* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SWAPNATIL CHANDANE
  • Availability : Available
  • ISBN : 9788177668025
  • Edition : 5
  • Publishing Year : DECEMBER 1973
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 76
  • Language : MARATHI
  • Category : HORROR & GHOST STORIES
  • Available in Combos :RATNAKAR MATKARI COMBO SET - 17 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
HE WAS JUST 20 YEARS OLD WHEN HE WROTE HIS FIRST FAIRY TALE, `THE FAIRY WITH GOLDEN MIND`. IT WAS ACTUALLY A LOVE STORY WRITTEN BY ONE YOUTH FOR ALL THE YOUNGSTERS. THEN HE KEPT ON WRITING ONE STORY AFTER ANOTHER, INITIALLY THEY ALL SOUNDED TO BE FAIRY TALES, BUT EACH ONE WAS A LOVE STORY, EACH HAVING A UNIQUE FLOW OF LANGUAGE, WITH A RHYTHM, WITH A CHIME, WITH SUCH A PICTURESQUE DESCRIPTION THAT EACH SOUNDED TO BE HAPPENING IN FRONT OF OUR VERY EYES, ROLLING FAST LIKE A MOVIE. SOME STORIES WERE A PERFECT COMBINATION OF LIGHT AND FIGURES. MATKARI`S WORDS POSSESS SUCH IMMENSE POWER. TRULY SPEAKING FAIRY TALES ARE NOT ONLY FOR THE CHILDREN, THEY ARE ACTUALLY MEANT FOR THE YOUNG MINDS. THOSE GROWNUP YOUNG MINDS WHO CAN FEEL THE POETIC ASPECT OF LIFE, WHO CAN SENSE THE BEAUTY AROUND, WHO WANT TO PURSUE THEIR DREAMS, WHO WANT TO COLOUR THE CANVAS OF THEIR LIVES WITH ALL THE SHADES OF SADNESS AND HAPPINESS IN PERFECT HARMONY. THIS FAIRY TALE WILL WORK AS LOVE POEMS FOR THOSE MINDS. LOVE POSSESSES DIVINE HAPPINESS, IT CARRIES THE IMMENSE PAIN OF SEPARATION. BUT LOVE IS MORE THAN THE HAPPINESS AND PAIN. IT IS BEYOND UNDERSTANDING. IT IS SACRIFICE, IT IS PAYING, IT IS CHANGING INSIDE OUT, IT IS A COLOURFUL EXISTENCE. EVERYONE WHO WAS IN LOVE, IS IN LOVE AND WILL BE IN LOVE MUST READ THESE STORIES. THESE ARE THE ONLY OF ITS TYPE WRITTEN BY MATKARI. HE NEVER HANDLED THIS FORM THEREAFTER. THESE STORIES ARE THE PROOF OF HIS SKILLS AS A ROMANTIC WRITER.
जेमतेम विशीचे असताना रत्नाकर मतकरींनी पहिली परिकथा लिहिली : ‘सोनेरी मनाची परी’ अर्थातच, ती प्रेमकथा होती. एका तरुणानं, सगळ्या तरुणांसाठी लिहिलेली. त्या पाठोपाठ आल्या, या संग्रहातल्या इतर परिकथा खरं तर प्रेमकथा. त्यांची कथनशैली अगदीच वेगळी. भाषा लयबद्ध, नादमधुर. इतकी चित्रदर्शी, की जसा एखादा गतीमान चित्रपटच आपल्या नजरेसमोर उलगडतोय. कुठं कुठं तर, छायाचित्रण केलेलं असावं तसं, छायाप्रकाश आणि आकृती यांचे खेळ दिसतात. ही किमया मतकरींच्या शब्दांची. परिकथा केवळ मुलांसाठी नसतात. जे मनानं तरुण आहेत, ज्यांना जीवनातलं काव्य जाणवतं, सौंदर्याचा शोध घ्यावासा वाटतो, सुखदु:खाच्या सर्व छटांमध्ये रंगावंसं वाटतं, त्या प्रौढांसाठी, या जणू कथारूपानं सांगितलेल्या कविता आहेत. प्रेमाविषयीच्या. प्रेमातला अत्युत्कट आनंद, विरहाच्या असह्य वेदना, यांच्याही पलीकडे जाऊन, प्रेमातला त्याग, प्रेमासाठी मोजावी लागणारी विंÂमत, प्रेमामुळे झालेले अंतर्बाह्य बदल, अशा सर्वच प्रेमरंगांची गाथा आहे ही. आज, काल वा उद्या, प्रेमात पडणाया प्रत्येकानं वाचल्याच पाहिजे, अशी या शैलीतल्या, या एवढ्याच कथा मतकरींनी लिहिल्या, आणि साचा मोडून टाकला. त्यांच्या एकूण लिखाणात असा दुसरा संग्रह नाही. एकूण मराठी वाङ्मयातच एकमेवाद्वितीय असा हा कथासंग्रह.