* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SWAPNAKADUN SATTYAKADE
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663907
  • Edition : 11
  • Publishing Year : MARCH 2003
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 72
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE PRESENT BOOK `A TALE OF KALPANA CHAWLA` HAS BEEN PRINTED 10 EDITIONS SO FAR WHICH SHOWS THE POPULARITY OF THE BOOK AS WELL AS OF THE WRITER. BRINGING OUR DREAM INTO REALITY IS NOT AT ALL THAT EASY. IF REQUIRES A LOT OF PERSEVERANCE COURAGE AND MOST OF ALL INCESSANT ATTEMPT FOR THE INTRICATE. HERE IS A YOUNG LADY OF WHOM NOT ONLY KARNAL IN PANJAB (INDIA) BUT ALSO THE WHOLE WORLD SHOULD BE PROUD OF. SHE IS NO OTHER THAN KALPANA CHAWLA! (KC AS SHE WAS POPULAR IN HER GROUP.) KALPANA IS THE FIRST INDIAN LADY ASTRONAUT TO BE INCLUDED IN THE NASA`S COLUMBIA EXPEDITION. THIS EVENT WAS FANTASTIC AS SHE WAS BORN IN A TRADITIONAL INDIAN FAMILY. HOWEVER, WITH ALL ODDS, SHE COMPLETED HER ENGINEERING WITH AERONAUTICS AS HER SPECIAL SUBJECT. LANDING IN USA FOR FURTHER EDUCATION WAS HER NEXT ACHIEVEMENT. THERE WAS NO OTHER MODEL BEFORE HER BUT SHE HERSELF BECAME A MODEL FOR THE GENERATIONS TO COME! SHE HAD INDIRA GANDHI`S DESIRE TO WIN, JRD TATA`S TENACITY AND KIRAN BEDIE`S SENSE OF DUTY! SHE HAS SET UP AN EXEMPLARY LIFE. STILL REMEMBER THAT ONE HAS TO CARRY ONE`S OWN CROSS! AS SHE DID. SHE CREATED A NEW IDEAL BEFORE THOSE WHO `SEE` DREAMS AND TRY TO BRING THEM IN REALITY. IN HER LAST MESSAGE TO HER PROFESSOR DR. V. S. MALHOTRA SHE HAS RIGHTLY SAID, ``THERE DOES EXIST A WAY TO GO FROM A DREAM TO REALITY. THE ONLY THING THAT IS REQUIRED IS TO HAVE THE INSIGHT AND COURAGE IN YOU.`` SHE HAD ALL THAT! BORN IN KARNAL ON 1ST JULY 1961 SHE PASSED AWAY FROM THIS WORLD ON 1ST FEBRUARY 2003. IN A VERY SHORT SPAN OF 42 YEARS SHE ACHIEVED NAME AND FAME, WHICH IS INDESCRIBABLE. IN THE LAST EXPEDITION SHE FLASHED LIKE A METEOR AND SPREAD THE RAYS OF HOPE AMONGST MANY. THE BOOK SCREWS YOU FROM THE FIRST PAGE TO THE LAST. SUCH IS THE LANGUAGE! THE DETAILS OF HER LIFE ARE QUITE VIVIDLY PENNED. ANY ONE AND EVERYONE SHOULD READ THIS BOOK.
