* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SUNDER APALI PHULBAG
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662694
  • Edition : 8
  • Publishing Year : 1994
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 152
  • Language : MARATHI
  • Category : TECHNOLOGY,ENGINEERING,AGRICULTURE
Quantity
THE PRICES OF LAND HAVE TOUCHED THE SKIES ON ONE SIDE AND ON THE OTHER THE SKYSCRAPERS ARE COMPETING THE SKIES IN BIG CITIES. BUNGALOW IS STILL A DREAM WHILE THE OWNERSHIP FLATS ARE THE FACT. NO ONE HAS A PERFECT IDEA ABOUT GARDENING IN HOUSE OR ON THE FREE LAND SURROUNDING OUR BUNGALOW. THIS BOOK IS ESPECIALLY FOR THOSE NATURE LOVERS TO HAVE A GARDEN IN HOUSES, IN BALCONIES, ON TERRACES ETC. THIS BOOK WILL GUIDE YOU ABOUT THE VARIETY OF PLANTS TO BE CHOSEN, THE PROPER WAY OF PLANTING, CARING AND NURTURING PLANTS. THERE IS A PLEASURE IN HAVING OUR OWN GARDEN, CARING FOR IT, SEEING THE BLOSSOM, THE FRUITS ON IT. TREES AND PLANTS WITH ITS BLOSSOM HAVE THE POWER TO TAKE AWAY THE PHYSICAL AS WELL AS MENTAL TENSIONS FROM US. THE PHYSICAL EXERTION WHILE CARING FOR THE PLANTS DURING GARDENING WILL HELP US TO IMPROVE OUR HEALTH; THIS IS AN ADDITIONAL BENEFIT FROM THE GARDEN. HAVE A GARDEN, SMALL OR BIG, HAVE PLANTS AROUND YOU INDOOR OR OUTDOOR, IN THE OPEN SPACE OR THE POTS, HANGING OR IN BALCONIES, IN EMPTY CARTONS OR BUCKETS. THEN LOOK AFTER THE GARDEN WELL WITH A SCIENTIFIC APPROACH, BE WITH NATURE AS MUCH AS YOU CAN, BE HAPPY, BE HEALTHY.
सध्या मोठ्या शहरात जमिनीच्या किमती आकाशाला जाऊन भिडल्या आहेत. म्हणूनच आकाशाची उंची गाठू पाहणा-या इमारती मोठ्या शहरात होऊ लागल्या आहेत. ‘बंगला’ हे एक अजूनही ‘स्वप्न’ आहे. ओनरशिप फ्लॅट हे मात्र ‘वास्तव’ आहे. आपल्या बंगल्यात किंवा फ्लॅटमध्ये बागेची हौस कशी करावी, याची विशेष कल्पना कुणाला नसते. म्हणूनच अशा रसिक लोकांसाठी घरात, बाल्कनीत, टेरेसवर कोणती झाडं, कशी लावावीत, त्यांची कोणती काळजी घेऊन ती कशी फुलवावीत-जोपासावीत, यासाठी हे मार्गदर्शन. बाग, ती घरातील असो की, घराबाहेरील असो, ती जोपासण्यात-फुलविण्यात एक आगळा-वेगळा आनंद असतो. आपण लावलेल्या झाडांना फुलं-फळं आलेली पाहिल्यावर अनेक प्रकारचे मानसिक ताणतणावसुद्धा कमी होतील. तसेच, झाडांची निगा करताना शारीरिक श्रम झाले की, प्रकृतीही सुधारेल. जागा लहान असो, की मोठी असो, तिथं बाग करा. जागा नसेल, तर कुंडीत, खोक्यात झाडं लावा. शास्त्रोक्त पद्धतीनं ती छान फुलवा. निसर्गाचा अमर्याद आनंद लुटा... आनंदी व निरोगी व्हा...
