* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SUSHILECHA DEV
  • Availability : Available
  • Editors : V. S. KHANDEKAR
  • ISBN : 9788171618194
  • Edition : 4
  • Publishing Year : JANUARY 1953
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
‘SUSHILECHA DEV’ IS A NOVEL BY V.M.JOSHI WHICH IS EDITED BY V.S.KHANDEKAR. ENGLISH EDUCATIONS BREAKS THE VARIOUS BARRIERS IN INDIAN EDUCATION SYSTEM. IT HAS GREAT ROLE IN THE DEVELOPMENT OF MODERN INDIAN WOMAN. THIS NOVEL TELLS THE STORY OF THIS MODERN INDIAN WOMAN. IT COVERS THE WIDE PICTURE OF CONTEMPORARY SOCIETY .
आधुनिक महाराष्ट्राच्या जीवनातला आणि इंग्रजी शिक्षणाबरोबर जी नवी स्री भारतात निर्माण होऊ लागली, तिच्या विकासातला एक महत्त्वाचा टप्पा या कादंबरीत फार चांगल्या रीतीने प्रतिबिंबित झाला आहे. या दृष्टीने ही कादंबरी एका विशिष्ट कालखंडाची प्रतिनिधी आहे. तो काळ म्हणजे एकोणिसाव्या शतकाची अगदी शेवटची वर्षे आणि विसाव्या शतकाची पहिली दोन तीन दशके हा होय. या कालखंडात मध्यम वर्गातल्या सुशिक्षितांच्या आचारविचारात आणि भावभावनात झपाट्याने जे बदल होत गेले त्यांचे चित्रण करायला वामनराव जोश्यांइतका अधिकारी लेखक क्वचितच मिळाला असता. एक तर वामनराव या काळातच लहानाचे मोठे झाले होते. प्रत्येक चांगल्या कादंबरीत, बीजरूपाने का होईना, लेखकांचे आत्मचरित्र दृष्टीला पडते, असे काही टीकाकार म्हणतात. त्यांचे हे विधान एकांगी असले तरी अर्थपूर्ण आहे. वामनराव जोशी हे मराठीतले एक थोर कादंबरीकार आहे. वैचारिकता हाच त्यांच्या प्रतिभेचा विशेष होय. त्यामुळे साहजिकच निरनिराळ्या व्यक्ती आणि प्रसंग व त्यांच्या विविध पात्रांवर होणाऱ्या प्रतिक्रिया यांचे वर्णन करताना वामनराव स्वत:च्या उत्कट अनुभवांचा आश्रय घेतात. ‘नवा समाज’, ‘नवा मानव’, ‘नव्या श्रद्धा’, ‘नवी मूल्ये’ हे शब्द आज आपल्या भोवतालच्या वातावरणांत सारखे घुमत आहेत. अशा वेळी ‘सुशीलेचा देव’ ही विचारप्रेरक कादंबरी महाराष्ट्रांत घरोघर वाचली गेली पाहिजे. तिच्यातल्या ज्योतीवर आपल्या मनातल्या स्नेहपूर्ण वाती लावून घेतल्या पाहिजेत. तसे करताना भोवतालचा अंधकार उजळविण्याचा मार्ग त्यांना नि:संशय दिसू लागेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #हिरवा चाफा #सुशीलेचा देव
Customer Reviews
  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    दैवांच्या दास्यातून मुक्त झाली, तरच आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊ… सत्तर वर्षांपूर्वी म्हणजे १९२९मध्ये म्हणजे प्रसिद्ध झालेल्या ‘सुशीलेचा देव’ या कादंबरीतील सुशीला आणि बळवंतराव बोटीने परदेशी जायला निघतात. तेव्हा देव नाकारणाऱ्या सुशीलेला लेखक म्हणतो ‘‘बाकी देव नको म्हणालात तरी तुमच्या पोटी एक देव, (नाहीतर देवी) सहासात महिन्यांनी येणार आहे असे मला एका गुप्तहेराने सांगितले आहे. वाईट एवढंच वाटतं की हा बाल-देव हिंदुस्थानाबाहेर जन्माला येणार आहे.’’ त्यावर सुशीलेचे यजमान बळवंतराव म्हणतात, ‘‘तो बालदेव सबंध जग आपलं घर मानील. तो कृत्रिम देशमर्यादा मानणार नाही. तो आंतरराष्ट्रीय होणार आहे.’’ आज सत्तर वर्षांनी अशा ‘आंतरराष्ट्रीय’ नागरिकत्व मिरवणाऱ्या भारतीयांची संख्या काही कमी नाही; परंतु सुशीलेला अभिप्रेत असणाऱ्या देवधर्मविरहित मनुष्यधर्माची कास त्यांनी धरलेली आहे असे मात्र दिसत नाही. आर्थिक विषमता संपुष्टात येऊन ‘समाज आणि व्यक्ती यातील द्वैत नष्ट झाल्यामुळे मालक आणि नोकर, माझं काम आणि तुझं काम हा भेदच राहणार नाही. सगळी कामं आपली, जे काही होतं ते आपलं असं प्रत्येकाला वाटू लागेल, आणि जो तो जे येईल ते काम आपलं असं समजून उत्तम रीतीनं, सुंदर रीतीनं, आनंदानं आणि हौशीनं करील, तेव्हा समाजातले विरोध, मांडणं, संप, मारामाऱ्या, युद्ध-महायुद्धंही संपतील.’’ हा तिचा आशावाद आजही केवळ स्वप्नातल्या कल्पनेतच आहे; आणि ‘‘आम्ही देवांच्या दास्यातून मुक्त झालो, आम्ही आता स्वतंत्र झालो, आणि लोकांनाही आम्ही आता स्वतंत्र करणार’’ हा त्यांचा निर्धार आज सत्तर वर्षांनीही केवळ कागदावरच राहिलेला आहे. हे सर्व खरे असले तरी सत्तर वर्षांपूर्वीच्या पुण्याच्या सनातनी ब्राह्मण समाजात देवाच्या अस्तित्वालाच आव्हान देणारी, देव नाकारून, देवांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन माणूसपण हेच सर्वश्रेष्ठ असा आग्रह धरणारी सुशीला ही नायिका आजही बंडखोर आणि आदर्श वाटावी अशीच आहे. अशा पाखंडी विचारांबद्दल त्यावेळचे ब्रिटिश सरकार तिला व तिचे द्वितीय पती बळवंतराव यांना पकडते; परंतु ब्रिटिश सरकारलाही त्या विचारात राजद्रोहाचा खटला भरण्यासारखे काही शोधून दाखवता येत नाही आणि सोडून द्यावे लागते. आजच्या ठोकशाहीच्या काळातही कदाचित हे आश्चर्य ठरावे. सांगायचे तात्पर्य हे की वामन मल्हार जोशी यांनी १९२९साली ‘सुशीलेचा देव’ ही कादंबरी लिहून मराठी माणसाच्या भावविश्वात किती प्रचंड गोंधळ उडवून दिला असेल - याची आज कल्पनाही करवत नाही. सुशीलेच्या रूपाने स्वंतत्र विचार करणारी, रूढी परंपरा-देवधर्म-कर्मकांड आणि बाबा वाक्यं प्रमाणम् या प्रवृत्तीला आव्हान देणारी तेजस्वी नायिका वामन मल्हारांनी उभी केली; आणि आजच्या बंडखोर स्त्रीलाही सुशीलेइतकी बंडखोरीची पातळी गाठणे जड जाते - इतकी तिची वैचारिक प्रगल्भता त्यावेळीही त्यांनी दाखवली - याचे अप्रूप उरतेच. म्हणूनच ‘सुशीलेचा देव’ ही कादंबरी आजही तितकीच वाचनीय आणि ताजी तरतरीत वाटेल - ती वाचायला हवी असे आग्रहाने सांगावेसे वाटते. वि. स. खांडेकर यांनी ‘सुशीलेचा देव’ची संक्षिप्त आवृत्ती ११२ पृष्ठात सिद्ध केली; आणि तिला प्रस्तावनाही लिहिली. १९५३ साली म्हणजे या कादंबरीच्या लेखनाला पंचवीस वर्षे होत आल्यावर! चांगले साहित्य कधी शिळे होत नाही. काळाच्या कसोटीवर ते घासून पुसून घेतले गेल्याने अधिकाधिक उजळत जाते. ही कादंबरी-लेखन आहे. ‘‘सुशीला ही खऱ्या अर्थाने नवी स्त्री आहे. मध्यमवर्गातल्या स्त्रीच्या वेषभूषेत आणि बाह्य जीवनातच क्रांती झालेली नाही, ती तिच्या अंतरंगातही होत आहे, तिचे विचार व भावना, श्रद्धा आणि ध्येये तळापासून ढवळून निघत आहेत, हे जितक्या सहजपणे, सूक्ष्मतेने आणि ठाशीवपणाने या कालखंडात कुठे प्रतिबिंबित झाले असेल तर ते या कादंबरीतच!’’ असे खांडेकरांनी म्हटले आहे. ते अगदी यथार्थ आहे. हरिभाऊ आपटे यांच्या कादंबऱ्यांतील स्त्री किंवा शारदा ‘आम्ही गाई गरिब जातीच्या! नाहि आम्हां वाचा’ असे म्हणणारी होती. १९१५मध्ये वामनरावांनी ‘रागिणी’ लिहून भांडखोर म्हणता येईल अशी उत्तरा ही उपनायिका चितारली. पण ती केवळ शाब्दिक बंड़खोरी करणारी होती. सुशीलेच्या रूपाने पहिली विचारप्रधान नायिका मराठी ललितवाङ्मयात अवतरली. तिचा पती रावबा दुसऱ्या बाईच्या नादी लागतो, समाजात मोकळेपणाने वावरताना तिला जगाच्या संशयी जिभेशी मुकाबला करावा लागतो; अशावेळी ती त्या संकटाला तोंड देतानाच आपले दु:ख हे समाजाच्या अशाच प्रकारच्या दु:खाचा एक लहानसा भाग आहे हे लक्षात घेऊन अंतर्मुख होऊन व्यापक विचार करू लागते आणि आपल्या सामाजिक दु:खांच्या मुळाशी असलेली कारणे शोधून काढते; हे तिचे वैशिष्ट्य आहे. ‘‘जगात देव आहे का?’’ असा प्रश्न विचारून, त्याच्या अस्तित्वाचा शहानिशा करणारी सुशीला ही त्यावेळच्या सनातनी व सुशिक्षित वर्गालाही भलतीच स्टंट वाटली असणार! त्या वेळच्या जागरूक स्त्रीची प्रतिनिधी म्हणूनही सुशीला अनेकांना परवडली नसती, इतकी ती वैचारिक दृष्ट्या प्रगत आहे. जळी स्थळी काष्ठी पाषाणी देव आहे हा प्रारंभीचा संस्कार. लग्नानंतर पती हाच परमेश्वर या कल्पनेला तडा जातो. पती म्हणजे मातीच हे कळून येते. परंतु हा सज्जनांचा वाली असलेला सर्वशक्तिमान परमेश्वर समाजातल्या सत्प्रवृत्त व सच्छील माणसांच्या सहाय्याला धावून येत नाही हे तिला जाणवते. परलोकाची व परमेश्वराची भीती आणि नीती यांची सांगड घातली गेली असली तरी वस्तुस्थिती तशी नाही; त्या देवाच्या हाती कौटुंबिक, सामाजिक कल्याणाचा भार सोपवून काहीही पदरी पडत नाही; हे तिला जाणवते. सुशीलेच्या मानसिक विकासाच्या अनेक पायऱ्या वामन मल्हारांनी दाखवल्या आहेत, आणि शेवटी ध्येय हाच देव या अनुभूतीच्या पायरीवर तिला आणून उभे केले आहे. ‘कधी कधी भूमितीतल्या एखाद्या सिद्धान्ताप्रमाणे, आपला युक्तिवाद सुशीलेच्या रूपाने वामनरावांनी मांडला आहे असेही वाटते. सुशीलेच्या जीवनात सुनंदा, बळवंतराव, रावबा आणि काफ हे तरुण येतात. रावबाचा पश्चाताप, सुनंदाचे कौटुंबिक जीवन, काफची आत्महत्या हे प्रसंग चटका लावणारे आहेत. पण ही पात्रे एकांगी वाटतात. कारण वामनरावांनी त्यांचा उपयोग सुशीलेच्या मानसिक विकासातील एकेक टप्पा म्हणून करून घेतलेला आहे. तेवढेच स्थान त्यांना दिले आहे. सुशीलेच्या देवविषयक कल्पनांमधील बदल जसे घडत गेले तसे ते समाजमनात घडत गेले का? सुशीलेला अभिप्रेत असणारा मानवधर्म अमलात आला का? असे प्रश्न विचारण्यात अर्थ नाही. चार्वाकाच्या काळापासून देवाचे अस्तित्व नाकारणारे विचारवंत समाजात होत आले आहेत; परंतु बहुसंख्या व्यक्ती देवधर्म-पारंपरिक नीतिकल्पना यांचा अवलंब करताना कुठल्याही प्रकारची चिकित्सा वृत्ती दाखवत नाहीत हेही खरे आहे. ‘‘सत्याचा शोध करणाऱ्या व्यक्तीला देवकल्पनेच्या बाबतीत अज्ञेयवादी होण्याशिवाय गती नाही’’ हे वामनरावांनी दाखवले आहे तसेच केवळ अज्ञेयवादाने मनुष्य सुखी होई शकत नाही हेही स्पष्ट केले आहे. सामान्य माणसातला देव जागृत दोईल तेव्हाच; देवाचे काम माणसाच्या हातून होत राहील. वेगळ्या देवाची गरज उरणार नाही.’’ असा संदेश देणारी सुशीला आज एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर आपण असतानाही आपल्याला पथप्रदर्शक वाटेल-अशीच तेजस्वी आहे. संबंध विश्व हेच आपले घर मानणाऱ्या विश्वमानवाची तिची संकल्पना आज तेवढीशी अवघडही उरलेली नाही. माहिती तंत्रज्ञानाने आपण सारे एकत्र आलो आहोत. नवा माणूस नवा समाज त्यातूनच घडणार आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more