तिच्यापुढे कुणी आदर्श नव्हता. इंदिरेची इर्षा, जे. आर्. डीं.ची जिद्द, किरण बेदीचा कर्मवाद एकएक प्रकाशकण वेचून तिनेच त्याचा धु्रवतारा बनवला. आणि त्याकडे पाहत ती पावले टाकत राहिली. एक नवी वाट निर्माण केली, मागच्यांसाठी आदर्श ठेवला. उल्केप्रमाणे ती क्षणार्धात अंतर्धान पावली... राख शरीराची होते. विचारांची, आदर्शांची राख करणारा अग्नि अजून जन्मला नाही. तिने असंख्यांच्या मनात प्रकाशाचे कण पेरले. ते रुजतील, फुलतील आणि त्या तारकापुंजातून तिचेच तेज फाकेल. तिने प्रत्यक्षात आणलेला संदेश अमर आहे. स्वप्नाकडून सत्याकडे जाणारी वाट खरोखरच अस्तित्वात आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #SWAPNAKADUNSATYAKADE #MADHURISHANBHAG #स्वप्नाकडून सत्याकडे (कल्पना चावलाची कहाणी) #
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 06-07-2003

    कल्पना चावलाच्या जिद्दीची कहाणी... पहिली भारतीय अंतराळवीर स्त्री म्हणून कल्पना चावला हिचा सर्वच भारतीयांना अतिशय अभिमान वाटतो. १ फेब्रुवारी २००३ रोजी कोलंबिया यान पृथ्वीकडे येत असताना अपघात झाला आणि कल्पनासह सर्व अंतराळयात्री ठार झाले. जमिनीपासून सुारे साठ किलोमीटर उंचीवर असताना ही दुर्घटना घडली. त्याची प्रत्येक भारतीयाला हळहळ वाटली. चावला हिच्या व्यक्तिमत्त्वाने भारावून जाऊन लेखिका माधुरी शानभाग यांनी तिची जीवनकहाणी ‘स्वप्नातून सत्याकडे’ या छोटखानी पुस्तकात शब्दबद्ध केली. अगदी अल्प कालावधीत त्यांनी इंटरनेट वृत्तपत्रे, साप्ताहिकांतून आलेले तपशील यांच्या आधारे ६० पानांचे हे पुस्तक ‘कर्नाल ते केप कॅनव्हेरोल’, ‘निळ्या नभाच्या पलीकडे’ आणि ‘त्यानंतर...’ अशा तीन प्रकरणात विभागले आहे. “स्वप्नाकडून सत्याकडे जाणारा मार्ग अस्तित्वात आहे. फक्त तो शोधायची दृष्टी आणि धैर्य, तुमच्या अंगी असायला हवे,” असे २५ जानेवारी २००३ रोजी कोलंबिया अवकाशयानातून पाठविलेल्या संदेशात कल्पनाने म्हटले होते; आणि “अवकाशात प्रचंड वेगाने त्या पोकळीत फिरण्यामधली रोमांचकता मला पुन:पुन्हा अनुभवाविशी वाटते. मृत्यू सतत आपल्या आसपास घोटाळत असतो; पण तो सर्वत्र आहे आणि धोका पत्करणे, हा आमच्या कामाचा एक भाग आहे. कोणत्याही आनंदाची किंमत कशा ना कोणत्या रूपात द्यावीच लागते,” असे एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत तिने म्हटले होते. तिच्या अंगी असलेली धीरोदत्त वृत्ती यातून दिसून येते; पण तिच्या मृत्यूबद्दल हळहळही वाटतेच. कर्नाल येथे पंजाबी कटुंबात जन्मलेल्या कल्पनाला बालपणपासूनच विज्ञानाची आवड होती. टागोर बालनिकेतन शाळेत हुशार विद्यार्थिनीमध्ये तिची गणना होत असे. तिचा मोठा भाऊ कर्नालच्या फ्लइंग क्लबमध्ये जात असे, त्यामुळे कल्पनालाही आपण वैमानिक व्हावे, असे वाटे. त्यानुसार पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयात तिने