* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"SWAMI (MASTER) THE MARATHA (NON MUSLIM) EMPIRE ESTABLISHED IN MAHARASHTRA BY CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ (D. 1680) AGAINST ALL ODDS LATER PASSED INTO THE HANDS OF THE PESHWAS (PRIME MINISTER) WHO BECAME THE SUPREME LORDS. THE MARATHA EMPIRE WHICH STRETCHED ACROSS A SIZEABLE PORTION OF WESTERN, CENTRAL AND NORTHERN INDIA SUFFERED A SEVERE SETBACK WHEN THE MARATHAS LOST THE (THIRD) BATTLE OF PANIPAT IN 1761. IT WAS AN IMMENSE LOSS OF MEN, MONEY, AND MATERIAL. THE THEN PESHWA NANASAHEB COULD NOT BEAR THE BRUNT OF THE CASUALTIES WHICH INCLUDED HIS ELDEST SON AND YOUNGER BROTHER, AND SOON PASSED AWAY. FOR THE SIXTEEN YEAR OLD MADHAVRAO WHO SUCCEEDED NANASAHEB, IT WAS NOT A PIECE OF CAKE. THE COFFERS WERE EMPTY, THE ROYAL COURT WAS FRAUGHT WITH INTERNAL DISSENSIONS. MADHAVRAO COULD NOT GO ALONG WITH HIS UNCLE, RAGHUNATHRAO, WHO WANTED TO BE THE PESHWA, AND WENT TO ANY EXTENT INCLUDING LOOTING HIS OWN SUBJECTS. THE NIZAM, HYDER, AND THE BRITISH HAD SET THEIR EYES ON THE MARATHA EMPIRE. SWAMI IS BASED ON THE LIFE AND CHARACTER OF MADHAVRAO WHO RESURRECTED THE MARATHA EMPIRE. HE REVIVED THE LOST GLORY AND PRIDE. THE EXTENT OF THE EMPIRE WAS NOW WIDER THAN BEFORE. HE CONTAINED THE ENEMY. SWAMI SKETCHES THE PERSONAL LIFE OF THE PESHWA AND SPECIALLY POIGNANT ARE THE PARTS COVERING THE DISCOMFORT HE FEELS WHEN RAGHUNATHRAO IS A THORN IN HIS FLESH, AND HIS UNTIMELY DEATH. THE NOVEL THROWS LIGHT ON THE POLITICAL, SOCIAL AND CULTURAL HISTORY OF THE MID PESHWA ERA. THE PORTRAYAL OF THE BOND BETWEEN MADHAVRAO AND HIS WIFE, RAMABAI, IS A SPECIAL FEATURE. RANJIT DESAI (1928-1992) TACKLED THE GENRE OF NOVELS WITH SUCH EASE THAT HIS COLLECTION INCLUDES ALL TYPES OF NOVELS: HISTORICAL, SOCIAL, MYTHOLOGICAL, AND BIOGRAPHICAL. HE WAS ALSO A PLAYWRIGHT AND HAS TO HIS CREDIT SHORT STORIES. "
"""महाराष्ट्रातल्या जनतेला जिने मंत्रमुग्ध केले, अशी मराठी सारस्वतातील अजरामर साहित्यकृती. रणजित देसाई : मराठी साहित्याला समृद्ध करणारे थोर साहित्यिक. १९४६ साली `भैरव` या कथेला लघुकथास्पर्धेत वाचकांकडून एकमुखाने पहिले पारितोषिक. १९५२ मध्ये `रुपमहाल` हा पहिला कथासंग्रह प्रकाशित. त्यानंतर सातत्याने कथालेखन. ग्रामीण जीवनावरील व ऐतिहासिक व्यक्तिरेखांवरील लेखन अधिक रसरशीत.`स्वामी`ला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त. मराठीमध्ये अतिशय लोकप्रिय असलेली व रसिकमान्यता पावलेली रणजित देसाई यांची कादंबरी. थोरले माधवराव पेशवे यांचे राजकीय जीवन, कर्तृत्व आणि त्यांचे वैयक्तिक करुणगंभीर जीवन याचे अतिशय उदात्त व प्रभावी चित्रण स्वामीत केलेले आहे. इतिहास आणि साहित्य ह्याचे एवढे उर्जस्वल नि रोमहर्षक रसायन मराठी भाषेत आजतागायत कोणी निर्माण करू शकलेले नाही.कादंबरीतील अतिशय उठावदार आणि कलात्मक व्यक्तिरेखा आहेत, माधवराव, रमाबाई आणि राघोबादादा यांच्या. सद्गुणी आणि तेजस्वी कर्तव्यदक्ष माधवराव, स्वार्थी, भोळसट, राजद्रोही राघोबा आणि सोशिक, त्यागी, साध्वी रमाबाई या तिन्ही चरित्ररेखा वाचकांच्या मनांवर विलक्षण परिणाम करतात. थोरल्या माधवराव पेशव्यांची ही चरित्रगंगा वाचताना करुणेने मन भरून येते. उदात्ततेने भारावून जाते आणि पूर्वजांच्या अभिमानाने मान ताठही होते. स्वामी वाचून वाचक दिपून जातो. दिग्मूढ होतो. इतिहास आणि ललितकृती या दृष्टींनी रसोत्कट असलेली शोकात्मिक कादंबरी."
* राज्य पुरस्कार १९६२. * ह.ना.आपटे पुरस्कार १९६३. * साहित्य अकादमी पुरस्कार १९६४.