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#RATNAKAR MATKARI #PARDESHI#ADAM # SWAPNATILCHANDANE #RANGANDHALA #SANDEH #PARDESHI #MRUTYUNJAYEE #NIRMANUSHYA#EK DIVAVIZTANA#SAMBHRAMACHYALATA #MEHTAPUBLISHINGHOUSE#HORROR STORIES#MARATHIBOOKS #रत्नाकर मतकरी #परदेशी
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA

    परीकथातून घडणाऱ्या वास्तवाचे दर्शन... रत्नाकर मतकरी यांनी १९५९ ते १९६४ च्या दरम्यान नऊ परीकथा लिहिल्या. या परीकथांचा संग्रह ‘सोनेरी मनाची परी’ या नावाने १९७३ साली निघाला. तो बरीच वर्षे दुर्मीळ होता. ‘स्वप्नातील चांदणे’ या नावाने त्याची नवी आवृत्ती नघाली आहे. मुखपृष्ठावर चंद्रमोहन कुलकर्णी यांचे स्वप्नातील चांदण्याच्या आल्हाददायक पार्श्वभूमीवरील ढगांमध्ये अधांतरी झेपावणाऱ्या, तरुण तरुणीचे आकर्षक रुपडे- यामुळे प्रथमदर्शनीच ते मनात भरते. ‘या परीकथा मी एका विशिष्ट भावस्थितीत लिहिल्या. तेव्हा मी नुकताच प्रेमात पडलो होतो. केवळ एका मुलीच्या नव्हे तर सबंध जीवनाच्या’ या प्रस्ताविकाच्या आरंभीच्या ओळींनीच या परीकथांची नजाकत काही आगळीवेगळी असणार, याची मनोमन ग्वाही मिळते आणि ‘सगळे आयुष्य समिधेसारखे जाळून टाकणारा कलंदर शायर उत्कटपणे शायरी करतो, आतडी पिळवटणाऱ्या व्यथेची गझल बनवतो, त्याक्षणी तो दु:खी नसतो, तर दु:खाची चव घेत असतो आणि या चव घेण्यातच त्याला आयुष्याचे समाधान सापडते’ हे निरीक्षण पुढे येते तेव्हा हॅन्स अँडरसनच्या स्वानुभवाधिष्ठित शोकात्म परीकथांच्या वळणावर जाणाऱ्या आशयगर्भ जीवनचिंतनाचीही डूबही या लिखाणाला मिळालेली असणार हे मनावर ठसते. अद्भुत वाटणारी परीकथाही शेवटी आयुष्याचीच कथा मांडते. आयुष्यात नेहमी आढळणारे सत्यच ती वेगळ्या शैलीत, वेगळ्या परिभाषेत मांडते, एक विशिष्ट वातावरण निर्माण करते. परीकथेत येणारी चेटकीण, राजाराणी, राजकन्या, पऱ्या, जादूगार ही पात्रे आपल्या अवतीभवती वावरणाऱ्या माणसांचीच प्रतीके असतात. अकारण प्रेम करणारी, दीनदुबळ्यांना निरपेक्ष मदत करणारी, उगाच दुष्टपणाने छळवाद मांडणारी ही पात्रे असतात. पण कधीं ती स्थलकालाच्या मर्यादा लीलया झुगारून देऊ शकतात. काही अलौकिक शक्ती वा सिद्धी त्यांना अवगत असतात, त्यामुळे नेहमीच्या वास्तवापलीकडच्या जगातही ती आपल्याला नेऊन आणतात. चांगले आणि वाईट, पाप आणि पुण्य यांच्यातील संघर्षाची वेगवेगळी रूपे कधी सूक्ष्म, तर कधी अतिरंजित परिप्रेक्ष्यातून दाखवतात. बालपणी वाचलेल्या परीकथा आयुष्यभर वेगवेगळ्या टप्प्यावर नवनवा आशय-संदेश-अर्थ देत पुन:पुन्हा आपल्या जीवनात डोकावत राहतात. मतकरींच्या या परीकथा प्रौढांसाठी आहेत. स्त्री-पुरुष आकर्षणाची वेगवेगळी रूपे त्या दर्शवतात. आणि त्यातील अपरिहार्य ताटातूटही विशाल सहानुभूतीने, सौहार्दाने विश्वात्मक पातळीवर नेऊन ठेवतात. त्यांच्या कल्पनाशक्तीला आणि काव्यात्मक शैलीला या परीकथांमध्ये मुक्त, स्वैर