मिळविलेला प्रवेश, त्यानंतर उच्च शिक्षणासाठी तिने टेक्सास विद्यापीठात मिळवलेला प्रवेश... जीन पियरे या फ्रेंच तरुणाकडून अमेरिकेत तिने विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेतले. १९८४ मध्ये त्याच्याशीच लग्न केले. १९८८ मध्ये डॉक्टरेट पूर्ण करून ‘नासा’मध्ये संशोधन विभागात तिला नोकरी मिळाली, येथपर्यंतचा प्रवास पहिल्या प्रकरणात आला आहे. त्यानंतर नासातील प्रशिक्षण, पहिली कोलंबिया मोहीम यांची तांत्रिक माहिती वगैरे सर्व तपशील दुसऱ्या प्रकरणात येतात. हे सर्व तपशील लेखिकेने संकलित करून नेटकेपणाने मांडले आहेत. त्यातून कल्पनाची बुद्धीची झोप, जिद्द, चिकाटी यांचे दर्शन घडते. पुढील भागात १६ जानेवारी २००३ला कोलंबिया अवकाशात झेपावले; पण त्याआधी तिला करावी लागलेली तयारी, या मोहिमेत नेमून दिलेले, सुरळीतपणे तिने पार पाडलेले प्रयोग या सर्वांची माहिती दिली आहे. आणि शेवटी ती दुर्घटना. पहिल्या भारतीय अवकाशयात्रीला आपण मुकलो. भारतालाच नव्हे, तर साऱ्या जगाला तिचा अभिमान वाटावा आणि येणाऱ्या पुढच्या पिढ्यांनाही. विज्ञाननिष्ठ पिढीची विज्ञाननिष्ठ पिढींच्या निर्मितीसाठी ती सतत स्फूर्ती देत राहील. असा आशावादहही व्यक्त केला आहे. तिसऱ्या प्रकरणात कल्पनाचा मृत्यू ही क्षणिक लाट न ठरता स्त्रियांना आणि पुरुषांनाही डोळसपणे आजूबाजूला पाहायला लावावे. कल्पनाचे आयुष्य, तिची धडपड, चिकाटी नव्या पिढीपर्यंत पोहोचायला हवी. समाजाला विज्ञानभिमुख करण्यासाठी कल्पना चावला ही प्रवृत्ती लोकांसमोर विशेषत: नव्या पिढीसमोर सतत राहायला हवी, हेच तिच उचित स्मारक ठरेल, असा आशावाद लेखिकेने व्यक्त केला आहे. प्रत्येक घर या पुस्तकाचे स्वागत व्हायला हवे. अत्यंत आटोपशीर असे चरित्र लिहून लेखिकेने चरित्रांच्या पुस्तकात भर घातली आहे. -डॉ. मंदा खांडगे ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA SAHITYA PATRIKA JAN - FEB 2006

    धगधगते अग्निकुंड ... अंगावर शहारे आणणारी कल्पना चावलाची उत्कंठावर्धक कहाणी. २१व्या शतकाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या तरुणाईला प्रेरणादायी ठरेल असे माधुरी शानभाग यांचे हे पुस्तक. आपल्या अंतरातला स्फुलिंग पेटता ठेवून त्यावर जगणाऱ्या राखेला प्रयत्नवादच्या आणि बुद्धिवादाच्या फुंकरीने उडवून लावणाऱ्या कल्पनाच्या व्यथांची ही कथा! कुणाचाही आदर्श समोर नसताना, किरण बेदीचा दुर्दम्य आशावाद, इंदिरेची झळाळणारी जिद्द, जे. डी. ची ईर्षा यांचा एकेक प्रकाश कण वेचून कल्पना त्याचा धु्रवतारा बनवते. स्वप्नाकडून सत्याकडे कल्पनाने जी खडतर वाटचाल केली त्याचे उत्कंठावर्धक चित्रण लेखिकेने केले आहे. तिच्या वृत्तीचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा, असे हजारो पालक आपल्या पाल्यांला यापुढे सांगतील. येणाऱ्या पिढ्यांपुढे एक आदर्श ‘रोल मॉडेल’ म्हणून स्वत:ला