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SUNDERAPALIPHULBAG #SUNDERAPALIPHULBAG #सुंदरआपलीफुलबाग #TECHNOLOGYENGINEERINGAGRICULTURE #MARATHI #A. B.PATIL #ए.बी.पाटील
Customer Reviews
  • Rating StarDAINIK KESRI 12-02-1995

    आपल्या छोट्याशा घराभोवती एक छोटीशी बाग असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. प्रत्येकजण स्वत:चं हे स्वप्न पुरं करण्यासाठी धडपडतही असतो. ज्यांच्या घराभोवती थोडीफार जागा असते ते आपलं हे छोटंसं स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करू शकतात, परंतु आजकाल दिवसेंदिव वाढत चाललेल्या सिमेंट-काँक्रीटच्या जंगलामुळे स्वत:ची बाग तयार करणं अशक्य होऊन बसलं आहे. गॅलरीतून, खिडक्यातून, गच्चीतून छोट्या छोट्या कुंड्या ठेवून आपली हौस भागावणारे मात्र बरेच आहेत. या हौशी व्यक्तींनी जरूर वाचावे असे ‘सुंदर फुलबाग’ हे आ. बा. पाटील लिखित पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. बागेकडे अगदी नव्याने वळणाऱ्या किंवा आपल्या बागेची शास्त्रोक्त निगा कशी घ्यावी,त्यामध्ये कोणत्या सुधारणा कराव्यात, कोणती झाडे घरात ठेवावीत, गच्ची-बाग किंवा बाल्कनी-बाग कशी करावी याची माहिती पुस्तकात आलेली आहे. बागेची आखणी, खड्डे खणणे, बी, रोपे, कलमे, झाडांची छाटणी, कुंपण याबरोबरच कुंडीतील झाडे, हिरवळ (लॉन), बोन्साय, फुलदाणीतील पुष्परचना अशी इत्थंभूत माहिती पुस्तकात आलेली आहे. स्वत:ची सुंदर फुलबाग फुलवू पाहणाऱ्या फुलबागप्रेमींनी जरूर वाचावे असे हे पुस्तक. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KAHANI PAHILYA AAGINGADICHI
KAHANI PAHILYA AAGINGADICHI by RAJENDRA AKLEKAR Rating Star
Sainath Chawali

श्री राजेंद्र आकलेकर लिखित कहाणी पहिल्या आगीनगाडीची हे पुस्तक आज वाचून झालं.भारतामध्ये 16 एप्रिल 1853 रोजी 3:30वाजता बोरीबन्दर ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली.धावण्यापूर्वी ही रेल्वे भारतात सुरू करण्यासाठीचा लढा,चळवळ यातील अधिकारी लोकांनी केलें प्रामाणिक काम माणसाच्या , वाचकाच्या मनाला क्षणभर विचार करायला लावत.जेम्स बर्कले ने पहिला वहिला भारतातील रेल्वे मार्ग बांधला हे आजच्या पिढीतील क्वचित लोकांना माहिती असेल.लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं.रॉबर्ट स्टीफन्सन यांच्याशी बर्कले यांची आयुष्यभर मैत्री राहिली.रॉबर्ट स्टीफन्सन हे जॉर्ज स्टीफन्सन यांचे पुत्र होते.(ज्यांनी वाफेच्या इंजिनवर चालणारी पहिली रेल्वे उभारली होती.) बर्कले साहेब 7 फेब्रुवारी1850 ला भारतात पोहचले आणि 16 एप्रिल 1853 ला रेल्वे धावली.म्हणजे अवघ्या 3 वर्षात हे सर्व काम त्यांनी केले.रेल्वे सुरू करण्याचा ब्रिटिशांचा उद्देश जरी स्वार्थी असला तरी आपल्याकडे त्यांनी सुरू करण्यापूर्वी रेल्वे नव्हती आणि त्यांनी जर आणलीच नसती तर सुरू झाली असती की नाही हा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच उत्तर नकारार्थीच असेल. ही आहे भारतातील पहिल्या रेल्वेमार्गाची कथा! आपला प्रवास मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनसपासून सुरू होईल. या मूळ रेल्वेमार्गावर पडलेल्या अवशेषांकडे बघत,त्यांचा अर्थ लावत, त्यांची नोंद घेत तो उत्तर दिशेकडे कूच करेल. या अवशेषांपैकी काही अवशेष खूप महत्त्वाचे आहेत, काही अस्ताव्यस्त पडलेले आहेत, काही तर अगदीच क्षुल्लक आहेत; पण देशातील पहिल्यावहिल्या रेल्वेमार्गाच्या विकासाची गोष्ट सांगण्यासाठी ते अजूनही आपला श्वास टिकवून आहेत. त्या काळातल्या तंत्रज्ञानाबद्दल ते माहिती देतात. तसंच हे शहर कसं वाढलं, याचीही गोष्ट सांगतात. नेमक्या याच गोष्टीसाठी GIPR म्हणजे मध्य रेल्वे आणि BB&CI म्हणजे पश्चिम रेल्वे यांची रचना कशी झाली, हे इत्थंभूत सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. या संशोधनसाठी लेखकाने व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे यादरम्यान अनेकदा रेल्वेने प्रवास केला. अनेक गोष्टी धुंडाळण्यासाठी रेल्वेमार्गाच्या कडेने चालतचालत अभ्यास झाला. अर्थात त्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाची वेळोवेळी रीतसर परवानगी घेतली होती. भूतकाळातली रेल्वे, तिचे रूळ आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टींचं कौतुक करताना आपण हे विसरता कामा नये की, मुंबईची ही रेल्वे किंवा भारतीय रेल्वे नेहमीच भविष्याकडे पाहत आली आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more