Adaptation TypeTitleLink
TV SerialSWAMI
Original LanguageTranslated LanguageTranslated ByWebsite
MARATHIENGLISHEka
MARATHIGUJARATIMehta
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating Starप्र. सु. येतावडेकर

    नाबाद ६०--- स्वामी -मराठी साहित्यातील एक अजरामर असं अक्षरलेणं. कादंबरीचा भाषेचा बाज हा अभिजात मराठीची महत्ता अधोरेखित करणारा आहे. माधवराव पेशवा या मध्ययुगीन ऐतिहासिक व्यक्तीमत्वाच्या मध्यवर्ती भूमिकेवर बेतलेली कादंबरी, उण्यापुऱ्या चारशे सोळा पाना एक मोठा असा कालपट चित्रित करते. मराठेशाहीच्या राजकीय इतिहासातील मोठा काळ पेशवाईच्या राजकारणाने व्यापलेला आपल्याला पाहायला मिळतो. थोरले बाजीराव पेशवा ते अगदी सवाई माधवराव पेशवा यातील प्रत्येक व्यक्तीने पेशवा म्हणून पद भूषवत असताना मराठ्यांचे राज्य विस्तार कसे पावेल यासाठीच योगदान दिलेले पाहायला मिळेल. त्याच पेशवाईच्या कोंदणातील एक अस्सल रत्न म्हणजे माधवराव पेशवा हे होय. माधवराव पेशवा यांनी पेशवाईची वस्त्रे स्विकारल्यापासून ते थेऊर मुक्कामी अंतकाळ होईपर्यंतचा काळ यामध्ये चित्रित होताना आपल्याला पाहायला मिळतो. पेशवाईतील राजकारण, मोहिमा, राजकीय डावपेच याबरोबरच गृहकलह अशा विविध घटना यात येत राहतात. अल्पवयीन असताना पेशवाईची वस्त्रे प्राप्त झाल्यामुळे वाढलेली जबाबदारी, राज्यशकट हाकताना लागणारी सरदारमंडळी व त्यांची कुमक, शहरसुधारणा त्याच प्रकारे प्रजाहित लक्षात घेऊन राबवावे लागणारे प्रकल्प यात लागणारा कस यावर काम करत असताना एक प्रजाहित दक्ष राज्यकर्ता म्हणून माधवराव मनाला भावून जातात. निजामासोबतचा लढा, कर्नाटक स्वारीत हैदराचा केलेला बंदोबस्त याबरोबरीनेच अंतर्गत गृहकलह यात लागलेला माधवरावांचा कस याचे सम्यक वर्णन आपल्याला कादंबरीत पानोपानी दिसून येते. खुशमस्कऱ्या हुजऱ्यांच्या गर्दीत हरवलेले राघोबादादा, महत्वाकांक्षी आनंदीबाई, राजकीय सल्लागार सखारामबापू बोकील, नाना फडणीस,न्यायाधीश रामशास्त्री,माधवरावांचा सेवक श्रीपती त्याचबरोबरीने पेशवाईला साथ लाभलेली मराठा सरदार मंडळी ग्वाल्हेरकर शिंदे, इंदोरचे होळकर यांची राजनिष्ठा, करारी गोपिकाबाई, अल्लड नारायणराव, पतीबद्दल आपली निष्ठा ठेवून त्याला हरप्रसंगात साथ देणाऱ्या रमाबाई इ.या व्यक्तीरेखा आपल्याला भेटत असतात. पेशवाई राजकारणातील पेचप्रसंग, डावपेच, लढाया, पेशवाई थाट म्हणून आज वापरात असलेला शब्द त्या थाटाला साजेसं दरबारी वर्णन ही आपल्याला यात वाचायला मिळते. या वर्षी, २०२२ साली कादंबरीला प्रकाशित होऊन ६० वर्षे झाली आहेत.आजही वाचकांच्या पहिल्या पसंतीच्या अग्रक्रमात `स्वामी` आपलं अढळपद राखून आहे. ...Read more