सिद्ध करणाऱ्या कल्पनाचे हे धगधगते अग्निकुंड! तिच्यापासून स्फूर्ती घेऊन विज्ञाननिष्ठ पिढी निर्माण होईल, असा विश्वास वाटतो. कल्पनाच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया जरी भारतात घातला गेला तरी तिचे कर्तृत्व फुलले ते अमेरिकेत. कल्पनासारखे भारतीय जेव्हा परदेशी जाऊन उज्ज्वल यश मिळवितात, तेव्हा आपण ते भारतीय असल्याचा अभिमान व्यक्त करतो. कल्पनाने जो विज्ञानवाद जोपासला, प्रयत्नवाद आणि परिश्रमाची वाट धरली ती प्रसिद्धी व पैसा देणारी नव्हती. तेव्हा कल्पनाचा मृत्यू ही क्षणिक लाट न ठरता स्त्री-पुरुषांनी डोळसपणे आजूबाजूला पाहावे. गल्लीबोळात नवी देवळे उभी राहण्यापेक्षा अभ्यासमंडळे आणि प्रयोगशाळा उभ्या राहाव्यात. १९४७च्या भारत-पाक आणि नंतर फाळणीपासून ते २००३ माधुरी शानभाग यांनी कर्नल ते केपकॅनव्होराल या भागात कल्पनाच्या जन्मापासून ते नासाच्या कॅलिफोर्नियातील अमेन्स रीसर्च सेंटरमध्ये संशोधक म्हणून काम करताना कल्पनाने घेतलेल्या गरुडभरारीचे त्रोटक पण अचूक चित्रण केले आहे. ‘वैâसी’ या नावाने अमेरिकेत ओळखली जाणारी, निळ्या नभाच्या पलीकडे झेपावणारी ‘आय अ‍ॅम कल्पना चावला फ्रॉम कर्नाल इंडिया’ म्हणत भारताविषयी सार्थ अभिमान बाळगणारी आणि १९९७ या दिवशी ‘कोलंबिया’मधून अवकाशात झेप घेणारी ‘पहिली भारतीय अंतराळ स्त्री’ म्हणून लेखिकेने कल्पनाची करून दिलेली ओळख उल्लेखनीय आहे. ‘कोलंबिया’चे अवकाशात उड्डाण जितके महत्त्वाचे त्यापेक्षा अंतराळ यात्रीचे प्रशिक्षण अधिक महत्त्वाचे आणि धोकादायक असते. त्यांचे उतरणे, अंतराळ यात्रीचे प्रशिक्षण, कोलंबियाचा ताशी २८,००० कि.मी. असलेला वेग, खास पोशाख, उड्डाणाच्या वेळीचा प्रचंड वेग आणि शरीरावर चार गुरुत्वाकर्षणाएवढा असलेला दाब हे सारेच लेखिकेने तरलपणे उभे केले आहे. पुढे यानाची गती २८,००० कि.मी. इतकी झाल्यावर यान आडवे होऊन अवकाशात पृथ्वीभोवती फिरायला सुरुवात होते. पृथ्वीभावेती घिरट्या घालून १६ दिवसांनी ते परतणार होते, परंतु जडत्वाच्या गुणधर्मामुळे फिरणारे यान त्याच गतीने फिरत राहते. लेखिकेचे समाजभान येथे प्रकट झाले असून त्यांनी केलेली सुरक्षा निरीक्षणे हे त्यांचे द्योतक आहे. अंतराळातील वर्णने रोमहर्षक केली असून अविस्मरणीय बनली आहेत. त्यामुळे ही वर्णने वाचकाच्या आंतरमनाचा ठाव घेणारी बनतात. उड्डाणाची वेळ अमेरिकेत पहाटेची होती. भारतात त्यावेळी रात्र होती. पहिल्या झटक्याला प्रचंड वेगामुळे माणसाच्या रक्तप्रवाहावर परिणाम होतो. त्या वेगाशी जुळवून घेताना रक्तदाबात अनियमित चढउतार होतात त्यासाठी जमिनीवर अशा वेगाचा सराव करावा लागतो. अंतराळवीर जेव्हा जमिनीवर असतात तेव्हा शरीरातील पाणी गुरुत्वाकर्षणामुळे पायाच्या दिशेने वाहते. अवकाशात आल्याबरोबर गुरुत्वाकर्षण नाहीसे होते. त्यामुळे पाणी सर्व शरीरावर साठून सर्वांगावर, विशेषत: चेहऱ्यावर सूज येते. १९ नोव्हेंबर १९९७ ते ५ डिसेंबर १९९७ असे १६ दिवस कल्पना ‘कोलंबिया’ यानात अंतराळात होती. त्या काळात त्यांनी पृथ्वीभोवती २५२ फेऱ्या मारल्या. ३७६ तास ३४ मिनिटे ती अवकाशात राहिली. सुमारे १ कोटी कि. मी. अंतर त्यांनी काटले. पृथ्वीपासून १५० कि. मी. उंचीवर होते. १६ जानेवारी २००३ साली ‘ए.