संचार करायला पूर्ण मोकळीक मिळालेली आहे. ‘जादूचे फुलपाखरू’ मधील एक लहानशीच सुंदर मुलगी... तिच्या डोळ्यांमध्ये दोन छोटुकल्या चांदण्या वस्तीला येतात. तिच्या उरात एक किरमिजी सुरवटही राहते... वाळूतून पळून आल्यावर समुद्राच्या पाण्यातून एक सुंदर पुरुष तिच्यासमोर हसत उभा राहतो... आणि तिच्या त्या चिमुकल्या किरमिजी सुरवंटाचे सोनेरी फुलपाखरू होऊन फडफडू लागते. ते फुलपाखरू वेळीअवेळी तिच्या स्वप्नात शिरते... तिच्या अंगाखांद्यावर बागडते. ती कॉलेजात जाते तेव्हा वर्गात प्राध्यापक बालकवीची पारव्याची कविता ‘जड उदास लयीत’ रुक्ष करड्या सुरात’ शिकवतात. त्याचप्रमाणे त्यांना फुलराणी कधी नीट शिकवता येत नाही. तिचे लक्ष तुळईवर बसून घुमणाऱ्या पारव्यांच्या जोडीच्या प्रणयाकडे जाते... पर्समधील पत्र वाचताना, तिच्या चेहऱ्यावर हसू फुटते... प्राध्यापक संतापाने लाल होतात, तिच्या बाकाजवळ येऊन ते पत्र ओढून घेतात... फाडून फेकून देतात... तिला रडू फुटते... प्राध्यापक घरी येतात... एक सोनेरी फुलपाखरू खिडकीतून आत येते... खिडकीतून प्राध्यापकांना एक गुलाबी ढग दिसतो. त्यातून ओळखीचा एक सुंदर चेहरा दिसतो... एवढ्यात वर्गातली ती प्रेमपत्र वाचणारी मुलगी दारात उभी असल्याचे त्यांना दिसते. ते क्षणभर बावरतात... घाबरतात. पण ती म्हणते, ‘अय्या, तुमच्या खिडकीतल्या पांगाऱ्याला बहर आला.’ प्राध्यापकांना तो गुलाबी ढग आता सोनेरी दिसू लागतो. आपण फुलराणी शिकवू शकू असे त्यांना वाटते. प्राध्यापकांच्या खोलीत तिचे सोनेरी फुलपाखरू नाचू बागडू लागते. ती त्यांची खोली आवरते. हंगामात मोहोर परत यावा तशी आपली हरवलेली वर्षे परत आलीय, असे प्राध्यापकांना वाटते. ते विचारतात, ‘ही जादू तू कुठे शिकलीस?’ ती म्हणते, ‘हे फुलपाखरू... जादूचे... त्याने केली ही सगळी जादू.’ ‘मला देशील तुझे फुलपाखरू? त्याची मला गरज आहे... मी एकटा आहे.’ ‘हे फुलपाखरू माझे नाही... मावळतीला सागरतीरवर भेटलेल्या तरूणाचे आहे... ते कुणाला देता येणार नाही.’ ती जाते... फुलपाखरूही जाते... खिडकीतून दिसणारा सोनेरी ढग किरमिजी होतो-काळा होतो. पांगाऱ्याचा बहर ओसरतो. फुलराणीची कविता प्राध्यापकांना कधीच नीट शिकविता येत नाही. स्वप्नातील चांदणेमधील राजकन्येच्या जन्मवेळी पऱ्या लक्षावधी विलक्षण स्वप्नांचा चुरा करून उधळतात... ती मोठी होते तसतशी तिची स्वप्ने वाढत जातात. ती वयात येते. तिचे मन शरीरात मावेनासे होणे. रूप लखलखू लागते. चित्त दशदिशांना उडू लागते. तिची सप्तरंगी स्वप्ने तारूण्याचे गूढ मंत्र तिच्या कानात गुणगुणत राहतात... एकदा ती रात्री मिटलेल्या डोळ्यांनी महालाबाहेर पडते. मुख्य दरवाज्याशी शस्त्रधारी पहारेकरी असतो. त्याच्या गळ्यात ती हात घालते. त्याच्या रूंद छातीवरच रेशमी केसांचे डोके ठेवून गाढ झोपी जाते... तो तिला जागे करतो. ती काळेभोर डोळे उघडते. ‘तू माझा आहेस’ म्हणून ती परत झोपी जाते... पहाटे परत ती आपल्या महालात जाते. पांघरूण लपेटून शांत झोपते... रात्रीचे तिला सर्व आठवते. पण समजत नाही... काल रात्री आपल्याला अद्भुत स्वप्न पडले... असे तिला वाटते. ... अशा अनेकरात्री येतात...जातात... स्वप्न अधिक गहिरे होत जाते. पुढे राजा तिचे लग्न ठरवतो. ती म्हणते, ‘माझे लग्न ठरले आहे. करीन लग्न तर त्या माझ्या मनातल्या तरूणाशीच.’ ‘कुठे आहे तो?’ ‘माझ्या स्वप्नात.’ ‘स्वप्नातला तरूण आणायचा कसा? तुझे लग्न लावायचे कसे?’ राजा विचारतो. ‘मग मी तशीच राहीन. एवढे मोठे सम्राट म्हणवता. माझ्या स्वप्नातला तरूण सापडत नाही?’ ती आजारी पडते. खंगू लागते. पहारेकरी अस्वस्थ होतो. तो अवलियाचा पोशाख करून राजाकडे जातो. ‘मी राजकन्येचे दुखणे दूर करीन.’ तो राजकन्येच्या महालात जातो... ‘राजकन्ये, डोळे उघड.’ ती आवाज ओळखते. डोळे उघडते. तो तिला सांगतो, ‘तू प्रेम केलेस खरे, पण ते प्रेम राहिले अंतराळी. तू राहिलीस भूमीवर स्वप्नातून जागी हो, जे अनुभवलेस ते विसरून जा. माझं ऐक. तिन्ही त्रिकाळ चांदणे खरे, पण तुला थोडे ऊन हवे. थोडी सावली हवी.’ तो एवढे सांगून महालाबाहेर पडतो. राज्य सोडून जायचे ठरवतो. राजकन्या स्वप्नातून जागी होते. तोच तो... ती ताडकन उठते. राजवाड्याच्या चौकीपहाऱ्यावर येते. तो तिथे नसतो ती पहारेकऱ्याच्या मागावर निघते... दासी तिला थोपवतात. शिपाई अडवतात... तो तिला दिसतो. धर्मशाळेत... ती त्याला बघते. घट्ट मिठी मारते. तो अजूनही स्वप्नात असतो. ती संपूर्ण जागी असते. प्रेमकथाच, पण ती परीकथेच्या रुपात अशा काव्यात्म पातळीवर पेश केली गेली की, तिची आवाहकता झपाटून टाकते. वाचकांवर गारूड करते. ‘कुंभ’मध्ये वयात आलेल्या शांतीला होणारी स्पर्शांची जाणीव त्याची अपूर्वाई आणि नवऱ्याला जवळ घेण्याची तिला वाटणारी ओढ यांचे चित्रण केले गेले आहे. ‘दोऱ्यांच्या बाजेशीच त्याने तिला गाठले. आणि तोल जात ती दोघेही बाजेवर कोसळली. सकाळ झाली तेव्हा त्याला काहीतरी वेगळे वाटत होते. खूप हुशारी वाटत होती. एकदम नवा साक्षात्कार व्हावा तसे झाले होते. इतके दिवस आपण असे वागत नव्हतो हा किती वेडेपणा झाला...’ अशासूचक, संयमित निवेदनातून या नवदांपत्याच्या पहिल्यावहिल्या मीलनाची नवलाई पकडली आहे. ‘प्रेमातला अत्युंत्कट आनंद, विराहाच्या असह्य वेदना यांच्याही पलीकडे जाऊन प्रेमातला त्याग, प्रेमासाठी मोजावी लागणारी किंमत, प्रेमामुळे झालेले अंतर्बाह्य बदल अशा सर्वच प्रेमरंगाची गाथा म्हणून हे पुस्तक सौंदर्यवादी रसिकाला गुदगुदल्या करीत राहील. अद्भुताचे मायाजाल दाखवणाऱ्या या कथावास्तवाचे वास्तवही प्रकट करतात. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 22-04-2007

    कथाकार, नाटककार ललित लेखक असणारे रत्नाकर मतकरी यांच्या तारुण्यात त्यांनी पहिली परिकथा लिहिली. ‘सोनेरी मनाची परी’ असे त्या कथेचे नाव होते. या संग्रहातील कथा या त्याच वाटेवरून जातात. परिकथा, प्रेमकथा, स्वप्नकथा, शृंगारकथा, प्रौढकथा असे काहीसे याचे एकूणस्वरूप. सत्यकथा व वीणा मासिकात यापूर्वी सर्व कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. जादूचे फुलपाखरू, दुखऱ्या गुडघ्याची गोष्ट, स्वप्नातील चांदणे, फाटक्या कपड्यातील राजकन्या, लाकडातील चेहरा, वनराणी आणि फूल, कुंभा, कवीची प्रिया, सोनेरी मनाची परी या त्या कथा. चंद्रमोहन कुलकर्णी या रेखाटन व मांडणीतज्ज्ञांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. त्यांनी कल्पकता दाखविल्याने पुस्तक देखणे झाले आहे. मुखपृष्ठ हे कथांप्रमाणे नाजूक आहे. -संजय बोरीकर ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more