* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SPARSHKAMALE
  • Availability : Available
  • ISBN : 9788171618989
  • Edition : 7
  • Publishing Year : OCTOBER 1978
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 176
  • Language : MARATHI
  • Category : LITERATURE
  • Available in Combos :ANAND YADAV COMBO SET-33 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ADORNMENT HAS A PECULIAR PLACE IN OUR LIFE. BUT MANY A TIMES, IT PORTRAYS WOMAN AS A MEDIUM TO SATISFY HEDONISM AND NOT AS A PERSON. THIS IS NOT TRUE. A WOMAN HAS SOME SPECIAL PLACE. SHE HAS AN EXISTENCE BEYOND THE LUST, SHE HAS ETERNAL BEAUTY, WHICH CAN BE SAVOURED WITHOUT INTERMINGLING IT WITH LUST. THE ARTICLES INCLUDED UNDER THIS BOOK ARE WRITTEN WITH THIS ANGLE, TO DESCRIBE HER BEAUTY BEAUTIFULLY. TO SHOW HER AESTHETICNESS. THROUGHOUT THE ARTICLES SHE MEETS US IN VARIOUS FORMS, SOMETIMES SHE IS A CHARMING BABY ANGEL, SOMETIMES SHE IS AN INNOCENT GIRL, SOMETIMES A FULLY GROWN LADY, SOMETIMES AS AN ELITE LADY OF NOBLE BLOOD IN A 9 YARD SAREE, SOMETIMES AS A CONFIDENT URBAN LADY IN A 6 YARD SAREE. SOMETIMES, SHE IS THE `ADIMAYA`, A CLOSE FRIEND, A LOVER, A WIFE, A MOTHER, AND ALL THE TIMES A DIVINE POWER CARING FOR THE MANHOOD.
शृंगारिक वाङ्मयात स्त्रीला भोगलालसेच्या पलीकडे आणखी एक नितान्तसुंदर अस्तित्व असते. आस्वादाच्या पातळीवर तिच्या अस्तित्वाचे रूपसौंदर्य अनुभवता येते. आस्वादाच्या पातळीवर स्त्रीचे विविध रूपांतील सौंदर्य आविष्कृत करावे, या प्रेरणेने या संग्रहातील ललितलेख लिहिले आहेत. कधी ती बालअप्सरेच्या रूपात भेटेल, तर यौवनमुग्ध, ललितगात्रा मदनिकेच्या स्वरूपात जाणवेल, कधी ती नऊवारीतील खानदानी, कुलीन स्त्री होऊन येईल, तर कधी सहावारीतील धीट, नागर ललना होऊन भेटेल; आणि कधी आदिमायेच्या मूलभूत रूपात सखी, प्रिया, पत्नी, जननी यांसारख्या विविध नात्यांनी पुरुषाचा सांभाळ करणारी दैवी शक्तीही असेल. स्त्रीची अशी अनेकविध रूपे जेव्हा रसिक पुरुषमनाला सामोरी येतात, तेव्हाच असे ‘स्पर्शकमळे’ मधील शृंगारसमृद्ध ललित लेख घडतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#झोंबी #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार १९८८-८९) #(दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स -उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार १९८९) #(मारवाडी संमेलन पुरस्कार १९९०) # (साहित्य अकादमी पुरस्कार १९९०) #(प्रवरानगर - विखेपाटील पुरस्कार १९९१) #(संजीवनी साहित्य पुरस्कार, कोपरगाव १९९४) # नांगरणी # (रोहमारे ग्रामीण पुरस्कार १९९०) #घरभिंती #काचवेल #माऊली # (कालीमाता साहित्य पुरस्कार १९८६ #परिमल लेखन पुरस्कार १९८६ # नटरंग #(महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९८२) # गोतावळा # शेवटची लढाई #(राज्य पुरस्कार २००१-०२) #भूमिकन्या #झाडवाटा # उगवती मने #(राज्य पुरस्कार २००२-०३) # आदिताल # डवरणी #माळावरची मैना # घरजावई #खळाळ #उखडलेली झाडं #सैनिक हो, तुमच्यासाठी... #मळ्याची माती #मायलेकरं #साहित्यिकाचा गाव #मातीखालची माती #स्पर्शकमळे #पाणभवरे #साहित्यिक जडण-घडण # ग्रामसंस्कृती #(रा. ना. सबनीस वाङ्मयपुरस्कार २००२) # मराठी लघुनिबंधाचा इतिहास #साहित्याची निर्मिती प्रक्रिया #ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव आत्मचरित्र मीमांसा #"ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या #(राज्य पुरस्कार १९८३) # मराठी साहित्य - समाज आणि संस्कृती #१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणिसाहित्यातील नवे प्रवाह # डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास #ZOMBI #NANGARNI #GHARBHINTI #KACHVEL #MAULI #NATRANG #GOTAVALA #SHEVATCHI LADHAI #BHUMIKANYA #ZADVATA #UGVATI MANE #AADITAL #DAVARNI #MALAVARCHI MAINA #GHARJAWAI #KHALAL #UKHADLELI ZADE #SAINIK HO TUMACHYASATHI #MALYACHI MATI #MAI LEKARA #SAHITYIKACHA GAON #MATIKHALCHI MATI #SPARSHKAMALE #PANBHAVARE #SAHITYIK JADAN-GHADAN #GRAMSANSKRUTI #MARATHI LAGHUNIBANDHACHA ITIHAS #SAHITYACHI NIRMITI PRAKRIYA #GRAMINTA SAHITYA ANI VASTAV #AATMACHARITRA MIMANSA #GRAMIN SAHITYA : SWARUP ANI SAMASYA #1960 NANTARCHI SAMAJIK STHITI ANI SAHITYATEEL NAVE PRAVAH #DR. ANAND YADAV EK SAHITYIK PRAVAS
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL (YUVA)

    ‘स्त्री-पुरुष लैंगिक संबंध हा फार फार पूर्वीपासून साहित्यातला एक प्रमुख भाग राहिला आहे. जसजसं समाजातील स्त्री-पुरुषांवरील लैंगिक बंधने शिथिल होत गेली. तसतशी साहित्यात लैंगिक संबंधातले चित्रण खूप धिटाईने, उघडपणे येऊ लागले. मुळात लैंगिक भावनेबद्दल कसं िहावं, किती प्रमाणात लिहावं आणि किती लिहिले तरी ते अश्लील होऊ न देता संदर्भासकट लिहून शृंगारिक होईलस, हे बघणे लेखकाचे काम आहे. असे कितीतरी लेखक मराठीत आहेत, पण मला खास करून तुला सांगावेसे वाटते असे नाव आहे आनंद यादव यांचे ‘स्पर्शकमळे’ हे पुस्तक. शृंगाराचे वर्णन प्रियकराने प्रेयसीला हळुवार स्पर्श करावेत, तसे येते. जणू प्रत्येक शब्द हा लेखकाचा स्वत:चा शृंगार भासावा. स्त्री-पुरुष लैंगिक आचार-विचारांचा ‘निसर्ग’ इथे लेखक उभा करतो. इथं तू लेखक विचारात घेऊ नकोस. त्याचे लेख घे. शृंगार हाच जीवनाच्या स्थायीभावाच्या रूपात वावरतो. तुला वात्सायन माहीत असेल, पण इथं वात्सायनाचे दर्शन घडत नाही. प्रत्यक्ष लैंगिक संबंधाचे वर्णन नाही. पण यात संपूर्ण शरीरच शृंगारिक सौंदर्याने नटल्यानंतर डोळे, कान, हात, पाय अगदी चालणेसुद्धा कसं मोहक आणि शृंगारिक होते. ते दिसते. वाचकांना उत्तेजित करणाऱ्या पुस्तकासारखं हे पुस्तक नाही, तर