ऊ.ए.१०७’ या कोलंबियाच्या दुसऱ्या फेरीसाठी तिची निवड होते. तेव्हा परत प्रशिक्षणासाठी नासाच्या वेगवेगळ्या विभागात काम करावे लागते. त्यामुळे पुढे ढकललेली भारत भेट रद्द होते. कल्पनाला अवकाशात जाण्यासाठी कोणकोणत्या दिव्यांतून जावे लागले याचे तपशीलवार वर्णन लेखिकेने केले आहे. तिला अभिनिवेश किंवा आत्मप्रौढी बिलकुल नव्हती. समोरच्या तरुणींना तिने, ‘आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा करा, त्यांना कधीही विसरू नका.’ एक दिवस ते सत्यात उतरते. असा संदेश तिने दिला. तिचा हा उपदेश नसून अनुभवाचे बोल वाटावेत असा प्रामाणिकपणा त्यात होता. दुसऱ्या उड्डाणाच्या वेळी या फेरीची ती कमांडर होती. प्रमुख आणि फ्लाईट इंजिनिअरच्या खुर्चीत बसलेली होती. यानात पाण्याने अंघोळ करता येत नाही. कारण पाण्याचा फवारा पडत नाही आणि तांब्या उलटा केला तर पाणीही पडत नाही. ओल्या सुगंधी टॉवेलने अंग पुसणे हीच अंघोळ सर्वांत कठीण काम म्हणजे मलमूत्र विसर्जन. ती एक कसरतच असते. कारण गुरुत्वाकर्षण नसल्याने काहीही खाली पडत नाही. द्रव पदार्थ स्ट्रॉने ओढून प्यावे लागतात. नियोजित वेळेआधी ६१ मिनिटे कल्पनाने कोलंबियाचा ताशी २८,००० कि.मी. असलेला वेग कमी केला. परतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्याचा संदेश पृथ्वीवरील नासाच्या नियंत्रण कक्षाला पोचला गती कमी करताना त्याची दिशा बदलून पृथ्वीपासूनची उंची कमी करण्यात आली. तेव्हा साधारण ऑस्ट्रेलियावर कुठेतरी ‘कोलंबिया’ने वातावरण प्रवेश केला. नियोजन वेळेआधी फक्त १६ मिनिटे कोलंबियाचा आणि कक्षाचा संपर्क तुटला. तेव्हा कोलंबिया जमिनीपासून सुमारे ६० कि.मी. अंतरावर होते. लुझियानातील लोकांना स्फोट झाल्याचा मोठा आवाज ऐकू आला आणि श्वास रोखून नियंत्रण कक्षात बसलेल्या नासाच्या वरिष्ठ तंत्रज्ञानां ‘कोलंबिया’ जळून नष्ट झाल्याची बातमी जाहीर करावी लागली. कल्पना जीवनाला पारखी झाली. भारतभेटीचे स्वप्न स्वप्नच राहिले. ‘मरावे परी किर्ती रूपी उरावे’ कल्पनाच्या मृत्यूने हे शब्द खरे करून दाखविले. भव्य यश मिळवून ती परत आली असती तर...! कल्पना चावलाचे आयुष्य, तिची धडपड, चिकाटी व तिचा प्रयत्नवाद लेखिकेने उत्कटपणे मांडला आहे. समाजाला विज्ञानभिमुख करण्यासाठी कल्पना चावला ही प्रवृत्ती नव्यापिढी समोर ठेवण्याचा लेखिकेचा प्रयत्न स्तुत्य वाटतो. -प्रा. डॉ. शिवाजीराव पाटील ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 06-04-2003

