NA
‘गोष्ट डॉट कॉम किशोरांसाठी’ या पुस्तकात किशोरवयीन मुलांसाठी आवश्यक असणारी मूल्ये आणि संस्कार यांच्याशी संबंधित बोधकथा ज्ञानदा नाईक यांनी लिहिल्या आहेत. आजच्या काळात किशोरवयातील मुलांना मोबाईल, टी.व्ही., इंटरनेट, व्हिडिओ गेम्स अशा अनेक भुरळ पाडणाNया गोष्टी उपलब्ध आहेत. यांच्या पसाNयात हरवलेली मुले जगण्यासाठी आवश्यक अशी मूल्ये आणि संस्कार हरवून बसतात. जगण्यातला आनंद गमावून बसतात. फार लहानही नाही आणि मोठेही नाही अशा अडनीड वय असणाNया या मुलांना दिशा देण्याचे काम या बोधकथा करतात. कुठलाही उपदेश नाही, तर ‘कसे जगावे’ हे या बोधकथांमधून ज्ञानदा नाईक सांगतात. प्राणी, पक्षी, पुÂले, पाने यांना त्यांनी आपल्या कथांमध्ये बोलते केले आहे. प्रामाणिकपणा, धैर्य, धाडस, चातुर्य, कल्पकता, संवेदनशीलता या गुणांचे महत्त्व त्यांनी या बोधकथांमधून सांगितले आहे. आपल्या आवडीनिवडी, छंद जोपासणे किती आवश्यक आहे, ते सांगितले आहे. तसेच आपले मित्र, संस्कृती, निसर्गाप्रती प्रेम, समाजासाठी आपली कर्तव्ये यांचे महत्त्वही या बोधकथा सांगतात. किशोरावस्थेतील मुलांमध्ये भावनिक ओलावा निर्माण करणारा हा बोधकथांचा झराच ज्ञानदा नाईकांनी आपल्यासाठी आणला आहे.
AWARD FOR EXCELLENCE IN BOOK PRODUCTION, 2023.