"GREAT GIFT OF SATYAGRAHA WAS GIVEN BY MAHATMAJI TO THE COUNTRY. THE FULLY DEVELOPED INVENTION OF MAHATMAJI`S SATYAGRAHI TECHNIQUE WAS SEEN IN THE FREEDOM STRUGGLE OF SOLAPUR IN 1930. THIS EVENTUALLY LED TO THE EXISTENCE OF THE `PEOPLE`S STATE` IN SOLAPUR AS ENVISIONED BY MAHATMAJI. REALIZING THE DANGER, THE BRITISH EMPIRE ISSUED MARTIAL LAW IN SOLAPUR AND ENFORCED IT FOR FIFTY-NINE DAYS. WHAT HAPPENED IN SOLAPUR NEVER CAME OUT OF SOLAPUR. MAHATMAJI HIMSELF AND HIS FOLLOWERS DID NOT UNDERSTAND THIS VICTORY OF THEIR SATYAGRAHI TECHNIQUE TILL THE END. THIS EVENT, WHICH SHOULD BE A GOLDEN PAGE IN THE HISTORY OF INDIAN FREEDOM STRUGGLE, WAS NOT CAREFULLY RECORDED AND FELL INTO OBLIVION.
THIS UNKNOWN HISTORY IS EXPLORED IN THE BOOK SOLAPUR MARTIAL LAW 1930."
"सत्याग्रहाची विलक्षण देणगी महात्माजींनी देशाला दिली. महात्माजींच्या सत्याग्रही तंत्राचा पूर्ण विकसित अविष्कार १९३० सालच्या सोलापूरच्या स्वातंत्र्यलढ्यात दिसला. याची अखेर महात्माजींच्या कल्पनेतले ‘लोकराज्य` सोलापूरात अस्तित्वात येण्यात झाली. चाणाक्ष साम्राज्यसत्तेने यामधला धोका ओळखत सोलापूरात मार्शल लॉ जारी करून तब्बल एकोणपन्नास दिवस राबवला.
सोलापूरात जे घडले ते सोलापूरबाहेर कधी आलेच नाही. खुद्द महात्माजींना व त्यांच्या अनुयायांना आपल्या सत्याग्रही तंत्राचा हा विजय अखेरपर्यंत समजला नाही. समज गैरसमजाच्या या कल्लोळात सोलापूरच्या लढ्याबाबतची तमाम भारतीयांची धारणा ही सिसेरोच्या वरील वचनाप्रमाणे राहिली. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात सुवर्णपान ठरावे अशी ही घटना सजगपणे नोंद न झाल्याने विस्मृतीच्या अडगळीत गेली.
सोलापूर मार्शल लॉ १९३० या पुस्तकात या अज्ञाताचा शोध घेतलेला आहे.
"