    फ्रॉम द पॉइंट ऑफ नो रिटर्न... कल्पना चावला हे नाव स्मरताच प्रत्येक भारतीयाच्या मनात दु:खाची एक तरी लकेर चमकून जाते. यापुढेही जात राहील. या दु:खाला सार्थ कौतुकाभिमानाची झालर आहे. केवळ या जगातच नव्हे, तर संपूर्ण विश्वावर तिने आपल्या नावाची मोहर उमटवली १ फेब्रुवारी २००३ च्या रात्री झालेल्या कोलंबियाच्या अपघातानं सारं विश्चच हळहळलं. पंजाबातल्या एका लहानशा शहरगावात जन्माला आलेल्या या आकाशकन्येची कहाणी माधुरी शानभाग यांनी रोचकपणे मांडली आहे. फाळणीमुळे विस्थापित व्हावं लागलेल्यांमध्ये चावला कुटुंबही होतं. जगण्यासाठी वाटेत तिथे पाय रोवून उभं राहण्याची जिद्द फाळणीतल्या विस्थापितांनी दाखवलीच. त्याच संस्कारावर आपल्या परिश्रमांचा साज चढवून कल्पनानं थेट अंतराळात पाऊल टाकलं. कल्पनाचं बालपण अन्य कोणत्याही भारतीय मुलीपेक्षा वेगळं नव्हतं. तिच्या वेगाच्या वाऱ्याच्या, साहसाच्या वेडाला (भारतीय संस्कृतीत नेहमी होतो तो) विरोध झालाच. एरोस्पेस इंजिनीयरिंगसारखा अभ्यासक्रम, परगावी आणि पुढे परदेशी शिक्षण या सगळ्यांसाठी तिला घरच्यांच्या मिनतवाऱ्या कराव्या लागल्या. रूढ अर्थानं तिचं कुटुंब आधुनिक जीवनशैली अनुसरणारं नव्हतं. ‘भारतीय स्त्री’ या संकल्पनेमध्ये अनुस्यूत असणारे सारे अडथळे तिला पार करावे लागले. मात्र या अडचणींचा कल्पनाने कधी बाऊ केला नाही. उलट भारतीय असल्याचा, एकत्र कुटुंबपद्धतीचा तिला नासाच्या निवडचाचण्यांमध्ये फायदाच झाला. व्यक्तिस्वातंत्र्याचे अतिरिक्त लाड पुरवण्याची मागणी करणाऱ्यांनी हे ध्यानात घ्यायला हवं. त्यामुळेच कदाचित कल्पनाने भारतीय भूमीशी असलेले संबंध शेवटपर्यंत टिकवून ठेवले होते. त्याच्या मनस्पर्शी कहाण्या या पुस्तकात वाचायला मिळतात. दर नव्वद मिनिटांत एक पृथ्वीप्रदक्षिणा (एक दिवस एक रात्र) घालण्याने उद्भवणारा त्रास, अवकाश मोहिमांची पूर्वतयारी, तत्संबंधी तांत्रिक बाबींची सोप्या शब्दांत माहिती लेखिकेने दिली आहे. कल्पनाने अवकाशातून पाहिलेल्या पृथ्वीचे केलेले वर्णन तिच्या वृत्तीतील लालित्याचा, सौंदर्याच्या ओढीचा पुरावाच आहे. रूक्ष संशोधनाच्या मुखवट्याआडचा कल्पनाचा हसरा चेहरा या पुस्तकानं वाचकांसमोर मांडला आहे. डॉ. आनंदीबाई जोशी या परदेशात जाऊन डॉक्टर होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला, डॉ. कमला सोहोनी या पहिल्या भारतीय महिला संशोधक, कल्पना चावला ही पहिली भारतीय अंतराळवीर... ही मालिका ‘पहिली’ या क्रमांकाच्या पुढे नेणं, हेच कल्पनाचं खरं स्मारक ठरणार आहे, हे लेखिकेचं मत वाचकाला अंतर्मुख करतं. ...Read more

  • Rating StarDAINIK PUDHARI 31-08-2003