  • Rating StarSharad Kharde Patil

    आज वाचुन पुर्ण झाली.. अगदी सहज सोप्या शब्दात कालखंड उभा करणे ही तर रणजित देसाई सरांची अफाट शक्ती च... श्रीमंत बाजीराव पेशवे वा पानिपत युद्धा नंतर मराठा साम्राज्यस लयाला नेण्यास नंतर चे पेशवे कारणीभूत या माझ्या अविचारी बुद्धीला छेद देणारी कांदाबरी.. "वाचाल तरच वाचाल " ...Read more

  • Rating StarAnkush Naik

    आजच कादंबरी वाचून पूर्ण झाली. राज्यकारभार सांभाळताना व गृहक्लेशातून जात असतानाही आपल्या पत्नीवर माधवरावांनी किती निस्सीम प्रेम केलं होतं, ह्याची माहिती झाली. माधवरावांचे आणि रमाबाईंचे शेवटी-शेवटी असलेले संवाद तर खरे प्रेम काय असते, याची जाणीव करून देात. कादंबरी वाचून पूर्ण झाल्यावर, मन खूप सुन्न झालं. प्रेमावरचे आज पर्यंत खूप चित्रपट बघितले आणि ते आवडले देखील, पण ही कादंबरी वाचून पूर्ण झाल्यावर वाटलं, की ह्या सारखी दुसरी प्रेमकथा असूच शकत नाही.. एवढंच म्हणेन, अप्रतिम !!!!!!!! अप्रतिम !!!!!!!! अप्रतिम !!!!!!!! रणजित देसाई सरांचे खूप आभार, त्यांच्या लेखनामुळेच एवढा छान इतिहास मनाला स्पर्शून गेला. 🙏🙏 ...Read more

  • Rating StarMahendra Dhalape

    "ती जागा फार सुंदर आहे, प्रशस्त घाट आहे. त्या घाटाच्या जरा वरच्या बाजूला जाऊन उभे राहिले व पहिले की काळ्या फत्तरानी रेखत गेलेला नदीकाठ डोळ्यात भरतो.नदीच्या पात्रावरून वाऱ्याबरोबर सळसळत येणाऱ्या लाटा मनाचे तरंग उठवतात... माधवरांवांचे मस्तक आपल्या मांडवर घेऊन रमाबाई चितेवरूनच दूरवर दिसणारा नदीचा पट्टा नजरेत भरत उराशी साठवत होत्या. अचानक दृश्य धुरकट होऊ लागले,ज्वाला वर चढत होत्या, फुटणाऱ्या लाकडाखेरीज काही आवाज आवाज कानांवर येत नव्हता.. क्षणभर दर्शन झाले ते ज्वालांच्या सोबतीने फडफडणाऱ्या रेशमी श्वेत-पदराचे.... रमाबाईंचे माधवरावांवर असलेलं निस्सीम प्रेम, कधीही एकमेकां कडे काहीही न मागणारे दोन्ही उभयतां, अत्यंत कमी वयात आलेल्या जबाबदारी स्वकर्तुत्वाने सिद्ध करणारे स्वामी...शब्दाच अपुरे आहेत पुढील वर्णनास.. शेवटची ३० पाने म्हणजे अगदी डोळ्या समोर सगळं दृश्य दिसत आहे असा भास आणि त्यातून होणारी मनाची घुसमट.. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
शोभना शरद देशमुख, येवदा.

साधारणतः शत्रुचा शत्रु तो आपला मित्र या न्यायाने हिटलरसंबंधी एक कौतुकाची भावना भारतीय जनसामान्यांच्या मनात होती. हे पुस्तक वाचून ती पूर्णपणे बदलली . हिटलर आणि ब्रिटन शत्रु असले तरी तो प्रत्यक्षात कसा होता हे वाचुन डोळे खाडदिशिी उघडले आणि कळले हिटलरतो हिटलरच ! वंशाभिमान काय असतो ?" त्यातील फोलपणा कळून आला. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
शोभा शरद देशमुख, येवदा

पुस्तक हाती घेतले अन् एका बैठकितच संपविले. पुस्तकात उल्लेखीत लहानमोठे किंबहुना कमी अधिक स्वरुपाचे प्रसंग अनेकांचे जीवन व्यापुन जातात पण म्हणून काही त्या सर्वांच्या कथा बनत नाहीत. मनमोहक शब्दांच्या मोहजालात वाचकांना अडकवून ठेवण्याची लेखकाची लेखनशली अफलातून आहे हे निश्चित. इ.स.ची सनावळी आणि जादू‌ई शब्दांची नियोजकता वाचकाला खिळवून ठेवते यातच कथेचे आणि लेखकाचे खरे यश दडलेले आहे ...Read more