वाचकांच्या मनात स्वत:चीच एक नैसर्गिक माणूस म्हणून प्रतिमा तयार करण्याचे काम हे पुस्तक करते. मुळात या पुस्तकात शृंगार ह भोगलोलूप म्हणून येत नाही तर एक आस्वादक म्हणून येतो. स्वत:च्या नैसर्गिक रसांना तृप्त करणारा म्हणून येतो. शृंगार स्पर्शकमळातून व्यक्त होत असताना तो कोणालाही दुखावत नाही, तर उलट तो मातेच्या ममतेने, आपुलकीने स्वत:च्या हाताने चार घास भरवावे तसा भरणपोषाण करतो. हा शृंगार शरीर भोगाच्या पातळीवरून एका आंतरिक नितांत सुंदर अशा जगात घेऊन जातो. इथं स्त्री-पुरुष हा भेद तसाच ठेवून, त्याला कोणतीही आध्यात्मिक किंवा आदर्शाची कल्पना न चिकटवता भावनिक पातळीवर हा शृंगार घडताना दिसतो. मुळात येथे अनेक लेख आहेत, पण या लेखांची जी माळ आहे. त्यातील धागा एकच आहे तो म्हणजे शृंगार, प्राकृत शृंगार. शृंगाराबद्दल अनेक कवी, लेखक, नाटककार आणि समाजातल्या इतर व्यक्तींकडून मी खूप काही ऐकले होते, वाचले होते, पण फक्त शृंगारावर ललित गद्य उपलब्ध आहे, हे मला या ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’च्या पुस्तकाने सांगितले. कोणताही आडपडदा न ठेवता. ...Read more

  • Rating StarDAINIK KESRI 08-07-1979

    मनाला व्याकुळ करणारी ‘स्पर्शकमळे’… प्रत्येक संवेदनशील पुरुष बालपणापासून स्त्रीविषयक अनुभव कणाकणाने गोळा करीत असतो, आपली जाणीव संस्कारित करीत असतो आणि जीवन समृद्ध करीत असतो. निरनिराळ्या वेळी, वेगवेगळ्या वस्त्रांत आणि भिन्न-भिन्न भावावस्थेतील तिची दर्ने, तिचे शब्द विविध निमित्तांनी झालेले तिचे स्पर्श सारे काही कृपणपणाने तो साठवीत असवतो. एकांतात त्यांची उजळणी करून आपला अनुभवांचा ठेवा तो वाढवीत असतो. अशा वेळी त्याचे मन कातर होते, हळवे होते, उत्कंट बनते. पण आपल्या या आनंदाच्या ठेव्याबद्दल सगळ्याच पुरुषांना काही बोलता येत नाही. मनावर सगळ्या प्रकारचे दबाव असतात. स्त्रणपणापासून आत्ममैथुनात्मक विकृतीपर्यंतचे सर्व प्रकारचे आरोप येण्याची भीती असते. शिवाय, आपल्या नाजूक थरार असलेल्या अनुभवांच्या तुलनेने सुचणारे सगळे शब्द भडक, भणंग, फत्तरासारखे जडशिळ आणि उष्टेशिळे वाटायला लागतात. वाचकही व्याकूळ ! अशा या पार्थिव-अ पार्थिवाच्या सीमारेषेवरील अनुभवांना डॉ. आनंद यादव यांनी ‘स्पर्शकमळे’मध्ये शब्दरूप दिले आहे. या लेखनात कुठे अट्टाहास नाही की शब्दांमधून शिल्प उभे करण्याचा प्रयत्न नाही. आपल्या अनुभवांकडे, त्या अनुभवांनी निर्माण केलेल्या भाववृत्तींकडे निखळपणाने पाहण्याच्या आत्ममग्न वृत्तीमुळे यादवांचे शब्द पारदर्शक होतात. त्यांचे अनुभव वाचकांच्या अनेक विस्मृत अनुभवांनी जागृती आणतात, त्यांच्याशी संवाद साधतात. झंकारलेल्या तारांच्या नुस्त्या जवळ असण्याने दुसरे वाद्य झंकारू लागावे तशी वाचकाची अवस्था होते. यादवांच्या अनुभवातील नाजूक थरार वाचकाच्या अनुभवांना प्राप्त होते आणि एखाद्या कातरवेळेसारखा तोही उत्कंट, हळवा आणि व्याकूळ होऊन जातो. अर्थात् हे दुष्प्राप्य श्रेय