    आकाशाला गवसणी घालण्याची स्वप्ने पाहणारी आणि ती स्वप्ने सत्यात उतरावित म्हणून जिद्दीने प्रयत्नांची पराकाष्ठा करणारी आदर्श भारतीय अवकाशकन्या कल्पना चावलाची ही जीवनकथा प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक भारतीयास अभिमानस्पद वाटावी अशीच आहे. ‘स्वप्नाकडून सत्याकड’ ही कल्पना चावलाची कहाणी माधुरी शानभाग यांनी खूप श्रम घेऊन समर्थपणे लिहिली आहे. कल्पनाला दुर्दम्य जीवनेच्छेचा, चिवट वृत्तीने झुंजत राहायचा वारसा तिच्या आई वडिलांकडून मिळाला होता. तिच्या वडिलांची जिद्द थेट तिच्या रक्तात उतरली होती. कल्पना लहानपणापासूनच हूड होती. बाहेरच्या जगात रमणारी होती. ती हट्टी होती, जिद्दी होती. भातुकलीच्या खेळात रमण्यापेक्षा चेहऱ्यावर वाऱ्याचे सपकारे घेत सायकलवरून रपेट मारण्यात तिला आनंद वाटे. शाळेत ती भरतनाट्यम, कराटेही शिकली. खेळात अनेक बक्षिसे तिने मिळविली होती. शाळेत असताना एकदा तिने एक मोठे पोस्टर बनविले होते. त्यात अवकाश यान, विमान, ग्रह-तारे होते. तिचा भाऊ मला पायलट व्हायचे आहे असे म्हणायचा. अवकाशात उडण्याचे बीज तेथेच कल्पनाच्या डोक्यात पेरले गेले. विरोध होत असतानाही तिने चंदीगडच्या पंजाब इंजिनिअरींग कॉलेजात प्रवेश घेतला. तिने हट्टाने ‘एरॉनॉटिक्स’ विषय घेतला होता. मध्यमवर्गीय शीख कुटुंबात राहणाऱ्या कल्पनाची झेप अवकाशाकडे होती. तिने पंजाब विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. पुढे ती शिकायला अमेरिकेस गेली. १९८८मध्ये आपली डॉक्टरेट पूर्ण झाल्यानंतर तिने अवकाशात जायच्या प्रयत्नांची आखणी करावयास सुरुवात केली. वयाच्या तिशीनंतर कल्पनाने नासाच्या संशोधन विभागातून अवकाशयात्री विभागात प्रवेश मिळविला. पुढे तिची निवड झाली. तिने त्यासाठी अनेक कसोट्या दिल्या. तिने जिद्दीने प्रशिक्षण घेतले आणि कोलंबिया अवकाशयान उड्डाणासाठी सज्ज झाले. कल्पना चावला पहिली भारतीय अवकाश कन्या ठरली. तिने आपल्या पृथ्वीचे, सूर्यमालेचे निरीक्षण केले. नवीन अनुभव घेतले. १९ नोव्हेंबर १९९७ ते ५ डिसेंबर १९९७ या काळात तिच्या यानाने २५२ पृथ्वी प्रदक्षिणा काढल्या होत्या. तिची मोहीम सफल झाली होती. ती आपल्या जन्मभूमीला कधीच विसरली नव्हती. २००३ साली कोलंबियाच्याच अवकाश यात्रेसाठी तिची फेरनिवड झाली होती. १६ जानेवारी २००३ रोजी तिचे अवकाश यान अवकाशात झेपावले. अवकाश यान परत येताना पृथ्वीच्या वातावरणात घुसल्यानंतर तापमान नियंत्रणाबाहेर गेले. प्रचंड दाब वाढला. कोलंबिया जमिनीपासून केवळ ६० कि.मी. अंतरावर असताना त्याने पेट घेतला. अनेक तर्कविर्तक झाले. हसतमुख कल्पनाची भरारी कायमची विसावली होती. कल्पना चावलाची ही कहानी विद्यार्थ्यांना, स्त्रियांना नक्कीच आदर्श वाटावी अशी आहे. स्वप्नाकडून सत्याकडे जाण्याचा मार्ग खडतर असतो, पण त्यातून यश प्राप्त होते याची साक्ष येथे पटते. अनेक बारकाव्यासह आपल्या समर्थ लेखणीने माधुरी शानभाग यांनी कल्पनाची सत्यकथा सांगितली आहे. अनेक महत्त्वपूर्ण चित्रामुळे पुस्तक समृद्ध झाले आहे. -ज्ञानेश्वर म. कुलकर्णी ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
स्मिता अंजनकर, ठाणे.

