यांनी जागविल्या आहेत. या व्यक्तिचित्रांच्या अनुषंगाने तत्कालीन सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीचंही दर्शन घडतं. हा व्यक्तिचित्रणात्मक स्मृतिसुगंध नक्कीच दरवळणार
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#भा. द. खेर #व्यक्तिचित्रण #ललित #मराठीपुस्तक #मेहतापब्लिशिंगहाऊस #B.D.KHER #LALIT #MARATHIBOOK #MEHTAPUBLISHINGHOUSE"
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more