यादवांना या संग्रहातील प्रत्येक ललित लेखांत साध्य होतेच असे नाही. त्यांच्यावरही व्यक्त-अव्यक्त असे दबाब येतात. संभाव्य प्रतिक्रियांबद्दल तेही सावध असतात आणि ‘आपली’ अशी एक बाजू वकिली कौशल्याने मांडून ठेवतात हे या संग्रहाला जोडलेल्या ‘‘मराठी शृंगारिक गद्यवाङ्मय आणि ‘स्पर्शकमळे’ ! ’’ या काहीशा बटबटीत असलेल्या प्रास्ताविकावरून दिसून येते. यादवांची तक्रार या प्रास्ताविकांत मराठीतील स्त्रीविषयक व शृंगाराविषयक अनुभव व्यक्त करणाऱ्या लेखनाविषयी यादवांनी दोन तक्रारी केल्या आहेत. हे लेखन ‘विकारविवश’ असते आणि असे अनुभव ‘मी’च्या नावे व्यक्त करण्यास मराठी लेखक कचरतात. यादवांच्या मते भोगाच्या नव्हे तर आस्वादाच्या पातळीवर स्त्रीच्या नितांत सुंदर अस्तित्वाचे रूपसौंदर्य अनुभवास येते आणि असे अनुभव ‘मी’च्या नावे व्यक्त करण्याच्या बाबतीतला सोवळेपणा सोडून द्यायला हवा, कारण प्रत्यक्षांत ‘मी’ला आलेल्या अनुभवांच्या आविष्कारामुळेच ललित गद्याला आत्मचरित्रस्पर्शी वास्तवाचे वेगळे परिणाम लाभत असते. यादवांच्या या दोन्ही तक्रारींमध्ये तथ्य असले तरी वास्तविक त्या दोन्ही तक्रारीचे मूळ एकाच वाङ्मयीन मूल्यात आहे. हे मूल्य म्हणजे लेखनपूर्व व लेखनगर्भ आत्मनिष्ठेचे ! त्यामुळे यादवांनी हे प्रास्ताविक लिहून भलत्याच गोष्टींवर म्हणजे त्यांच्या विषयावर लक्ष केंद्रित करायला मदत केली आहे, त्यामुळे यादवांचे चुकीच्या कारणांसाठी कौतुक होण्याचा किंवा तितक्याच चुकीच्या कारणांसाठी त्यांच्यावर हल्ला होण्याचा धोका संभवतो. अनुभवांचा कस व आवाका विषयावर नव्हे तर आविष्काराच्या सच्चेपणावरून कळतो. सुदैवाने स्वत: यादवांच्या लेखनात हा सच्चेपणा भरपूर प्रमाणात दिसतो. वाढाळ वयापासून प्रौढ वयापर्यंतचे स्त्रीविषयक व स्त्रीशीसंबंधित असे अनुभव त्यांनी येथे आस्वाद्य स्वरूपात सादर केले आहेत. त्यात वहिनी, प्रिया, पत्नी, मैत्रीण अशी पुरुषाची स्त्रीबरोबर निर्माण होणारी, विविध नाती आहेत, त्याचप्रमाणे गाठीची चोळी, स्कर्ट, नऊवारी असे स्त्रीचे वस्त्रविशेष आहेत. डोळे, आवाज, हाताची बोटे असे स्त्रीच्या सौंदर्याचे घटक आहेत, त्याचप्रमाणे तिच्या आठवणी, तिच्याविषयी मन जी चित्रे उभी करते तेही आहे. एकूण एका संवेदनशील, हळव्या, उत्कंट, आत्ममग्न पुरुषाच्या स्त्रीच्या संबंधातील विविध भावावस्था व अनुभव यांचे मनोज्ञ चित्रण म्हणजे ही ‘स्पर्शकमळे’ ‘वैनी’ मानदंड ठरणार ? या संग्राहतील ‘वैनी’ हा पहिलाच लेख यादवांच्या लेखन म्हणून असणाऱ्या थोरवीचा प्रत्यय देण्यास समर्थ आहे. करंदीकरांचा ‘स्पर्शाची पालवी’ किंवा इरावती कर्व्यांचा ‘मामंजी’ अशा काही थोड्या लेखांप्रमाणे यादवांचा हा लेख मराठी ललित निबंधाच्या क्षेत्रात मानदंडाची मान्यता पावेल यात शंका नाही. वैनीच्या आगमनामुळे व प्रेमळपणामुळे अडाणी वयाच्या मुलामध्ये निर्माण होणारी धूसर, अनामिक व हुरहूर लावणारी भाववृत्ती यादवांनी या लेखात हळुवारपणाने व सर्व बारकावे टिपणाऱ्या सूक्ष्मतेने व्यक्त केले आहे. वैनीनं सगळ्या घराचं रूप पालटून टाकलं हे सांगताना यादव लिहितात : ‘(वैनीनं) एक नात घरात आणलं. अरेतुरे सगळे अहोजाहो झाले. एका माणसामुळे सगळे मानाचे झाले.’ या लेखातला मी म्हणतो : ‘कधी आईनं वैतागून मला बडवायला सुरुवात केली की, वैनी सोडवून घेई. रट्ट्याला धरून बाजूनला घेऊन जाई. हृदयाबरोबर गच्च घरी. मला तिची ऊब मिळे. अशी कुणाची मिळत नसे. तिच्या उबीत उत्कंट होऊन रडतानाही बरं वाटे. ती आपल्या मऊ मऊ तळव्यांनी माझे डोळे पुसे. ओठांवरून हात फिरवे. ‘नाई, गप माझ्या सोन्या. भांडणं करू नयेत...’ असं दाटदाट सायीगत असलेल्या प्रेमानं ती बोले... बरेच दिवसात असं काही झालं नाही तर मला चुटपूट लागून राही. वैनीच्या कुशीत शिरायला मिळत नसे.’ निवेदकाचा लहानपणचा अनुभव आणि त्या अनुभवाचा त्याने आज लावलेला अन्वयार्थ यांचा एकजीव मिलाप अशा ठिकाणी दिसतो, त्यामुळे हे लेखन केवळ स्मृती जागवणारे व चाळवणारे राहात नाही तर त्या स्मृतींच्या संदर्भातील लेखकाची आजचा भावनिक अनुभूती व्यक्त करते. यादवांच्या शैलीचीही सर्व वैशिष्ट्ये वरील उताऱ्यात व्यक्त झालेली दिसतात. प्रमाणबोली, प्रादेशिकबोली, व संवादबोली यांचे मिश्रण करून (‘हृदयाबरोबर’, ‘उत्कंट’, ‘रट्ट्याला’, ‘न्हाई’, ‘करू नेत’, ‘उबीत’, ‘वैनी’) यादव वाचकाला विश्वासात घेतात, कृत्रिमतेची व प्रयत्नपूर्वकतेची आशंका पुसून टाकतात. लेखाच्या शेवटी तात्पर्य सांगितल्याप्रमाणे यादव लिहितात. ‘‘वैनीचं असं हे रक्ताचं आणि प्रेमाचं दुहेरी नातं पुरुषाला मिळालं तर तो पूर्ण पुरुष होईल !’’ या वाक्यात दिसणारी सुलभीकरणाची, ‘मध्यवर्ती कल्पना’ स्पष्ट करून सांगण्याची प्रवृत्ती इतरही काही लेखांत अधूनमधून डोकावते. फडके-खांडेकर प्रणीत लघुनिबंधामध्ये कल्पनाविस्ताराच्या प्रकाराचे व शब्दाने शब्द वाढवीत नेण्याच्या तंत्राचे दर्शन होई. ते वैशिष्ट्य यादवांच्या काही लेखात आपसूक येत असलेले आढळते. उदाहरणार्थ, डोळ्यांबद्दल लिहिताना त्यांना कृष्ण, राम (‘जगात राम शोधायला आलेला राम !’) खिस्त शिवाजी, हिटलर, सीता, उर्मिला, राणी लक्ष्मी, हेलन (ऑफ ट्रॉय) इत्यादींचे डोळे आठवतात ! (महात्मा गांधी, फ्लॉरेन्स नाइिंटगेल, बेबी शकुंतला, मीना कुमारी, गुरुदत्त इ. मंडळी जागेच्याअभावी सटकली असावीत !) अर्थात यावर उतारा म्हणून की काय यादव ‘‘भव्य डौलदार कमानीसारखा दिसणारा तुझा डोळा. मी खालच्या पापणीवर उभा. काळ्याभोर बुबुळामध्ये आत सकाळची स्वच्छ उन्हं पसरली आहेत. पाहता पाहता तुझं बुबुळ अलगद गुहेच्या तिळासारखं वर उघडतं नि मी आत जातो...’’ असं काही तरी जीवघेणं लिहून जातात. यादवांच्या या लेखनात कलात्मकता आणि व्यावसायिकता यांचे मिश्रण झालेले दिसते. पुस्तकाची सजावट माझ्या या निरीक्षणाला पुष्टी देणारीच आहे. मुखपृष्ठावरील रंगीत चित्र व आतील रेखाचित्रे (जोशी आर्टसची) अलंकरणात्मक आहेत; पण लेखांचा आशय मात्र त्यांच्यातून व्यक्त होत नाही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more