नुकतेच `छाटीतो गप्पा ` वाचण्यात आले. अतिशय सुरेख , खुसखुशीत, नर्म विनोदी लेखन आपल मन ताजेतवाने करण्यात यशस्वी झाले आहे.पुस्तक वाचून विदर्भातील संस्कृती, परंपरा आणि त्याची जपणूक करणारी माणसं नव्याने भेटतात. या सर्वांना विनोदाची दिलेली जोड खूपच सुरेख हे.आपल्या संग्रही असायलाच हवे असे पुस्तक आहे. पुनर्वाचनाचा मोह नक्कीच होणार.असेच लिहित रहा. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
विनोद कलंत्री, अमरावती

स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणाऱ्या आनंददायी लेखनाची अनुभूती - छाटितो गप्पा. ...... त्र्यंबकेश्वर - सप्तश्रृंगी च्या प्रवासाची शिदोरी म्हणून सोबतीला जी.बी.देशमुखांचे "छाटितो गप्पा" पुस्तक घेतले आणि प्रवास सुखकर झाला. "छाटितोगप्पां" मधील गप्पांमधे रमून सुखद आनंद प्राप्त झाला... एकाच पिढितील असल्यामुळे लेखकाच्या जागी क्षणो क्षणी स्वतःला बघत होतो कारण आमच्या पिढितील सर्वांचे बाप पुस्तकातील बापाप्रमाणे चीफ साहेबच होते आणि स्वाक्षरी करण्या पूरती शिक्षित असलेली मायाळू माय एमबीए (निरक्षर) होती तरी तिने वित्त, एच. आर. अशा प्रत्येक क्षेत्रात आचार्याची पदवीच जणू प्राप्त केली होती ....रात्री बेरात्री मित्र परिवाराला वाढून तृप्त करणाऱ्या माता आता इतिहासात जमा झाल्या... जीवनाचा सोपान चढत असताना वाटेत येणाऱ्या निर्जीव पात्रांनाही सजीव करण्याची किमया लेखकाने केली आहे . मग ते `गव्हातले खडे` का असेना....!!! जीवन प्रवासात लाभलेले मित्र ,सहकारी प्रत्येकाचा उल्लेख करत असताना त्यांच्या सोबत कधितरी आपलेही भेटीचे योग यावयास हवे होते असे कुतुहल मनात साहजिकच निर्माण झाले मग ....ते दहा रुपये देणारे बाबुराव काका असो की मनोहर रिक्षावाला ...आणि ती "जीबला"...अप्रतिम !!! अमरावतीच्या मणिबाई गुजराती हायस्कूल ह्या शाळेविषयी लिहताना पिंपळगावकर सर, अनगळ मॅडम , भगत सर एक एक करून दर्शन देऊन गेले. मैदानाच्या एका बाजूला गाड्या लावणारे मामु ,भाकऱ्या, मनुभाई , मोटू अशोक आणि क्राफ्ट च्या सरां सारखा दिसणारा भिडाणे खारमुरे वाला ..ही सर्व आमच्या साठी अविस्मरणीय पात्र आहेत . ज्या कारणासाठी अनगळ मॅडम आणि लेखकाला हॅट-ट्रिक पूर्ण करता आली तो प्रसंग देखील धमालच....!!! . आजोबांच्या सेवेसाठी लहानग्या नातवांमधे स्पर्धा ही भाग्यवानाच्या घरीच होऊ शकते ...हे संस्कार ज्याच्या घरात आहे तोच खरा श्रीमंत... तो प्रसंग वाचताना डोळे पाणावले.... आणखीन एक गोष्ट ... "मेरा नाम जोकर" च्या थर्मास चे मलाही फार आकर्षण होते ...!!! नागपुरच्या टिपिकल "च्य" पासून सुरु होणाऱ्या भाषेतून वऱ्हाडच्या "काऊन बे"च्या भाषेला स्पर्श करत थेट पुण्यातील वर्माजीच्या दुकानातील जिभेला कष्टप्रद अशा पुणेरी मराठीत रमत-गमत एक -एक दृश्य ज्या प्रकारे चित्रित केल्या गेले ते सरळ काळजात घर करून जाते ...."छाटितो गप्पा" च्या माध्यमातून पुनः पुन्हा अनुभवलेल्या जीवन यात्रेच्या प्रवासातील प्रसंग स्व. मधुकर केचे सरांच्या शब्दात सांगावे तर ....मी डोळे उघडून बघितले, मी डोळे ओले करूनही बघितले, डोळे पुसूनही बघत राहिलो, आणि डोळे बंद करून त्यात परत- परत रमत आहे.... शेवटी ...पन्नास- साठ च्या दशकातील जे आमच्या सारखे नमुने आहेत मग ते कोणत्याही ठिकाणचे असो, त्यांच्या साठी हे पुस्तक म्हणजे, काही पात्र बदलतील, एखाद दुसरी घटना पण बदलेल परंतु जीवन प्रवास हा सारखाच राहील..... वाचनीय, स्मृतिगंधाचा दरवळ पसरविणारे .....आनंददायी लेखन. लेखकाच्या सक्षम लेखणीस त्रिवार सलाम... अभिनंदन!!! ...Read more